फ्रायडे नाईट

लौंगी मिरची's picture
लौंगी मिरची in जनातलं, मनातलं
6 Sep 2018 - 7:10 pm

शुक्रवार आला कि अगदि सकाळपासुनच ह्याची तयारी चालु असते . सगळ्यात पहिली स्टेप माझी मानसिक तयारी करणे , जी लवकर होत नै . मी फारच आढेवेढे घेते , तो तेवढावेळ माझ्या मागेपूढे गोंडा घोळत असतो . सकाळपासुनच “ आज जरा रीलॅक्स व्हायचय , खुप काम केलं आठवडाभर “ . मी गप्प . परत एक दिड तासांनी ,“ थोडेसे हात पाय दाबुन देतेस का , नैतं तो पेन रीलिफ स्प्रे मारुन दे पाठीवर “ . मी गप्प .
मग अजुन थोडा वेळ वाट बघुन ,“ आज रात्री तु मस्त चिकनचा रस्सा बनव , अगदि सेम तुझ्या आई सारखा “ ह्यावर मी फक्त “ ह्म्म “ एवढं बोलते .
आजकाल त्याने जास्त युक्त्या काढल्यात . उगाच नॉस्टॅल्जीक व्हायचं , जुन्या मित्रांच्यात मी कसा जॉली होतो ते सांगायचं , ऑफीसच्या कामाने मी किती त्रासलोय ते दाखवायचं . एरवी दिवसातुन मोजुन पन्नास शब्द ( कुटूंबासोबत ) बोलनारा माणुस शुक्रवारी मात्र हजाराच्या आसपास शब्द वापरुन बोलतो , फार कौतुक वाटतं मग मलाही .
आठवडाभर ऑफीसमधुन साधा एकहि फोन न करणारा माणुस , शुक्रवारी मात्र चार ते पाच वेळा कॉल करतो , फारच गोड गोड बोलतो .
मस्क्यावर मस्का लावतो . सगळं कळत असतं मला पण मी एकदम अनभिज्ञ असल्यासारखं वावरते .
फायनली संध्याकाळ होते आणि घरी आल्यावर त्याचे प्रयत्न जोर धरु लागतात . सारखं सारखं किचन मध्ये येणं , उगाच फिल्टर भरणं , टेबल वर प्लेट्स लावणं , ओह्ह माय गॉड . रोज लॅपटॉपवरुन ऊठुन टेबलावर जेवायला येणारा प्राणी ज्याला ताटात काय असणारे याची साधीशी भणकहि नसते तो दर फ्रायडे नाइटला बायकोला कसला भारी मस्का मारतो हे कोणाला जर पहायचं असेल तर माझ्या घरी फक्त शुक्रवारी या .
कसला गोड बोलतो . आणि त्याचा मु़ख्य विषय असतो “ माझ्या माहेरची माणसे “ . त्यांचे अक्षरशा गोडवे गातो तो , कुणाकुणाची आठवण काढेल काहि सांगता येत नै . मी काहि लवकर रीस्पॉन्स देत नै , कधी नव्हे ते इतका मस्का लावुन मिळतोय तो का सोडा ?
शेवटी तो मेन मुद्द्याकडे आपला मोर्चा वळवतोच , “ ए .. अगं मी तुझ्याशी बोलतोय “
मी : “ बोलना “
तो : “ आज खुपच काम केलं दिवसभर “
मी : “ ह्म्म “
तो : “ आता जॉब चा कंटाळा आलाय “
मी : “ म्हणजे “ ?
तो : “ जराही स्वता:साठी वेळ मिळत नै “
मी : “ काढावा लागतो वेळ “
तो : “ आज काढलाय ना “
मी : “ रीअली ? “
तो : “ आज थोडं जागायचच , जरा आरामात होऊ द्यायचं “
मी : “ आज मूड मध्ये दिसतोय्स “
तो : “ हो , एकदम ... मग ? बोलना ? बघ मुलं पण नाहियेत इथं “
मी : “ .......”
तो : “ सांगना , घेऊका ?“
मी : “ हो , पण एकच पेग “

मांडणीलेख

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

6 Sep 2018 - 7:59 pm | पद्मावति

:)

दुर्गविहारी's picture

6 Sep 2018 - 8:07 pm | दुर्गविहारी

हा हा हा ;-)

सुबोध खरे's picture

6 Sep 2018 - 8:33 pm | सुबोध खरे

हायला

हे तर BTM क्लबचे सन्मान्य (emeritus) अध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे दिसतात.

BTM -- बायकोच्या ताटाखालचे मांजर

लौंगी मिरची's picture

6 Sep 2018 - 8:39 pm | लौंगी मिरची

एका पूरुषाला दुसरा बायकोच्या संमतीने पिणारा पूरुष ताटाखालचे मांजर वाटु शकतो . सोच अपनी अपनी :)

जुना वैरी नवीन रूप धारण करून हल्ल्याच्या तयारीत दिसतोय .

लौंगी मिरची's picture

6 Sep 2018 - 8:54 pm | लौंगी मिरची

हा हा हा ,
ट्रंप , तुमचा सदस्य कालावधी १ महिना ३ आठवडे असा आहे ;)

ट्रम्प's picture

6 Sep 2018 - 10:32 pm | ट्रम्प

हुजूर मायबाप ,
तुमचा प्रतिसाद खरे साहेबांच्या नंतर होता . आणि या अडाणी पामराला थोडासा खवचट वाटला , शिवाय तुम्ही विधानसभेची एक टर्म पूर्ण केली आहे पण मिपावरील माझ्या नवतारुण्याच्या धुंदीत ती टर्म दिसलीच नाही त्यामुळे या पामराकडून ती आगळीक घडली तेवढी पदरात घ्या :) :)

लौंगी मिरची's picture

6 Sep 2018 - 11:09 pm | लौंगी मिरची

माझा प्रतिसाद खरे साहेबांच्या प्रतिक्रियेलाच होता . खवचट के साथ खवचट ह्या तोडीतला .
असो , :)

माहितगार's picture

6 Sep 2018 - 8:41 pm | माहितगार

:) 'तोलून मापून असेल तर जगून घ्या !' बद्दल उत्तम लेखन !!

सणक, टणक वगैरे शब्द कानावरून गेले आहेत. पण हे भणक म्हणजे काय असतं म्हणायचं?

काय दारुण अवस्था करून ठेवलीय.

अमच्या मित्राकडे त्याची बायको स्टॅाक चेक करून बाटली आणून ठेवते.
"काय प्यायची ती इथेच प्या, बाहेर तोंड वेंगाडू नका कुणाकडे."

नवऱ्याचा शिंव्व करायचा का भिजका उंदीर बनवायचा बायकांच्याच हातात असतं.

शब्दबम्बाळ's picture

7 Sep 2018 - 10:47 am | शब्दबम्बाळ

दारू पिण्याने नवरा शिंव्ह होत असेल तर किती शिंव्हाना त्यांच्या शिव्हणी मैत्रिणींसोबत बार मध्ये जाऊन बाटली मागून बाटली रिचवतायत आणि मग रात्री कधीतरी डुलत डुलत घराकडे येतायत हे झेपेल याची थोडी शंका वाटतेय... :P

श्वेता२४'s picture

7 Sep 2018 - 10:50 am | श्वेता२४

आठवडाभर राब राब राबून, थोडासा वेळ काढायचा, जगायचं, आरामशीर वाटू द्यायचं कुणामुळे तर एका पेगसाठी एवढं सगळं वाचून गम्मत वाटली आणि नवरा एवढा मूडमध्ये असूनही लेखिका तटस्थ का तेही कळलं. गम्मतशीर

खटपट्या's picture

7 Sep 2018 - 11:47 am | खटपट्या

लेख आवडला, पण एका पेग साठी एवढं.....:)

नाखु's picture

7 Sep 2018 - 3:18 pm | नाखु

साक्षंकता सदस्य नक्कीच प्रकाशाच्या मशाली दाखवतील

दूरदर्शन प्रेक्षक नाखु

सिरुसेरि's picture

7 Sep 2018 - 4:02 pm | सिरुसेरि

मस्त लेखन .

अभ्या..'s picture

7 Sep 2018 - 4:32 pm | अभ्या..

बायकोच्या संमतीने पिलेली अंगी लागते.

लौंगी मिरची's picture

7 Sep 2018 - 6:05 pm | लौंगी मिरची

प्रतिसादांसाठी धन्यवाद.

पिंगू's picture

7 Sep 2018 - 6:05 pm | पिंगू

हाहाहा...

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2018 - 2:59 am | टवाळ कार्टा

शुद्ध नंदीबैल तिचायला

खटपट्या's picture

8 Sep 2018 - 6:19 pm | खटपट्या

असं बोलू नये :)

लौंगी मिरची's picture

8 Sep 2018 - 7:45 pm | लौंगी मिरची

हा हा हा , तुम्हि अजुन बैल च दिस्ताय , नंदि बनन्यातली मजा कधी घेणार ? ;) ,

मराठी कथालेखक's picture

10 Sep 2018 - 5:27 pm | मराठी कथालेखक

हं..या बायकोच्या ताटाखालील बोक्याला मस्का मारुन का होईना दर आठवड्याला प्यायला मिळतंय हे महत्वाचं... झालंच तर एक पेग नेहमी एकच राहत नसेल.. तेव्हा उगाच वाघ सिह इत्याही बनून , गुरगुर करुन शेवटी उपाशीच रहायला लागणार असेल तर त्यापेक्षा ही आनंदाची देवाण घेवाण बोक्याच्या फायद्याचीच की :)

palambar's picture

14 Sep 2018 - 10:08 pm | palambar

हा हा हा ही ही ही भारी