संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग होता का ? या मुद्द्यावरून विरोधक पुन्हा पुन्हा टिका करताना दिसतात. काय असतील या संघ विरोधामागची कारणे ?
इंग्रजांविरुद्ध मोठ्या लढाईला सुरुवात झाली ती 1857 मधे. त्याचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले आणि झाशीच्या राणीसारखे संस्थानिक त्यात सहभागी होते. पुढे वासुदेव बळवंत फडकेंनी सशस्त्र लढा दिला. सर्वात कमी वयाचा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे, तीन चाफेकर बंधू फासावर चढले. सावरकरांनी इंग्लंडमधे राहून सशस्त्र क्रांतिकार्यासाठी मदत पुरवली. तो लढा अधिक प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला. पण सावरकरांचे योगदानही सतत नाकारण्याचा प्रयत्न होतो. एखाद्या टीकाकाराला विचारा की सावरकरांनी जर काहीच योगदान दिले नव्हते तर इंग्रजांनी त्यांना अंदमानच्या तुरुंगात का डांबले होते ? टीकाकारांकडे याचे उत्तर नसते.
लोकमान्य टिळकांचे योगदानही नाकारण्याचा प्रयत्न होतो. इथेही टिळक या व्यक्तीपेक्षा त्यांची जात अनेकांना सलते.
महाराष्ट्रात तरी इंग्रजांविरुद्ध लढण्यामधे ब्राह्मण समाज आघाडीवर होता. काँग्रेस पक्षावर या समाजाची पकड होती. गोपाळ कृष्ण गोखले कमी वयात काँग्रेसचे अध्यक्ष झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही जणांच्या असे लक्षात आले की आपल्याला सत्ता हस्तगत करायची असेल तर या जातीला बाजूला सारायला हवे. म्हणून ब्राह्मण जातीला त्यांनी बदनाम करायला सुरुवात केली.
<टाइम प्लीज>
ज्यांना पॉपकॉर्न खाऊन घाण करायची आहे त्यांनी
https://www.misalpav.com/node/41559
इथे व्यक्त व्हावे.
</टाइम प्लीज>
संघाची स्थापना 1925 साली झाली. त्याला बाबाराव सावरकरांसारख्या क्रांतिकारकांचा आशीर्वाद होता. आपली स्वतःची संघटना त्यांनी संघामधे विलीन केली. स्वा. सावरकरांचेही संघाला आशीर्वाद होते. किंबहुना नानासाहेब पेशवे, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर यांचीच परंपरा सांगणारे लोक संघामधे सामील झाले. हुतात्मा राजगुरू यांचे सख्खे नातेवाईक आज संघाच्या कामात आहेत.
ब्राह्मण जातीचा असा शिक्का बसल्यामुळे संघाबाबत आकस असावा असे दिसते. आपल्याकडे थेटपणे जातीला नावे ठेवणे सुसंस्कृतपणाचे समजले जात नाही. पण अप्रत्यक्ष रीतीने दिलेल्या शिव्या मात्र खपून जातात. जिथे जिथे ब्राह्मण समाज दिसेल, तिथे तिथे त्याचे योगदान नाकारले जाते. टीकाकारांचा रोष संघावर नसून ब्राह्मण जातीवर आहे. उद्या संघावर ब्राह्मणांऐवजी इतर जातींचा पगडा आहे अशी प्रतिमा समाजामधे तयार झाली तर हेच टीकाकार संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे किती मोठा सहभाग होता, असे सांगायला सुरुवात करतील.
थोडक्यात काय तर नेणीवेमधे ब्राह्मण जातीबद्दल असलेला आकस संघ विरोधाच्या रूपाने जाणिवेत प्रगट होतो.
प्रतिक्रिया
1 Jul 2018 - 11:17 am | साहना
काहीबाही ! सर्वच संघटनांनी स्वातंत्र्यलढ्यांत भूमिका घ्यायला पाहिजे असे काही ब्रम्हवाक्य आहे काय ? आंबेडकर ह्यांची स्वातंत्र्य लढ्यांत काय भूमिका होती ? चर्च ची भूमिका काय होती ? वारकरी संप्रदायाने का नाही वारी सोडून सशस्त्र लढा पुकारला ? अखिल भारतीय वस्त्रोद्योग मंडळाने स्वातंत्र्यलढ्यांत का भाग घेतला नाही ? तिरुपती संस्थान त्या वेळी काय करत होते ? विवेकानंद स्वातंत्र्य लढ्यांत भाग घ्यायचा सोडून काय नसते तात्विक उद्योग घेऊन बसले होते ?
ओके ! भारतीय आर्मीची भूमिका काय होती ?
तात्पर्य : इतर लोकांनी काय भूमिका घेतली ह्या आधी आपण आणि आपल्या बापजाद्यांनी काय भूमिका घेतली होती हे स्पष्ट करावे (संघाच्या टीकाकार मंडळीनी). त्यापेक्षा आजच्या दिवशी भारतीय लोकांचे स्वातंत्र्य वाढावे ह्यासाठी काय केले आहे हे सुद्धा सांगावे.
1 Jul 2018 - 11:40 am | अमरेंद्र बाहुबली
सहमत
1 Jul 2018 - 1:31 pm | आनन्दा
सहमत आहे. आणि प्रत्येकाने प्रत्येक आंदोलनात सहभागी व्हायची गरज नसते. आणि तसेही संघाने बाहेरून नेहमीच पाठिंबा दिलेला आहे.
संघाच्या कोणत्या माणसाने ब्रिटिशांना विनाशर्त पाठिंबा दिलाय ते सांगा.
मग बघू.
1 Jul 2018 - 2:01 pm | सोमनाथ खांदवे
साहना जी,
वारकरी पंथ ,आंबेडकर , तिरुपती संस्थान किंवा चर्च यांनी कधी संघाचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग विषयी आक्षेप घेतल्याचे ऐकीव नाही (असेल तर निदर्शनास आणून द्यावा ) म्हणून त्यांच्या उल्लेखा मुळे मूळ विषय भरकटू शकतो .
1 Jul 2018 - 12:50 pm | सोमनाथ खांदवे
फुल्ल सपोर्ट
1 Jul 2018 - 1:48 pm | भीमराव
टिळक, सावरकर, चाफेकर, राणी लक्ष्मीबाई, पेशवे यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल जन्मात कोणाला शंका असायचे कारण नाही. तुम्ही स्वतः रास्वसंघ या संघटनेच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल प्रश्न विचारला आहे. वरील स्वातंत्र्य सेनानी ब्राह्मण होते म्हणून त्यांचा दाखला देऊन संघ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढला हे कसे सिद्ध होते? गदर पार्टी/कांग्रेस, आझाद हिंद सेना, सशस्त्र क्रांती कारक, सत्याग्रह, पत्रिसरकार असं काही संघाने संघटीत पने केलं आहे तर बोला. मुळ लढा सोडून संघाने संघ म्हणून लोकांना राष्ट्रप्रेमाने प्रेरीत केले असले तरी सांगा. पन स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांची जात दाखवुन जर संघाला प्रमाण पत्र दिले तर प्रश्न पडतो की संघ फक्त एकाच जातीची मक्तेदारी आहे का?
हे लिखाण जतीवाद पसरवनारे आहे,
1 Jul 2018 - 1:54 pm | सोमनाथ खांदवे
स्वातंत्र्य लढ्यात योगदान असलेली काँग्रेस ( गांधी ,टिळक,पटेल यांची ) भारत स्वतंत्र झाला तेंव्हाच संपली , मग आताच्या काँग्रेस चे व त्यांच्या नेत्याचे स्वतंत्र लढ्यातील योगदान काय ?
अजून किती दिवस त्या मुद्दला वरील व्याज खात बसणार ?.
1 Jul 2018 - 4:29 pm | चौकटराजा
१८५७ साली जे लढले त्यानी त्याच वेळी हे" स्वातंत्र्य युद्ध आम्ह्वी पुकारले आहे चालते वा ! " असे स्पष्ट भूमिका असलेले संघटन केले होते काय ? याचे उत्तर मिपाकर इतिहास अभ्यासक प्रेमी ई ई नी द्यावे . " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे : असे म्हणताना स्वराज्य मिळविल्यानंतर नक्की काय करणार याचे काही विवेचन टिळकांनी केले होते काय ? हा माझा दुसरा प्रश्न आहे . " मेरी झासी नही दूंगी ! " या उदागारामागे राणी ची लोकशाही आणायची भूमिका होती की फक्त आपले राज्य पुन्हा मिळविण्याची ? त्यावेळी ब्रिटन मध्ये लोकशाहीचा उदय झाला होता ना ?
मी तरी भारत देशांत स्वातंत्र्य आले या पेक्षा लोकशाही आली याला महत्व अधिक देतो . जुलमी , लुटारू ब्रिटीश नकोत पण आम्हाला आता लोकशाही नावाचा शासन प्रकार हवा आहे ज्यात " राजा " या संज्ञेला अजिबात स्थान नाही ." अशी ग्वाही स्वातंत्र्य लढ्यात कोन्ग्रेस पक्षाने तरी स्पष्ट पणे दिली होती का ? ( संस्थानिकाचे तनखे बंद कारायचे धाडस करायला या देशाला २२ वर्षे लागली ).
मला वाटते प्रत्यक जण आपापल्या परीने फक्त " ब्रीटीश" नकोत या एकाच मुद्यावर लढत होता . सर्वांचे एकत्र प्रयत्न व दुसरे महायुद्ध यांचा एकत्रित परिणाम म्हणून जगात अनेक देशाना स्वातंत्र्य मिळाले त्यात भारत आ एका देश !
1 Jul 2018 - 5:00 pm | जेम्स वांड
दिसला ब्राह्मण का धोपट हा कार्यक्रम तसंही कामाचा नाही हे सगळ्यांना समजेल तो सुदिन. असो, एक मायनर दुरुस्ती सुचवू इच्छितो, सर्वात तरुण क्रांतिकारी हे अनंत लक्ष्मण कान्हेरे नाही तर खुदिराम बोस होते, असे वाटते.
1 Jul 2018 - 6:43 pm | नाखु
झालं,मिपा स्वातंत्र्य पूर्व काळात नव्हतं , नाही तर मिपाकरांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय? नाखु खिजगणतीत यांचा सहभाग काय?
ब्रिटिशांनी या १९४७ ला निकाल लावून मिपाची धर्मसंकाटातून सुटका केल्याबद्दल अभिनंदन.
अखिल मिपा पुरा(लेले) तत्व आणि खोगीरभरती वरचेवरती या पावसाळी आजार प्रतिबंध समितीच्या "धागे उकळा,विषय टाळा" या पत्रकातून साभार
1 Jul 2018 - 11:58 pm | कपिलमुनी
<टाइम प्लीज>
ज्यांना"धागे उकळा,विषय टाळा" घाण करायची आहे त्यांनी
इथे व्यक्त व्हावे.
वगैरे वगैरे वोर्निंग वाचायला तयार रहा
1 Jul 2018 - 9:29 pm | प्रसाद गोडबोले
मुळातच ज्याला आपण स्वातंत्र्य लढा म्हणतो तो स्वातंत्र्य लढा होता का ह्यावर सविस्तर चर्चा केली पाहिजे .
भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे काही अमेरिकन स्वांतंत्र्य लढ्यासारखा नव्हता. अमेरिकेने स्वातंत्र्य " जाहीर" केले आणि मग ते नाकारण्याविरुध्द युध पुकारले. भारतात म्हणजे अगदी गोखलें पासुन गांधीं पर्यंत आपले म्हणजे " दे दान सुटे गिर्हान" असेच चालु होते !
भारतीय आणि अन्य अनेक वसाहतींच्या स्वातंत्र्याचे श्रेय द्यायचे असेल तर त्यातील बहुतांश योगदान अॅडॉल्फ हिटलर चे च आहे. हिटलर झाला , दुसर्या स्वातंत्र्य युध्दामुळे युरोपीय अर्थव्यवस्था ढासळल्या नसत्या तर अजुन पुढील १०० वर्षे तुम्ही मीठ मुठभर उचलत राहिला असता ! म्हणे साम्राज्याचा खचला पाया =))))
प्रभात फेर्या काढत राहिला असता " चरखा चला चला के , लेंगे स्वराज्य लेंगे" तुमच्या त्या लेंग्यांचा अन चरख्याचा काही फरक पडत नाही म्हणावं साहेबाला .
पोकळ स्वप्नील अन रोमॅन्टीक आशावादाच्या स्वप्नातुन भारतीयांना कधी जाग येणार की नाही हे देवच जाणे !
1 Jul 2018 - 10:06 pm | जेम्स वांड
पोकळ स्वप्नील अन रोमॅन्टीक आशावादाच्या स्वप्नातुन भारतीयांना कधी जाग येणार की नाही हे देवच जाणे !
खरंय, अन स्वस्त नशापाणी पण कधी सोडणारेत देव जाणे!
1 Jul 2018 - 11:28 pm | नाखु
ठेवता आणि मूळातच देव नाहीये अशी शंभर टक्के खात्री असलेल्या थोर विचारवंत+समाज सुधारक लोकांना कामाला लावता.
देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
प्रेक्षक नाखु
2 Jul 2018 - 3:50 am | प्रसाद गोडबोले
हो तेही खरंय पण त्याचा स्वातंत्र्य लढ्याशी काय संबंध आहे ? गांधी , टिळक , गोखले , सावरकर वगैरे लोकांपैकी कोणीच नशापाणी करत असल्याचे ऐकीवात नाही . नेहरुचा सिगारेट पिताना फोटो पाहिला आहे, जिनाही दारु पित होते म्हणे .
2 Jul 2018 - 9:24 am | साहना
१००% सहमत ! भारत कधी भविष्यांत खरोखर स्वतंत्र झाला तर गांधी नेहरू ह्यांना ब्रिटिश एजेंट म्हणून समजण्यात येईल.
3 Jul 2018 - 11:24 am | माहितगार
१९२५ आणि २०१४ मध्ये आली नाही का ? :) संघाने भारतीय 'शीस्त' या प्रकारास कमी पडतात त्याकडे कॅडर बेस्ड चळवळ उभी करुन प्रयत्न केला, पण संघातील शीस्तीची दिक्षा संघाच्या सहयोगी संस्था आणि बाहेरुन समर्थन देणार्यांपर्यंत कितपत पोहोचली हाही प्रश्नच असेल.
संघ समर्थकांच्या दृष्टीकोनातून गांधी-नेहरु विरोधाचे मुख्य कारण अल्पसंख्यांक तुष्टीकरणाच्या भावनेत दडलेले असावे . संघाला समर्थन देणार्या मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गाच्या नेमक्या समस्या एलाईट वर्गातून असलेल्या नेहरुंना समजत नव्हत्या त्यामुळे ते त्या समस्यांना व्यावहारीक तोडगे देण्यास कमी पडत होते कारण त्या समस्या ते स्वतः जगले नव्हते.
संघ समर्थकांच्या गांधी नेहरुंम्बद्दलच्या काही आक्षेपांची ऊतरे नरहर कुरुंदकरांच्या लेखनातून आणि गोविंद तळवळकरांच्या अग्रलेखातून मिळतात. ज्यांना सशस्त्र संघर्ष करायचा त्यांनी तो करावयास होता आणि केला अगदीच नाही असे नाही, म गांधींनी त्यांच्या बाजूने सर्वसामान्यांची अहिंसक चळवळ चालवली किमान जनसामान्यांना जागे करणे आणि त्यांना सामावून घेण्याचे श्रेय त्यांना जावे. ब्रिटीशांपासून स्वांतंत्र्याचे यश त्यामुळे आले असेल नसेल . ब्रिटीश का गेले आणि श्रेय नेमके कुणाला याचे कागदोपत्री सुस्पष्ट पुरावे उपलब्ध नाहीत तेव्हा नाहीत. म. गांधी बद्दल विश्लेषण होताना सुटणारी बाब म्हणजे कितीही अंहिसेचा जप केला तरी प्रसंगी शत्रुचा भेद करण्यास सांगणारी गीता केवळ हातात ठेवली नाही तर सर्वांना वाटली याचा विसर का पडावा. १८५७ चा ईतिहास पाहिल्या नंतर देश सुटा सुटा उभा राहणे विरुद्ध पूर्ण देश एकाच वेळी उभा करण्याचे गांधी प्रणित स्ट्रॅटेजीचे स्वतःचे फायदेही असावेत.
The Role of RSS in Freedom Struggle Brilliantly Explained By Arpan Srivastava - December 21, 2015 हा लेख काँग्रेसने संपुर्ण स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणत्यावर्षी प्रस्तुत केला त्याचे वर्ष देते. असो.
2 Jul 2018 - 1:45 am | गामा पैलवान
चौकटराजा,
तुमचं विधान कमालीचं रोचक आहे. आपण भारतीयांनी लोकशाही म्हणून जे काही स्वीकारलंय ते ब्रिटीश प्रारूप आहे. आणि ब्रिटनमध्ये अधिकृत राज्यव्यवस्था लोकशाही नसून संवैधानिक राजेशाही म्हणजे constitutional monarchy आहे. तेव्हा लोकशाही म्हणजे नक्की काय हे आगोदर ठरवायला हवं. ते ठरल्यावर लोकशाहीच्या मागणीचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा संबंध तपासून बघता येईल.
आ.न.,
-गा.पै.
2 Jul 2018 - 7:16 am | चौकटराजा
माझ्या अल्प माहिती अनुसार आपली राज्यव्यवस्था तीन चार प्रारूपांचे एक समिश्र स्वरूप आहे. त्याला कारण अतिशय गुंतागुंतीची समाजरचना हे असावे बहुदा !
2 Jul 2018 - 1:48 am | गामा पैलवान
आशु जोग,
एका वाक्यात संघाचं स्वातंत्र्यलढ्यातलं स्थान सांगतो :
संघाच्या चार दशकांच्या अथक परिश्रमांचे फलित म्हणून एक संघी आज पंतप्रधान झालेला आहे.
आ.न.,
-गा.पै.
2 Jul 2018 - 4:33 pm | विजुभाऊ
पेशवाईपासूनच ती सुरवात झाली होती.
2 Jul 2018 - 4:44 pm | कपिलमुनी
यावर एवढा मोठा लेख पाडण्यापेक्षा संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग असलेल्याचे १० पुरावे असा लेख आला असता तर त्याला मूल्य असते.
नुसतीच शब्दांची फिरवाफिरवी करण्यापेक्षा १ पुरावा देखील मोठा ठरतो .
पुरावे द्या बोलणार्यांची तोंडे आपोआप बन्द होतील.
2 Jul 2018 - 5:34 pm | स्वधर्म
धागाकर्ते बघूया काय उत्तर देतात ते.
3 Jul 2018 - 9:54 am | माहितगार
हम्म खरय संघ समर्थकांचा आणि विरोधकांचा दोन्हीचा अभ्यास जरा जरा कमी पडतो. The Role of RSS in Freedom Struggle Brilliantly Explained By Arpan Srivastava - December 21, 2015
2 Jul 2018 - 10:59 pm | माहितगार
स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीं आणि ज. नेहरुं शिवाय इतर कोणी काही केल नव्हतं, म्हणून म. गांधींनी काँग्रेस बंद करुन केवळ नहेरु परिवाराला स्वातंत्र्याचा वारसा आंदण दिला. म. गांधींनी काँग्रेस १९४७ मध्येच बंद करण्यास सांगितल्यामुळे आणि काँग्रेस बाह्य पक्षात नेहरु परिवार जाईल त्या पक्षात स्वातंत्र्याचा वारसा जाणे अपेक्षीत असल्यामुळे वरुण गांधी सोबत स्वातंत्र्याचा वारसा भाजपाच्या माध्यमातून त्यांच्या आशिर्वाद कर्त्या संघाकडे जमा झाला -आता तो त्यांच्या (संघाच्या) तिजोरीत बंदीस्त आहे. १९४७ आधीचे सर्व काँग्रेसचे पुरावे संघाच्या नावाने मोजा म्हणजे झाले !
2 Jul 2018 - 11:09 pm | माहितगार
१९४७ च्या आधीचा काँग्रेस हिंदूंचा पक्ष होता असे जीना आणि मुस्लिम लीगने सुद्धा सर्टीफीकेट दिलेच होते. तो ईतिहास जमा होऊन त्याचे रुपांतरण लांगुलचालनलीग मध्ये झाले. जीना आणि मुस्लिम लीगचे सर्टीफीकेट तरी छुप्या लांगुलचालनलीगला चालावयास हवे . आताच्या काळात लांगुलचालनलीग जीना आणि मुस्लिम लीगला रिप्रेझेंट करते आणि भाजपा हिंदूंना. जर स्वांतत्र्य लढ्याचे प्रमाणपत्र हिंदूंचे असेल तर आता ते भाजपाकडे वर्ग झाले तर बिघडले कुठे :) (ह.घ्या.)
3 Jul 2018 - 12:18 am | आशु जोग
मुख्य विषय
संघाबाबत आकस का
हा चर्चिलेला आहे. तो मुद्दा सोडू नका म्हणजे झाले. संघावर ब्राह्मणांचा असा शिक्का बसल्याने विरोध आहे.3 Jul 2018 - 1:31 am | कपिलमुनी
मला वाटले संघाचा म्हणजे राजकीय धागा आहे.
जातीयवादी आहे माहिती नव्हते.
संघ म्हणजे ब्राह्मण असा तुमचा समज असेल तर तुम्ही पुण्या-मुंबई बाहेर फिरला नाहीत किंवा वाचन मर्यादा आहे.
असो.
गोपीनाथ मुंडे , खडसे हे सगळे संघ कार्यकर्ते आहेत.
चालू द्या.
3 Jul 2018 - 2:47 am | प्रसाद गोडबोले
+१
संघ म्हणजे ब्राह्मण हा अतिषय गोड गैरसमज मीही अनेक ठिकाणी पाहिला आहे ! हे म्हणजे संघाला लैच संकुचित समजण्याचा प्रयत्न आहे. आणि ब्राह्मणांना देखील !
एकाने तर मला प्रश्नही विचारला होता की संघाचे सारे सरसंघचालक ब्राह्मण त्यातही विशेषकरुन कोकणास्थ ब्राह्मण का ? आता काय उत्तर देणार ह्याला ! कप्पाळ !!
संघाच्या वैचारिक विरोधात असलेले अनेक ब्राह्मण लोकांना मी अगदी जवळुन ओळखतो. शिवाय " केवळ बौध्दिकं घेतात" म्हणुन संघ सोडलाय माझ्या एका अगदी जवळच्या मित्राने =))))
अवांतर : संघात जातपात अजिबात मानत नाहीत ( म्हणे .) पण तरीही संघाच्या सदस्यांमध्ये जातवार डिस्ट्रीब्युशन काय असावे ? त्यातही विशेष करुन पुर्णवेळ कार्यकर्त्यांमध्ये प्रचारर्कांमध्ये? माझ्या अंदाजानुसार संघात ओ.बी.सी समाजाचे लोकंच जास्त असवेत !
3 Jul 2018 - 10:15 am | आशु जोग
हे जगाला सांगा
3 Jul 2018 - 11:58 am | माहितगार
नेमके कसे ? मुस्लिम आणि दलित राष्ट्रपती , एक ओबीसी पंतप्रधान दिला कि जगाला आपोआप कळते , सहसा वेगळे सांगावे लागत नाही आणि सांगावे लागले तर मजबूत आधार असतो. मजबूत आधारावरुन "संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग होता का ?" हे शीर्षक धागा देत काढलात खरा पण कुणि पुरावा मागितला की पुरावा देण्याचे सोडून घुमजाव केलात ? दुसर्या कुणितरी शोधून पुरावे सादर करत प्रतिसाद दिला, असे होते कारण पुराव्याच्या वेळी पुरावेच लागतात, संदर्भाच्या वेळी नेमके संदर्भच लागतात.
सरसंघचालकांचे पद अजून कदाचित ब्राह्मणेतरांना गेले नसेल पण ईतर कोणती महत्वाची पदे आता पर्यम्त ब्रांह्मणेतरांना मिळाली याचे नेमके ससंदर्भ ऊत्तर आपल्या हातापाशी तयार हवे की नको ? फक्त याच बाबतीत नव्हे (केवळ केंद्रात भाजपा असेल तर त्याचे राष्ट्रीय नेत्यांनी दिलेले समर्थन माहिती असते म्हणून त्याची री समर्थक ओढताना दिसतात ) भारतातील विवीध राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थात भाजपाची सरकारे असतील तर त्यांनी कुठे कुठे चांगले काम केले याची आकडेवारी अभ्यासपूर्ण लेख संघ-भाजपासमर्थकांकडून येताना दिसतच नाहीत. अशा प्रसिद्धीच्या कामात डावे कम्यूनीस्ट कमी रिसोर्सेस मध्येही तरबेज असतात, भाजपा-संघ समर्थकांकडे रिसोर्सेस खरेतर अधिक आहेत पण ते नकारात्मक विरोधाची एकच बाजू सांभाळताना दिसतात. तेही सत्तेत नसताना ठिक आहे . अनेक राज्यात दहा दहावर्षे राज्य राहूनही तिथल्या सरकारांबद्दल चांगल्या बाजू अभ्यासपूर्ण पणे पुढे का येत नाहीत ? कि त्यातही विरोधकांचे साहाय्य भाजपा समर्थकांना हवे असते.
ब्राह्मणांना त्यांच्यावर टिका नको असेल तर जन्माधारीत विषमता नाकारणे आणि अगदी पौरोहीत्य आणि धार्मिक प्रमुखपदात सर्वजातीयांना समान संधी देणे गरजेचे आहे . पुरोहीत आणि धर्म प्रमुख सरसंघचालक आणि अगदी ब्राह्मण वेगवेगळ्या जातीतून येताना दिसले ते जन्माधारीत नसले की बोलणार्ञांची तोंडे आपोआप बंद होतील. पण त्यासाठी जन्माधारीत विषमता नाकारणे केवळ संघातील शाखांपुरते नव्हे मनातून नाकारणे महत्वाचे असावे तर आणि तरच तुमच्या म्हणण्यास वजन प्राप्त होऊ शकेल असे वाटते. असो.
3 Jul 2018 - 10:42 am | माहितगार
संघाचे सारे सरसंघचालक बहुधा कर्हाडे ब्राह्मण असावेत चुभूदेघे , आणि अगदी कोकणस्थ ब्राह्मणांनाही संधी का नाही ? असा काहीसा आणि कदाचित संघाच्या अंतर्गत धुसफूसीतून आलेलाही प्रश्न असू शकतो.
संघाचे सारे सरसंघचालक ब्राह्मण का हा ब्राह्मणेतरांचा प्रश्न समान संधीसाठी असेल तर अगदीच गैर नाही पण सध्याच्या सरसंघचालकांनी भविष्यातील सरसंघचालक ब्राह्मणेतरही असू शकतील असे सुतोवाच केले आहे. त्या शिवाय जन्माधारीत विषमता नाकारण्याबाबत सध्याचे सरसंघचालक पुर्वीच्या सरसंघचालकांच्या मानाने अधिक प्रोअॅक्टीव्ह वाटतात. अर्थात जन्माधारीत विषमता नाकारण्याबाबत संघ समर्थक अजून पूर्ण पणे सध्याच्या सरसंघचालकांच्या विचारधारेत नीटसे रुळले नाहीत त्यामुळे अधून मधून जन्माधारीत विषमतेचे आडून पाडून समर्थन होण्याचे प्रसंग दिसतात, संघ समर्थकांच्या विचारात बदल न होण्याचा दोष मात्र संघाला जात रहातो. असे होण्यामुळे सरसंघचालकांचे अगदी निकटवर्तीय सुद्धा कदाचित सरसंघचालकांच्या विचारधारेशी पुर्णपणे जुळले अहेत की नाही असा प्रश्न निर्माण होत रहातो.
3 Jul 2018 - 12:47 pm | गामा पैलवान
कपिलमुनी,
स्वातंत्र्यलढा म्हणजे नक्की काय? संघ १९२५ साली अस्तित्वात आला. त्यानंतर गांधींनी दोन चळवळी केल्या. १९३२ ची सविनय कायदेभंग आणि १९४२ ची चलेजाव चळवळ. (१९४० च्या आसपास वैयक्तिक सत्याग्रह केला होता, पण तो नावाप्रमाणे वैयक्तिक असल्याने लक्षात घ्यायचा नाही.)
त्यातल्या सविनय कायदेभंगाच्या वेळेस संघ फक्त ७ वर्षांचा होता. पहिल्या १० वर्षांत काँग्रेसने काय थोर दिवे लावले होते?
चलेजावच्या वेळेस ज्या दिवशी चळवळ घोषित झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळे काँग्रेसचे नेते तुरुंगात होते. चळवळ चालवली ती संघाच्या दुसऱ्या फळीने. घ्या हवे तेव्हढे पुरावे.
आ.न.,
-गा.पै.
3 Jul 2018 - 2:15 pm | माहितगार
एकतेच्या एकच आवाज असावा यासाठी, एकदा गोलमेज परिषदेत सबंध भारतीयांचे केवळ एकमेव काँग्रेसच प्रतिनिधीत्व करेल असे म. गांधींनी सांगितले की , ईतर संस्थांनी चळवळीत का काम केले नाही हे विचारण्याचा नैतिक आधिकार अंशतः संपतो. अर्थात ईतर संस्थांनी मुख्य सक्रीय चळवळीस अप्रत्यक्ष आधार पोहोचवायचा असतो. तो पोहोचवला कि त्यांचे काम संपते तसा अप्रत्यक्ष आधार १९४२च्या चळवळीत भूमिगत काँग्रेसी नेत्यांना संघाच्या नेत्यांनी पुरवला असल्याचे प्रथम दर्शनी दिसते.
परिवारवादाच्या विरोधात आणि आणिबाणीच्या विरोधात काँग्रेसींनी सहभाग का घेतला नाही याचे उत्तर काँग्रेसींकडे असेलच असे नाही.
तथ्य दोन्हीच्या मध्ये कुठेतरी असावे , अगदी काँग्रेसची जागा घ्यावी एवढे संघाचे मनुष्यबळ तो पर्यंत नसावे. पण त्यांच्या स्वतःच्या क्षमतेत जमतील तेवढे प्रयत्न्न केलेच असणार कारण कम्यूनीस्ट किंवा मुस्लीम लिग प्रमाणे किमान राष्ट्रनिष्ठेचा बद्दलची साशंकता संघाबद्दल असू शकत नव्हती. संदर्भ The Role of RSS in Freedom Struggle Brilliantly Explained ; Rashtriya_Swayamsevak_Sangh#Indian_Independence_Movement
3 Jul 2018 - 4:56 pm | कपिलमुनी
मला संघाने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला किंवा ना घेतला याने फरक पडत नाही.
घ्या हवे तेव्हढे पुरावे >> तारीख , कोणी घेतला आणि स्वरूप काय होते ?
जर लोक आरोप करत आहेत असे धागाकर्त्याचे मत असेल तर त्यांनी सप्रमाण खोडायला हवे . ते त्याला जातीयवादाची फोडणी देउन खात बसलेत.