उचापतखोर हेनरी रेव्हिंग्टन

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
1 Sep 2018 - 1:04 am

उचापतखोर हेनरी रेव्हिंग्टन
इतिहास तज्ज्ञ गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ‘श्री राजाशिवछत्रपती भाग 1 व 2 आणि इंग्रजीतील ग्रंथ Shivaji His life and Times’ या तीन संदर्भातून साकार एक उपद्रवी व्यक्तिमत्व...

पन्हाळ्यावरून महाराजांच्या सुटकेचा व पावनखिंडीतील लढ्याचा भाग “मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून - वाटाडे” या लेखमालेतून सादर केला होता. त्यावेळी इंग्रजांनी तोफातून गोळे दागायाला सुरवात केल्यावर महाराजांना गडावरून लवकर सुटका करायला आखणी करावी लागली असावी, असे म्हटले गेले होते. शिवाय इंग्रजांनी आधी केलेला करार मोडून सिद्दी जोहरच्या बाजूने लढायला उतरावे हे त्यांना संतापजनक वाटले होते. या प्रकारात हेनरी रेव्हिंग्टन याचे उपद्व्याप कसे कारणीभूत होते. असे इंग्रजी वृत्तांतातून समजून येते. महाराजांनी त्यांना कशी अद्दल घडवली तेही समजून घ्यायला रंजक आहे म्हणून सादर...

ईस्ट इंडिया कंपनीतील फॅक्टरीत ( सध्या फॅक्टरी म्हटले की यंत्रांच्या धडाकेबाज आवाजात विविध वस्तू, माल बनून विक्रीसाठी पाठवून द्यायची इमारत असे डोळ्यासमोर येते. इथे फॅक्टरी किंवा वखार नावाचा बोध करून घ्यायचा असेल तर जहाजावरून आलेला माल उतरवून व जाणारा माल भरायच्या तयारीत ठेवण्याची गोडाऊनची जागा किंवा इमारत असे सध्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रक कंपनीच्या गोडाऊनची जागा जशी दिसेल असे त्याचे रुप असावे. नंतरच्या कालात वरिष्ठांची निवासस्थाने, चारीबाजूंनी कोट बंदोबस्त वगैरे सोई त्यात कालांतराने होत गेल्या असाव्यात.) टॅली क्लार्कच्या नोकरीकरिता हेनरी रेव्हिंग्टन इ. स. १६५१ मध्ये इंग्लंडहून सुरतला आला. तेव्हापासून इ. स. १६५८ पर्यंत त्याचा वार्षिक पगार वीस पौंड (म्हणजे सुमारे १८० रुपये) होता. इ. स. १६५६ मध्ये तो कंपनीच्या सुरत येथील वखारीत हिशोबनीस म्हणून काम करीत होता. कंपनीचा सुरत येथील एजंट (मुख्य व्यवस्थापक) जॉन स्पिलर हा २८ जानेवारी १६५७ रोजी सुरतहून इंग्लंडला रवाना झाला. त्याच्या जागी एजंट म्हणून ज्याची नेमणूक केल्याचे कंपनीने कळविले होते तो कंपनीचे ते पत्र सुरतला पोचण्यापूर्वीच मृत्यू पावला होता. त्यामुळे कंपनीकडून पुढील हुकूम येईपर्यंत रेव्हिंग्टन कंपनीचा सुरत येथील हंगामी एजंट झाला आणि मॅथ्यू अॅण्ड्यूज व जॉन लॅम्ब्टन हे त्याचे सहाय्यक म्हणून काम करू लागले.
1657मध्ये शाहजहान आजारी पडला, तो मरण पावला अशा अफवा भारतात सर्वत्र पसरल्या आणि त्याचे मुलगे यादवी युद्धाच्या तयारीस लागले. शाहजहानचा सर्वात धाकटा मुलगा मुरादबख्श हा तेव्हा गुजरातचा सुभेदार होता. यादवी युद्धाच्या तयारीकरिता पैसा उभा करण्यासाठी त्याने शाहबाज नावाच्या मनसबदाराच्या हाताखाली पाच हजार स्वार देऊन त्याला सुरतच्या किल्ल्यातील बादशाही खजिना काबीज करण्यास पाठविले. शाहबाज याने नोव्हेंबर १६५७ मध्ये सुरत शहर ताब्यात घेतले पण सुरतच्या किल्ल्यातील शिबंदी त्याला प्रतिकार करू लागली. तो काबीज करण्याकरिता त्याने इंग्रजांची व डचांची मदत मागितली. पण ती देण्याचे त्यांनी नाकारले. तेव्हा इंग्रजांनी त्याला तोफा द्याव्यात अशी मागणी त्याने केली. त्यावर आमच्याकडे मोठ्या तोफा नाहीत असे उत्तर इंग्रजांनी दिले. इंग्रजांनी काही लहान तोफा पुरून ठेवल्या होत्या त्या मात्र त्याने खणून काढून ताब्यात घेतल्या. या वेळी रेव्हिंग्टन कंपनीचा सुरत येथील एजंट म्हणून काम पहात होता. त्याने तो स्वत: आणि त्याचे काही सहकारी यांच्या मालकीच्या काही लोखंडी तोफा सुरतचा मुख्य अधिकारी मिर्झा अमीन याला विकत दिल्या. त्या तोफांची किंमत सुमारे चोवीस हजार रीअल्स ऑफ एट (The silver coins were known as Reales (Reals) म्हणजे सुमारे अठ्ठेचाळीस हजार रुपये ) त्यापैकी पाच हजार रुपये लगेच देण्यात आले आणि बाकीची रक्कम त्यापुढे कंपनीने जकात म्हणून जी रक्कम भरावयाची द्यावयाची असेल तिच्यातून हप्त्याहप्त्यांनी वळती करून घ्यावी असे ठरले. जकातीच्या रकमेतून रेव्हिंग्टनला तोफांच्या किंमतीपोटी ठरल्याप्रमाणे वेळोवेळी पैसे येत आले होते आणि त्याला येणे असलेल्या रकमेपैकी बरीचशी रक्कम वसूल झाली होती. पण पुढे एप्रिल १६५९ मध्ये मिझ अरब हा सुरतला मुख्य अधिकारी म्हणून आला. त्याने तोफांच्या या व्यवहाराची जबाबदारी नाकारली आणि इंग्रजांनी तोफा परत घ्याव्यात व तोफांच्या किमतीपोटी त्यांना देण्यात आलेले पैसे परत करावेत अशी मागणी त्याने केली. इंग्रज तसे करण्यास तयार होईनात. तेव्हा कंपनीच्या प्रेसिडेंटला बंदरावर जाऊ न देणे, कंपनीचा माल जकात नाक्यावर अडकवून ठेवणे, इत्यादी प्रकारे त्याने कंपनीच्या व्यवहारात अडथळे आणण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर डिसेंबर १६६० मध्ये त्या पदावर आलेल्या मुस्तफाखानानेही तेच धोरण पुढे चालू ठेवले. शेवटी हे प्रकरण निर्णयाकरिता औरंगजेबाला कळवावे अशी तडजोड झाली. दर मणास २१.५ रीअल्स ऑफ एट हा मुळात ठरलेला तोफांच्या किमतीचा दर कमी करून १६ रीअल्स ऑफ एट करावा आणि इंग्रज जर ते मान्य करण्यास तयार नसतील तर त्यांनी तोफा परत घ्याव्यात व तोफांच्या किमतीपोटी त्यांना पूर्वी जकातीतून वळती करून दिलेली रक्कम त्यांनी परत करावी असा निर्णय औरंगजेबाने दिला. (काही कारण नसताना इंग्रज कंपनीला हेनरीच्या उचापतीमुळे फुकटचा बुर्दंड पडला.)

शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सुटून (13 जुलै1660 ) विशाळगडावरून राजगडावर परत आल्यानंतर करतलबखानाच्या सैन्याला (2फेब्रुवारी 1661)उंबर खिंडीत गाठून शरणागती पत्करायला लावल्यानंतर, महाराजांनी विशाळगडाच्या पायथ्याशी अदिलशहाच्या बाजूने लढणाऱ्या सूर्याजी सुर्वे व जसवंत दळवी यांच्या बेमुर्वतखोरीला धडा शिकवून दिला. मग ज्या इंग्रजांनी कंपनीच्या तर्फे झालेला करार मोडून रुस्तुम-ए-झमानला गुपचुप भेटून दगाबाजी केली त्यांना धडा शिकवायला मार्च 1661 मध्ये, राजापूर येथे त्यांच्या (फॅक्टरी) वखारीत जाऊन तिथे असलेल्या आठ इंग्रजांना कैद केले. ते होते:1. हेनरी रेव्हिंग्टन 2. रँडलोफ टेलर 3. रॉबर्ट फेर्रोंडो 4. रिचर्ड नेपियर 5. रिचर्ड टेलर 6. फिलिप गिफार्ड? 7. एक सर्जन, कदाचित तो रॉबर्ट वॉर्ड असावा (हा डॉक्टर कंपनीचा होता. त्यालाही हेनरीने पन्हाळ्यावर अळेबळे तोफा उडवायच्या मोहिमेवर नेले होते)* 8. विलियम मिन्घेम. पैकी पहिले सात ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर होते. शेवटच्या मिन्घेम बद्दल काही स्पष्टीकरण आवश्यक आहे. 1659 साली लंडन नावाच्या जहाजाला सुरतहून ते राजापूरपर्यंत पाठवले गेले. त्यात तो जहाजाच्या तोफखान्याच्या गोलंदाजांचा तो मदतनीस (gunner's mate) होता. राजापूर वखारीत हेनरीने त्याला वार्षिक £ 30 वार्षिक बोलीने रोजगार दिला. अफजलखानाच्या मालकीच्या तीन जहाजांपैकी एका जहाजाला हेनरी रेव्हिंग्टनने आपल्या थकबाकीची सुरक्षा म्हणून ताबा घेतला आणि त्याचे नाव राजापूर मर्चंट ठेवले. मिन्घेमला त्या खानाच्या जहाजाचा कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले. मिंघेम हा त्यानंतर तो रेव्हिंग्टन बरोबर पन्हाळाकडे तोफा घेऊन त्या उडवायला रवाना झाला.

या तोफा होत्या किती? त्यांचा महाराजांच्या एकंदरीत निसटायच्या मोहिमेवर काय प्रभाव पडला? यावर विचार व्हायला हवा.
हेनरी राजापुरच्या फॅक्टरीत सुरते प्रमाणे टॅली क्लार्क - हिशोबनीस होता.(Tally clerk count goods and match them with shipping invoices and packing orders to ensure the accuracy of incoming and outgoing shipments. They record weights, measurements and dimensions of cargo. Tally clerk calculate storage, damage, shipping and receiving fees.)
पण मध्यंतरी सुरतेत नव्या एजंटची नेमणूक होऊन तो रुजू होईपर्यंत कंपनीच्या सभासद मंडळाने ठरवले असल्याने हाच हंगामी एजंट म्हणन काम करत असे. राजापुरला नवी फॅक्टरीची शाखा सुरू झाल्यावर याला वरिष्ठतेमुळे किंवा उचापतखोरीची ‘ब्याद’ म्हणून किर्ती असल्याने तो राजापुरातील फॅक्टरीत पाठवला गेला. तिथे हाताखालच्या लोकांच्या समोर मालकाच्या रुबाबात तो वागत असावा.
त्याकाळात जहाजांना स्वरक्षणासाठी तोफा - गोळे, ते उडवू शकणारे शिक्षित सैनिक, हत्यारे लागत पण इंग्रजी कंपनीने अशी हत्यारे विक्रीला बंदी केली होती. नंतर कालांतराने ती उठवली गेली. मालाच्या वाहतुकीतील सलोख्याचे संबंध राखून वेतनाव्यतिरिक्त पैसा कमवण्यासाठी व वेळ प्रसंगी आपल्या रक्षणासाठी काही हत्यारे व दारूगोळ्यांचे साठे तो व त्याचे साथिदारांनी साठवून गोडाऊनच्या कोपऱ्यात दडवून वा पुरुन ठेवले असावेत. असे करत त्याने कंपनीला पत्ता न लागू देता येणाऱ्या- जाणाऱ्या जहाजावरील लोकांशी संगममत करून 2 उखळी तोफा होत्या आणि 50 दारूगोळे असे सामान घेऊन ठेऊन ते विकायच्या संधीची तो वाट पहात असावा. त्याचे व रुस्तुम-ए-झमानचे पुर्वीपासून बोलाचालीचे संबंध होते. हेनरीने पुर्वी एकदा रायबागला परस्पर भेटून चांदीच्या नाण्याची टांगसाळ राजापुरात उघडायची कल्पना मांडली होती. रुस्तुम ए झमान सिद्दी जोहरच्या सैन्यातील प्रमुख सरदार होता. त्याच्या सांगण्यावरून हेनरीकडील तोफांच्या मदतीने पन्हाळगडावर भगदाड पाडायची शक्कल पुढे आली असावी. मग हेनरी आपल्या बरोबर इतर मदतनिसांना घेऊन मिंघेमला तोफची बनवून तोफांना गाड्यावर घालून अणुस्कुरामार्गाने कोकणातून आला असावा. (अंदाजे 100 किमीच्या आसापास अंतराच्या) वाटेत त्याने रायपाटण व अणुस्कुर्याहून राजापुरच्या आपल्या कार्यालयाला फुशारक्या मारणारी पत्रे लिहिली. ‘विजापुरच्या सरदाराची ह्या लढतीत (आपल्या तोफांमुळे?)सरशी होत आहे’. त्या पत्राच्या उत्तरात, राजपुरचे त्याचे साथिदार म्हणतात कि तुमच्या पत्रातील मजकूर वाचून आनंद झाला. आशा आहे की पुढील पत्रात प्रत्यक्ष कसे घडले ते वाचायला मिळेल.
त्या तोफा जहाजावरून लढतीत वापराच्या असल्याने, तोफगोळ्यांची देखभाल वेळोवेळी झालेली नसल्याने, आधी त्याची वापरून प्रात्यक्षिके न झाल्याने, त्यात मिंघ्येम हा मुख्य तोफचीचा मदतनीस असल्याने, अशा विविध कारणांनी तोफांचे प्रात्यक्षिक प्रभावी झाले नसावे. काही गोळे तटबंदीजवळ पडले असतील पण त्यांची मारक क्षमता किरकोळ असावी. त्याला त्या तोफा कशा काम करतात यात रस नसावा. कारण तो स्वतः प्रथम पुर्वीच्या मित्राला भेटायला कोल्हापुरात तळ ठोकून राहिलेल्या सरदार रुस्तुम-ए-झमानला भेटला. कारण त्यानेच त्याला बोलावले असल्याने त्याला मध्यस्थ करून या मोहिमेचा मुख्य सिद्दी जोहरकडून त्याला जास्तीत जास्त धन पदरात पाडून घ्यायचे असावे. पण जायचा यायचा खर्च वगळता जितके अपेक्षित होते तितके धन त्याला मिळाले असेल असे नंतरच्या कफल्लकतेतून दिसत नाही.
... काळाचे फासे पलटले. तो व अन्य साथिदार राजापुरात पकडले गेले. राजापुरची वखार पुरलेल्या मालासाठी पार खणून काढून नेस्तनाबूत झाली. त्यांना रायरीच्या कैदखान्यात महिनोनमहिने पडावे लागले. सुरतचे कार्यकारी मंडळ घडलेल्या प्रकाराने हानी झाल्यामुळे त्याच्यावर प्रचंड नाराज होते.
सूरत कार्यकारी मंडळांनी शिवाजीला इंग्रजी कैद्यांच्या सुटकेसाठी काही गळ घालणारी पत्रे लिहिली होती परंतु त्यापैकी कोणत्याही पत्राची दखल घेतली गेली नाही. दरम्यान रेव्हिंग्टन आजारी पडला म्हणून पेरोलवर सोडला गेला. शिवाय शल्यविशारद डॉक्टर रॉबर्ट वॉर्ड आणि विल्यम मिंघेम यांच्याबरोबर प्रवास करताना, पेरोलवर परत येण्याचे आश्वासन देऊन ते सटकले. बोटीने प्रवास करत रेव्हिंग्टन आणि इतर दोन 17 ऑक्टोबर 1661 रोजी सुरत येथे दाखल झाले. सुरतला परत आल्यावर शरीराने दुर्बल व आर्थिक दुराचाराने कफल्लक झालेल्या हेनरीचे 11 डिसेंबर 1661 रोजी निधन झाले. दुसऱ्या दिवशी सुरत येथे एक सल्लामसलत झाली आणि काही मिनिटांत असे ठरविण्यात आले की हेनरी नोकरी करत असताना निवर्तल्याने त्याच्या वैयक्तिक मालमत्तेची विक्री करून त्याच्या नोकरांच्या कडून व दक्षिणेतील भागात अन्य उचापती करून झालेल्या कर्जाची रक्कम त्याच्या खाजगी मालमत्तेतून, पगारातून वळती करून शक्यतोवर वसूली व्हावी.
सूरत परिषदेला उरलेल्या इंग्रजी कैद्यांमधून आणखी तीन पत्र मिळाली. त्यांना रायरीहून दुसरीकडे पाठवण्यात आले. परिषदेने 10 मार्च 1662 रोजी लिहिले की आम्ही महत्वाच्या कामात व्यस्त असल्याने तुमच्यावर अनावश्यक वेळ घालवण्याची गरज नाही. कारण त्या लबाड, भामट्या (rogue) शिवाजीकडून अद्याप एकही उत्तर परत आले नाही. शिवाय तुमच्या सारख्या कैद्यांकडून आलेल्या तिन्ही पत्रातील उद्धट आणि अनादराची भाषा वाचून आम्हाला धक्का बसला आहे...
एकंदरीत शिवाजी महाराजांनी उपद्रवी हेनरीला चांगलीच अद्दल घडवली.

मांडणीआस्वाद

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

1 Sep 2018 - 6:43 pm | दुर्गविहारी

खुपच सविस्तर आणि महत्वाची माहिती दिली आहे. बराचसा ईतिहास अज्ञात होता.
बाकी थोड्या सुधारणा हव्यात.

शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सुटून (13 जुलै1660 ) विशाळगडावरून राजगडावर परत आल्यानंतर करतलबखानाच्या सैन्याला (2फेब्रुवारी 1661)उंबर खिंडीत गाठून शरणागती पत्करायला लावल्यानंतर, महाराजांनी विशाळगडाच्या पायथ्याशी अदिलशहाच्या बाजूने लढणाऱ्या सूर्याजी सुर्वे व जसवंत दळवी यांच्या बेमुर्वतखोरीला धडा शिकवून दिला.

हा क्रम उलटा हवा होता.

शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सुटून (13 जुलै1660 ) विशाळगडाच्या पायथ्याशी अदिलशहाच्या बाजूने लढणाऱ्या सूर्याजी सुर्वे व जसवंत दळवी यांच्या बेमुर्वतखोरीला धडा शिकवून राजगडावर परत आल्यानंतर करतलबखानाच्या सैन्याला (2 फेब्रुवारी 1661)उंबर खिंडीत गाठून शरणागती पत्करायला लावली.

‘विजापुरच्या सरदाराची ह्या लढतीत (आपल्या तोफांमुळे?)सरशी होत आहे’.

पन्हाळ्याच्या वेढ्यात राजापुरकर ईंग्रजांनी युनियन फ्लॅग फडकावून दक्षिण बाजुने तोफा डागल्या. या वेढ्याच्या काळात पावनगड हा पन्हाळ्याचा शेजारचा किल्ला अस्तित्वात नव्हता, तो पुढे शिवाजी महाराजांनी बांधला. सिध्दी जोहारने या पावनगडाची टेकडी ताब्यात घेउन पन्हाळ्यावर काली बुरुजाच्या बाजुने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी मदत म्हणून या तोफा वापरल्या. अर्थात हा सर्व प्रकार शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन पहात होते. खरंतर याच ईंग्रजांनी महाराजांना मदत करायचे वचन करुन असा दगा दिला होता. मात्र त्याकाळात महाराज वेढ्यात असल्याने नाईलाज होता. अर्थात कोकण स्वारीत राजापुरची वखार पहार लावून खणली व आतील काही ईंग्रजांना वासोट्यावर तर काहींना रायगडाजवळील सोनगडावर कैदेत ठेवले.
या सर्व प्रसंगाची साक्षी असलेली राजापुरची वखार आज अक्षरशः नामशेष अवस्थेत आहे. गावकर्‍यांना तीचे महत्व न समजल्याने त्यांनी बरीच ईमारत तोडली. आज जे काही अवशेष उपलब्ध आहेत, त्याचे फोटो टाकतो.
Rajapur wakhar1

Rajapur wakhar2

Rajapur wakhar3

Rajapur wakhar 4

Rajapur wakhar 5

आनन्दा's picture

1 Sep 2018 - 11:29 pm | आनन्दा

मला तो क्रम बरोबर वाटतो..
त्यांना बहुधा महाराजानी सुर्वे दळवी वर केलेली निर्णायक स्वारी म्हणायची आहे..
टी त्यांनी पन्हाळ्याच्या प्रकरणातून सेटल झाल्यावर केली, आणि त्याच स्वारीत बहुधा राजपुरकर इंग्रजांना धडा शिकवला.

शशिकांत ओक's picture

2 Sep 2018 - 4:50 pm | शशिकांत ओक

सविस्तर निरीक्षणाबद्दल धन्यवाद.

सिध्दी जोहारने या पावनगडाची टेकडी ताब्यात घेउन पन्हाळ्यावर काली बुरुजाच्या बाजुने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी मदत म्हणून या तोफा वापरल्या.

गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या इंग्रजी ग्रंथात जागेचा तसा उल्लेख नाही. शिवाय तोफांच्या माऱ्याचा पल्ला किती लांबवर होता ते नक्की माहित नाही. पवन गड इतक्या लांबून केला तर कदाचित तो आपल्या सेनेतील मोर्चा वर पडायची शक्यता असावी... सध्याच्या काळात राजापूरच्या वखारीची भयाण अवस्था त्याच्या विनाशाची कल्पना दर्शवते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2018 - 1:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक माहिती.

प्रसाद_१९८२'s picture

2 Sep 2018 - 2:21 pm | प्रसाद_१९८२

छान माहिती !

अभ्या..'s picture

2 Sep 2018 - 3:37 pm | अभ्या..

च्यायला, लैच इपितर बेणं होतं की.
मी थोडा शिवराज्याभिशेकाच्या हेन्रीविषयी कन्फ्युज झालो पण तो जॉर्ज ऑक्झंडेन होता बहुतेक.

शशिकांत ओक's picture

3 Sep 2018 - 10:41 am | शशिकांत ओक

हेन्रीविषयी कन्फ्युज झालो पण तो जॉर्ज ऑक्झंडेन होता बहुतेक.

परिस्थिती तशीच आहे...
ऑग्झिंडेन हे कुटुंब भारतात आपले कल्याण
करायसाठी आले होते! पैकी जॉर्जचे कर्तृत्व सूरत च्या लुटीत जाणवते. ते कसे ते नव्या धाग्यावर दिसेल.

याच्या उचापती सादर केल्या. त्या पेक्षा जास्त हलकट आणि बदमाश मानावा लागेल असे एक महाशय गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या इंग्रजी ग्रंथातून निदर्शनास आले.
तो होता 'अँथनी स्मिथ'. महाराजांनी त्याचा उजवा हात तोडण्याची आज्ञा केली... पण त्याने आपली सुटका कशी केली याच्या फुशारक्यातून तो शोले सिनेमातील जगदीपच्या मियां सूरमा भोपालीची आठवण करवतो... तो धागा नंतर येईल.