करुणानिधींच्या तब्ब्येती बद्दलची बातमी पहात होतो. त्यांच्या लोकप्रीयतेची सद्य स्थिती पहावी म्हणून गूगल ट्रेंड उघडले. तमीळनाडू मधील सध्याचे (गेल्या १२ महिन्यातले) गूगल ट्रेंड्स तपासले तर काही निकाल जरा अनपेक्षीत वाटले.
* तामीळ भाषा आणि त्या खालोखाल तामीळ नाडू हे शब्द सर्वाधीक शोधले जातात हे ओघाने आले.
* तामीळनाडूच्या नेते मंडळीत सध्या हयात मध्ये केवळ रजनीकांत ही रजनीकांत आहे. डिएमके चे करुणानिधी त्यांचे सुपूत्र स्टालीन ,ए आय ए डिएम के चे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, राहुल गांधी, पि. चिदंबरम,कमल हसन यांनाही शोध आहेत पण फारसे महत्वाचे स्थान दिसत नाही; पण म्हणून डिएमकेच्या दोन्ही पार्ट्या किंवा काँग्रेस संपतील असे नाही. गूगलशोधाचे गूगल ट्रेंडवरचे ट्रेंड सांगतात दिवंगतांमध्ये एम. जी रामचंद्रन हयात नसूनही रजनीकांतच्या पॉप्यूलॅरिटीला अद्याप तोडीस तोड आहेत त्या नंतर जयललिथांचा नंबर लागतो . यांच्या खूपच खाली आठवणीत असू इतपत द्रविड मुन्नेत्र कळघमचे अध्यक्ष अणादुराईंचे नाव दिसते पण दिसते म्हणजे त्यांच्या नावावर पक्ष अजून तरुन जाऊ शकतो.
विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुद्धा अणादुराईं बरोबर सोबत शोधले जातात. काँग्रेसचे महात्मा गांधी, जुने मुख्यमंत्री कामराज, जवाहरलाल नेहरु, राजीव गांधी सुद्धा अणादुराईंएवढे तामीळींच्या आठवणीत दिसतात पण इंदीरा गांधी मात्र त्यांच्यापेक्षा कमी शोधल्या जातात . अण्णादुराईं एवढाच शोध मोदींचाही होतो जो राहुल गांधींच्या शोधाच्या पाचपट आहे. पण अर्थात रजनीकांताची लोकप्रीयता दिवंगत रामचंद्रन सोडले तर बाकी सर्वांच्या किमान चौपटीने अधिक दिसते.
भाषेच्या बाबतीत तामीळ भाषा हा सर्वाधिक शब्द शोध आहे. त्यामानाने इंग्रजी भाषा ८ टक्केच शोधली जाते तर त्यातल्या त्यात जराशी समाधानाची बाब म्हणजे ५ टक्के शोध हिंदी भाषेच्या वाटेला येतो आणि खास म्हणजे हा शोध बर्यापैकी हिंदी भाषा प्रचारसभेच्या परिक्षांची माहिती शोधण्यासाठी होतो. तमीळ च्या मानाने संस्कृतचा शोध एक टक्क्यापेक्षाही कमी होत असावा जो होतो तो मुख्यत्वे शंकराचार्यांचे देवी लक्ष्मीला प्रसन्न करणार्या कनकधारा स्तोत्रासाठी आणि थोडासा संस्कृत परिक्षांच्या संदर्भाने होत असावा. हा संस्कृत भाषेचा शोध रामायण, महाभारत, आणि भगवद गीतेच्या शोधाच्या दुप्पट आहे.
तमीळ भाषा, रजनीकांत आणी गॉड या शब्द शोधाचे प्रमाण अभ्यासले तर तमीळ भाषा रजनीकांत आणि गॉडच्या नव्वदपट शोधली जाते. रजनीकांत आणि गॉड शब्दांचा शब्द शोध जवळपास सारखा दिसत असला तरी गॉड शब्दाची मुख्य शोध शब्द कोणते तर 'गॉड ऑफ सिनेमा' आणि हा गॉड ऑफ सिनेमा पुन्हा रजनीकांतच असणार हे वे सा न ल :)
गॉड द सुप्रीम बीइंगच्याच प्रमाणात कार्तीकेया आणि महादेव या देवता शोधल्या जातात. आपण हिंदू धर्म प्रेमी असाल तर कार्तीकेय आणि महादेव या दोन देवतांवरील तमीळी श्रद्धांचे नक्कीच आभारी असाल, कारण उर्वरीत भारतात प्रेम असल्या धर्मग्रंथ इथेही शोधले जात असले तरी अत्य्ल्प प्रमाणात म्हणजे स्क्रिप्चरल किंवा थिऑलॉजीकल बेस किंवा आयडीयॉलॉजीकल बेस कमकुवत रहाण्याची शक्यता वाढते. ( अर्थात रामायण महाभारताच्या प्रमाणात सध्या सध्या तामीळनाडूत वास्तव्य करणारे स्वतःस सदगुरु म्हण्वणारे कन्नड योगगुरु जग्गी वासूदेव यांचाही गूगल शोध तामीळनाडूत होत असावा असे दिसते - हे सदगुरु जग्गी वासूदेव महाराष्ट्रात फार परिचीत नसले तरी हजरजवाबी विनोदी शैली, इंग्रजी लिटरेचरवरचे प्रभुत्व आणि इतर धर्मीय तत्वज्ञान सहज सुलभ पद्धतीने पुरोगाम्यांना न दुखावता खोडत हिंदू धर्मीय योगसाधना खुप खुबीने पुढे ठेवतात भारतातला कथित पुरोगामी मिडीया सुद्धा त्यांना दूर ठेवत नाही आणि आंतरराष्ट्रीय मंचावर हिंदूधर्मीनेतृआध्यात्मिक नेतृत्वाची भिस्त बर्या पैकी या महामहिमांवर आहे.)
(आता इथे हे ही लक्षात घ्या तमीळ भाषेचा शोध हिंदी भाषेच्या जवळपास वीसपट अधीक असला तरी रजनीकांत, कार्तीकेय, महादेव, आणि स्वतः गॉड यांच्या पेक्षा हिंदी भाषेचा शोध ८ पट अधीक आहे - इथे गूगल ट्रेंड ज्या पद्धतीने माहिती सादर करते त्यात आकडे एक्झॅक्ट मॅच करु शकत नाहीत पण महत्वपूर्ण ढोबळ अंदाजा येण्यास मदत होते तर हिंदी प्रेमींना तेवढीच समाधानाची गोष्ट)
धर्माकडे वापस येऊ कार्तीकेय आणि महादेवाचा शोध इस्लाम शब्दाच्या तीप्पट आहे तर बायबल आणि जीजस शब्दाच्या दुप्पट आहे. कार्तीकेय आणि महादेवाचा शोध हिंदूईझम शब्दाच्या पाचपट आहे तर महाभारत शब्दाच्या अकरा पट आहे. आता इथे लक्षात घ्या की हिंदूइझम, महाभारत, गीता, जग्गी वासूदेव, इत्यादीपेक्षा इत्यादी पेक्षा इस्लामचा शोध ६३ टक्केपेक्षा अधिक आहे तर जीजस शब्दाचा शोध हिंदूईझम शब्दाच्या तीप्पट म्हणजे ३००% पेक्षा अधिक आहे. अर्थात योगा शब्दाचा शोध आणि जीजस शब्दाचा शोध एकसारखा आहे. आणि आधी म्हटल्या प्रमाणे कार्तीकेय आणि महादेवाचा शोध दुप्पट आहे. पण बायबलचा शोध जो त्यांना थिऑलॉजीकल सपोर्ट प्रोव्हाईड करतो त्या थिऑलॉजीकल किंवा आयडीऑलॉजीकल सपोर्टचा अभाव आहे असे वाटते.
* गूगल ट्रेंड्सना एंबेड करण्याची सुविधा माहित नसल्यामुळे संदर्भ सादर करण्यात तांत्रिक अडचण उपस्थित होते. संबंधीत शोध कुणि स्वतः घेऊन खात्री करणे हाच एक मार्ग असू शकतो जी प्रत्येकाने आपल्या जबाबदारीवर करुन घ्यावी.
* गूगल ट्रेंड्सवरुन मिळणार्या निकालांना मर्यादा असू शकतात , आणि मी गूगल ट्रेंड्स चालवत नाही म्हणून उत्तरदायीत्वस नकार लागू असल्याचे स्पष्ट करणे क्रमप्राप्त आहे.
* अनुषंगिका व्यतरीक्त आवांतरे टाळण्यासाठी अनेक आभार.
प्रतिक्रिया
27 Jul 2018 - 2:31 pm | कंजूस
इतरांना लोक चांगलेच ओळखून आहेत म्हणून शोधत नसावेत?
27 Jul 2018 - 2:44 pm | माहितगार
मी केवळ रोमन लिपीत आणि आपल्याला परिचीत स्टँडर्ड नावाने शोधतोय , तरीही आजकाल सोशल मिडिया आणि आंतरजाल यांची सरमिसळ होत असल्यामुळे हे ट्रेंड्स किमान शहरी जनतेचे अंशतः प्रतिनिधीत्व करत असावेत. असे वाटते,
27 Jul 2018 - 8:24 pm | उपयोजक
:)
8 Aug 2018 - 10:03 am | माहितगार
अखेर वयाच्या ९४ व्या वर्षी करुणानिधींचा देहांतवास झाला. त्यांच्या मागे दोन पत्नी, चार मुले आणि दोन मुली काही पुतणे असा परिवार यातला बर्यापैकी परिवार राजकीय, चित्रपटीय घराणेशाही आणि आर्थीक व्यवहारांबद्दल साशंकीत पार्श्वभूमी असलेला दिसतो.
त्यांच्या परिवारातील राजकीय वारसदारात एम.के. स्टालीन यांचे नाव आघाडीवर दिसते (गूगल ट्रेंड्स तमीळ शोधप्रीयतेत त्यांचा मुलगा उदयनिधी स्टालीन जरासाच पुढे दिसतो. द्रविड मुन्नेत्र कळघम या त्यांच्या राजकीय पक्षाची तमीळ शोधप्रीयता स्टालीन पिता पुत्रांच्या डबल असावी. स्टालीनच्या अर्धी शोध प्रियता करुणानिधीची मुलगी कणिमोझी हिला दिसते, कणिमोझीच्या खालोखाल शोधप्रीयता अरुलनिथी या करुणानिधीच्या नातवास अभिनेता असल्यामुळे प्राप्त होते. त्यानंतर बाकी नातेवाईकांचा क्रमांक लागतो त्यात एम.के. अलागिरी, एम.के. मुथू, कलानिधी मारन, दयानिधी मारन, राजाथी अम्मल ( करुणानिधींची द्वितीय पत्नी) असा क्रम लागावा.
करुणानिधींच्या मृत्यूमुळे मिळणारी तात्कालीक सहानुभूतीच्या लाटेचा करुणानिधींचा पक्ष , मुलगा स्टालीन मुलगी कणिमोझी आणि या दोघांच्या मुलांना पोहोचेल. अर्थात सहानुभूतीची लाटेचाही वार्षिक शोधप्रीयता सरासरीत समावेश केला तर रजनीकांतची शोधप्रीयता करुणानिधींच्या दुप्पट रहाते. पण करुणानिधींच्या सहानुभूतीच्या लाट ओसरल्यावर रजनीकांतची शोधप्रीयता स्टालीन आणि डिएमके पार्टीच्या किमान आठप्टीहून अधिक रहाते. अर्थात रजनीकांत स्वतःच्या शोधप्रीयतेस मतपेटीत किती रुपांतर करु शकतो ते येता काळ ठरवेल.
8 Aug 2018 - 11:17 am | सुबोध खरे
गुगल फक्त शिक्षित लोक आणि त्यात सुद्धा जालावर असलेल्या लोकांचा कल सांगू शकते. साधारण ८० % लोक तरी जालावर नसतील. ( ४५ टक्के स्त्रिया आणि ३५ % पुरुष) त्यामुळे अशा "ट्रेंड"ला किती महत्व द्यायचे हा एक मोठा प्रश्न आहे.
वाय एस राजशेखर रेड्डी यांनी नेट सॅव्ही चंद्राबाबू नायडूंचा मोठा पराभव करून आंध्र प्रदेशात हे दाखवून दिले होते कि जालावर आणि प्रत्यक्ष जमिनीवर फार मोठा फरक असू शकतो.
8 Aug 2018 - 12:23 pm | माहितगार
मान्य आहे, तरीही नेट सॅव्ही असणे आणि नेटवर लोकप्रीयता असणे या भिन्न बाबी आहेत. नेटवरची लोकप्रीयता मतांमध्ये परीवर्तीत करणे हे एक वेगळे आव्हान आहे. त्या शिवाय पार्लमेंटरी सिस्टीमची स्वतःची आव्हाने आहेतच भारतीय स्थानिक भाषेचे परिमाण आणि गूगल ट्रेंडवरील इंग्रजी शोध यातही फरक पडू शकतो. हे सगळे असूनही स्मार्ट फोन प्रकारानंतर व्हॉट्सअॅप आणि युट्यूब प्रभावातून नेटचा प्रभाव वाढला आहे तसेच अर्बन पॉपुलेशन मध्ये रुरल भागातून आलेल्या तरुणांचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे गूगल ट्रेंडच्या मर्यादा स्विकारुनही सरसकट नाकारताही येत नाही.
तशीही तामीळनाडूसहीत दक्षिणेत चित्रपट अभिनेत्यांच्या लोकप्रीयता मतदानात परिवर्तीत झाल्याचा गेल्या शतक भराचा मोठा इतिहास पाठीशी आहे. एन.टी.रामाराव, एम.जी.रामचंद्रन, जयललिता हि यातली ठळक नावे स्वतः करुणानिधी सुद्धा चित्रपट लेख वगैरे. मृत्यूच्या बळावर सहानुभूतीची असलेली लाट सरली की रजनीकांतला पुन्हा संधी असू शकेल. कारण जयललिता आणि करुणानिधी दोहोंचे ही राजकीय वारसदारांची भ्रष्टाचार विषयक प्रतिमा पुरेशा स्वच्छ नाहीत याचा लाभ रजनीकांतला होऊ शकावा असे वाटते.
8 Aug 2018 - 8:13 pm | Jayant Naik
एका वेगळ्या मुद्द्यावर प्रकाश टाकल्याबद्दल आभार.
8 Aug 2018 - 10:25 pm | चौथा कोनाडा
छान ! रोचक निरिक्षणे !
9 Aug 2018 - 11:41 am | सुबोध खरे
हे सगळे असूनही स्मार्ट फोन प्रकारानंतर व्हॉट्सअॅप आणि युट्यूब प्रभावातून नेटचा प्रभाव वाढला आहे तसेच अर्बन पॉपुलेशन मध्ये रुरल भागातून आलेल्या तरुणांचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे गूगल ट्रेंडच्या मर्यादा स्विकारुनही सरसकट नाकारताही येत नाही.
हे आपले म्हणणे मान्य आहे