फाडून टाक डिक्शनरी

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
28 Oct 2008 - 9:59 pm

अण्णांचे इंग्रजी आणि गणित हे दोन विषय एकदम पक्के होते.आईचे सर्व घरगुती व्यवहाराचे हिशेब ते तोंडीच करत.२ ते ३० पर्यन्तचे पाढे,पावकी निमकी,पाउणकी ,सवायकी,दीडकीचे पाढे तोंडपाठ असल्याने गुणाकार,भागाकार,बेरीज आणि वजाबाकी हातचा मळ असायचा. तसंच इंग्रजी पण.तर्कडकरानी लिहीलेलं इंग्रजी भाषेचं व्याक्रणाचं पुस्तक जवळ जवळ तोंडपाठ होतं.

आम्हाला काहिही इंग्रजी मधे लिहायचं असले तर एखादं अडलेलं स्पेलीन्ग डिक्शनरी न उघडता चक्क अण्णाना विचारावं.कधी त्यांच स्पेलिंग बरोबर आहे का म्हणून डिक्शनरी उघडून त्यांच्या समोर पाहत असल्यास ते कुतुहलाने पहात असत.आणि

गम्मत म्हणून,
"अण्णा स्पेलिंग चुकलं "
म्हणून सांगीतल्यास,ते म्हणत,
"माझं स्पेलिंग चूक वाटल्यास डिक्शनरीचं पान सरळ फाडून टाक"
असं सांगून झाल्यावर त्यांच्या चेहरयावरचा आत्मविश्वास पाहिल्यावर आनंद मिळत असे तो कसा विसरायला होणार?

श्रीकृष्ण सामंत

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

28 Oct 2008 - 10:29 pm | लिखाळ

छान आठवण !
--लिखाळ.

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Oct 2008 - 12:19 am | श्रीकृष्ण सामंत

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com