खरंच खूप दुःख वाटतेय आजकालच्या बातम्या ऐकून ऐकून . वृत्तांकनामधून आजकाल लहान मुलांवरील अत्याचाराच्या बातम्या जरा जास्तच येत आहेत . खूप विषन्न व्हायला होते हे सारे ऐकून .
मला जे वाटते ते मी आतापर्यंत करत आलोय . माझ्या मुलाचा जन्म झाल्यापासून मी नित्यनेमाने बालाशिषः स्तोत्र म्हणतो . जेणेकरून खरंच दत्तगुरूंचे रक्षकवच असेल तर ते माझ्या मुलांना लाभावे म्हणून . या स्तोत्राची संख्या ५ आहे . म्हणजे किमान आपल्या मुलांच्या रक्षणासाठी ते दिवसातून किमान पाच वेळा तरी म्हणावे .
वरील लिखाणावरून अभिप्रायांची राळ उडू शकते . मला पुन्हा नास्तिक नि आस्तिक वादामध्ये पडायचे नाही आहे . मी कुठल्याही अंधश्रद्धेला खटपणीही घालत नाही आहे . मी फक्त या स्तोत्रासंबंधी सांगत आहे . कदाचित इथे आंजावर बहुतेकांना हे माहीतही असेल . नवीन सांगण्यासारखे त्यात काही नाही आहे . पण एक भोळी अशा आहे . या आंजावर कित्येक आया असतील , बापही असतील ज्यांना हा तोडगा एक आंतरिक समाधान देऊ शकतो .
माझं हे ठाम मत आहे कि विज्ञान म्हणजे दुसरं काही नसून ते एक अढळ विश्वास आहे . ध्येयप्राप्ती आणि फक्त ध्येयप्राप्ती . आजच्या धकाधकीच्या जीवनात जर आपल्या सोनूल्यांकडे आपण पूर्ण वेळ लक्ष देऊ शकत नाही तर निदान हे रक्षाकवच किमान एक मानसिक समाधान तरी नक्कीच देते . मी फार पूर्वीपासून या स्तोत्रांचा चाहता आहे आणि मला वाटत हि स्तोत्रे निव्वळ उपयोगीच नाहीत तर अद्भुत आहेत . जर तुम्हाला मानायचे असेल तर माना अथवा गंगेला सोडून द्या . पण काही मायबाप यावर नक्कीच विचार करतील आणि ते आचरणात आणतील .
हे बघा, इथे विज्ञान अंधश्रद्धा , देव , आस्तिक नास्तिक असं काहीच नाही आहे . तुम्हाला फक्त सुरुवातीला थोडे कठीण वाटेल पण एकदा पाठ झाले कि आपल्या नेहेमीच्या कामामध्ये फक्त गुणगुणत जा . परिस्थिती नियंत्रणात येतेय असं वाटू लागेल .
मी खाली आपल्यासाठी हे "बालाशिष स्तोत्र" देत आहे . कदाचित कोणालातरी उपयोगाचे वाटू शकते . पण लक्षात असू द्या कि हे स्तोत्र नेहेमी म्हणावयाचे आहे तेही किमान पाच वेळा . एकदा सुरुवात करा मग सगळं सोपं होऊन जाईल . शुभं भवतु
स्वांशेनेदं ततं येन स त्वमीशात्रिनंदन।।
मुञ्च मुञ्च विपद्भ्योsमुं रक्ष रक्ष हरे शिशुम्।।१।।
प्रातर्मध्यंदिने सायं निशि चाप्यव सर्वथा।।
दुर्दृग्गोधूलिभूतार्तिगृहमातृग्रहादिकान्।।२।।
छिन्धि छिन्ध्यखिलारिष्टं कमण्डल्वरिशूलधृक्।।
त्राहि त्राहि विभो नित्यं त्वद्रक्षालंकृतं शिशुम्।।३।।
सुप्तं स्थितं चोपविष्टं गच्छन्तं क्वापि सर्वतः।।
भो देवावश्विनावेष कुमारे वामनामयः।।४।।
दीर्घायुरस्तु सततं सहओजोबलान्वितः।।
इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य
दत्तपुराणांतर्गत
श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितः
बालाशिषः स्तोत्रह संपुर्णम
प्रतिक्रिया
30 Apr 2018 - 3:59 pm | आनन्दा
वाखु