सामानाची यादी

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
1 Sep 2018 - 9:15 pm

सामानाची यादी

आज मुलीने पुढाकार घेऊन बाजारातून आणावयाची सामानाची यादी दिली. पूर्वी आई द्यायची तशी. फरक इतकाच की आई मराठीतूंन यादी देत असे मुलगी इंग्रजीतूंन लिस्ट देते. दोन्ही याद्या जोडणारा कॉमन दुवा म्हणजे मी. नातीने आजीचे सुवाच्च अक्षर हुबेहुब उचलले आहे. मधले बापाचे आणि आजोबाचे गलिच्छ अक्षर बायपास करून. यादीत बऱ्याच गोष्टी आहेत त्याला आठवणी आहेत. प्रत्येक जिन्नासाला आठवण वेगळी. मटर म्हटले की एकत्र मटर शेंगा सोलणारे गोलाकार आमच्ये एकत्र कुटुंब डोळ्या समोर उभे रहाते. आई असते, बाबा असतात, पूर्वा असते मी असतो. जो जास्त शेंगा सोलेल त्याला जास्त उसळ मिळेल अशी गमतीची चढाओढ असायची. वांगी म्हटलं की आईने पहाटे चार वाजता उठून केलेली भरली वांगी आठवतात. मी खुपदा प्रयत्न केला पण चवीला अजून हाताच वळण नाही. भेंडी म्हटलं तर कापलेल्या टोकाची केलेली सैनीकांची फौज आणी ती लुटूपुटी ची लढाई आठवते. मग शाई रंग लाऊंन कागदावर उठणारे शिक्के आठवतात. कलींगड आणली की घरी फ्रीज नसल्यामुळे पाण्याच्या बादलीत बुडवून ठेवनारी आई आणि दर पंधरा मिनीटानी ठंड़ावा तापासणारी मी आणि बहीण आठवतात. खरी तर ही यादी खुप मोठी आहे न संपणारी. अशी आठवाणीचे कागदाचे टुकड़े जोडून यादी करणे म्हणजे वाळूचे उडते कण पकडून वाळूची मूर्ती करण्या सारखे आहे.

तर अशी ही सामानाची यादी खरी तर आठवणीचीच यादी

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

ट्रम्प's picture

2 Sep 2018 - 6:40 am | ट्रम्प

" आई असते, बाबा असतात, पूर्वा असते मी असतो. " आणि नंतर
" दर पंधरा मिनीटानी ठंड़ावा तापासणारी मी "
तर झालंय काय वाचतांना आमचा सुद्धा गोंधळ उडाला की हो !!!

श्वेता२४'s picture

2 Sep 2018 - 7:53 pm | श्वेता२४

माझाही उडला कि गोंधळ. लेखाचा अजून विस्तार करता आला असता. थोडक्यात आटोपला असे वाटले