सेक्रेड गेम्स

बार्नी's picture
बार्नी in जनातलं, मनातलं
8 Jul 2018 - 4:45 pm

सेक्रेड गेम्स

sacred games

काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्स विक्रम चंद्रा च्या कादंबरीवर टीवी सिरीज बनविणार म्हणून समजले आणि मी उडालो. इंजिनीरिंग ला असताना मला विक्रम चंद्रा चे हे पुस्तक प्रचंड आवडलेले . इतका बारीक अभ्यास करून तरीही रियालिटी शी बांध ठेवून थ्रिलर लिहिण्याचे कसब फारच थोड्या लेखकांकडे असते.

आणि त्यात अनुराग कश्यप , विक्रमादित्य मोटवाणे हे दोघे डायरेक्टर आणि वरून ग्रोव्हर ( गँग्स ऑफ वासेपूर , मसान, मोह मोह के धागे फेम ) सारखा लेखक व नवाझुद्दीन सिद्दिक्की , सैफ आली खान , राधिका आपटे सारखी स्टारकास्ट बघून होपफ़ुल होतो . नेटफ्लिक्स चे शोज हे इतर शोज पेक्षा अत्यंत वेगळे असतात कारण त्यांची क्वालिटी . मग तो नार्कोस असो की स्ट्रेन्जर थिंग्स असो की जर्मन शो " डार्क " असो . सतत काहीतरी नवीन देत राहण्यामुळे नेटफ्लिक्स छोट्या काळात प्रचंड यशस्वी झालेली आहे.

तर दोन दिवसांआधी ही सिरीज रिलीज झाली आणि झपाटल्यासारखी बघून काढली . अँड इट वाज वर्थ इट .

sacred games

सरताज सिंग ( सैफ अली खान ) हा मुंबई मध्ये काम करणारा अंडर परफार्मिंग पोलिसवाला असतो . सोडून गेलेली बायको , डिपार्टमेंट मधील राजकारण ह्याने वैतागलेला . एक दिवस त्याला अंडरवर्ल्ड डॉन गणेश गायतोंडे ( नवाज ) चा फोन येतो आणि मुंबई वाचविण्यासाठी तुझयाकडे २५ दिवस असल्याचे सांगतो , मग सुरु होतो एक खेळ जो शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो.

कुठल्याही प्रकारची सेन्सॉर बोर्ड ची भीती नसली की काय होऊ शकत , हे अनुराग आणि विक्रमादित्य ने दाखवून दिले आहे . सॅक्रेड गेम्स हा भारताचा नार्कोस आहे असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही . राजीव गांधी पासून , शाह बानो प्रकरण , देव , धर्म , बाबरी मस्जिद प्रकरण , नंतरच्या दंगली , रामायण , महाभारत सारख्या विविध विषयांवर बेधडक कमेंट्री करण्याचे धाडस लेखकांनी दाखवलेले आहे.
उदाहरणार्थ एपिसोडस ची नावं बघा . अश्वथामा , हलाहल , ब्रह्महत्या , रुद्र , आतापी वातापी , प्रत्येकल्प , आणि ययाती नावाचा अंतिम एपिसोड .

शिवाय अभिनयाच्या बाबतीत ही कुठेच कमतरता भासत नाही . नवाजुद्दीन सिद्दिक्की तर संपूर्ण शो मध्ये भाव खाऊन गेलाय.

navaaj

सरताज म्हणून सैफ ने ही बर्याच वर्ष्यानंतर मस्त काम केलेले आहे . आणि काटेकर म्हणून जितेंद्र जोशीने काही काही सीन्स मध्ये सैफ लाही लाजवेल असा अभिनय केला आहे. तांत्रिक दृष्ट्या इतका सरस आजपर्यत कुठलाही टीवी शो झालेला नसेल , कुठेही आपण भारतीय शो बघतोय असं वाटत नाही.
नेटफ्लिक्स ने ह्या शो द्वारे बेंचमार्क खूपच वर ठेवला आहे जो येणाऱ्या काही वर्षांत इतर शोज ना गाठणे कठीण ठरेल .

त्यामुळे एकता कपूर च्या पांचट कार्यक्रमांना आपण कंटाळला असाल तर हा खेळ बघायलाच हवा .

( टीप : हा शो १८+ प्रेक्षकवर्गाला गृहुत धरून बनविला असल्याने फॅमिली सोबत किंवा लहान मुलांना दाखविण्यापूर्वी विचार करावा )

मांडणीआस्वाद

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

9 Jul 2018 - 8:56 am | ज्योति अळवणी

Interesting.... नेटफ्लिक्स बद्दल बरच ऐकलं आहे. बघायलाच हवं एकदा हे प्रकरण

बार्नी's picture

9 Jul 2018 - 9:29 am | बार्नी

पहिला महिना फ्री आहे, बघून टाका !

कपिलमुनी's picture

9 Jul 2018 - 9:11 am | कपिलमुनी

शो बघायला सुरुवात केलि आहे . नार्कोसची छाप जाणवली आहे.
रहस्य आणि भूतकाळ यांची सांगड छान घातलि आहे . फॅमिलि शो मात्र अजिबात नाहि.

pawar.sujit's picture

9 Jul 2018 - 9:28 am | pawar.sujit

Kalach pahun zali...
Baryach diwsani hindi madhe hatke serial pahili. Nawajuddin, Radhika, Jitendra Joshi yanchya pudhe Saif purn zakolalay

अनन्त अवधुत's picture

9 Jul 2018 - 12:12 pm | अनन्त अवधुत

पहिला एपिसोड प्रचंड आवडला. पुढे पण पाहेन.

मंदार कात्रे's picture

9 Jul 2018 - 5:07 pm | मंदार कात्रे

नेटफ्लिक्स ने ह्या शो द्वारे बेंचमार्क खूपच वर ठेवला आहे जो येणाऱ्या काही वर्षांत इतर शोज ना गाठणे कठीण ठरेल .

१००% सहमत

गामा पैलवान's picture

10 Jul 2018 - 10:38 pm | गामा पैलवान

बार्नी,

उत्सुकता वाढली आहे. याचा राशीप्रपात ( = टॉरेंट) वा तूनळीदुवा लाभेल काय?

आ.न.,
-गा.पै.

मंदार कात्रे's picture

11 Jul 2018 - 5:04 pm | मंदार कात्रे

व्यनि पहा

या मालिकेविषयी बरेच ऐकले आहे. पाहण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

चित्रगुप्त's picture

11 Jul 2018 - 1:22 am | चित्रगुप्त

अगदी आत्ताच याचा शेवटला आठवा भाग बघून उठून मिपावर येतो तो हा धागा. अत्यंत वास्तव आणि परिणामकारक. जवळ जवळ प्रत्येक संवाद शिव्यांनी भरलेला. अर्थात हे संवाद भाई-दादांच्या तोंडचे असल्याने ते तसेच असायला हवेत. शिव्या, हत्या, पिस्तुलांची ठोकाठोकी आणि सेक्स यातून वाट काढत जाणारी उत्कंठावर्धक कथा. अर्थात यातली कामुक दृश्ये मुद्दाम मसालेदार्पणासाठी-- म्हणजे तशी कथेच्या दृष्टीने फारशी आवश्यक नसूनही -- घातलेली वाटतात. सिनेमाटोग्राफी, संवाद, दिग्दर्शन, कास्टिंग वगैरे उत्तम. त्यातल्या त्यात सैफअलीच ठोंब्या वाटतो. सध्या पाऊण पाऊण तासाचे आठ भाग आलेत, पुढले केंव्हा येणारेत ? मलातरी फार गुंतागुंत असलेली कथा पटकन कळत नाही, त्यामुळे कोणते प्रसंग आधीचे, कोणते नंतरचे हे समजणे जरा कठीण गेले.

मंदार कात्रे's picture

11 Jul 2018 - 5:05 pm | मंदार कात्रे

आठव्या भागाचा शेवट ( सीझन फिनाले ) अर्धवट किंवा कन्फ्युझिन्ग वाटला . १-३ एपिसोड वेग छान आहे कथेचा . ४-६ बोअरिन्ग होतो थोडासा आणि कामुक दृष्ये संपूर्णतः अनावश्यक वाटली . भाषा मात्र योग्य आहे . शिव्यांमुळे झणझणीत वास्तवता आली आहे शो मध्ये

बार्नी's picture

11 Jul 2018 - 7:19 pm | बार्नी

आजकाल सीजन क्लीफ हँगर ला सोडण्याची फॅशन झाली आहे ( मायला त्या गेम ऑफ थ्रोन्स च्या ) , ह्यामुळे फॅन थेरीज सुरु होतात आणि अजून प्रसिद्धी मिळते. .

राघव's picture

12 Jul 2018 - 4:25 pm | राघव

"मायला त्या गेम ऑफ थ्रोन्सच्या.." ++++१ ...........वर्ष वर्ष वाट पाहायला लावतात... x(

scared Games सारखी अजून कुठली वेब series आहे का? हि खूप आवडली.
धागा वाचून उत्सुकता वाढली होती.
कळावे.

कपिलमुनी's picture

12 Jul 2018 - 1:20 pm | कपिलमुनी

इंग्रजी नार्कोस बघा

स्पा's picture

12 Jul 2018 - 5:37 pm | स्पा

"ब्लॅक मिरर '' चे सगळे सिजन बघा

प्रसाद_१९८२'s picture

12 Jul 2018 - 9:02 pm | प्रसाद_१९८२

कॉग्रेस पार्टीने म्हणे या वेबसिरिज मध्ये राजीव गांधींचा अपमान केला म्हणून, नेटफ्लिक्स व नवाझुद्दीन सिद्धीकी विरुध्द एफआयआर दाखल केली आहे.

सोमनाथ खांदवे's picture

15 Jul 2018 - 6:00 am | सोमनाथ खांदवे

नक्की काय संवाद , माहिती आहे कुणी तरी सांगा ,सगळेच जण नेटफ्लिक्स वर पाहू शकत नाही हो !!!!!!

प्रसाद_१९८२'s picture

15 Jul 2018 - 11:03 am | प्रसाद_१९८२

Sacred Games चे सर्व ऐपिसोड तुम्ही ह्या साईटवर फुकट पाहू शकता.

सोमनाथ खांदवे's picture

15 Jul 2018 - 12:08 pm | सोमनाथ खांदवे

https://youtu.be/r3KV31CMeF8
हे ते वादा चे कारण

तुषार काळभोर's picture

16 Jul 2018 - 8:48 am | तुषार काळभोर

अशा ठिकाणी संपावलाय की दुसऱ्या पर्वाला पर्याय नाही.
पण निर्माण प्रक्रियेतील सलगता व दर्जा जर राखला, तर तो कास्ट चांगला होईल असं वाटतं.

प्रसाद गोडबोले's picture

16 Jul 2018 - 10:44 am | प्रसाद गोडबोले

तद्दन बकवास सीरीज आहे.
पहिल्या भागात अश्वस्थामा ह्या भागात उत्कंठा जागृत होते पण नंतर तोच तोच पणा निर्माण होतो . कथेचा विषय जितका फास्ट आहे तितके पार्ट फास्ट नाहीत , त्यामुळे बर्‍आचसा भाग रटाळ वाटला. म्हणजे २४ मध्ये त्याच्या बावळट पोरीचे अन बायकोचे सीन होते किंव्वा ब्रेकिंग बॅड मध्ये त्याची बायको डोक्यात जायची तसे काहीसे रटाळ !
नवाजहुसेन म्हणजे अगदी गँग्स ऑफ वासेपुर पार्ट ३ करत आहे असे वाटते.

बाकी ह्या सीरीजमध्ये " ड्रग्स , सेक्स , व्हायोलन्स , मनसोक्त शिव्या हे सारे दाखवणे म्हणजेच जणु काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य " असा काहीसा दृष्टीकोन दिसतो. असो. दाखवो बापडे ! एकवेळ ड्रग्स आणि सेक्स ठीक आहे , समजु शकतो , पण व्हायलन्स आणि शिव्या देणे " अभिजात " किंव्वा "नवीन प्रयोग" किंव्वा "अभिव्यक्ती स्वातंत्र्य" कसे असु शकते हे आमच्या आकलनाच्या पार आहे !

अवांतर : बाकी ह्या सीरीज मध्ये पहाता पहाता एक गोष्ट निदर्शनास आली , आपल्या रीसर्च अ‍ॅन्ड अ‍ॅनालिसिस विन्ग रॉ चा मोटो कि काय ते आहे - धर्मो रक्षति रक्षित: |

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।
तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् । । ८.१५ । ।

हा मुळ कोणत्या ग्रंथातील आहे ? मिपावर शतकी धागा काढता येईल असे उत्तर आहे !

नो वंडर व्हाय रॉ इज सो सनातनी !! लोल !!
=))))

कपिलमुनी's picture

16 Jul 2018 - 10:58 am | कपिलमुनी

मनुस्मृति मधील वचन आहे का ?

गामा पैलवान's picture

16 Jul 2018 - 11:55 am | गामा पैलवान

हाहाहा, अगदी बरोबर.

संदर्भ : https://drive.google.com/file/d/0B-ll6TtiictNWWpVVUpQaVhWbFU/view : पान १२२/३३२

-गा.पै.