आश्विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.
या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. आज आपण लक्ष्मीपूजनासंदर्भात माहिती पाहूया.
१. कोजागरी पौर्णिमा व श्री लक्ष्मीपूजन : कोजागरीस लक्ष्मी व इंद्र या देवतांचे पूजन सांगितले आहे, तर आश्विन अमावास्येस लक्ष्मी व कुबेर या देवतांचे पूजन सांगितले आहे.
२. श्री लक्ष्मी व कुबेर : लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, तर कुबेर हा संपत्ती-संग्राहक आहे. अनेकांना पैसा मिळविण्याची कला साध्य असते; पण तो राखावा कसा हे माहीत नसल्यामुळे अनाठायी खर्च होऊन पैसा त्यांच्याजवळ शिल्लक रहात नाही. किंबहुना पैसा मिळविण्यापेक्षा तो राखणे, सांभाळणे व योग्य ठिकाणीच खर्च करणे हे फार महत्त्वाचे आहे. कुबेर ही देवता `पैसा कसा राखावा', हे शिकविणारी आहे, कारण तो धनाधिपती आहे; म्हणून या पूजेसाठी लक्ष्मी व कुबेर या देवता सांगितलेल्या आहेत. सर्वच लोक विशेषत: व्यापारी ही पूजा मोठ्या उत्साहाने व थाटामाटात करतात.
प्रतिक्रिया
28 Oct 2008 - 11:09 am | शैलेन्द्र
धन्यवाद...
28 Oct 2008 - 3:03 pm | ब्रिटिश टिंग्या
लक्ष्मीपुजनाच्या दिवशी लक्ष्मीची आरती करु नये असे म्हणतात. याचे काही कारण :?
28 Oct 2008 - 3:06 pm | अवलिया
कोण म्हणतो असे?
माझी भेट घालुन द्या बरे जरा... :)
28 Oct 2008 - 3:10 pm | ब्रिटिश टिंग्या
आस्था चॅनेलवर!
अवांतर - माझ्या रुममध्ये फक्त दोनच हिंदी चॅनल्स येतात्......बी४यु म्युझिक अन् आस्था.......त्यामुळे मी 'या' वयात 'आस्था चॅनेल' का बघतो हे विचारुन अपमान करुन घेउ नये!
28 Oct 2008 - 3:13 pm | अवलिया
या वयात तु टीव्ही का पहात बसतोस?
28 Oct 2008 - 3:17 pm | ब्रिटिश टिंग्या
सदानकदा काय करणे अपेक्षित आहे?
अवांतर : गुरुदेव विप्रंचा क्लास जॉईन करु काय ;)
28 Oct 2008 - 3:20 pm | अवलिया
सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
जय जय रघुवीर समर्थ
28 Oct 2008 - 3:13 pm | अवलिया
या वयात तु टीव्ही का पहात बसतोस?
28 Oct 2008 - 3:16 pm | छोटा डॉन
ते अंमळ **** लोक आहेत, बिनधास्त पुजा करा लक्ष्मीची ...
आयला कोणीही उठते आणि काहीही सांगते
भाड्या, ह्या वयात हे धंदे ?
हमारी इज्जत पैदान मे मिलादी ...
तोंड दाखवु नकोस पुन्हा आम्हाला ...
अरे, जरा परदेशी चॅनेल्स बघावेत. त्यांच्या संस्कॄतीची, राहणीमानाचे, आचर-विचारांची ,ओळख करुन घ्यावी, सुधारा जरा !!!
आम्ही बघ कसे काही घंटा कळात नसताना जर्मन चॅनेल्स पाहतो की नाही ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
28 Oct 2008 - 3:20 pm | ब्रिटिश टिंग्या
>>बिनधास्त पुजा करा लक्ष्मीची ...
शंका लक्ष्मीच्या पुजेची नाहीये! लक्ष्मीची आरती करावी का नाही या बाबत आहे!
- (शंकासुर) टिंग्या
28 Oct 2008 - 3:21 pm | अवलिया
आरती बरोबर लक्ष्मीची पूजा केली तर चालेल फक्त मग लक्ष्मी किंवा पुजा नाराज व्हायला नको.
28 Oct 2008 - 3:26 pm | ब्रिटिश टिंग्या
आरतीला पुजाबाबत अन् पुजाला आरतीबाबत सांगितलं नाहीये अजुन.......
दोघींना एकत्र बसवल तर वाट लागलं ना भौ माझी!
28 Oct 2008 - 8:42 pm | विनायक प्रभू
राहिला तर मी आहेच
28 Oct 2008 - 3:27 pm | सनातन
भाव तेथे देव आहे.
28 Oct 2008 - 3:27 pm | सनातन
भाव तेथे देव आहे.
28 Oct 2008 - 6:49 pm | ब्रिटिश
>>सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे.
गटारी अमावस्या ईसरलात क भाउ, आमचा सन हाय तो.
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
28 Oct 2008 - 7:15 pm | मीनल
आमच्या घरी लक्ष्मी पूजनाला अख्खे धणे कपाटात,दागिन्यांच्या पेटीत ठेवतात.म्हणजे २ किंवा ४ दाणे.का ते माहित नाही.
पूजा करताना, करून झाल्यावर ही जरा वेळ कपाट,तिजोरी उघडी ठेवतो.सासुबाई म्हणतात लक्ष्मीला बसायला जागा हवी ना!
बतासे ,लाह्या,दूध साखर ही नैवेद्द्याला ठेवतात.
आम्ही त्या दिवशी घर बंद करत नाही.
ते अस की लक्ष्मी घरी येणार तेव्हा घर बंद असेल तर ती परत नाही का फिरणार?
अजून एक.
लक्ष्मी आणि अवदसा.दोघी बहिणी.लक्ष्मी पुठल्या दाराने तर अवदसा लगेचच मागल्या दाराने येते म्हणे.
म्हणून आपल्या चांगल्या कृतीने अवदसेला थारा देऊ नये.
तीला भांडण,तंटे,राग,रूसवा खूप आवडतात.म्हणून त्या दिवशी तरी हे टाळावे. त्यामुळे अवदसेला कंटाळा येतो आणि ती निघून जाते.लक्ष्मी मात्र स्थिरावते.
कोणीतरी लक्ष्मी बद्द्ल सांगितलेले असे की --
१]विष्णु पत्नी लक्ष्मी ला रोज संध्यकाळी तिन्ही सांजेला दार उघडे ठेऊन बोलावायचे.
आरती करायची.आणि घरच्या स्त्रीने म्हणायचे ये,बस.मी कूंकू लावते.
पण लावायचे नाही.
विवाहितेला घरातून बाहेर जाताना कूंकू लावायची पध्दत आहे.
ते न लावल्यामुअळे लक्ष्मी आपल्या घरून जात नाही.
२] फक्त विष्णुची मूर्ती घरात ठेऊ नये .लक्ष्मी ( ती ही एक स्त्रीच आहे )रूसते म्हणे.आपल्या कडे येत नाही.निदान फोटो तरी ठेवावा.
ब-याच जणांना असे अनुभव आले आहेत असे ऐकले.
मला स्वतःला अतिषय कष्ट करून आणलेल्या पैश्याचा आदर करावा ,योग्य ठिकाणी दान करावे,दारू,जुगारात पैसा घालवू नये हे म्हणजे लक्ष्मीचे पूजन वाटते.
मला अजून एक प्रश्न नेहमी पडतो.
लक्ष्मी एवढ्याश्या कमळावर कशी काय बसते किंवा उभी राहते?
तसच महाकाय गणपती आणि उंदिर.
मीनल.