काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी .
मला माझ्या तरुण वयातच काश्मीर मध्ये जवळ जवळ पाच वर्षे शिक्षणाच्या निमित्याने राहण्याची संधी मिळाली. सर्व जगात पृथ्वीवर स्वर्ग असेल तर काश्मीर असेल ,असे सांगणारा सम्राट किंव्हा ."काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे ." अशा सारखी कानावर पडणारी भाषणे . . पाकीस्तानला उद्देशून त्यांना दम भरण्या साठी केलेली नेते मंडळीची विधाने .भारतीय सेनेचे असणारे काश्मीर मधील कायमचे वास्तव, या वर होणारी सादोदित चर्चा , तसेच धर्माच्या आधारे होणारी हिंसा. अशांती व सर्व कांही , सद्य परिस्थितीत सर्व सामान्य माणसाला काश्मीर बद्दल या पलीकडे जाऊन कोणतीही माहिती असेल असे मला वाटत नाही . अर्थात हे माझे वैक्तिक मत आहे.
पौराणिक कथे नुसार संस्कृत भाषेत "का" म्हणजे पाणी व "शमीरा" म्हणजे सुकवलेला असा अर्थ होतो .ऋषी कश्यप यांनी बारमुला (वराह-मुला) इथे एक प्रचंड मोठ्या तळ्याच्या बाजूला छेद देऊन ते प्रवाहित केले व आपल्या शिष्य गणाला व विद्वान लोकांना तिथे राहण्याची विनंती केली . हा नवीन तयार झालेला भू भाग एक सुपीक माती आणि समशीतोष्ण हवामाना मुळे, तांदूळ, भाज्या आणि सर्व प्रकारचे फळे याने समृद्ध आहे, आणि रेशीम तयार करण्याच्या गुणवत्तेसाठी हि प्रसिद्ध आहे. काश्मीर इतिहासपूर्व कालखंडात येते , तो कधी कधी स्वतंत्र होता, परंतु कांही काळ उत्तरे कडील बॅक्टरीया,टारटेरी, तिबेट आणि इतर डोंगराळ प्रदेशांच्या आक्रमकांनी परागंदा झाला होता . दक्षिणेकडे सिंधु व्हॅली आणि गंगा खोऱ्या पर्यंत त्यांचे वास्तव्य होते.
थोडक्यात याच संस्कृती मधील पाणिनी ज्यांच्या "अष्टाध्यायी" ह्या जगातील सर्व प्रथम व्याकरणाचा सर्वात वैज्ञानिक व निर्दोष ग्रंथ मानला जातो .पतंजली जानी मानव धर्मासाठी योग सामर्थ्याची भेट दिली .सारंगदेव ज्यांना हिंदुस्तानी व कर्नाटकी संगीताचे भीष्म पितामह मानले जातात .आचार्य अभिनव गुप्त हे सर्व काळातील विद्वान आहेत कि ज्यांनी ४६ साहित्यिक अभिजात लिखाण केले आहे कि ज्या मध्ये अभिनव भारती हे समाविष्ट आहे .त्यांची जगातील ८० विद्यापीठात "रास तत्वे " शिकवली जातात . काश्मीर हे खऱ्या अर्थाने सरस्वतीचे मुख्य निवास स्थान समजले जाते म्हणून त्याला"शारदापीठ " असे हि संबोधित केले जाते . पूर्वी विद्यार्थी आपला ज्ञान भाग शिकून काशी मधून उत्तीर्ण होत असे व त्या नंतर तो उच्चं शिक्षण साठी काश्मीरच्या दिशेने आपली पाऊले उचलत असे .बहुतेक सर्वच संस्कृत साहित्याचा उगम हा काश्मीर मधून झाला आहे . संस्कृत कवी कलहंस यांनी १२ व्या शतक मध्ये लिहलेला , सम्राट राजा ललितादित्य यांच्यावर राजतरागिणी नावाचं ग्रंथ खूपच प्रशिध्द आहे . आठव्या शतकातील सम्राट राजा ललितादित्य हा इतका पराक्रमी होता कि त्यांचे साम्राज्य उत्तरेस कॅस्पियन समुद्रा पासून ते दक्षिणेत गोदावरीच्या पात्रा पर्यंत पसरलेले होते कि ज्या मध्ये आसामचा, जे पूर्वेस आहे ,याचा हि समावेश होता .किती भारतीय लोंकाना या पराक्रमी सम्रांटाचे नाव ठाऊक आहे , किती लोकांना माहित आहे कि श्रीनगरची स्थापना सम्राट अशोकाने केली आहे . काश्मिरी साधू महायान याने बौद्ध धर्माचा प्रसार मध्य आशिया ,चीन व जपान मध्ये केला होता .
काश्मीर मधील हिंदू लोकांना पंडित या नावाने संभोधिले जाते. अगदी तुकोबारायांच्या फेट्या प्रमाणे हे लोक डोक्याला फेटा बांधतात . महाराष्ट्रातील कुरोड्या हा पारंपारिक ( तळलेल्या तांदळाच्या गोल शेवया सारखा दिसणारा ) प्रकार मी तिथे अनुभवाला आहे . भारतात सर्वात जास्त संस्कृत भाषा आपल्याला काश्मिरी भाषेत सापडेल . त्र , ज्ञा, ऋ, या सारखे मराठीतील शब्द काश्मिरी भाषेत हि आढळतात . "कुलूप " हा शब्द म्हणणारे भारतिय कदाचित आपण मराठी किव्हा काश्मिरी दोघेच आहोत .
काश्मीर हा कांही जमिनीचा एक निर्जीव तुकडा नसून भारतीय संस्कृतीची अनेक तथ्ये सांगणारा इतिहास आहे . भारता मधील नवीन येणाऱ्या पिढीला हा इतिहास आवर्जून सांगितला पाहिजे . तो त्यांच्या पाठय पुस्तकात समाविष्ट केला पाहिजे .इंग्रजांनी तयार केलेला इतिहास ज्या मध्ये आमचा मूळ इतिहास संपवणे व प्रत्येक भारतीयाला मना मध्ये लाज उत्पन्न करणे हीच त्यांची रचना होती .स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली तरी देखील ह्याच गोष्टी आपण पुन्हा करीत आहोत . पण काश्मीर असा एक मोठा खजिना आहे कि ज्या मधून खरोखरच आपली प्राचीन भारतिय सभ्यता ,संस्कृती बाहेर पडेल व खऱ्या अर्थाने तो भारताचा अविभाज्य भाग असेल .
प्रतिक्रिया
30 Jun 2018 - 3:58 pm | शाम भागवत
सगळी माहिती नविन वाटली. अजून वाचायला आवडेल.
30 Jun 2018 - 5:00 pm | चौथा कोनाडा
सुंदर माहितीपुर्ण लेख !
आपण म्हणता "मला माझ्या तरुण वयातच काश्मीर मध्ये जवळ जवळ पाच वर्षे शिक्षणाच्या निमित्याने राहण्याची संधी मिळाली." ही अचंबित करणारी बाब आहे !
लोक परदेशात, इतर राज्यात शिक्षणासाठी जातात हे माहित होते, पण काश्मीरमध्ये शिक्षण घ्यायचा योग येणारी पहिली व्यक्ती पहात आहे.
आपल्या या वास्तव्याचे प्रतिबिंब पडलेले या लेखात दिसत नाहीय.
आपल्या तेथिल वास्तव्य व शिक्षण संबंधी तपशिलवार माहिती वाचायला आवडेल.
काश्मीर हा कांही जमिनीचा एक निर्जीव तुकडा नसून भारतीय संस्कृतीची अनेक तथ्ये सांगणारा इतिहास आहे . भारता मधील नवीन येणाऱ्या पिढीला हा इतिहास आवर्जून सांगितला पाहिजे . तो त्यांच्या पाठय पुस्तकात समाविष्ट केला पाहिजे .
हे कोण करू शकेल ?
"कुलूप "या सारखे आणखी कोणते शब्द आहेत?
आणखी काय भाषा साम्य आढळले ?
सध्याची काश्मिरची अवस्था पाहुन वाईट वाटते.
30 Jun 2018 - 5:29 pm | झेन
या विषयावर अनुभवातून लिहीलेले जास्त वाचायला मिळत नाही. खाली क्रमशः लिहायचे राहिले असावे असे वाटते.
30 Jun 2018 - 5:54 pm | Deserter
आवडला आणी बायदवे तुमचे आडनाव नहार आहे का
30 Jun 2018 - 7:32 pm | Sanjay Uwach
नाही.
30 Jun 2018 - 7:18 pm | Sanjay Uwach
मी ज्या ठिकाणी काश्मीर मध्ये शिकलो ,ते अभियांत्रिक कॉलेज होते हे मी नमूद करायचे राहून गेले आहे .माझ्या बरोबर शिक्षण घेणारी अनेक मुले हि मराठी होती .त्यातील बऱ्याच मुलांचे पालक हे सैन्य दलाशी संबंधित होते . मी ज्या काळात. होतो तो खूपच आनंददायी ,चैन और अमन असा काळ होता . भारतीय संस्कृती मध्ये काश्मीरचा इतिहास लिहावा तेवढा थोडाच आहे कारण प्रत्येक भारतीयांचे उगमस्थान हे काश्मीरच आहे .म्हणून थोडक्यात मांडणी करण्याचं प्रयत्न केला आहे .या पूर्वी देखील मी काश्मीर संबधी एखादी प्रतिक्रीया मी .पा वर दिलेली होती पण प्रक्षोभक टीका करणारी माझी वृत्ती मुळीच नाही. सध्या काश्मीर मधील जहरी धार्मिक भाषणे , जाणीव पूर्वक पसरविण्यात आलेल्या अफवा ,अनियंत्रित असणारी काश्मिरी नेते मंडळी हे एक आशातंतेचे माझ्या मते एक कारण आहे . माझी नाळ हि कोल्हापूरशी जोडली असून, रोज वृत्तपत्र उघडले ,कि काश्मीर मध्ये एखादा २४-२५ वर्षाचं तरुण लढताना शाहिद झाल्याची, एखादी तरी बातमी रोज असते .शहीद जवानांची वृद्ध आईवडील .तरुण पत्नी ,लहान मुलगा आक्रोश करताना पाहिले कि मन फारच विचलित होते .
1 Jul 2018 - 10:26 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, सउ ! आपली पार्श्वभुमी व त्य
1 Jul 2018 - 10:34 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, सउ ! आपली पार्श्वभुमी व त्यावेळचे वातावरण समजले. आता मिपाकरांच्या दृष्टीने स्वतः काश्मिरचा अनुभव असलेले आपल्यासारख्याचे मत महत्वाचे असेल.
काश्मीर हीभारतीयांची जनक भूमी हे हा गौरवशाली इतिहास आहे या बाबीचाअ, आताचे जे अस्वस्थ वातावरण आहे याचा कश्या पद्धतीने उपयोग करता येईल असे आपल्याला वाटते ?
2 Jul 2018 - 12:21 pm | Sanjay Uwach
इतिहासाचा उपयोग करून माणसांची मनोवृत्ती बदलता येणे हे सद्याच्या परिस्थितीत तरी कठीण वाटते पण हि परिथिती कशी बदलणे शक्य आहे ,यावर वैयक्तिक मत मांडणी होऊ शकते . तरी पण नेमके तुम्हाला माझ्या कडून काय अपेक्षित आहे ,हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे . माझ्या एका मित्राला मी विचारले होते कि भट , कौल ,धर,बांडे या सारखी आडनावे काश्मीर मधील बहुतेक पंडित लोकांची आहेत पण अन्य धर्मीय देखील तीच नावे लावतात. कधी काळी आपण त्यांच्या परिवारातील होतो असे तुला वाटत नाही काय ? त्याने दिलेले उत्तर " होय तसे मला वाटते , तसे पहिले तर काश्मीर पासून मध्य आशिया पर्यन्त पूर्वी मूर्ती पुजकच लोक होते ,पण त्या नंतर माझ्या पूर्वजांनी स्वखुशीने अन्य धर्म स्वीकारला ? माझा दुसरा प्रश्न " धर्म दुसरा असेल व देश भिन्न असतील व ते एकमेकांचे कट्टर शत्रू असतील तर कोणत्या गोष्टीला आपण नेमके प्राधान्य दिले पाहिजे ? उत्तर " माझ्या धर्माच्या सांगण्या नुसार आपण जिथे जन्मतो तीच आपली जनक भूमी असायला पाहिजे ,तिच्या साठी आपण प्राण देखील देण्यास तयार पाहिजे ? काश्मीर मधील बदरवा , किस्तवाड हा जो जम्मूला लागून असणारा भाग आहे तो मिश्र धर्मियांच्या म्हणजे डोगरी पंजाबी लोकांच्या प्रभाव खाली असणारा भाग आहे .यातील अनेक काश्मिरी भारतीय सेनेच्या बरोबरीने लढत आहेत.
3 Jul 2018 - 12:59 pm | चौथा कोनाडा
हं ... आता आले थोडे तपशिल, मला (आणि अर्थात मिपाकरांना देखिल) हेच अपेक्षित होते, तिथली माणसे, त्यांची मते व गौरवशाली इतिहास यावर चर्चा.
येवु द्या अजुन या संदर्भात आणखी.
धन्यवाद संउ !
आणि .... इतिहासाचा उपयोग करून माणसांची मनोवृत्ती बदलता येणे अवघड आहे ..... अगदी खरे !
3 Jul 2018 - 1:53 am | शलभ
खूप छान माहिती. कधीच ऐकली नव्हती. अजून सांगा ना.
4 Jul 2018 - 1:26 am | डॉ सुहास म्हात्रे
काश्मीररबद्दल खूप नवीन माहिती समजली. अजून विस्ताराने लिहा. वाचायला आवडेल.
4 Jul 2018 - 6:55 am | Sanjay Uwach
भारत स्वतंत्र झाल्या नंतरच्या काश्मीर मध्ये ज्या कांही घटना घडल्या त्याची अगदी थोडक्यात आपण माहिती घेऊया .या वर कांही मिपा लेखकांनी खूप सविस्तर लिहले आहे . काश्मीर राजाने काश्मीर विलीनीकरणा साठी केलेला विलंब . याच काळामध्ये पाकिस्तान सरकारने काश्मीर मध्ये घुसवलेले तुर्की भाडोत्री दरोडेखोर .त्यानी केलेले काश्मिरी लोंकांच्या वरील अत्याचार .याच काळात सुरवातीस स्वतंत्र काश्मीर साठी आग्रह धरणारे व नंतर मुख्यमंत्री झालेले शेख अब्दुला. शेख साहेब मुख्यमंत्री असणारा काळ हा सर्व भारतीयांच्या साठी आनंदीदायक होता . याची माझ्या मते असणारी कारणे.
शेख साहेबाचे एकतर व्यक्ती महत्व फारच जबरदस्त होते .सुशिक्षित होते , पूर्वी ते कॉलेज मध्ये ते रसायन शास्राचे ते शिक्षक होते . त्यांच्या उंची मुळे पन्नास लोंकाच्यात ते उभा राहिले तरी लांबून उठून दिसत असत . कुठे गेले तरी लोकांच्यात वावरण्याची त्यांची विशेष अशी खुबी असायची .गर्दीतून एखादा गरीब माणसाला हेरून " मी तुझ्या कडे चहा घेण्यास येणार आहे " असे ते आवर्जून सांगत त्या मुळे सामन्यातील सामान्य माणूस त्यांच्या प्रेमात पडत असे . फुटीरवादी लोंकांच्यावर त्यांचा चागंलाच वचक होता . कांही भाषणाच्या वेळी ते या लोंकाना तंबी पण देत असायचे . त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्स कार्यकारणी सदस्या मध्ये एक दुसरी जागा पंडित लोंकाना हि दिली जात असे . याचा फायदा घेऊन अनेक चांगल्या शासकीय नोकऱ्या पंडित लोकांनी आपल्या पदरात पाडून घेतल्या होत्या . या काळात शेख साहेबाना विरोधक असा कोणीच नव्हता . सगळे चिडी चूप .
क्रमशः
4 Jul 2018 - 10:32 am | Jayant Naik
खूप आवडला. मस्त .
4 Jul 2018 - 10:32 am | Jayant Naik
खूप आवडला. मस्त .
7 Jul 2018 - 8:08 pm | Sanjay Uwach
शेख साहेबांच्या कारकीर्तीत फुटीरवाद्यांचे छोटे छोटे अनेक मोर्चे निघत असत , अफवा मुळे किरकोळ दगडफेकही होत असे,पण ती लवकरच नियंत्रणा मध्ये येत असे. त्या वेळी प्रसार माध्यमे ,आजच्या सारखी प्रगत नव्हती .वृत्त पत्रे उर्दूत असल्या मुळे ,इतर वाचक वर्ग बातमी वाचू शकत नसे . .प्रत्येक शुक्रवारी वारी कुठल्या ना कुठल्या दर्ग्यात लोक नमाज पठणा साठी प्रचंड गर्दीने जमत असत ,मात्र साधारण तीन नंतर प्रार्थना झाल्यावर " तकऱीर " म्हणजे प्रमुख पाहुण्यांचे भाषण हे हमखास ठरलेले असायचे .त्या भाषणात इतर सर्व राजकीय समालोचन होत असे . यातील मजेशीर बाब म्हणजे लोकांना खास भाषणासाठी जमा करावे लागत नसे व तिथे येणाऱ्याला भाषण हे ऐकावेच लागत असे ( अर्थात इच्छा असलेस ).वरील सांगितलेला भाग वाचताना जरी साधा वाटत असेल पण काश्मीर मधील बरेच राजकारण हे " तकऱीर " आधारीत चाले .गरिबातील गरीब माणसा पासून श्रीमंत ,राजकीय नेते या " तकऱीर " मुळे फारच प्रभावित होत असत .असो
एक किस्सा : आम्ही कॉलेजच्या खाजगी कँटीन मध्ये सकाळी न्याहरी करण्यास जात असत .तिथे १०-१२ वर्षाची गोरीपान ,लाल लाल गाल असणारी छोटी छोटी मुले न्याहारी साठी जमत असत .कँटीन मधील आमची सर्व हातातील कामे टाकून तिथला वेटर गुला त्या मुलांच्याच मागे लागत असे .प्रत्येक मुला कडे भरपूर पैसे असायचे .ती मुले दोन दोन ,तीन तीन अंड्याचे आम्लेट खात असत.
गुलाची अन माझी मैत्री असल्या मुळे मी त्याला ,हे काय आहे??? असे विचारले तर तो म्हणाला हि सर्व मुले "कालीन " म्हणजे कार्पेट तयार करणारी मुले आहेत .याना दिवसाची मजुरी भरपूर मिळते . मी त्याला त्यांच्या कारखान्यात घेऊन जाण्याचा आग्रह केला .तसे त्यांच्या कारखान्यात कुणालाही आत सोडत नाहीत पण एका सकाळी मी त्या कार्पेटच्या कारखान्यात गुला बरोबर गेलो .तिथला सर्व प्रकार पाहिल्यावर मी थक्कच झालो .एखाद्या शाळेत पाढे सांगितल्या प्रमाणे एक मुलगा काश्मिरी भाषेत कांहीतरी सांगत होता व बाकीची सर्व मुले तो सांगेल त्या प्रमाणे तो पाढा म्हणत व हाताने एक एक धागा पुढे सरकवीत होती . त्यांनी पाढ्याच्या ठेक्या वर हाताने विणलेली ती पर्शियन कलाकुसरीची कालीन पाहून मी थक्क झालो . साधारण एक कालीन होण्या साठी ४-५ महिने लागतात .त्याची किंमत ३ लाख किव्हा त्या पेक्षा हि अधिक असते म्हणे .या कालीनच्या विशिष्ट डिझाईनला सातशे वर्षाची परंपरा लाभली आहे व अशी अनेक प्राचीन पर्शियन कलात्मक कालीन त्यांनी या तालरुपात म्हणजे पाढ्यात बांधून ठेवली आहेत .यूरोप ,मिडलईस्ट या ठिकाणी हि कालीन बनविणाऱ्या लोकांच्या शो रूम आहेत. त्या पाढ्याच्या जुनाट वहीत इतका मोठा इतिहास ,आर्थिक उलाढाली व कलात्मकता पाहून मी मात्र थक्क झालो .
9 Jul 2018 - 6:19 pm | चौथा कोनाडा
खरंच थक्क करणारा किस्सा !
आजच्या कोलाहलाच्या काळात अशी कौशल्ये उध्वस्त झाली असतील !
काश्मिरच्या बातम्या म्हटलं की दगडफेक, जवांनाच्या तळावर हल्ल्ला, काही सैनिक शहिद अश्याच बातम्या !
दुर्दैव, आपले अन काश्मिरींचे ! :-(
8 Jul 2018 - 8:25 am | मदनबाण
पण काश्मीर असा एक मोठा खजिना आहे कि ज्या मधून खरोखरच आपली प्राचीन भारतिय सभ्यता ,संस्कृती बाहेर पडेल व खऱ्या अर्थाने तो भारताचा अविभाज्य भाग असेल .
अनेक वर्ष काश्मिर प्रश्न, चर्चा, हुरियत, राजकारण, आर्टिकल ३७०, लष्कर , दगडफेक , आतंकवाद , काश्मिरी पंडीत यांच्या स्त्रियांवर बलात्कार, त्यांचे पलायन, त्यांच्या विषयी ब्र देखील न काढणारे याच देशातील चादरमोद राजकारणी , तिथील देशद्रोही मुस्लिम जनता , आतंकवाध्याच्या जनाज्याला अख्खा गाव लोटणे इ. इ . इ . इ.
या प्रश्नाचे रुट कॉझ अॅनॅलिसस केल्यास उत्तर पाकिस्तान असे येते, मग जो पर्यंत पाकिस्तानला या सर्वाची किंमत आपण चुकवायला लावत नाही तो पर्यंत हा प्रश्न पुढील ७०० वर्ष असाच राहील हे खात्रीने सांगता येइल. राजकिय इच्छा शक्ती नसणे आणि लष्कराला पाकिस्तानची व्यवस्थित ठासण्याची परवानगी न देणे या सर्वातुनच आपण सतत्याने तरुण जवानांच्या शव पेट्या येताना आणि त्यांच्या स्त्रियांच्या आक्रोश पाहत बसलो आहोत... फक्त जवनांच्या शवपेट्यांची संख्या मोजत बसणे हेच आपण वास्तव म्हणुन स्विकारले आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साला नशिबाने गंडवलंन...
29 Jul 2018 - 9:36 pm | राही
पत्रकार, लेखिका इरा पांडे यांचा कश्मीरविषयक एक लेख गेले काही महिने व्हॉट्स ॲपवर फिरतो आहे. तो लेख आणि हा इथला लेख यातील आशय आणि मांडणी यात बरेचसे साम्य आहे.अर्थात एकाच धर्तीचे विचार अनेक समकालीनांना सुचणे सहज शक्य आहे. कारण अनेक समकालीन लोक समविचारी असू शकतात.
अभिनवगुप्त, पाणिनि, दंडिन, राजतरंगिणी, दशकुमारचरित इत्यादि नावे इतिहासाच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असतात. त्यांचे कार्यही थोडक्यात दिलेले असते. कला शाखेच्या पहिल्या वर्षात तर हा इतिहास असतोच असतो. भारतातली बहुतेक महाविद्यालये तो शिकवतात. पण इंजीनिअरिंगला जाण्याच्या लाटेमुळे गेली वीसपंचवीस वर्षे कलाशाखेकडे कोणी ढुंकूनही बघत नव्हते. शाळेतही इतिहासभूगोलाच्या अभ्यासाला दुय्यम महत्त्व दिले जाईं. त्यामुळे सध्याच्या अनेक तरुणांना ही (सहज उपलब्ध) माहिती नसते. सुदैवाने आता परिस्थिती थोडी बदलते आहे आणि कलाशाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे.
30 Jul 2018 - 1:04 am | उपयोजक
'काश्मीरची ५ हजार वर्षे' नावाचं पुस्तक आहे त्यात काश्मीरमधली हिंदू संस्कृती,मंदिरे,प्राचीन हिंदू लोक,साहित्य यांची व्यवस्थित,साद्यंत माहिती दिलेली आहे.
30 Jul 2018 - 10:24 pm | राही
कश्मीरची ५००० वर्षे हे पुस्तक वाचण्याच्या अमूल्य सल्ल्याबद्दल आभार.
30 Jul 2018 - 8:33 pm | Sanjay Uwach
आपण या लेखनाला नवीन प्रतिक्रीया देऊन हा विषय परत आणलात ,या बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे .माझ्या वाचनात लेखिका इरावती पांडे यांचा लेख अजून आला नाही .तो वाचण्यास मला निश्चितच आवडेल . मी छोट्या छोट्या गोष्टी लिहणारा एक हौशी लेखक आहे .इतिहासावर तर लिहण्य इतपत तर माझा अभ्यास मुळीच नाही .या लेखांच्या माध्यमातून मी काश्मीर मध्ये अनुभवलेले प्रसंग लिहण्याचा माझा मूळ उद्देश होता आणि आहे देखील . प्रतिक्रिया सदरा खाली लिहिण्या पेक्षा " काश्मीर मधील मी अनुभवलेले प्रसंग व गंमती जमती " या सदरा खाली लेखन करावे म्हणजे अनेक वाचकांच्या नजरेत ते येईल व ते वाचकांना निश्चितच आवडेल असे मला वाटते . माझा मित्र कर्नल रणधीर जमवाल याने मला त्यांच्या वाचनालयातून " काश्मीरचा इतिहास" हा इंग्रजी मधून असणारा एक मोठा लेख पाठवला होता त्याचा आधार घेऊन मी कांही गोष्टी सांगण्याचा यात प्रयत्न केला आहे पण इतर प्रतिक्रियेत कुठेही इतिहास आणला नाही . आपला व्यवसाय व आपली आवड हि कदाचित भिन्न असू शकते .मिपा वर अनेक अभियांत्रिक,तरुण लेखकांनी फार दर्जेदार इतिहासाचे लेखन केले आहे .तरी पण आपण सांगितलेल्या माहिती बद्दल मी खरोखरच राही यांचे मनापासून आभार मानतो .धन्यवाद !!!
30 Jul 2018 - 8:59 pm | चौथा कोनाडा
जरूर लिहा वेगळ्या धागा. विषय ते जास्त सयुक्तिक होइल.
30 Jul 2018 - 8:45 pm | रमेश आठवले
-- काश्मीर हे खऱ्या अर्थाने सरस्वतीचे मुख्य निवास स्थान समजले जाते म्हणून त्याला"शारदापीठ " असे हि संबोधित केले जाते .--
आधुनिक संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की एकेकाळी लुप्त झालेली सरस्वती नदी ही काश्मीर हिमालयात उगम पाऊन सध्याच्या पंजाब, हरयाणा, राजस्थान भागातुन वाहणारी महानदी होती. काही हजार वर्षांपूर्वी भुकम्प व हवामान बदलामुळे ती लुप्त झाली.
10 Aug 2018 - 10:52 pm | कलंत्री
शंकराचार्याचा एक मठही काश्मिर मध्ये आहे असे वाचलेले आठवते.
आजची परिस्थिती ही राजकिय ध्रूवीकरणासाठी अतिशय पोषक अशी ठरली आहे. सैन्यदलाचा गैरवापर, राजकिय पक्षाची लोकशाही मार्गाने समस्या सोडवण्याची नाखुशी, काश्मिरी पंडीताची विस्थापित अशी स्थिती यात खरेतर वाईट अवस्था झाली आहे.
काश्मिरप्रश्न समजावून घेण्यासाठी एखादे अभ्यासशिबिर घ्यावे असा विचार आहे,
11 Aug 2018 - 6:37 pm | Sanjay Uwach
कलंत्री ,
आपण सांगीतल्या प्रमाणे काश्मीर मध्ये अद्य शंकराचार्यांचे एक मंदिर आहे .श्रीनगर टुरिस्ट सेंटर पासून थोडे पुढे चालत गेलात कि जवळ पास "शंकराचारी '' नावाची मोठी टेकडी लागते .तशी हि टेकडी चढायला खूप अवघड आहे ,पण बहुतेक प्रवासी या टेकडीवर जातात . दिवाळी, वैशाकी पौर्णिमा या दिवशी बहुतेक भाविक लोक शंकराचार्याच्या दर्शन साठी मंदिरात जातात .
थोर अदी शंकराचार्य हे अनेक वर्षे काश्मीर मध्ये येऊन राहिले होते . काश्मिरी लोंकाना ते धार्मिक प्रवचने देत असत . या टेकडीवरील निवास मध्ये ते शैव पंथातील प्रमुख विद्वान लोकांशी म्हणजेच "शैवाचार्य" यांच्याशी धार्मिक चर्चा , वाद विवाद ,या टेकडीवर ते करीत असत . या टेकडीवर शैव पंथीयांचे मंदिर वआश्रम हा आधी पासूनच होता. तसेच एखाद्या बाहेरून आलेल्या धार्मिक विद्वान,तपस्वी मुनी लोकांची रहाण्याची सोय देखील इथे करण्यात येत होती. या कारणा मुळे साहजिकच शंकराचार्य या टेकडीवर राहत असत . त्या वेळी या टेकडीला " गोपदरी" असे नाव होते पण शंकराचार्यांच्या सन्मानार्थ या टेकडीचे नाव "शंकराचारी" असे ठेवण्यात आले . या टेकडीवर स्थानिक काश्मिरी पंडितांनी वेदांता वरील चर्चे मद्ये महान शैवाचार्य "अभिनव गुप्तां" याला हरवले होते त्या वेळी त्यांनी अचानक चर्चे साठी शंकरचार्याना पुढे केले . ( असे म्हटले जाते कि आदी शंकरचार्यानी अभिनव गुप्ता यांना महादेवाच्या रूपात आपले दर्शन दिले ) शंकराचार्यांना देखील कांही स्थानिक महिलांनी वाद विवाद मध्ये हरवले होते व ग्रहस्ती धर्माचा अनुभव घ्यावा असा सल्ला दिला होता . दंत कथे अनुसार ग्रहस्ती धर्माचा अनुभव घेण्या साठी त्यांनी वाराणसीच्या राजाच्या शरीरात प्रवेश केला असे मानले जाते.
वरील सर्व गोष्टी मी मुद्दाम इथे सांगण्याचे कारण कि सद्य परिस्थितीत बऱ्याच माहिती आपण जिनिअस गुगल द्वारे जाणू शकतो पण माझ्या एका काश्मिरी मित्राच्या ८o वर्षे वृद्ध आजीकडून ह्या गोष्टी जाणून घेण्याचा आनंद फारच वेगळा होता .त्यात पुराणातील कथा होत्या ,वंश परंपरेने चालत आलेल्या मौखिक कथा होत्या .लिहताना मात्र कांही गोष्टीना मी संक्षिप्त रूपात लिहल्या आहेत.
21 Aug 2018 - 7:12 am | रमेश आठवले
https://www.youtube.com/watch?v=2E3DYtAjokE
संजय नहार व त्यांच्या पत्नी काश्मीर मधील दंगलीं मध्ये अनाथ झालेल्या मुलांना पुण्यात आणुन त्यांचे संगोपन करण्याचा चान्गला उपक्रम गेले काही वर्षे करतात . त्या सम्बन्धी माहिती झी २४ तास वर काही आठवड्या पूर्वी ऐकली होती. गुगल वर त्यांच्या संबंधीचा एक व्हिडिओ सापडला, तो दिला आहे.