स्वप्न

अभिजित कुमावत's picture
अभिजित कुमावत in जनातलं, मनातलं
31 May 2018 - 3:56 pm

जागेपणि बघतो ती वेगळी अणि झोपेत बघतो ती वेगळी.
खरच स्वप्नांची दुनिया काही औरच.
जागेपणि जी स्वप्न बघतो ती शक्यतो आपल्या भविष्याला धरून असतात. आणि दिवासभरच्या घडामोडी वर अवलंबून असतात अशी काही झोपेतली स्वप्न जी सन्दर्भ विरहित असतात.

माणूस जन्माला येतो तेहि स्वप्नवतच आहेना. नऊ महीने आपली माता आपणास स्वताच्या गर्भात वाढवते. ती आणि आपले वडील त्या गर्भाला विचारात घेऊन स्वप्न बघतात. मूल झाल्यावर ते अस वगेल तस वगेल. पण तेच मूल मोठ झाल्यावर आपल्या स्वप्नात रंगून जात.आणि आपण आपल्या जन्मदात्यांना काहीतरी देण लागतो हे विसरून जात.

जन्माला आल्यापासूनच जणू परीक्षा चालू होते. आणि ती मरण येईपर्यंत चालूच रहते. त्या प्रत्येक परीक्षेत पास होण्यासाठी आपण आणि आपल्या बरोबरचे स्वप्न बघतातच. कहींचि पूर्ण होतात कहींचि मोड़तात, तर कहींचि स्वप्नवतच राहतात.

स्वप्न बघण वाइट नाहीं पण त्यांच्या आहारी जाण चांगल नाहीं. स्वप्न पूर्ण करायची ताकद अपल्यातच हवी, ती धमक असावी, तरच स्वप्न साकार करता येतात. स्वप्न पूर्ण करण तस सोप्प नाही. त्यात आपणास आपली कर्त्तव्य लक्षात ठेवावी लागतात. आणि कधी कधी आपणास करतव्यासमोर आपली स्वप्न सोडून द्यावी लागतात.

हे सगळ विचारात घेतल तर जागेपणि बघितलेल्या स्वप्नपेक्षा झोंपेत बघितलेली स्वप्नच बरी वाटतात. कारण आपल्याला हे तरी माहित असतं की आपण जे कही बघितल ते अजानतेपने आणि झोपेत बघितल. त्यामुळे ती तुटली तरी एवढा त्रास होत नाही.....

स्वप्न अशी
स्वप्न तशी
स्वप्न पूर्ण
करू तरी कशी
Abhi.k.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

31 May 2018 - 4:05 pm | विजुभाऊ

लेख अर्धवट का लिहीलाय. काय म्हणायचं आहे तेच समजले नाही
जे वाटले ते लिहीले. तुमचा उत्साह मोडायचा नाही.
पण लिहीत रहा. कोणी काहिही प्रतिसाद दिला तरी नाउमेद होऊ नका.