अजाणता !

चाफा's picture
चाफा in जनातलं, मनातलं
29 Oct 2008 - 11:03 pm

वैतागुन समिधाने हातातली डिझाईन्सची वही बेडवर टाकली. पुन्हा पुन्हा मन लाउन काढलेल्या तिच्या डिझाईन्स आत्ता तिला फ़ारच टाकावू वाटत होत्या, उद्याच तिला एका लग्नाच्या मेहंदीची ऑर्डर होती आणि तिच्याकडे अजुनही ज्या साठी ती ईतकी प्रसिध्द होती तश्या आगळ्यावेगळ्या डिझाईन्स नव्हत्या. तिच्या अप्रतिम डिझाईन्समुळेच तर ती नावा रुपाला आली होती, मोठ्या मोठ्या लग्नाच्या ऑर्डर तिला मिळत होत्या. पैसा ही महत्वाची बाब होतीच पण आता तिला प्रसिध्दीही मिळत होती. रात्र रात्र जागुन ती मेहंदीच्या डिझाईन्स तयार करत असे दिवसभरात पाहीलेल्या सगळ्या वस्तु तिच्या डोळ्यासमोरुन झळकुन जात असत आगदी एखाद्या पडद्यावरची नक्षी असो किंवा खिडकीवर बसवलेली ग्रिल, या सगळ्यातुन तिला आपसुकच काहीतरी सुत्र सापडायचे आणि सुंदर डिझाईन्स चटाचट वहीवर चितारल्या जायच्या. पण कुणासठाउक का आजकाल तिला त्यात समाधान वाटत नव्हते तिला आणखी काहीतरी नविन हवे होते काहीतरी नविन, जे एकदम वेगळे असेल या आधी कुणाच्या हातावर उमटले नसेल असे काहीतरी नवे. आपल्या बॉब केलेल्या केसांतुन हात फ़िरवत ती बेडवर पडून राहीली ही तिची विचारात असल्याची नेहमीची मुद्रा, बराचवेळ असाच गेल्यावर ती किचनमधे गेली आणि मस्तपैकी कॉफ़ी तयार करुन मग भरुन पुन्हा गॅलरीत जाउन विचार करत राहीली. विचार करुन करुन डोके दुखायची वेळ आली पण काही नवे असे सुचायला तयार नव्हते. शेवटी कंटाळून ती उठली तेंव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते किचनमध्ये जाउन काही करायचा कंटाळा आला होता आणि भुक तर ठार मेली होती तिने सरळ बेडरुमचा रस्ता धरला आणि बेडवर अंग झोकुन दिले.

संपुर्ण दुसरा दिवस जरा गडबडीतच गेला तहे तर्‍हेच्या हातांवर तितक्याच तर्‍हेवाईक स्वभावाच्या स्त्रियांसह मेहंदी काढताना समिधा थकुन गेली होती, दिवस हां हां म्हणता पसार होवुन गेला आणि रात्र आपले पदर उलगडत अवतरली. घरी जाताना तिच्या मनात दिवसभर ऐकलेल्या बायकांच्या कौतुकाच्या शब्दांची आठवण येउन तिला एकदम मस्त फ़िलींग येत होते. त्यात स्कुटीवरुन जाताना गालांशी,केसांशी लडीवाळपणे खेळुन जाणारा वारा तिला आणखी सुखावत होता. पण....... अचानक तिला आपल्या डिझाईन्सवर केलेली नवरीच्या मोठ्या बहीणीने केलेली टिका आठवली आणि दुधात मिठाचा खडा पडावा तसा तिच्या मनातला उत्साह मावळला " अय्या अशीच मेंदी तुम्ही माझ्या मैत्रीणीच्या लग्नातही तिच्या हातावर काढली होती, तुमच्याकडे लेटेस्ट डिझाईन्स नाहीत का हो?" किती उपहास भरला होता तिच्या बोलण्यात! तिच्या आठवणीनेच समिधाच्या मनात पुन्हा कालचेच विचार थैमान घालु लागले. " शी! आपल्याला झालय काय? नविन डिझाईन्स सुचत का नाहीयेत?" मनातल्या मनात ती स्वःतावरच चरफ़डली. विचारांच्या गोंधळात घर कधी आले तेही तिला कळले नाही. उदासवाण्या मुडमधेच ती घरात शिरली. आपली नेहमीची सवय म्हणुन तिने फ़ोनवर कुणाचे मेसेज ठेवले आहेत का ते तपासुन पहाण्यासाठी आन्सरींग मशीनचे बटण दाबले. समिधा कधीच आपला मोबाईल नंबर कुणाला देत नसे कारण तिचे बरेचसे फ़ोन तिच्या कामासंदर्भातच असत त्यात अर्जंसी असण्याचे काही कारण नसायचेच. खरंतरं तिला आता कुणाचीच ऑर्डर घ्याविशी वाटत नव्हती, सगळ्यांना नकार द्यायचा असे ठरवुन ती मेसेज ऐकु लागली. दोन-चार मेसेज ऐकल्यावर जो आवाज तिला ऐकु आला त्यामुळे तिचा हा निश्चय पार ढासळला, दिपीका, तिची जिवाभावाची एकुलती एक मैत्रीण बोलत होती. समिधाला तश्या फ़ारश्या मैत्रीणी नव्हत्याच आणि त्यातही दिपिका ही तिची आगदी जवळची मैत्रीण होती. दिवसभर कामात उगीच डीस्टर्ब नको म्हणून समिधाने मोबाईल बंद करुन ठेवला होता त्यामुळे दिपिकाला घरी मेसेज टाकावा लागला असणार. मेसेज संपल्याचा बिप ऐकल्यावर ती भानावर आली आणि दिपिकाचा मेसेज पुन्हा ऐकला, तिच्या चुलत बहीणीचे लग्न होते म्हणुन ती समिधाला येणार का म्हणुन विचारत होती. लग्न पुढच्या आठवड्यात होते तिने आपली डायरी तपासली पुढच्या आठवड्यात एकही अपॉइंट्मेंट नव्हती समिधाने पटकन दिपिकाचा मोबाईल नंबर फ़िरवला.....!

दिपाच्या गावाला कोकणात येउन समिधाला खुप बरे वाटत होते ती शहरातली दगदग नाही कामाचं टेंशन नाही मुख्य म्हणजे तिला त्रास देणारा तो प्रश्नही नव्हता लग्नाचे दिवस आगदी मजेत सरले ईथे तिच्या डिझाइन्स कुणाला जुन्या वाटत नव्हत्या तिच्या मेहंदी काढण्यावर सगळेच महीला मंडळ खुश दिसत होते त्यामुळे तिलाही कुठेतरी समाधान वाटत होते.

लग्न आटोपले नवरी आपल्या सासरी निघुन गेली आता घरात एकंदरीत वातावरण शांत होते. आज प्रथमच समिधाला दिपीकाचे घर संपुर्ण पहाता येणार होते. दिपीकाचे घर म्हणजे भला मोठा वाडा होता, अनेक खोल्या त्यांचा वापर कमी असेल पण साफ़सुफ़ होत्या पहील्या मजल्या पेक्षा दुसर्‍या मजल्यावर खोल्या कमीच होत्या पण एक मोठी खोली आणि संपुर्ण पुस्तकांनी भरलेली समिधाला आश्चर्य वाटल्याशीवाय राहीले नाही, " ही आमच्या आजोबांची खोली ते गेल्यापासुन आम्ही तशीच सांभळून ठेवलेय, इथली सफ़ाइ फ़क्त घरातली माणसेच करतात कारण आजोबा त्यांच्या काळातले........... नको तु विश्वास ठेवायची नाहीस"
"अगं पण का विश्वास न ठेवायला झालेय काय?"
काही नाही ग आजोबा त्यांच्या काळातले मोठे मांत्रीक होते मी लहान असतानाच गेले ते पण लोकांमधे आजही त्यांच्या नावाचा दबदबा आहे". समिधाला मनोमन हसुच आले पण दिपासमोर हसणे म्हणजे योग्य वटले नसते. म्हणुन विषय बदलायचा म्हणुन तिने आजुबाजुला दिसणार्‍या पुस्तकांची चौकशी केली पण दिपाला त्यातले काहीही माहीत नव्हते इतक्यात दिपाला खालुन कुणीतरी हाक मारली " तु इथेच थांब मी आलेच इतक्यात" दिपा निघताना म्हणाली. थोडावेळ असाच एकाजागी उभे राहुन गेला पण मग समिधाला कंटाळा आला आणि तिने समोरच्या रॅकमधले एक पुस्तक काढले आणि चाळायला सुरुवात केली भाषा अगम्य होती त्यामुळे फ़क्त पाने उलटण्याचाच चाळा चालु होता अचानक तिला एका पानवर सुंदर नक्षी दिसली इतका सुंदर पॅटर्न तिने आजपर्यंत पाहीला नव्हता. आता तिच्यातली प्रोफ़ेशनल डिझाइनर जागी झाली चटकन तिने आपल्या हातरुमालावर ती नक्षी उतरवुन घेतली. पुढची पाने उलटताना तिच्या लक्षात आले की या पुस्तकात आणखी अनेक सुंदर आर्टवर्क आहे मग अखेरचा उपाय म्हणुन तिने ते पुस्तकच बरोबर घेतले आणि खाली आपल्या खोलीकडे आली. वेळ मिळेल तशी ती त्या पुस्तकातल्या डीझाईन्स आपल्या वहीत उतरवित होती सगळ्या डिझाईन्स उतरवुन झाल्यावर तिने पुस्तक पुन्हा जागेवर नेउन ठेवले. आता तिला तिचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळाल्या सारखा झाला पुन्हा आपल्या घरी जाउन आपल्या कामात गुरफ़टून जावेसे वाटायला लागले. या तिच्या अंतरीक ओढीने तिचा दिपाकडचा मुक्काम तिने लवकरच आटोपता घेतला आणि आपल्या घरी पुन्हा नव्या जोमाने परतली. आता तिच्याकडे पुन्हा नवी डीझाईन्स होती तिला आता पुन्हा कुणी नाक मुरडणार नव्हते.

लग्नाचा सिझन चालु असल्याने तिची अनेक ठीकाणी वाट पाहील्या जात होती. समिधानेही कुणाला नाराज केले नाही, आपल्या ताज्या डीझाईन्सचा मात्र तिने हात राखुनच वापर केला. शेवटी त्या डीझाइन्सही कधी ना कधी संपणार होत्याच. एकटी वधु तिच्या नविनतम डीझाईन्स हातावर मिरवत होती. त्या डीझाईन्सने समिधाची चर्चा पुन्हा एकदा थोरामोठ्यांच्यात सुरु होणार होती. समिधाला आता भरुन पावल्या सारखे वाटत होते.

........ पण, हा आनंद फ़ार काळ टीकला नाही नविन लग्न झालेले जोडपे हनिमुनला जात असताना गाडीला अपघात झाला आणि त्यात नववधु दगावली. बातमी कळताच तिला दुख झालेच पण ज्याचे त्याचे नशीब!. पुढच्या आठ दिवसात तिला मान वर करायला फ़ुरसत नव्हती ईतक्या ऑर्डर होत्या पण तिने एक गोष्ट मात्र काटेकोरपणे पाळली की आपल्या नव्या डीझाईन्स ती फ़क्त वधुच्याच हातावर काढत असे. समिधा कामात व्यग्र होत चालली होती आणि तिकडे काळचक्र आपले काम करत होते.

दिवसा मागुन रात्री जात होत्या. एक सकाळ उगवली ती एक भयावह बातमी घेउनच तिने मेहंदी काढलेल्या सगळ्या वधु एकाच रात्रीत कुठल्या ना कुठल्या अपघातात ठार झाल्या होत्या. अपवाद फ़क्त एकच होती. पोलीस चौकशीत काहीही वेगळे निष्पन्न झाले नव्हते पण या योगायोगाकडे बाकी स्त्रियांचे लक्ष गेले नसते तरच नवल. आता समिधाच्या नावाची कुजबुज सुरु झाली होती. कारण सगळ्या बाबतीत एकच बाब कॉमन होती ती म्हणजे समिधाची मेहंदी. लोक आगदी कितीही आव आणला तरी भुत-प्रेत करणी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतच असतात फ़क्त चारचौघात बोलत नाहीत इतकेच. त्यामुळे या सगळ्या दुर्दैवी घटनांमागे समिधाची मेहंदी काढणे काहीतरी अपशकुनी असावे असा तर्क सुरु झाला अर्थात तिच्या कॉपीटीटर्सना हा समज पसरवायला आनंदच वाटत होता. प्रथम समिधा याकडे दुर्लक्ष करत असे, पण हळूहळू तिलाही याच काळजीने वेढले शेवटी हा प्रश्न तिच्या करीयर समोर आडवा येउ पहात होता. पण तिच्या हाती करण्यासारखे कुठे काय होते? अखेरीस तिला दिपाची आठवण झाली कदाचीत या संकटात ती काही मदत करु शकेल! तिने दिपाला फ़ोन लावला आणि आपली चिंता तिच्यासमोर मांडली, हे सारं दिपाच्याही कानावर आले होतेच. पण दिपाही या बाबतीत हतबध्द होती, अखेर दिपाच्या वडिलांकडे कदाचीत काही माहीती मिळू शकली असती म्हणुन दोघीही शक्य तितक्या घाईत दिपाच्या गावी निघाल्या..........

" तु फ़ार मोठी चुक केली आहेस" दिपाचे वडील समिधाला म्हणत होते. दिपाच्या वडीलांना त्या नववधुंच्या आकाली मरणाची माहीती देताच त्यांनी पहीला प्रश्न विचारला तो त्यांच्या वडीलांच्या खोली बद्दल समिधाने तिथल्या काही वस्तुंशी छेडछाड तर केली नाही ना? हे त्यांना जाणुन घ्यायचे होते. समिधाने त्या पुस्तका बद्दल, त्यातल्या त्या सुंदर डिझाईन्सच्या कॉपी बद्दल सगळे काही न वगळता सांगुन टाकले. ताबडतोब दिपाच्या बाबांनी समिधा बरोबर जाउन ते पुस्तक शोधुन काढले आणि त्यातल्या त्या आकृत्या पहाताना त्यांच्या चेहर्‍यावर भयाच्या रेषा उमटलेल्या स्पष्ट दिसत होत्या सगळे पुस्तक चाळून पाहील्यावर ते समिधाला म्हणत होते " ही तु फ़ार मोठी चुक केलीस". माझ्या वडीलांची ख्याती तुला कदाचीत दिपाने सांगीतली असेल आजच्या काळात विश्वास न बसणार्‍या गोष्टी आहेत या पण त्या सत्य आहेत" थोडावेळ थांबुन सुस्कारा टाकत ते पुढे म्हणाले " जगात आपल्या कल्पनेच्या बाहेर आपल्या पंचेंद्रीयांच्या क्षमते पलीकडे काही आहे. पॅरानॅचरल असे काहीतरी आहे हे आज शास्त्रही मान्य करते माझे वडील त्याचेच एक आभ्यासक होते त्यांचा आभ्यास या बाबतीत दांडगा होता मला त्यातले फ़ार काही कळत नाही पण त्यांच्या सानिध्यात राहील्याने थोडीबहूत माहीती आहे".
" पण असे भयानक आहे तरी काय या डीझाईन्स मधे?" समिधाला आता रहावत नव्हते.
" या आकृत्या म्हणजे साक्षात मृत्युला आमंत्रण आहे. यातली कुठलीही आकृती शरीराच्या सरळ संपर्कात येत असली तर ताबडतोब येणार्‍या आमावास्येला ती धारण करणार्‍या व्यक्तीचा मृत्यु निश्चीत होतो. तु पुन्हा त्या अपघातांच्या तारखा आठवुन पहा त्या दिवशी आमावास्याच असेल" चेहर्‍यावरचा घाम टिपत दिपाचे बाबा म्हणाले.
" एके काळी आपल्या शत्रुंचा असा अकाली मृत्यु घडवण्यासाठी या प्रकारच्या आकृत्यांचा वापर करत असत, कदाचीत आजही करत असतील!"
" पण या निर्जीव रेषा माणसाच्या मृत्युला कारणीभुत कशा ठरतील?" बराच वेळ मनात टोचत असलेला प्रश्न समिधाने विचरुन टाकला.
" या नुसत्या रेषा नाहीत तर त्यात एक अर्थ आहे आपण कुठल्याही शुभ कार्याच्या वेळी नाही का स्वस्तीकाचे चिन्ह काढत? त्याही रेषाच ना? पण ते मांगल्याचे प्रतीक आहे शुभ शक्तींना आवाहन आहे जर शुभ शक्ती अश्या रेखाकृतीने आवाहीत करता येत असतील तर वाईट शक्तींना तसेच आवाहन करता येणार नाही का? त्या साठी या रेखाकृतींचा वापर केला जात होता."
" पण माझ्याकडे तर या आकृती गेले बरेच दिवस आहेत! मग माझ्यावर काही वाईट प्रसंग का नाही आला?" समिधाने छळणारा दुसरा प्रश्नही विचारुन टाकला.
"तुझ्याकडे त्या आकृती आहेत पण त्या तुझ्या वहीत कैद आहेत मी सांगीतल्या प्रमाणे शरीराशी सरळ संपर्कात नाहीत त्यामुळे तु बचावलीस" दिपाच्या बाबांनी खुलासा केला. " तुला त्या वहीचा ताबडतोब नाश केला पाहीजे अग्नी हा सर्वात पवित्र मानला जातो तु तुझी ती वही अग्नीच्या स्वाधीन कर तीही लवकरात लवकर".

मनात मणामणाचे ओझे घेउन समिधा आपल्या शहरात परतली. त्या तथाकथीत डीझाईन्स बद्दल ईतके सारे ऐकल्यावर तिला दिपाच्या घरी रहावले नाही म्हणुन ती ताबडतोबच निघाली घरी येउन तिने आपली वही उचलली खरी पण आपल्या हाताने तिला आपल्या डीझाइन्सला काडी लावणे शक्य होईना म्हणुन तिने शेवटी ति वही पाण्यात विसर्जन करायचे ठरवले. गाडी स्टार्ट करुन ती जवळच्या नदीवरच्या पुलाकडे निघाली, एव्हाना करकरीत संध्याकाळ झाली होती. पुलापर्यंत पोहोचेस्तोवर तिचे अंग घामाने डबडबले. पुलाच्या काठाजवळ गाडी थांबवुन तिने पर्स मधुन रुमाल काढून चेहरा पुसला, आणि मन घट्ट करण्यासाठी थोडी थांबली. मनातल्या द्वंद्वात ती ईतकी हरवली की रस्त्याच्या मध्यभागी पोहोचल्याचे तिच्या लक्षातही आले नाही. भरधाव वेगाने येणार्‍या त्या टेंपोच्या ड्रायव्हरच्याही ते लक्षात यायला उशीरच झाला आणि.........................................! जगातली शेवटची जाणीव संपताना समिधाच्या डोळ्यासमोर एकही चांदणी नसलेले काळेकुट्ट आभाळ आले आणि दुसर्‍या हातातल्या त्या पुस्तकातुन घाईघाईत उतरवुन घेतलेली डीझाईन असलेल्या रुमालाकडे पहात असताना तिने जाणीवेच्या कक्षा पार केल्या.

पुलावर झालेल्या अपघाताकडे लोटलेल्या गर्दीत ती तरुणी आपल्या हातातली वही पुन्हा पुन्हा उघडून पहात होती ही वही तिला आत्ताच रस्त्यावर सापडली होती आणि त्यातल्या त्या अप्रतीम नक्षीकामाने ती भारावुन गेली होती. या डीझाईन्स मेहंदीसाठी वापरायला कीती छान आहेत. तिच्या मनात विचार डोकावुन गेला. घाईने ती वही आपल्या छातीशी कवटाळत तिने गर्दीतुन पाय मागे घेतला.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

रामदास's picture

29 Oct 2008 - 11:30 pm | रामदास

खरी अस्सल भयकथा !

रेवती's picture

29 Oct 2008 - 11:37 pm | रेवती

छान उतरलीये.
बाकी अस्मादिक भित्रीभागुबाई असल्याने फारच घाबरले हे सांगायला नकोच.
एकदम हॅलोविनिय कथा आहे.

रेवती

टारझन's picture

30 Oct 2008 - 12:11 am | टारझन

मस्त लिहितोस रे चाफ्या ... कथा आवडली ... अजुन येउन देत .. आपण तुझा फॅन आजपासनं

अवांतर : तु प्रोफेशनल मांत्रिक नाहीस ना ? इथे ऍड केलीतर पहा

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
बघता काय सामिल व्हा

मूखदूर्बळ's picture

30 Oct 2008 - 12:22 am | मूखदूर्बळ

अफलातून कथा :)
जबरदस्त :)

भयकथा आवडली. :)

मनीषा's picture

30 Oct 2008 - 10:15 am | मनीषा

आवडली ...

विजुभाऊ's picture

30 Oct 2008 - 10:57 am | विजुभाऊ

चाफा तुझ्या ल्हिण्याच्या श्टाइल वरुन आत्ता समजले . मला मायबोलीवरची टेलीफोनची कथाहीखूप आवडली होती.
असाच लिहीत रहा .

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

अभिरत भिरभि-या's picture

30 Oct 2008 - 11:58 am | अभिरत भिरभि-या

सुरेख कथा.

लग्नाचा सिझन चालु असल्याने तिची अनेक ठिकाणी वाट पाहील्या जात होती. हे खरे वाट पाहिली जात होती असे हवे होते. "अनेक ठिकाणी" वापरल्यामुळे मुळातच अनेकवचन अभिप्रेत आहेच.

कथा खरोखर सुरेख आहे. अजुन येऊ देत :)

भास्कर केन्डे's picture

31 Oct 2008 - 8:55 pm | भास्कर केन्डे

कथा खरेच सुरेख आहे. मजा आली वाचून. आजपासून आपण पण तुमचा पंखा.

एक छोटासा सल्ला... "कॉपीटीटर्सन", "बेड" सारख्या इंग्रजी शब्दांऐवजी "स्पर्धक", "पलंग्/बिछाना/आंथरुन" सारखे साधे सोपे मरठी शब्दही उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करु शकलात तर लेखन आणखी जास्त परिपक्व होईल असे वाटते.

"वाहिल्या जात होती"... काय हो चाफेकर, तुम्ही विदर्भातले का? :)

आपला,
(वाचक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अनिल हटेला's picture

30 Oct 2008 - 12:09 pm | अनिल हटेला

आवडली !!!!

अजुनही येउ देत !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अत्तु's picture

20 Mar 2009 - 4:13 pm | अत्तु

छान आहे. जुन्या मायबोलीवर वाचल्याचं आठवतय.

नरेश_'s picture

20 Mar 2009 - 5:32 pm | नरेश_

पण दंतकथा वगैरे आहे का ? पार्श्वभूमीबद्दल विस्ताराने सांगितल्यास बरे होईल.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Mar 2009 - 6:04 pm | घाशीराम कोतवाल १.२

जबर्‍या चाफ्या जबर्‍या

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

ढ's picture

20 Mar 2009 - 6:21 pm |

भयकथा छानच.
अजुन वाचायला आवडेल आपलं लिखाण.

प्राजु's picture

20 Mar 2009 - 7:21 pm | प्राजु

आवडली कथा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

20 Mar 2009 - 7:28 pm | लिखाळ

छान कथा .. आवडली.
-- लिखाळ.

विनायक पाचलग's picture

20 Mar 2009 - 11:24 pm | विनायक पाचलग

लय भारी शंभर नंबरी
मला पण पार्श्वभुमीविषयी उत्सुकता वाटत आहे

When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES

विनायक पाचलग

समिधा's picture

20 Mar 2009 - 11:38 pm | समिधा

मस्त कथा, आवडली.