गूगल आणि मायक्रोसॉफ्ट स्पर्धेची क्षेत्रे

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
30 Aug 2018 - 10:52 am

मायक्रोसॉफ्ट आणि गूगल या सध्याच्या सॉफ्टवेअरमधल्या दोन मोठ्या कंपन्या. मायक्रोसॉफ्ट मुख्यतः डॉस नावाच्या ऑपरेटिंग सिस्टीमपासून प्रसिद्धीस यायला सुरुवात झाली. आणि मग पुढे विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम आणि ऑफिस वगैरे प्रॉडक्ट्स आली.

इंटरनेटच्या जमान्यात गूगलचं नाव गाजायला लागलं.

MicroSoft
मधल्या काळात मायक्रोसॉफ्टने अमेरिकेतल्या इतर मोठ-मोठ्या कंपन्यांप्रमाणेच साम्राज्यवाद सुरू केला. ज्या गोष्टी आपल्या स्वतःला निर्माण करता येत नाहीत पण उद्या प्रतिस्पर्धी ठरू शकतील अशा गोष्टी ताब्यात घेणं. हॉटमेल ही यशस्वी ठरलेली ई-मेल कंपनी मायक्रोसॉफ्टने ताब्यात घेतली.

सर्च इंजिनच्या बाबतीत मायक्रोसॉफ्टचं कुठे फारसं नाव नव्हतं. याहू आणि अल्टाविस्टा सर्वांना माहीत होते. पुढे पुढे इंटरनेटचा प्रभाव वाढायला लागला. सर्च इंजिन सारखी छोटीशी वाटणारी गोष्ट सुद्धा सर्वतोमुखी व्हायला लागली.
आणि मग 2005 साली गूगलने ई-मेल सर्व्हिस द्यायला सुरुवात केली ती होती जीमेल.

<टाइम प्लीज>
ज्यांना पॉपकॉर्न खाऊन घाण करायची आहे त्यांनी
https://www.misalpav.com/node/41559
इथे व्यक्त व्हावे.
</टाइम प्लीज>

आतापर्यंत दोन्हीही कंपन्यांची काम करण्याची क्षेत्रे वेगवेगळी होती. त्यामुळे तशी थेट स्पर्धा कुठे नव्हती. पण मायक्रोसॉफ्ट आणि गूगल दोघांच्याही ई-मेल सर्व्हिस सुरू झाल्या तिथे स्पर्धा आली.

google
आज दोघांचीही सर्च इंजिन्स आहेत. मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखीच गूगलचीही प्रॉडक्ट्स आहेत. बहुतेक घरगुती यूजर मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम वापरतात. डेस्कटॉपसाठी गूगलची क्रोमबुक नावाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. गूगलची मोबाईल साठी अँड्रॉइड ही ओएस आहे. मायक्रोसॉफ्टच्या मोबाईलवर विंडोज ओएस असायची. मॅपमधे गूगलमॅप आणि मायक्रोसॉफ्टकडे असलेले हियर मॅप. हियर मॅपचे वैशिष्ट म्हणजे ते ऑफलाइन, नेट नसतानाही वापरता येते फक्त जीपीएस हवे.

वेब ब्राउझरमधे मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर आणि गूगलचा क्रोम आहे. अशाप्रकारे दोघांमधले कॉमन एरिया किंवा स्पर्धेची क्षेत्रे वाढायला लागलेली आहेत.
अशीच अजून काही क्षेत्रे आपल्याला सांगता येतील का आणि पुढच्या काळात मायक्रोसॉफ्टला त्याच्या प्रॉडक्टला एक एक पर्याय उपलब्ध होत जाईल का ? कदाचित मला मोजकीच उदाहरणे दिसली असतील. मिसळीवरचे अनुभवी लोक अधिक भरही घालू शकतील.
ashutoshjog@yahoo.com

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

एक मुद्दा दोघांमधला विशेष फरक तो म्हणजे गुगल अॅन्ड्राइड हे सर्वांसाठी_सर्वकाही आहे त्यामुळे जाहिरातदार, कंपन्यांनी तिथे भराभर अॅप्स टाकली.
माइक्रोसोफ्ट यापासून सतत दूरच राहिले. खासगी क्षेत्रांना ते जाचक वाटले. पण सत्या नाडेलाने कुठेही माइक्रोसॅाफ्ट हे धोरण पक्के ठेवले.

आशु जोग's picture

1 Sep 2018 - 9:26 am | आशु जोग

आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते समजले नाही त्यामुळे प्रतिक्रिया देऊ शकत नाहीये

अॅप्स डिवेलपर लोकेशन, कॅाल हिस्ट्री, फोटो, कॅम्रा अशा कित्येक परमिशन्स मागतात त्या सर्व गुगल अँड्राइड देऊन टाकते॥ तसे माइक्रोसोफ्ट देत नाही. यामुळे चोरगिरीा आळा बसतो. अर्थात अॅप्सवाल्यांना अटी नको आहेत.
धंदा गेला तरी चालेल पण चोरवाटा ठेवायच्या नाहीत हे धोरण पक्के ठेवले माइक्रोसोफ्टने.

चौथा कोनाडा's picture

1 Sep 2018 - 8:52 pm | चौथा कोनाडा

या मुळं एमएस स्पर्धेत मागे पडंतय (....असं मला वाटते) ज्या वेगाने लोक गुगलच्या आहारी जात आहेत अ‍ॅप्सना सर्व परवानग्या देवुन स्वःतचे खासगीपण बेफिकीरपणे उघड करत आहेत, या वरुन त्यांना खासगीपणाशी फार देणं घेणं नाही.
लोकांना फुकट हव्यात या सवलती.
एमएसला स्पर्धेत टिकायचे असेल तर त्यांना काहीतरी उपाय योजावे लागतील.

अभ्या..'s picture

1 Sep 2018 - 9:29 pm | अभ्या..

खरोखर,
आणि ज्या वेगाने आणि झपाट्याने गुगल ही माहिती रिचवत आहे त्यावरुन ते पुढे भविष्यात काय करणार आहेत त्याचीच भीती वाटते. :(

चौथा कोनाडा's picture

3 Sep 2018 - 5:56 pm | चौथा कोनाडा

सहमत. एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता) आणि प्रायव्हसी हायजॅकींग कुठल्या थराला पोहोचेल हे भयकारक आहे.

खटपट्या's picture

30 Aug 2018 - 6:10 pm | खटपट्या

जुने नेटस्केप नॅवीगेटर आणि आताच्या जमान्यातले मायक्रोसॉफ्ट एज याचे उल्लेख राहिले.

चौथा कोनाडा's picture

30 Aug 2018 - 6:23 pm | चौथा कोनाडा

खरंच की राव ! नेटस्केप दोन तीन वर्षे वापल्याचे आठवते, युनिक्स ओएस असल्याच्या काळात. एमएस एज मात्र वापरायचे योग आले नाहीत.
हे मात्र खरे, या बाबतीत जे लवकर मिळते, फुकट मिळते, खुप रूळते, आणि अर्थातच सगळ्यांकडे असते तेच टिकते !

आशु जोग's picture

1 Sep 2018 - 9:24 am | आशु जोग

चौथा कोनाडा,

बरोबर आहे. नेटस्केप नेविगेटर वि आय ई अशी लढाई न्यायालयातही गेली होती

माइक्रोचे अझुर फॅार बिझनेस ?

सुखी's picture

30 Aug 2018 - 7:58 pm | सुखी

या मध्ये आता cloud services Cha pan विचार केला पाहिजे.

आशु जोग's picture

1 Sep 2018 - 9:25 am | आशु जोग

क्लाऊड क्षेत्रातही मायक्रोसॉफ्टला अ‍ॅमेझॉनकडून चांगली स्पर्धा आहे.

थॉर माणूस's picture

30 Aug 2018 - 10:56 pm | थॉर माणूस

१. क्रोमबूक डेस्कटॉपसाठी/लॅपटॉपसाठी बनवलेली नाही तर नेटबूकसाठी बनवलेली आहे, त्यामुळे तिची विंडोजशी थेट स्पर्धा (अजूनतरी) नाही.
२. गुगल मॅपसुद्धा ऑफलाईन वापरता येतात. आपल्याला हवा तेवढ्या भागाचा मॅप फोनवर डाऊनलोड होतो आणि जीपीएसच्या आधारावर वापरता येतो.

सध्या दोन्ही कंपन्या भविष्यातल्या तंत्रज्ञानावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मायक्रोसॉफ्ट क्लाऊड सर्विसेस मधे पुढे आहे, तिथे त्यांची स्पर्धा चक्क अ‍ॅमेझॉनशी आहे. गुगल क्लाऊड सर्विसेसमधे आपले स्थान बनविण्याचा प्रयत्न करत आहे (मधे ते क्लाऊड प्रोसेसिंग साठी प्रोसेसर २ महिन्याकरीता फुकट रेंट करत होते). आर्टीफिशिअल इंटेलिजन्समधे आबीएम चा घोडा (वॉटसन) कमाईत इतरांपेक्षा पुढे आहे, पण गुगल डीप लर्निंगच्या कामात पुढे सरकत आहे. एकंदरीत, पडद्यामागची स्पर्धा फक्त गुगल विरूद्ध मायक्रोसॉफ्ट अशी राहीलेली नसून इतर कंपन्यासुद्धा त्यात आहेत.

आशु जोग's picture

1 Sep 2018 - 9:36 am | आशु जोग

इथे गूगल मायक्रोसॉफ्ट स्पर्धा किंवा दोघांचे कॉमन एरीया असा विषय असला तरी मायक्रोसॉफ्टला इतरांकडूनही मिळत असलेले आव्हान याबाबतही माहिती मिळाल्यास आनंदच होइल.

आता पंधरा दिवसांपुर्वीची बातमी - १६ वर्षांचा मुलगा गेले वर्षभर अॅपलचा सर्वर डेटाबेस हॅक करून अभ्यास करतोय. कसली आली आहे **ची सिक्युअरटी अॅपलची?

क्यानडाचा ब्लॅकब्री युएसने पद्धतशीर मारला. दळिद्री आइफोन गळ्यात मारला लोकांच्या. आता वाटसपही काढले बीबीवरून.

सतिश गावडे's picture

1 Sep 2018 - 5:31 pm | सतिश गावडे

क्यानडाचा ब्लॅकब्री युएसने पद्धतशीर मारला. दळिद्री आइफोन गळ्यात मारला लोकांच्या. आता वाटसपही काढले बीबीवरून.

नाही हो. असले काही नाही. ब्लॅकबेरी आणि पूर्वीच्या नोकीयाची गोष्ट थोडीफार सारखीच आहे. आपलं मार्केटमधील स्थान अढळ आहे या भ्रमात राहील्याने या दोन्ही कंपन्या बुडाल्या. नोकिया आता पुन्हा आली आहे बाजारात.

Why did BlackBerry fail? What are some things that caused people to have less trust in BlackBerry?

ब्लुटुथ आणि मेमरी कार्ड काढले आइफोनमधून कारण आइट्युन्स गाणी चोरू नये, कॅापी करू नये. एखादी गोष्ट विकल्यावरही ती कशी वापरायची ते विकणाराच ठरवणार. आता आपण आइट्युन्सवरून काही घेणार नसलो तर या दोन गोष्टी नसण्याचा फुकटचा भुर्दंड बसतो. चांगला स्कीन आणि कॅम्रा फक्त अॅपलच देऊ शकतो हा भ्रम आहे. त्याच्या तीसटक्के कमी किमतीत सहज शक्य आहे हे इतर कंपन्यांनी दाखवलं आहे. सिक्युअरटीचे कसे बारा वाजलेत ते पाहिलंच. व्हाइट हौसात बीबीच वापरत होते.

सतिश गावडे's picture

1 Sep 2018 - 5:25 pm | सतिश गावडे

Netscape Communications Corporation आणि Netscape Navigator या दोन्ही गोष्टी आता ईतिहासजमा झाल्या असल्या तरी एके काळी ते आघाडीवर होते. मायक्रोसॉफ्टने त्यांना टक्कर देण्यासाठी आपला इंटरनेट एक्स्प्लोरर प्रोजेक्ट सुरु केला.

त्यावर मात करण्यासाठी नेटस्केपने जे पाऊल उचलले त्याने ईतिहास घडवला. तोपर्यंत वेब पेजेस स्टॅटीक होती. म्हणजेच तुम्ही एखाद्या वेबसाईटला भेट दिली की सर्वरवरुन फक्त माहिती यायची. आपल्याला आपली माहिती सर्वरला पाठवण्याची सोय नव्हती. नेटस्केपने यावर उपाय शोधण्यासाठी ब्रेंडन ईच नावाच्या संगणक तज्ञाला आपल्याकडे बोलावले. त्याला वेब पेजेसना डायनॅमिक बनवण्यासाठी लँग्वेज बनवण्यास सांगितले. नेटस्केप नेव्हीगेटरची पुढच्या व्हर्जनची प्रोडक्शन रिलीज तोंडावर आली होती.

ब्रेंडन झपाटून कामाला लागला आणि अवघ्या दहा दिवसात त्याने एक लँग्वेज तयार केली. आधी तिचे नाव होते Mocha. मग बदलून ठेवले LiveScript. आणि शेवटी नेटस्केपने जावा डेव्हलप करणार्‍या सन मायक्रोसिस्टीम बरोबर करार करुन त्यांचे "जावा" नाव आपल्या नवीन भाषेच्या नावात वापरण्याची परवानगी मिळवली आणि या भाषेचे नाव पुन्हा बदलले. ते झाले जावास्क्रीप्ट.

या जावास्क्रीप्टला अनेकांनी अनेक प्रकारची नावे ठेवली, तिला संपवण्याचा प्रयत्न केला. पण ती सगळ्यांना पुरुन उरली आणि वेब डेव्हलपमेंट विश्वातील अनभिषिक्त सम्राज्ञी झाली. आज जावास्क्रीप्ट न वापरलेली वेबसाईट औषधालाही शोधून सापडणार नाही. (अपवाद अगदी जुन्या वेबसाईटचा)

ब्रेण्डन ईचने पुढे मोझिला फाऊण्डेशनची स्थापना केली. याच संस्थेने आजचा आघाडीचा ब्राऊजर फायरफॉक्स बनवला.

आशु जोग's picture

1 Sep 2018 - 7:50 pm | आशु जोग

फायरफॉक्स ब्राऊझर आला म्हणजे नेटस्केप नेविगेटर कुठल्या तरी स्वरूपात टिकून राहीला असे म्हणता येइल का गावडे साहेब ?

सतिश गावडे's picture

1 Sep 2018 - 9:55 pm | सतिश गावडे

कारण ब्रेंडनने ज्याअर्थी ब्राऊजरमध्ये चालणारी लँग्वेज बनवली त्याअर्थी त्याने नेटस्केपचा कोड किंवा कल्पना फायरफॉक्स बनवताना वापरल्या असण्याची शक्यता आहे. थोडेसे गुगल केल्यास याबद्दल माहिती मिळेल.

सतिश गावडे's picture

1 Sep 2018 - 5:33 pm | सतिश गावडे

<टाइम प्लीज>
ज्यांना पॉपकॉर्न खाऊन घाण करायची आहे त्यांनी
https://www.misalpav.com/node/41559
इथे व्यक्त व्हावे.

हा सेल्फ गोल वाटतोय =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2018 - 8:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथे आंतरजाल ब्राऊझर्सबद्दल चर्चा सुरु आहे म्हणून केवळ... इथे ब्राऊझर्सच्या इतिहासाचा धावता आढावा आहे.

(संवैधानिक इशारा : ही किंचीत झैरात आहे असे वाटू शकेल. ;) ;) )

कंजूस's picture

2 Sep 2018 - 10:12 am | कंजूस

ते अलेक्सा का कुठला एआइ स्पिकर घरातले सर्व बोलणे शेजाऱ्यास देत होता म्हणे. - मग त्यांनी माफी मागितली. बोलूनचालूनऐकून इन्टेलिजन्सच तो. काहीही होऊ शकतं.

आणि एकदा गाडीत मोबाइलवरून बोलत असताना शहरातून पुढे जाताना बोलण्यातल्या संदर्भातल्या वस्तू विकणाऱ्या दुकानांच्या जाहिरातींचे नोटिफिकेशन्स सुरू झाले. लोकेशन आधारित इंटेलिजन्स.
परमिशन्स दिल्याने कॅाल्सही ऐकतात. बरं त्यातलं एकजरी परमिशन काढलं तर अॅप चात नाही.

आशु जोग's picture

3 Sep 2018 - 12:19 am | आशु जोग

कंजूस तुमचं नाव जासूस असायला हवं होतं

कंजूस's picture

2 Sep 2018 - 10:18 am | कंजूस

*चालत* नाही.
ब्राउजर,कॅाल कॅान्टॅक्टस ,इमेल,नोटिफिकेशन्स सिन्क करणे म्हणजे मार्केटमध्ये जाऊन माझ्याकडे एवढे पैसे आहेत हे अगोदरच सांगणे.

आशु जोग's picture

3 Sep 2018 - 9:09 pm | आशु जोग

पण आपण गूगलचीच ओएस वापरत असलो तर ही माहीती गूगलकडे आधीच गेलेली असते ना !