Skip to main content

भाळी लाल कुंकु

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 02/08/2018 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
भाळी लाल कुंकु गळ्यात काळे मणी अस्तित्व तुझे जाणवे साजणे क्षणोक्षणी * अंगणी रोज शेणसडा रेखते नाजुक रांगोळी जोडव्याचा तो पदान्यास भासे तू नाजुक कळी * सकाळची तुझी लगबग चुलीस करी चूल पोतेरे कंकणाचा नाद भिनला अन्नपुर्णा भासे मजला *. तुळशी समोर तेवावी ज्योत दिव्याची मंद अस्तित्व तसं तुझं उजळते माझे जीवन अकुकाका
लेखनविषय:

वाचने 3196
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

पण सकाळची तुझी लगबग चुलीस करी चूल पोतेरे कंकणाचा नाद भिनला अन्नपुर्णा भासे मजला यात इतर िकाणी आहे तसे यमक जुळलेले नाही त्यामुळे थोडी खटकली

In reply to by श्वेता२४

शिवाय, कोनाड्यातल्या हिंदमातेपेक्षा बराच आहे. ;) Sandy

सकाळची तुझी लगबग चुलीस करी चूल पोतेरे कंकणाचा नाद मजला कशी अंगाई वाटे रे *. तुळशी समोर तेवावी ज्योत दिव्याची मंद अस्तित्व तसं तुझं सहाणेला लाभे गंध .. आता जुळलं का यमक? येनीवे ह्याच्या पेर्णेने "आमचा लाल कंपू" पाडावे काय?

खरं तर खेड्यात हे अस्तित्वात आहे का ते माहीत नाही खुलासेच्छुक नाखु