.
.
Sing me a song of a lass that is gone,
Say, could that lass be I?
Merry of soul she sailed on a day
Over the sea to Skye.
Billow and breeze, islands and seas,
Mountains of rain and sun,
All that was good, all that was fair,
All that was me is gone.
.
.
वर्ल्डवॉर २ मधे कॉम्बॅट नर्स म्हणून काम केलेली क्लेअर आपल्या इतिहासतज्ञ नवर्यासोबत (फ्रॅंक) स्कॉटलंड फिरायला आली आहे. नवर्याचा पुर्वज जॅक रँडलबद्दल अधिक माहिती जमा करणे आणि दुसरा हनिमून असे दुहेरी उघड उद्देश या ट्रिपमागे आहेत. युद्धामुळे ४-५ वर्ष एकमेकांपासून दूर राहील्यावर बदलेल्या साथीदाराला जाणून घेणे आणि मुलासाठी प्रयत्न करणे असे छुपे उद्देश.
बॉटनी/झुडुपपाल्याचा औषधी उपयोग याची आवड असणारी क्लेअर अपघाताने २०० वर्ष मागे जाते. १९४५ मधून १७४३ मधे. गाई चोरणारे स्कॉटिश हायलँडर आणि त्यांचा पाठलाग करत गोळीबार करणारे ब्रिटिश सैनिक यांच्यापासून बचाव करत पळताना ती भरकटते आणि स्कॉटिश टोळीच्या तावडीत सापडते. आधी ते हिला ब्रिटिश हेर समजतात. पण मग तिचे वैद्यकीय ज्ञान बघून हिलर म्हणून नजरकैदेत ठेवून घेतात. काही घटनांमुळे तिला टोळीतल्या जेमी फ्रेजरशी लग्न 'करावे' लागते. पण नकळत ती त्याच्या प्रेमात पडते.
स्कॉटिश कॅथलिक किंग जेम्सला त्याच्या 'हक्काच्या' इंग्लंडच्या गादीवर बसवण्यासाठी होणारे जॅकोबाईट राइजिंग, दोन वर्षानंतरचे १७४५ कलोडन युद्ध, स्कॉटिश क्लॅन पद्धतीचा आणि एकंदरच हायलँडर संस्कृतीचा अंत या सगळ्यापासून ती जेमीला आणि तिच्या जिवाभावाचे मैत्र झालेल्या इतरांना वाचवू शकते का? इतिहास बदलता येतो का? प्रेमासाठी मनुष्य काय काय करू शकतो? हे जाणून घेण्यासाठी आऊटलँडर मालिका नक्की बघा!
पूर्ण मालिका जिच्यावर अवलंबून आहे त्या क्लेअरची भूमिका Caitriona Balfe ने अतिशय उत्तमरीत्या निभावली आहे. Sam Heughan अभिनीत जेमीने तिला तोलामोलाची साथ दिली आहे. दोघांमधील केमिस्ट्री जबरदस्त! पण मला स्वतःला फ्रॅंक आणि जॅक रँडल अशा दोन टोकाच्या दोन व्यक्तिरेखा जिवंत करणाऱ्या Tobias Menzies चे फार कौतुक वाटले. बाकी सगळ्यांचा अभिनयदेखील उत्तम. कास्टिंग डायरेक्टरचे कौतुक.
१९४०, १७४० मधले स्कॉटलंड, १७४० मधले फ्रांस, त्याकाळची वेशभूषा,भाषा, शस्त्रास्त्र, खानपान संस्कृती, प्रवासाची साधनं वगैरे बघायला फार छान वाटते. पिरियड ड्रामा बघायला आवडत असेल तर चुकवू नये अशी सिरीज. मी नुकतंच या सिरीजच बिन्ज केलं. ३ सीझन - ४२ एपीसोड प्रत्येकी १ तासाचे - ८ दिवस मधे बघून झाले.
दोनेक वर्षांपूर्वी आऊटलँडर सिरीजमधली पुस्तकं वाचायला सुरुवात केली होती. ६६५ + ७४७ + ९९९ + ९१६ + (१३३०/२) अशी ४००० पानं ie ४.५ पुस्तक वाचून मग ब्रेक घेतला होता. पुस्तकांत फारच डिटेल वर्णन आहेत त्यामुळे सलगपणे वाचल्यास कंटाळा येऊ शकतो. पण एवढी मोठी पुस्तकं मालिकेच्या १६ किंवा १३ भागात बसवल्याने फक्त महत्वाच्या घटना घेऊन बाकीचा फापटपसारा काढून टाकला आहे. आतापर्यंत पहिल्या तीन पुस्तकांवर तीन सीझन आलेत. चौथा यावर्षी येईल.
टाईम ट्रॅव्हल, इतिहास, युद्ध, साहस, प्रेम, फेमिनिझम वगैरेची छान भेळ जमून आलीय मालिकेत. त्यामुळे नक्की बघा!
प्रतिक्रिया
13 May 2018 - 1:14 pm | पद्मावति
रोचक. ओळख आवडली.
13 May 2018 - 2:51 pm | यशोधरा
कुठे बघू?
13 May 2018 - 8:31 pm | नितिन थत्ते
ओळख आवडली
14 May 2018 - 6:17 am | एमी
पद्मावति, नितीन आभार :)
यशोधरा,
मालिका starz चॅनलवर येते. Netflix, Hulu , amazon prime वगैरेवर आहे कि नाही मला माहित नाही; शोधून पहा.
मी बेकायदेशीर मार्गाने मिळवली ;)
14 May 2018 - 10:59 pm | यशोधरा
धन्यवाद.
14 May 2018 - 7:30 pm | मारवा
नक्कीच बघणार
तुम्हालाही एक आगाऊ मालिका सुचवतो गॉडलेस
मस्त आहे म्हणजे टीपीकल काऊबॉय ला वेगळ्या कोणातुन सादर केलेली आहे.
नुकतीच संपवली फक्त ७ च भाग आहेत.
15 May 2018 - 6:08 am | एमी
अरेच्चा ही तर imdb top 250 (https://www.imdb.com/chart/toptv/) मधे आहे की! नक्की बघेन.
या imdb चं काही मला कळत नाही
Godless
Rating: 8.4/10 - 28,753 votes
231 वर आहे पण
Outlander
Rating: 8.5/10 - 77,210 votes
जास्तजणांनी, जास्त रेटिंग देऊनही लिस्टमधेपण नाही :(
===
एनिवे तुम्ही लिस्टमधली Big Little Lies (Rating: 8.6/10 - 76,564) बघितली का? नसेल तर बघा. आणि लिस्टमधे नसलेली Mr. Mercedes (Rating: 8/10 - 7,108 votes) पण बघू शकता (यातले काही सीन फार gross वाटू शकतील).
या दोन्हींबद्दल लिहायचा विचार आहे. सीझन 2 झाल्यावर लिहीन बहुदा....े
15 May 2018 - 9:17 am | चौकटराजा
ही मालिका येस मूव्हीज वर आहे !
15 May 2018 - 9:18 am | चौकटराजा
गॉडलेस ही मालिका ही यस मुव्हीज वर आहे.
15 May 2018 - 5:11 pm | कपिलमुनी
Outlander ही Netflix वर आहे
16 May 2018 - 1:29 am | वीणा३
मला हि आधी खूप आवडली, नंतर कंटाळा आला.
17 May 2018 - 9:41 am | वीणा३
ते फ्रान्स ला जातात ना तिथल्या राजाची मदत घ्यायला त्या सिझन पर्यंत कंटाळले मी. शेवटचे ३-४ एपिसोड फारच बोर झाले. बिंज नव्हती केली दर आठवड्याला बघत होते .
16 May 2018 - 6:45 am | एमी
चौकटराजा, कपिलमुनी आभार :)
विणा३, बिंज केलं होतं का? नक्की कधीपासून कंटाळा आला?
===
https://www.maayboli.com/node/65682 इथला वैद्यबुवांचा प्रतिसाद वाचून बघा. त्यांनादेखील फार आवडलीय.
16 May 2018 - 3:15 pm | इन्ना
मी बिंज केल इतकी आवडली मला .
पुस्तकं मिळवून वाचणार आता.
16 May 2018 - 8:41 pm | हणमंतअण्णा शंकर...
मी ही मालिका पाहायला सुरू केली आणि पहिल्या मोसमातच माझा उत्साह गळाला. एकतर ती कल्पनाच मला असह्य झाली आणि दगडाला हात लावताना जी गाणी आणि संगीत आहे ते खूप सामान्य दर्जाचे वाटले.
दुसरी गोष्ट म्हणजे स्थिरचित्रणाचा पोत सरसकट इंस्टाग्रामच्या एखाद्या भिकार फिल्टरमधून काढल्यासारखा आहे. मला माझ्या टीव्हीचा कलर प्रोफाइल रंगसंपृक्त करावा लागला आणि रंगविरोधाभास गडद. तेव्हा कुठे जरा डोळ्यात जीव आला.
गोष्टही मला काही फार रुचली नाही. एकदा फँटसीचा आधार घेतल्यावर तिच्याकडे खूप दुर्लक्ष केलंय.
अर्थात दोन वर्षांपूर्वी मी रावळगुंडवाडीत मोकळा बसल्याने काही मालिका नेटाने आणि काही हपापुन पाहिल्या तरीही ही भावलीच नाही. (झ्याट काही कळले नाही तरी बीबीसीची वुल्फ हॉल दम धरून पाहिली तरीही ही काही जमली नाही).
आता वेळही नाही आणि खाजही नाही.
ही कल्पना वापरून एखादी बाई दगडाला शिवून शिवकाळात गेली किंवा अजून उत्तेजित कल्पना म्हणजे चक्रधरांच्या मेळ्यात (तिरोनी आत्यागत) सामील झालीतर काय कथा रचता येईल असलंच काही डोक्यात येतं. मग सगळंच लक्ष उडून पंढरीच्या विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन बघत बसतो आणि राखुमाईच्या मूर्तीत आणि विठ्ठलाच्या मूर्तीत इतका का फरक आहे याचा विचार करून माढ्याला कधी जायचं याचा प्लॅन करत बसतो.
17 May 2018 - 5:52 am | एमी
इन्ना,
अर्रे वाह! कधी केलंत बिंज? किती दिवस लागले?
नक्की वाचा पुस्तकं :)
===
हणमंतअण्णा,
तुमच्या मताचा आदर आहे. पण
दगडाला हात लावताना जी गाणी आणि संगीत आहे ते खूप सामान्य दर्जाचे वाटले. >> चेटाकिणींच्या पागन विधीच्या वेळचं संगीत? मलातर आवडलं ते! खरंतर एकन्दरच मालिकेचं पार्श्वसंगीत आवडलं.
दुसरी गोष्ट म्हणजे स्थिरचित्रणाचा पोत सरसकट इंस्टाग्रामच्या एखाद्या भिकार फिल्टरमधून काढल्यासारखा आहे. मला माझ्या टीव्हीचा कलर प्रोफाइल रंगसंपृक्त करावा लागला आणि रंगविरोधाभास गडद. तेव्हा कुठे जरा डोळ्यात जीव आला. >> मी टीव्हीवर पाहिली नाही त्यामुळे याबद्दल काही बोलू शकत नाही.
गोष्टही मला काही फार रुचली नाही. एकदा फँटसीचा आधार घेतल्यावर तिच्याकडे खूप दुर्लक्ष केलंय. >> हेदेखील कळले नाही. फॅन्टसी फक्त टाईम ट्रॅव्हल एवढीच आहे. बाकी हे ऐतिहासिक काल्पनिक कथानक आहे. तुम्हाला नक्की काय अपेक्षित होत?
ही कल्पना वापरून एखादी बाई दगडाला शिवून शिवकाळात गेली किंवा अजून उत्तेजित कल्पना म्हणजे चक्रधरांच्या मेळ्यात (तिरोनी आत्यागत) सामील झालीतर काय कथा रचता येईल असलंच काही डोक्यात येतं. >> हा हा हे माझ्यापण डोक्यात आलेलं. भीमा-कोरेगाव युद्धाची घटना घ्यायची कलोडन मूर युद्धऐवजी. पण तिकडे युद्धानंतर ब्रिटिशांनी हायलँडर संस्कृती, भाषा, पोशाख निर्दयीपणे पूर्ण चिरडून टाकली. आपल्याकडे तस झालं नाही. आणि यात जसं बोनी प्रिन्स चार्ली किंवा फ्रान्सचा राजा दाखवलाय तसं इकडे करायचा विचार जरी केला तर मालिका सेटवर जायच्या आधीच गुंडाळावी लागेल ;)