पहिल्या नजरेतच घातली ही मोहनी
माझ्या ह्दयाची तू तर स्वामिनी
काय माहिती काय ,काय पुढे होईल
पण हा क्षण मिळून , साजरा होइल
मी तर इथे , तू ही इथे
माझ्या मिठीत ये , ये ना...
हे प्रियसी , हे उर्वशी
माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे..
हरएक प्रार्थनेत तुझे प्रेम असे
तुजविण ते क्षण माझे , व्यर्थ भासे
तुझीच आस मज हदयास असे
तुझपासुनी शांतीही , तुझपासुनी प्रितीही..
ज्या दिवशी गवसलीस मजला
माझा जीव तो कुठे हरपला
हे प्रियसी , हे उर्वशी
माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे
हे प्रियसी , हे उर्वशी
माझ्या मिठीत ये , ये ना..
वेडापिसा झालो मी ह्या वेदनेने
हिसकावले स्वास्थ ह्या प्रेमभावनेने
तडफडे प्राण माझे तुझ्या त्रूष्णेने
आनंदाचा उत्सव असे , कोणते हे गुपित असे
हा दुरावा , जगू न देई
माझी ही अवस्था , तुला न ठावी
हे प्रियसी , हे उर्वशी
माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे
हे प्रियसी , हे उर्वशी
माझ्या मिठीत ये , ये ना..