बोलकी पुस्तकें

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
5 Jun 2018 - 12:54 am

भारतीय भाषांतून असलेली अनेक पुस्तके, कथा, स्तोत्रें मंत्र इत्यादी श्राव्य स्वरूपांत गोळा करून एका ठिकाणी उपलब्ध (विनामूल्य) करण्याचा उपक्रम काही मित्रांनी राबविला आहे. सगळ्याच लोकांकडे पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे नसतात, खूप लोकांकडे वेळ सुद्धा नसतो त्याशिवाय आमच्या देशांत अंध लोकांसाठी विशेष ब्रेल साहित्य सुद्धा बनवले जात नाही. त्याशिवाय अनेक लोक अशिक्षित असल्याने त्यांना वाचता येत नाही पण एखादा अभंग, भजन इत्यादी ऐकले तर समजते.

येत्या काही दिवसांत व्हॉइस आर्टिस्ट वापरून नानाविविध विषयावर छोटी छोटी बोलकी पुस्तके करण्याचा मानस आहे. संगणक, आरोग्य, कला, बाल साहित्य, करियर इत्यादी विषया वर ५-१० मिनिटांची बोलकी पुस्तके करण्याचा मानस आहे. मिपा वरील सदस्य काव्यशास्त्र विनोदात रमणारे असल्याने इथे काही प्रतिक्रिया दिल्यास फायदा होईल.

http://web.bookstruck.in/podcast/index
https://soundcloud.com/bookstruck-in

क्रिएटिव्ह इंडिया

https://www.youtube.com/channel/UCBMz4ANgH8sMYK4RtKNZOUA

हा एक दुसरा उपक्रम काही इतर मित्रांनी चालविला आहे. भारतीय संस्कृती, कला , नाटक, इतिहास, वास्तू इत्यादी विषयावर पाच मिनिटा पेक्षा कमी वेळाचे पण अतिशय उच्च दर्जाचे व्हिडीओ इथे बनवले जातात. आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता खरेच थक्क करणारी आहे हे समजण्यासाठी आपण हे काही विडिओ जरूर पहा. ह्यांच्याकडे त्यामानाने चांगले फंडिंग असल्याने दर्जा बराच चांगला आहे.

टीप आणि तोंडसुख :

दोन्ही उपक्रमातून मला काहीही आर्थिक फायदा नसून शक्य तेंव्हा मी स्वतःचे पैसे खर्च करून अश्या उपक्रमांची मदत करते पण अनुभवाने पैश्यापेक्षा वाचक आणि श्रोत्यांची अश्या उपक्रमांना सुरुवातीच्या दिवसांत जास्त गरज असते. एकूणच माझ्या मते भारतीय संस्कृतीत रूटेड अश्या मनोरंजनात्मक आणि अभ्यासनीय अश्या दृक्श्राव्य माध्यमांची देशांत कमतरता आहे. ज्या पद्धतीने भारुडे, कीर्तनकार, पोवाडे, अभंग कर्ते ह्यांनी भारतीय कथाकथनाची परंपरा चालू ठेवली आणि पूर्वजानी घालून दिलेल्या पायावर कळस चढविला तिथे आमचे जनरेशन मात्र मागे पडत आहे.

आधुनिक माध्यमांत आम्ही कथाकथन, काव्य शास्त्र विनोद ह्यांची परंपरा अश्या पद्धतीने चालू ठेवली पाहिजे कि ती आधुनिक सुद्धा वाटेल आणि प्राचीन सुद्धा वाटेल.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

5 Jun 2018 - 3:20 am | चित्रगुप्त

+१०००

चहाबिस्कीट's picture

5 Jun 2018 - 8:55 am | चहाबिस्कीट

असाच एक उपक्रम इथे सुरु आहे. त्यांची काही पुस्तके पण उपलब्ध आहेत
http://boltipustake.blogspot.com

तुम्हाला शुभेच्छा.

नक्की सहभाग घेईन(निदान जे साहित्य उपलब्ध आहे ते ऐकून, त्यावर प्रतिक्रिया देऊन तरी).
उपक्रमास शुभेच्छा.

श्वेता२४'s picture

5 Jun 2018 - 2:30 pm | श्वेता२४

शुभेच्छा

छानच ऊपक्रम राबवता आहात तुम्ही. शुभेच्छा!