"हॅलो"
"तुझे posts फार होताहेत, ते गाणं ग्रुपवरुन delit कर"
"बर,लगेच करतो"
आम्ही तात्काळ ग्रुप्स exit व WA forced stop केले"
मौनातच संयमीत उद्रेक झाला...
व्हाॅट्स अॅप संन्यास
बरे झाले देवा,
WA सोडविला,
पाश तोडविला,
आंतर्जाल ।
अपुलेच सांगती
पोस्ट तुझे फार,
त्यांना होतो भार,
नेटपॅक।
कसे हे आले,
आम्हावरी बंधन
म्हणे करा लंघन,
थोडा वेळ।
आम्हावरी सेंसाॅर,
इतकेच खोकणे,
तितकेच पादणे
ते नै होणे
आम्हा चिये।
आम्हा घरी आहे,
शब्दांचेच धन,
त्यावरी राशन?
नामंजूर ।
आम्हा ठावे करावे
सदा प्रेम बेदम,
असो बातों मे दम,
सर्वकाळ।
अजून नाही काही,
दिल का फूल मूर्झा,
वळवू ही उर्जा,
दूसरी कडे
सध्या तरी घेतला,
व्हाॅट्सप संन्यास,
अता दूसरा ध्यास,
घेऊ काही।
प्रोग्राम पायथाॅन
शिकू नवी भाषा,
पूढे आहे आशा,
लिहीण्याची।
मौनातच आहे,
जणू म्यान कारणा,
तनू ध्यान धारणा
चालतसे ।
जगण्यासाठी,
गॅजेट्स, अवश्य ना,
जणू विपश्यना,
शांत पणे।
जरी पाहो गेलो,
आहे वरतोनी,
येऊ परतोनी,
कधीतरी।
फुका म्हणे आता,
सोपी पायवाट,
अंतरीचा घाट,
ऐकू जरा ।
प्रतिक्रिया
28 Jul 2018 - 8:36 am | प्रचेतस
मस्त
28 Jul 2018 - 2:52 pm | Nitin Palkar
भावला मनाला फुकाचा अभंग
वाटे मना धरावा का तुमचाच संग....
29 Jul 2018 - 11:05 am | नाखु
प्रमाणात मिपावर "उधर (उधार) का माल इधर "अशी योजना राबविण्यात येत आहे.
"ढकलपत्र ढकलणार्यांना ढकला रे "संघाचा किरकोळ सदस्य नाखु बिनसुपारीवाला
29 Jul 2018 - 12:36 pm | सतिश गावडे
तुम्ही नक्की फॉरवर्ड संप्रदायाचे अनुयायी असणार. ;)
3 Aug 2018 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा
हही हही हही हही ही! =))
3 Aug 2018 - 5:05 pm | सिद्धार्थ ४
फॉरवर्ड करू का वाट्स अप वर ? :प