स्कॉसपूस प्येग बाबा , स्कॉसपूस प्येग
फक्त एक मारा मग वर होतील ल्येग
जास्त पैक नकोत त्याला
मारा बाजारात फेरी
क्वार्टरला जोड द्या पिळून हापूसची कैरी
आकाश होईल काळेनिळे
दिसेल पुब्लिश भारी
जीभ होईल जड
मग सुटतील नव्या फैरी
कसले वेब आणि कसले सायन्स
इथे "थोमोस रयुतर" पण मिळेल
जो मारल स्कॉसपूस प्येग
फक्त तोच पेपर टंकेल
टंकत सुटा पेपर सारे
सोडा , सोडा आंजावारी
जोडीला एक क्वार्टर ठेवा
नि सोबत हापूसची कैरी
एकच बस्स , पुरे झालं, असा नसतो क्रायेतीरिया
डोकं चालत नाही तोपर्यन्त ठोकत जा
जोपर्यंत येते नवीन आयडिया
टंका हळूच विचार करून
काम बघून नि मापून
टंकता येत नसेल तर
तोंडात टाका एक सुपारी
आहे कि नाही मित्रा स्कॉसपूस प्येग
आंजावरती पण भारी
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
( हलकेच घ्या बरे , कुणालाही दुखवायचे नाही आहे )
प्रतिक्रिया
10 May 2018 - 2:28 pm | राजेंद्र मेहेंदळे
ही कविता समजुन घ्यायची असेल तर मिपावरचे करंट अफेअर्स माहिती असले पाहिजेत, म्हणजे आता या आठवड्यात आलेले गेलेले सगळे धागे बघणे आले
10 May 2018 - 3:44 pm | कंजूस
आद्य हल्लाबोल चकानदु कवी स्यूडब्रेकर यास ओवरटेक केल्या गेली आहे.
10 May 2018 - 7:02 pm | खिलजि
ह्ये कायय त्ये कल्लेले नायय . इस्कटून संगत्याल कायय त्ये
10 May 2018 - 8:54 pm | वीणा३
तुमचे धागे मला गोविंदा च्या सिनेमा सारखे वाटतात. डोक्याला ताप नाही, झालंच तर थोडाफार मनोरंजन होतं :). लिहीत रहा :D
11 May 2018 - 4:54 pm | खिलजि
धन्यवाद मेहेंदळे साहेब ,कंकाका आणि वीणा ताई , आपला प्रतिसाद मला भावला ..
15 May 2018 - 9:14 pm | अकिलिज
कालपण लै हसलो. आजपण लै हसलो. चित्रागुप्ताचा प्रतिसाद पण जबरदस्त आहे. लगे रहो खिलजी.