परवा एक व्हिडीओ पाहिला. आय पी एल चा किताब मिळताच चेन्नई चा संपूर्ण संघ उत्सवात गढ़ला असता चेन्नई चा कर्णधार धोनी आपल्या मुलीच्या झीवाच्या कोड कौतुकात मग्न होता. त्याला ट्रॉफी च काहीच देणं घेणं न्हवत होत ते आपल्या मुलीच कौतुक, तिच्या वरची माया.
तो व्हिडीओ बघून मला आठवत राहील. मला आई घरी हवी असताना माझी आई शाळेत न लवकर घरी यायची ते. मी रात्री सायकल वरून पडल्यावर बेरात्री मला घेऊन डॉक्टर कड़े धावली होती ते. अंब्याची आपल्या वाटची फोड मला आंबे जास्त आवडत नाहीत म्हणून माझ्या ताटात टाकायाची ते. मला आवडते म्हणून स्वता कर्करोगाने आजारी असताना खास गाजराच्या वड्या माझ्यासाठी परदेशात पाठवल्या होत्या ते (आई च्या हाताचा हा मी खालेला शेवटचा पदार्थ). मी परदेशातली चांगली नोकरी सोडून भारतात परत येइन म्हणून आपल आजारपण माझ्या पासून लपवून ठेवल होत ते.
अगदी अलीकडच सांगायचं तर मला आठवत राहील ते माझ्या लहान मूली करता वेळ देता यावा म्हणून माझ वकीलीच तीसरे वर्ष सोडून दिल होत ते. माझी एक महीन्याची मुलगी दूर दक्षीण गोव्यात आजोळी असताना आयत्या तिकीट मिळत नाही म्हणून जनरल डब्यात जमिनीवर पेपर पसरून केलेला तो बारा पंधरा तासाचा प्रवास. मुलगी वर्षाची असताना तिच्या डोळ्यात कचरा गेल्या नंतर मध्यरात्री औषध आणता याव म्हणून बेरात्री मेडीकल दुकाना शोधणयाचा तो आटापीटा.
हे म्हणजे फक्त रोल चेंगीनग अगदी "फेस ऑफ" स्टाइल मध्ये
खर तर तो व्हिडिओ एक निमित्त होत ह्या जुन्या आठवणीत राहण्याच. पुन्हा पुन्हा आठवणारया ह्या जुन्या गोष्टी सांगण्याच. कारण ह्या आठवणी कधी विसरल्या जात नाहीत आणि हो सांगीतल्या शिवाय राहावत ही नाहीत
केदार अनंत साखरदांडे
प्रतिक्रिया
31 May 2018 - 11:13 am | एस
मनातलं मांडलं आहे. आपण आपल्या आयुष्यातल्या अनेक बाबींबद्दल कृतज्ञ असायला हवं. छान.
31 May 2018 - 12:41 pm | गामा पैलवान
मूखदूर्बळ,
मनातल्या आठवणींची वीण अशीच घट्ट राहो.
पण धोनीचं वर्तन मलातरी थोडं खटकलं. इतर कोणी आपल्या मुलामुलींना घेऊन आलेलं नव्हतं. उगीच तिला व बायकोला संघासमोर आणण्यात काय अर्थ, असं वाटून गेलं. इथल्या चलचित्रात ४ सेकंदानंतर तो थांबण्याची खूण करताना दिसतो आहे. मग क्यामेरे सेट केले गेले की झिवा धावंत येतांना दिसते. हे उत्स्फूर्त नाही. अर्थात धोनी बेकार बाप नव्हे. फक्त दिखाऊगिरी कशाला, इतकाच प्रश्न!
आ.न.,
-गा.पै.