भाळी लाल कुंकु
गळ्यात काळे मणी
अस्तित्व तुझे जाणवे
साजणे क्षणोक्षणी
*
अंगणी रोज शेणसडा
रेखते नाजुक रांगोळी
जोडव्याचा तो पदान्यास
भासे तू नाजुक कळी
*
सकाळची तुझी लगबग
चुलीस करी चूल पोतेरे
कंकणाचा नाद भिनला
अन्नपुर्णा भासे मजला
*.
तुळशी समोर तेवावी
ज्योत दिव्याची मंद
अस्तित्व तसं तुझं
उजळते माझे जीवन
अकुकाका
प्रतिक्रिया
2 Aug 2018 - 12:48 pm | चांदणे संदीप
छान आहे. :)
Sandy
2 Aug 2018 - 1:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
उजळते माझे जीवन
अकुकाका
हे वाचलं आणि जरासा दचकलोच ! :)
छान आहे काव्य.
2 Aug 2018 - 2:19 pm | सतिश गावडे
अकुकाकांनी प्रथमच काही वाचण्यासारखे लिहीलं आहे. कविता आवडली.
4 Aug 2018 - 10:58 am | श्वेता२४
पण
सकाळची तुझी लगबग
चुलीस करी चूल पोतेरे
कंकणाचा नाद भिनला
अन्नपुर्णा भासे मजला
यात इतर िकाणी आहे तसे यमक जुळलेले नाही त्यामुळे थोडी खटकली
4 Aug 2018 - 3:30 pm | चांदणे संदीप
शिवाय, कोनाड्यातल्या हिंदमातेपेक्षा बराच आहे.
;)
Sandy
4 Aug 2018 - 3:39 pm | अभ्या..
सकाळची तुझी लगबग
चुलीस करी चूल पोतेरे
कंकणाचा नाद मजला
कशी अंगाई वाटे रे
*.
तुळशी समोर तेवावी
ज्योत दिव्याची मंद
अस्तित्व तसं तुझं
सहाणेला लाभे गंध
..
आता जुळलं का यमक?
येनीवे ह्याच्या पेर्णेने "आमचा लाल कंपू" पाडावे काय?
9 Aug 2018 - 6:13 am | अत्रुप्त आत्मा
आळीपाळीने कुंथु!
असं पण पाडता यील! ;)
4 Aug 2018 - 6:44 pm | नाखु
खरं तर खेड्यात हे अस्तित्वात आहे का ते माहीत नाही
खुलासेच्छुक नाखु
9 Aug 2018 - 8:56 am | यशोधरा
कविता आवडली.