का करत नाही कुणी उलट सारे
ज्याला त्याला सुख प्यारे
हा द्यूत मांडला कुणी ?
इथे पटलावरचे प्यादे सारे
मंडल डोळ्यांनी दिसते खरे
दिसतात नभी चंद्र तारे
आवाका दोन नेत्रांचा असा किती ?
त्यात सामावले सुखदुःख आणि अश्रू सारे
दोन पायावरती उभे धड पुरे
असती एका मनाचे खेळ सारे
मन शोधूनही सापडत नाही विज्ञानास
तरी त्याचे अस्तित्व खरे
बघता सरळ कुणी , वाकडी भासे दुनिया
वाकडे वागता कुणी सलाम ठोके दुनिया
वक्र दृष्टी ग्रहांची ज्या कुंडलीत
त्याच ग्रहांची शांती होते
इतर ग्रहांचे फळ मिळूनही
सारे काही दुर्लक्षित होते
बळी द्या त्या कोंबड्या बकऱ्या
द्याल का कधी बळी वनराजाचा ?
डरकाळी ऐकून संपेल क्षणात
म्यान होतील मग चाकू सुऱ्या
वाह रे मानवा , तूच निर्माण केले सारे
तूच मांडीले कुंडलीतील ग्रह तारे
बळीवर बळी तू देत जा असाच
फुलवत जा पापांचे पिसारे
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
25 May 2018 - 8:33 pm | मदनबाण
सु रे ख . . .
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanati
28 May 2018 - 4:42 pm | खिलजि
प्रतिसादाबद्दल धन्यवाद साहेब . मंडळ आभारी आहे.
सिद्धेश्वर विलास पाटणकर