“आॅपरेशन स्मिअर” आणि “निद्रिस्त भारत”

गब्रिएल's picture
गब्रिएल in जनातलं, मनातलं
22 Apr 2018 - 9:54 am

व्हॉसपवर एक म्येसेज फिर्तो आहे. आमाला लई इचार करनारा वाट्ला. फकस्त आप्ल्या फायद्याकडं नजर आसलेल्या बुद्दीमान लोकांला जरा तरी बुद्दी यावी या कारनाने या टिकानी द्येत हाहे.

=================================================

“आॅपरेशन स्मिअर” आणि “निद्रिस्त भारत”

©कल्पेश गजानन जोशी

देशातली आजची एकंदरीत परिस्थिती पाहता ब्रिगेडीअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा एक सत्य भाकित वर्तविणारा लेख आठवतोय.

गेल्या वर्षी डोकलाम प्रश्नी मा. महाजन सरांचा “आॅपरेशन स्मिअर आणि भारत” हा लेख दैनिक पुढारीला वाचण्यात आला होता.

त्यात त्यांनी स्वत:च्या सैनिकी पेशाला शोभेल असे एक गुढ सत्य मांडले होते. ते गुढ यासाठीच, की ते कुणालाच माहित नव्हते. माहित झाल्यावरही त्यावर कुणी सामान्य व्यक्ती चटकन विश्वास ठेवणार नाही. परंतु त्यांचे ते गुढ आज खरे वाटु लागले आहे.

देशातील अस्थिर राजकिय सामाजिक परिस्थिती व वाढता असंतोष पाहता ब्रिगेडिअर महाजन यांनी वर्तवलेले भाकित स्पष्ट होऊ लागले आहे.

'आॅपरेशन स्मिअर आणि भारत' या आपल्या लेखात ब्रिगेडिअर हेमंत महाजन मांडतात:

“काळ बदलतोय तश्या युध्दनीती बदलत आहेत. शत्रुशी केवळ सीमेवर दोन हात न करता अन्य मार्गांनी कसे खिळखिळे करता येईल यासाठी नियोजनबद्ध डावपेच जगभरातील देश आखत अाहेत.”

"पाकिस्तानही चीनच्या मदतीने भारताला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहे. या आॅपरेशनला '१९४५- आॅपरेशन स्मिअर' असे नाव देण्यात आले आहे.”

"तीन वर्षातील भारताची जगभरात उजळलेली प्रतिमा तसेच भारताचे परराष्ट्र व लष्करी धोरण पाहता भारत सरकार काश्मिरप्रश्नी काही नमते घेईल असे वाटत नाही."
"म्हणुनच पाकिस्तान व चीनसारख्या शत्रु राष्ट्रांनी भारताविरोधात इलेक्ट्राॅनिक मिडिया व सोशल मिडियाच्या माध्यमातुन आपले भाडोत्री लेखक, साहित्यीक व पत्रकार कामाला जुंपले आहेत. त्याचेच नाव 'आॅपरेशन स्मिअर'!"

या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे भारतात महिला, बालके, दलित, अल्पसंख्य तसेच धार्मिक स्थळे असुरक्षित आहेत, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत अशी सर्वदूर बोंब करणे. थोडक्यात काय तर भारत हा एक असुरक्षित व अस्थिर देश आहे अशी भारताची बदनामी करणे हेच त्या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट. या अभियानासाठी पाकिस्तान, चीन व मध्य पूर्व आशियातील वहाबी उग्रवादी संघटनांकडून तसेच आयएसआयकडून आर्थिक मदत उभी करुन युरोप व अमेरिकासारख्या देशांमध्ये भारताविरुद्ध अपप्रचार सुरु देखिल झाला आहे. आतापर्यंत २१५ कोटी डाॅलर्स यावर खर्च झाले असून २०१९ च्या निवडणुकांआधी यापेक्षा कैक पट खर्च या आॅपरेशन स्मिअरवर खर्च होईल असे भाकित यात दर्शविले आहे.”

आपणांस माहित असेलच, २०१४ ला सत्ता परिवर्तन झाले. भाजप सरकार सत्तेत आले. पण काय आश्चर्य, नवीन सरकार सिंहासनारुढ होत नाही तोच असहिष्णुतेवरुन देशभरात हलकल्लोळ माजला होता.

अनेक दिग्गज नेत्यांनी, साहित्यिकांनी आपली पदके व पुरस्काराचा त्याग केला होता. आॅपरेशन स्मिअरची ही सुरुवात होती का? भारतात असहिष्णुता वाढली आहे ह्याचा कंठशोष करुन कुणाला सांगणे होत होते?

पुढे थोड्याच दिवसांनी रोहित वेमुला प्रकरण घडले. रोहित वेमुलाची आत्महत्या नसुन मर्डर असल्याचा कांगावा केला गेला.

भाजप व विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना यात गोवण्यात आले. या प्रकरणापासुन देशात दलित असुरक्षित असल्याचा ढोल बडवण्यास सुरुवात झाली.

नंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. आतंकवादी अफजलगुरुच्या जयंत्या मयंत्या वामपंथी संघटनांकडून साजरी होऊ लागल्या होत्या. या देशद्रोही कृत्यास विरोध केल्यावर सर्व डाव्या वामपंथी संघटनांनी (काँग्रेससहित) 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे' अश्या फुशारक्या मारल्या. सर्व काही नियोजनबद्ध घडल्यासारखं वाटावं असे हे एक एक प्रकरणं आता विचार करायला भाग पाडत आहे.

जेएनयू प्रकरण शांत होते न होते तोच कश्मिरमध्ये हिंसाचार उफाळला. कारण काय तर मोस्ट वाँटेड आतंकवादी बुरहान वानी याचा भारतीय सैनिकांनी खात्मा केला होता.

बुरहान वानीच्या अंतयात्रेस लाखोच्या संख्येने त्याचे भक्त एकवटले होते व देशविरोधी घोषणा देत होते. या घटनेनंतर कित्येक दिवस कश्मिर खोरे धुमसत राहिले. भारतीय सैनिकांवर व पोलीसांवर दगडफेक होऊ लागली. काही पोलीस व सैनिकांना निर्घृणपणे मारले गेले. याला प्रत्युत्तर म्हणुन आतंकवाद्यांविरोधात नरमाईची भूमिका सोडून भारतीय सैन्याने उग्र रुप धारण केले. शेकडो आतंकवाद्यांना यमसदनी धाडले. याचे दु:ख झाले की काय म्हणुन विरोधी पक्षांसकट तथाकथित लोकशाहीवादी व मानवतावादी लेखक, साहित्यिक व पत्रकारांनी 'मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे' म्हणुन आवई उठवली.

भारतीय सैनिकांना व पोलीसांना एकटे गाठून दगडांनी ठेचून मारले जात होते, त्याचे दु:खाश्रू न ढाळता पॅलेट गनचा वापर करुन दगडफेक्यांना बंदूकितील छर्र्यांमुळे इजा होत आहे, याचे अधिक दु:ख या मंडळींना झाले.

आॅपरेशन संपले नव्हते. आव्हानेही संपली नव्हती.

आतंकवाद आणि नक्षलवादाच्या मुसक्या आवळल्या जात होत्या म्हणुन की काय चीन-पाकिस्तान अस्वस्थ झाले. म्हणुनच भारताला डिवचण्यासाठी गिलगीट-बाल्टीस्तानमधून ओबोर अंतर्गत रेशीम मार्ग तयार करण्यास चीनने सुरुवात केली. एवढेच काय तर डोकलाम वरही कब्जा करण्याचा प्रयत्न चीनद्वारा केला गेला. त्यातुनच डोकलाम विवाद उद्भवला. हा संवेदनशिल विवाद उभा ठाकला असताना चीन युद्धाची भाषा करत होता. चीनचे राष्ट्राध्यक्ष उघड उघड धमकी देत होते. युद्धाला कधी तोंड फुटेल सांगता येत नव्हते. एवढी गंभीर परिस्थिती उद्भवली होती.

भारताचे लष्कर प्रमुख सैन्याची हिंमत वाढवित होते. भारत सगळी आव्हाने पेलण्यास सक्षम असल्याचे सांगत होते. पण त्याचवेळी काही पत्रकार व लेखक चीन किती बलाढ्य व पराक्रमी व भारतापेक्षा शक्तीशाली आहे याचे कौतुक करत होते व भारतीय सैन्याला व युद्धसामुग्रीला कुचकामी ठरवुन भारताचेच खच्चीकरण करत होते. यालाच म्हणतात 'आॅपरेशन स्मिअर'!

पण आम्ही भारतीय नागरीक याला राजकिय खेळ समजुन बसलो आहोत. पण ब्लू व्हेलसारख्या या खेळात अंतत: नाश तर आपलाच नाही ना? याचा विचार करणे गरजेचे झाले आहे.

देशात जे काही घडते आहे ते सामान्य राजकारण नव्हे. राजकारण सत्तेसाठी असु शकते. पण सत्तेवर बसणारा व त्याला बसवणारा (रिमोट कंट्रोल) कोण हेही ठाऊक असावयास हवे. रिमोट कंट्रोल कोणत्या देशातून चालवले जात आहे हेही माहित असावे. कारण सत्तेसाठी राजकारण, राजकारणासाठी पक्ष, पक्षासाठी विचार, विचारासाठी संघटना व संघटनांचा 'जगावर राज्य' करणे हा हेतु असतो.

म्हणुनच कुणी अख्खं जग इस्लाममय करण्याचा विडा उचलतो, तर कुणी ख्रिश्चनमय करण्याचा.

कुणी सेक्युलरिजमचा प्रचार करतो तर कुणी कम्युनिजमसाठी लाल क्रांत्या करतो.

लढाया व युद्धांचे एकमेव कारण संपत्ती, पैसा, साम्राज्यविस्तार किंवा सत्ता एवढेच नसते. ब-याच युद्धांमागे हीच कारणे दिसतात, पण वैचारिक कारणे कधीही स्पष्ट केली जात नाही.

विषम विचारी असणे हेसुद्धा शत्रुत्व निर्माण होण्याचे एक कारण आहे. यातुनच निर्माण होतात संघर्ष व अराजकता. तेव्हा सत्तेमागचे वैचारिक दृष्टीकोनही समजुन घेणे महत्वाचे ठरते. एकदा का ते लक्षात आले की

• आपल्या देशात मानवाधिकाराचे उल्लंघन होतेय म्हणुन आक्रोश करणारे,
• अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन होते म्हणुन दंगा करणारे,
• दलित- मुस्लीम असुरक्षित आहे असे म्हणणारे,
• अफजल गुरुसारख्या आतंकवाद्याला आपला आयडाॅल मानणारे,
• भारत की बर्बादी तक जंग चलेगी म्हणणारे,
• नक्षलवाद्यांना व आतंकवाद्यांना मदत करणारे कोण आहेत व त्यांचा खरा चेहरा कोणता हे उघड होईल.
• २०१४ पासुन आजतोवर देशात कधी नव्हे इतके आंदोलनं व मोर्चे निघाले व निघताहेत.
• २०० वर्षात कधी नव्हे ते भीमा कोरेगांव प्रकरण आत्ताच कसे काय घडले? आता तर भीमा कोरेगाव प्रकरणामागे नक्षली भेजा असल्याचे समोर येत आहे.
• डोकलाम विवाद पुन्हा गरम होणे,
• बिहारमध्ये अचानक जातीय दंगली उसळणे,
• बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी हिंदूवर हल्ले होणे,
• अॅट्रोसीटी कायद्यात अंशत: बदल काय झाला देशात हिंसाचार उफाळणे तसेच,
• कश्मीर खो-यात १३ आतंकवादी मारले गेल्यानंतर लगेच दगडफेक सुरु होणे आपणांस काय सुचित करत आहे?
• नोटाबंदीमुळे कश्मिरमधल्या फुटिरतावाद्यांना व आतंकवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद काही काळ ठप्प झाली होती. दगडफेक करणा-या युवकांना कोण पैसे पुरवतो हे सर्वश्रुत झालेच आहे.

तेव्हा २०१९ मधल्या निवडणुका पाहता भारत सरकारला शक्य तितके बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल व मोदी सरकारच्या हाती देश असुरक्षित असल्याचा कांगावा लवकरच केला जाईल असे वाटते.

भारतातील काही वैचारिक गट असे आहेत, ज्यांचे पाठिराखे (किंवा रिमोट कंट्रोल) इतर देशातही आहेत.

भारतातला मुसलमान दुखावला गेला की अरब राष्ट्रे (इस्लामिक राष्ट्रे) धाऊन येतात.

भारतातल्या ख्रिश्चनांवर अत्याचार झाले की युरोपीयन देश मदतीला येतात.

भारतात वामपंथीयांवर अन्याय झाला की चीन पुढे सरसावतो. हे पाठिराखे त्यांचे म्हणणे युनायटेड नेशन्ससमोर मांडतातच शिवाय भारतातही लुडबूड करु लागतात.
नक्षलवाद व दहशतवाद या दोन विषवल्लींना तेच खतपाणी घालतात. खास याचसाठी तर त्यांनी ती पेरली आहेत.

भारताची प्रबळ परराष्ट्रनीती व मोदी सरकारने वाढवलेली मित्र राष्ट्रे यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा व प्रतिभा उंचावली आहे.

नाहीतर युनायटेड नेशन्सला भारतात लुडबुड करण्यास संधी मिळवुन द्यावी हाच त्यांचा कावा असणार.

परंतु सततच्या अपयशामुळेच पाकिस्तान व चीनला आता आॅपरेशन स्मिअरसारखे छुपे युद्ध करावे लागत आहे. याचा सामना प्रत्येक भारतीयाला करावा लागतोय. पण देशात घडणारी प्रत्येक घटना हे राजकारण आहे असे म्हणुन डोळेझाक करणे हे भारताच्या व भारतीयांच्या भवितव्याविषयी घोडचूक ठरेल.

“त्यासाठी आपल्या विवेकबुद्धीने घडणा-या घडामोडींचे अवलोकन करणे आवश्यक आहे.”

© कल्पेश गजानन जोशी
kavesh37. blogspot. com

=============================

आज बुद्दी गहाण ठ्यवली तर उद्या गुलामी करावी लागतेय ह्ये इतिहास सांगतोय, आसं बुद्दीमान लोकच म्हंत्यात बगा !

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

विशुमित's picture

22 Apr 2018 - 10:22 am | विशुमित

मला तर हा व्हाटसअप लेखकच ऑपरेशन स्मिअर चा हस्तक वाटतोय.
शेवटच्या वाक्यावर धागालेखकानेच विचार करून स्वतःला बुद्धिमान करून सोडावे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2018 - 10:36 am | डॉ सुहास म्हात्रे

बरेच मुद्दे स्पष्ट दिसणारे आणि विचार करण्याजोगे आहेत.

मात्र, तात्कालिक वैयक्तिक स्वार्थाच्या राजकारणाच्या धुमाळीत (जो आपला वारसा अलेक्झांडरच्या आक्रमणापासून चालला आहे), त्यांच्याकडे लक्ष द्यायला फुरसत आहे कोणाला ?!

मला तर सद्यकालीन स्थिती हिच ऑप स्मिअरची एक ग्रॅन्ड खेळी वाटतेय. न जाणो किती मोठे मोहरे असतील ह्यात गुंतलेले. त्यांना तरी माहीतीय का कुणाच्या हातातील प्यादे आहेत ते कुणास ठाऊक. आणि त्यांचा उदोउदो करणार्‍यांना सुध्दा आपण देशभक्त अशी स्वप्ने पडताहेत ती तरी खरी आहेत का कुणास ठाऊक.
लैच लैच म्हणजे लैच.

मार्मिक गोडसे's picture

22 Apr 2018 - 12:00 pm | मार्मिक गोडसे

भारताची प्रबळ परराष्ट्रनीती व मोदी सरकारने वाढवलेली मित्र राष्ट्रे यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा व प्रतिभा उंचावली आहे.

इतकी खात्री वाटत असेल तर कशासाठी हि कोल्हेकुई?
आपलं गुप्तहेर खात सलून मध्ये बसून वृत्तपत्र चाळत बसले आहेत असं ह्या महाशयांचे म्हणणे आहे का?
प्रत्येक गोष्ट गालीच्या खाली सरकवण्याच्या सवयीमुळे गालिच्यावरून चालताना अडखळायला होणारच.

जेम्स वांड's picture

22 Apr 2018 - 12:48 pm | जेम्स वांड

म्हणुनच भारताला डिवचण्यासाठी गिलगीट-बाल्टीस्तानमधून ओबोर अंतर्गत रेशीम मार्ग तयार करण्यास चीनने सुरुवात केली.

हे वाटते तितके उथळ नाहीये. विदेशनीती (एकंदरीत) अन तिचा इतिहास ह्यांचा अभ्यास करता एक लक्षात येतं की चीन अन रशिया ह्यांचं कायमचं एकच दुखणं आहे ते म्हणजे 'ऑल वेदर सी ऍक्सेस नसणे' कारण भयानक अश्या आर्क्टिक हिवाळ्यात रशियाला आर्क्टिक समुद्राला ऍक्सेस बंद होऊन जात असे (अपवाद फक्त मुर्मांस्क बंदर) अन टायफूनच्या मोसमात चीनला उपलब्ध असणारा (एकमेव) पूर्व किनारा, वापरण्यात खूप काठिण्य येत असे, त्यामुळे ह्या दोन्ही सत्तांना येनकेनप्रकारेण दक्षिणेकडे असलेल्या तुलनेने गरम अन बारोमास नौकानयनयोग्य समुद्र म्हणजे पश्चिमेकडे कॅस्पियन समुद्र, भूमध्य समुद्र, काळा समुद्र अन पूर्वेकडे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंद महासागर, मलाक्काची सामुद्रधुनी, दक्षिण चिनी समुद्र इत्यादींवर प्रभुसत्ता हवी असते. जुन्याकाळी चीन मध्ये इतका दम नसल्याकारणाने त्याच्या कारवाया हल्ली वाढल्यात, रशियाने क्रिमियन युद्धपासून ते अफगाणिस्तान युद्धापर्यंत मुसंड्या मारल्या त्या दक्षिणेतच अन समुद्र मिळावा ह्या डेस्प्रेशन मधेच. हल्लीची चिनी आक्रमकता सुद्धा ह्याच गृहितकांवर आधारित असून 'दक्षिण चीन समुद्राच्या नावात चीन असल्याममुळे त्यावर चिनी सार्वभौमत्व आहे' वगैरे पोकळ अन हास्यास्पद दावे चीन करत असतो. ह्या ग्रँड स्कीम मध्ये भारताला त्रास देण्याची साईड इफेक्ट क्रिया साधत असली तर चीन ती सोडायला मूर्ख नाही पण फक्त भारताला टार्गेट करूनच सीपेक (चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, ओबोरचा पाकिस्तानी हिस्सा) बांधला जातोय, हे थोडंसं अतिरंजित वाटतं आहे, अर्थात त्यामागचा हेतू निर्विवाद आहे हे मान्य करायला हरकत नसावी. सीपेकचा मूळ हेतूच अरबी समुद्राला चिनी ऍक्सेस असणे इतक्यावर बेतलेला असणे जास्त संयुक्तिक वाटते.

६१ वर्षे काँग्रेसच्या नावाने ओरडून झाले.

आता सत्ता चालवणे जमेना तर चीन , पाकिस्तान आणि इतर देशांच्या नावाने ओरडा सुरु आहे.

पाकिस्तानात बिर्याणी खायची
चीनमध्ये झोपाळ्यावर झुलायचे.
इंग्लंडमध्ये डॉक्टरकीविरोधात बोलायचे.

आणि म्हणायचे हे आमच्याविरोधात कट करत आहेत.

मार्मिक गोडसे's picture

22 Apr 2018 - 2:48 pm | मार्मिक गोडसे

नाचता येईना अंगण वाकडं.

manguu@mail.com's picture

22 Apr 2018 - 6:20 pm | manguu@mail.com

नेहरुंपासून क्यानडाच्या खलिस्तान्वाल्यांपर्यंत सगळ्याना ह्यानी कशाला ना कशाला जबाबदार धरले आहे.

भाजपा , संघ , विहिंप, अभाविप हे सोडले तर इतर सर्व विश्व हे पापी , अज्ञानी , राष्ट्रद्रोही , असामाजिक , संस्कारहीन , विनाशक आहे , असे आणखी एक दोन वर्षात ह्यानी जाहीर करुन टाकावे असे वाटत आहे.

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2018 - 7:04 pm | श्रीगुरुजी

जाहीर करण्याची आवश्यकता नाही.

बिटाकाका's picture

23 Apr 2018 - 2:30 pm | बिटाकाका

वरील पैकी किमान दोन देश उघड उघड भारताविरुद्ध कारवाया करत असताना तुम्ही नाकारत आहात का? ते कारवाया करत असताना भारताने बोलणे बोलणे बंद करून डायरेकट युद्ध करावे असे आपले मत आहे का?
*****************************************
भारताचे पंतप्रधान दुसऱ्या देशात जाऊन काय करतात याची तसूभरही माहिती न घेता बिर्याणी खाणे, झोपाळे झुलणे वगैरे टीका हि खरंतर टीकेची आणि द्वेषयुक्त मानसिकतेची लेवल दर्शवते. पंतप्रधान दुसऱ्या देशात बिर्याणी खायला जातात हाच तुमचा अभ्यास आहे का? किती द्वेष करायला पाहिजे याची काही लिमिट आहे कि लिमिटलेस ठेवायचं ठरलंय? याआधीचे पंतप्रधान बाहेर जायचे तेव्हा इथून डब्बा घेऊन जायचे कि उपाशी परत यायचे हा प्रश्न मनात आला होता का कधी?
*****************************************
नाईलाजास्तव भक्तगीरी ठिक आहे, पण लेख काय भाजप च्या प्रवक्त्याने लिहिला आहे का? मग पंतप्रधान काय करतात याचा आणि लेखाचा तुलनात्मक संबंध जोडायचा काय संबंध? तुमचे लेखकाच्या मतांवर काही प्रत्युत्तर असेल तर ते जरूर मांडा.

उपेक्षित's picture

23 Apr 2018 - 7:54 pm | उपेक्षित

बीटा काका + १

खरे तर जिथे तिथे पक्षीय राजकारण (निदान मिपावकर तरी) न आणता वस्तुस्थिती समजून घेऊन बोलावे असे वाटते.

सर टोबी's picture

23 Apr 2018 - 10:53 pm | सर टोबी

'चाटू' हा अतिशय गलिच्छ शब्द आहे. तो वापरून जेंव्हा तुम्ही इतरांची संभावना करीत होता तेंव्हा कोणती मर्यादा आपण पाळत होता?

कृपया मी कुठे स्वतःहून कुणाला चाटु म्हणून संभावना केली हे दाखवा. भक्त या उल्लेखला उत्तर म्हणून मी चाटु, गुलाम, आपटार्ड यापैकी काय असा उल्लेख केल्याचे मला आठवते.
***********************
मालक, असा एखादा दुसरा प्रतिसाद लक्षात ठेवण्यापेक्षा माझे सगळे प्रतिसाद वाचत चला. माझे सगळे प्रतिसाद वाचले तर लक्षात येईल की भक्त या उल्लेखला थांबवण्यासाठी मी याविरुद्ध भूमिका असणाऱ्यांना काय म्हणायचे ही भूमिका मांडलेली आहे.
********************
याउलट एखाद्या पक्षाची बाजू घेणे ही भक्तगिरी आहे असा भक्त हा उल्लेख करणाऱ्यांचा समज आहे त्यामुळे मी एक पक्षाची बाजू घेणार्यांना व मी भक्त हा शब्द वापरला आहे.
*******************
तुमच्या या प्रतिसदानंतर - माझ्या वैयक्तिक कॅपसिटीमध्ये - भक्त या उल्लेखाला चाटु, गुलाम, आपटार्ड या उल्लेखाने प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवत आहे. उद्देश स्पष्ट आहे, भक्त हा उपहासात्मक उल्लेख थांबवणे.
*******************
तरीही, मुद्दा पंतप्रधानांवर कुठल्या मुद्द्यावर टीका करायची हा आहे. इथे एकमेकांचे समर्थक एकमेकांना काय म्हणतात हा विषय वेगळा घ्यायला नक्की आवडेल.

सर टोबी's picture

22 Apr 2018 - 5:53 pm | सर टोबी
  1. दिवसाचे १६ - १८ तास एकही सुट्टी न घेता काम करणारा नेता
  2. विमानातच झोप घेऊन पुढच्या देशाला भेट देणारा नेता
  3. स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेऊन देशाला वाहून घेणारा नेता
  4. नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राईकने दहशत वाद्यांचा कंबरडे मोडणारा नेता

या सर्वांचा फोलपणा जनतेला कळायला लागल्यावर हि नवी लोणकढी आय टी सेल ने काढली आहे.

संत असण्यापेक्षा , मी संत आहे ,हे संसारी लोकाना दाखवून त्याना खिजवण्यात बहुतांश संताना ( आणि त्यांच्या भक्ताना ) जास्त रस असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २७ आणि २८ एप्रिलला मोदी हा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात अनौपचारिक शिखर बैठक होणार आहे. भारत-चीनमधील संयुक्त पत्रकार परिषदेत चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी डोकलाममध्ये झालेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांमधील ही पहिलीच बैठक आहे.

याआधी परराष्ट्र सुषमा स्वराज आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या बैठक झाली. दोन्ही देशातील द्वीपक्षीय संबंध सुधारण्यावरील प्रक्रियेला वेग देण्यावर बैठकीत चर्चा झाली. शांघाई सहकार्य परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी सुषमा स्वराज सध्या चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. यासाठी स्वराज कालच चीनमध्ये पोहोचल्या.

https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news...

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2018 - 7:01 pm | श्रीगुरुजी

लेखातील विचारांशी पूर्ण सहमत.

पाकिस्तानचा विचार केला तर हे लक्षात येते की पाकिस्तान ४-५ वेगवेगळ्या स्टेकहोल्डर्सच्या माध्यमातून भारताशी युद्ध करीत आहे.

१) पाकिस्तानी लष्कर - पाकिस्तानी लष्कर सीमेवर भारतीय सैनिकांशी थेट युद्ध करते. त्याचबरोबर अतिरेक्यांना प्रशिक्षण व शस्त्रे देऊन भारतात पाठविणे व त्यांच्या माध्यमातून भारतात दहशतवादी हल्ले करणे यामागेही लष्कर आहे.

२) इस्लामी अतिरेकी - भारतात घुसून दहशतवादी हल्ले करून जास्तीत जास्त हत्या करणे हे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

३) पाकिस्तानी सरकार - आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद्यांची पाठराखण करणे, दाउदसारख्या अतिरेक्यांना राजाश्रय देऊन दहशतवाद सर्वार्थाने स्पॉन्सर करणे, सातत्याने काश्मिर विषय उकरून भारताची बदनामी करणे इ. च्या माध्यमातून स्वतः नामानिराळे राहून पाकिस्तानी सरकार भारताविरूद्ध युद्ध करीत आहे.

४) पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय एस आय - या संघटनेचे व लष्कराचे पाकिस्तानवर खरे नियंत्रण आहे. पाकिस्तानी सरकार तसे नामधारी असते. आय एस आय व लष्कराला मान्य असणारे सरकारच पाकिस्तानमध्ये टिकू शकते. भारतात दहशतवादी कृत्ये करून व छुप्या युद्धातून भारतात अशांतता माजवून भारताचे तुकडे करणे हे आय एस आय चे मुख्य उद्दिष्ट आहे.

५) भारतातील निधर्मांध म्हणजेच निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत - भारतीय जनतेचा बुद्धिभ्रम करून वैचारिक गोंधळ माजविण्याचे काम हे करतात. हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद, दलितांवर अत्याचार, मुस्लिमांवर अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी इ. अस्तित्वात नसलेल्या मुद्द्यावर काहूर माजवून माध्यमांमध्ये भारतावर टीका करणारे लेख लिहिणे, वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेल्या चर्चासत्रातून भारतावर सातत्याने टीका करून पाकिस्तानच्या सुरू असलेल्या कारवायांसाठी भारतच कसा जबाबदार आहे हे ठासून सांगणे, देशद्रोह्यांची पाठराखण करणे, भारतात दलित/मुस्लिम इ. वर अन्याय होत आहे असा गळा काढणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची शक्य तितकी बदनामी करून भारतालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे, इस्लामी दहशतवाद्यांची पाठराखण करून त्यांच्याविरूद्ध असलेल्या जनमानसात असलेली चीड सौम्य करणे, एखाद्या गुन्ह्यात हिंदू आरोपी व मुस्लिम बळी असतील तर आकाशपाताळ एक करून आरडाओरडा करणे, पण आरोपी मुस्लिम व बळी हिंदू असतील तर संपूर्ण दुर्लक्ष करून मौन पाळणे, न्यायालयाने यांना न आवडणारे निकाल दिले तर न्यायालयालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे, दिवसरात्र अखंड सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून शिव्या देताना भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे असा कांगावा करणे, पाकिस्तानी लेखकांना व कलाकारांना इथे बोलावून व त्यांचे कार्यक्रम आयोजित करून जनतेच्या मनातील पाकिस्तानविषयीचे शत्रुत्व सौम्य करणे . . . या व अशा अनेक मार्गांच्या माध्यमातून हे पाकिस्तान व इस्लामी दहशतवाद्यांना मदत करीत असतात.

या सर्वांच्या भूमिकेमुळे जनतेत एक प्रकारचा संभ्रम निर्माण होऊन वैचारिक गोंधळ होतो व त्यायोगे पाकिस्तानला मदत होते. भारतात देशांतर्गतच एकी नाही हा स्पष्ट संदेश जगाला दिला जातो. भारतात घडणार्‍या अनेक गोष्टी संशयास्पद असून त्यातील काही गोष्टींसाठी पाकिस्तान नसून भारतच जबाबदार आहे असे देशांतर्गत व जागतिक पातळीवर मत निर्माण होते. एकंदरीत भारताची भूमिका जागतिक पातळीवर बचावात्मक करण्याचे महान कार्य हे नग करीत असतात.

या ५ स्टेकहोल्डर्समधील सर्वात जास्त धोकादायक स्टेकहोल्डर्स निधर्मांध आहेत. बाहेरून उघड उघड हल्ला करणार्‍यांपेक्षा आतून वाळवीसारखे पोखरणारे छुपे शत्रू जास्त धोकादायक असतात.

यांच्यात काही राजकीय पक्षातील नेतेसुद्धा जबाबदार आहेत. उघड उघड चीनच्या तालावर नाचणारे डावे पक्ष, पाकिस्तानविषयी व अतिरेक्यांविषयी सहानुभूती असणारे खांग्रेससारखे तथाकथित निधर्मी पक्ष, पाकिस्तानमध्ये जाऊन मोदींना हटविण्याची मागणी करणारे मणीशंकर अय्यर व सलमान खुर्शीद सारखे नेते, डोकलाममध्ये चीन व भारताचे सैन्य एकमेकांसमोर युद्धाच्या पावित्र्यात उभे असताना गुपचूप चीनच्या राजदूताची भेट घेणारा पप्पू असे भारताला आतून पोखरणारे अनेक जण या देशात आहेत हे भारताचे दुर्दैव!

manguu@mail.com's picture

22 Apr 2018 - 7:11 pm | manguu@mail.com

यांच्यात काही राजकीय पक्षातील नेतेसुद्धा जबाबदार आहेत. उघड उघड चीनच्या तालावर नाचणारे डावे पक्ष, पाकिस्तानविषयी व अतिरेक्यांविषयी सहानुभूती असणारे खांग्रेससारखे तथाकथित निधर्मी पक्ष, पाकिस्तानमध्ये जाऊन मोदींना हटविण्याची मागणी करणारे मणीशंकर अय्यर व सलमान खुर्शीद सारखे नेते, डोकलाममध्ये चीन व भारताचे सैन्य एकमेकांसमोर युद्धाच्या पावित्र्यात उभे असताना गुपचूप चीनच्या राजदूताची भेट घेणारा पप्पू असे भारताला आतून पोखरणारे अनेक जण या देशात आहेत हे भारताचे दुर्दैव!

मिसळपावावरल्या छाटछुट राजकीय विश्लेषकनाही हे जर माहीत आहे तर मा श्री मोदीजी याबाबतीत अनभिज्ञ का आहेत ? ते ह्या सर्वाना 'आत' का टाकत नाहीत ?

( बायदि वे , त्या जे एन यु व यु पी मधल्या भारतविरोधी घोषणांच्या ध्वनीफितिंचे काय झाले ? देशद्रोह्याना अटक केली की नाही ? )

हेच्यावर कोनी निधरमान्धाने कायच बोल्ला नाय. हेच्यात कायच आच्चर्य नाय. ह्येनं इस्त्रीवर आजाबात अन्याव होत नाय आसं त्ये म्हंतात.

Police deployed in UP village fearing communal tensions after Muslim ‘pradhan’ rapes a minor girl

Kerala priest who spoke against child abuse arrested for raping minor girl

Man booked for raping ‘wife’ let off under Islamic law

ड्वॉळं उगडून पायलं तर प्येप्रात मदल्या आनि मागच्या पानावर ल्हान आक्षरात आश्या लै बातम्या आसत्यात. पन तेंच्यासाटी कोना निधरमान्धाला म्येन्बत्ती मोर्चा काडावा वाटत नाय का त्येच्या ड्वाळ्यात दोन आष्रूबी येत नाय बा !

जेम्स वांड's picture

22 Apr 2018 - 9:17 pm | जेम्स वांड

इथे तुम्ही मूळ कोण ते शोधण्यात बहुसंख्य लोकांना (काही सन्माननीय रिकामटेकडे अपवाद सोडता) रस नसावा. उगाच ओळख लपवायच्या नादात भाषेची अन लेखनाची आयमाय करणे बरे नव्हे.

ऑपरेशन स्मिअरच्या एजेंटसना असेच ओळख लपवून लिहावं लागतं.
पण उघडे पडतात बिचारे.

भारतीय सैनिकांना व पोलीसांना एकटे गाठून दगडांनी ठेचून मारले जात होते, त्याचे दु:खाश्रू न ढाळता पॅलेट गनचा वापर करुन दगडफेक्यांना बंदूकितील छर्र्यांमुळे इजा होत आहे, याचे अधिक दु:ख या मंडळींना झाले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Wakhra Swag | Official Video | Navv Inder feat. Badshah |

जेम्स वांड's picture

23 Apr 2018 - 11:55 am | जेम्स वांड

पण बोलणारा माणूस नक्की किती क्रेडीबिलिटीचा आहे त्यावर मणभर शंका आहेत, असो...!

पैसा's picture

22 Apr 2018 - 11:23 pm | पैसा

अशा बऱ्याच थेअरी येत असतात. पुरावे मिळणे फार कठीण असते. मात्र केंब्रिज अनालिटिका राहुल गांधींना मदत करत आहे अशी बातमी कानावर आली तेव्हा जरा भुवया उंचावल्या गेल्या. नंतर ठराविक काळाने प्रकरणे वर येताना बघून संशयाला जागा आहे असे वाटू लागले.

खरेच जर कोणी स्वार्थी लोक आपल्या फायद्यासाठी देशविघातक कारवाया करत असतील तर त्यांचे सत्य लोकांसमोर आले पाहिजे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या खऱ्या प्रश्नांकडे अशा विघातक कारवायांमुळे दुर्लक्ष होते. कोणी असे काही मुद्दाम करत असतील तर त्यांना जाणीवपूर्वक बनलेले देशद्रोही म्हणावे लागेल.

अर्थात नुसती थियरी मांडून लोकांना घाबरवणे हेही काही स्पृहणीय काम नव्हे. कोणी देशद्रोह करत असेल तर त्याचे पुरावे जमावायच्या कामाला थियरी मांडणाऱ्याने लागावे हे उत्तम.

श्रीरंग_जोशी's picture

23 Apr 2018 - 9:40 am | श्रीरंग_जोशी

वाह, तर्ककौशल्य दाद देण्यासारखे आहे. याच प्रकारचा तर्क तीन दशकांपूर्वी सुरू झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनाला लावल्यास या थेअरीतल्या उदाहरणांच्या तुलनेत बरीच मजबूत थेअरी बनेल :-) .

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2018 - 10:19 am | डॉ सुहास म्हात्रे

(अ)
१. अनेक दुर्दैवी घटना (भारतात आणि जगभरही) घडलेल्या असताना दोनच विशिष्ट घटना निवडून भारतभरच नव्हे तर परदेशात आकांडतांडव करणे.

आणि मुख्य म्हणजे...

२. त्या घटना घडल्या तेव्हा मेडियात काही खास प्रतिक्रिया नव्हत्या पण...

३. "त्यानंतर काही महिन्यांनी पंतप्रधानांच्या (नव्हे विशेषतः मोदींचा) परदेश दौर्‍याच्या काळातच मेडियाला जाग येणे" आणि "केवळ दौरा असलेल्या दोन देशांतच एकाएकी ५-५० लोकांनी निदर्शने करणे आणि ठराविक मेडियाने (त्या लोकांपेक्षा अनेक पटींने मोदींच्या स्वागताला आलेल्या लोकसंखेकडे दुर्लक्ष करून) त्या देशांत भारतातील घटनेविरुद्ध प्रक्षोभ उसळला आहे, अश्या प्रकारे जाहिरातवजा प्रसिद्धी करणे"

४. सद्य पंतप्रधान आणि सरकार यांच्याविरुद्ध माध्यमांत सतत लिहित रहावे यासाठी अनेक वार्ताहर, लेखक इत्यादींना काँग्रेसने नियमित पगारावर ठेवल्याचे अगोदरच उघड झाले आहे...
https://postcard.news/68-journalists-writers-and-bureaucrats-given-2-5-l...

आणि विशेषतः...

५. दौरा संपल्यावर लगेच दुसर्‍या दिवसापासून, जणु काय सगळ्या समस्यांचे निवारण झाले अश्या प्रकारे, मेडियात सामसूम झाली आहे.
पंतप्रधानांचा पुढचा दौरा चीनचा आहे आणि "त्या देशात निदर्शने करणे कठीण आहे (तेथे हुकुमशाही आहे असे म्हणून कोण बरे त्या प्रिय देशाला बदनाम करू पाहतेय?)" आणि "त्यातही निदर्शने करण्याचा प्रयत्न केल्यास काय होईल ते पूर्णपणे माहीत आहेच (तेथे हुकुमशाही आहे असे म्हणून कोण बरे त्या प्रिय देशाला बदनाम करू पाहतेय?)... आता यात मेडियाची आणि भारतिय राजकारण्यांची काय चूक आहे बरे ! =)) =)) =))

असे असले तरी, "हा सगळा प्रकार कटकारस्थान असल्याचा संशय नक्कीच निर्माण करते आहे", असे म्हणून सोज्वळ माध्यमांवर आणि उदात्त विचारवंतांवर उगा आळ घेऊ नये !

(आ)

आता सद्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांवर महाअभियोग चालवावा या नाटकाचा प्रयोग चालू आहे... नेहमीच्याच यशस्वी कलाकारांसमवेत !

(१) महाअभियोगासाठी दिलेले मुद्दे (आरोप) केवळ ओढूनताणून बनवलेले किंवा केवळ अनुमानात्मक आरोप (far fetched and speculative allegations) आहेत आणि त्यासाठी (सबळ तर सोडाच) कोणतेही पुरावे दिलेले नाहीत... "आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असल्यावर पुराव्यांची गरज ती काय?" :)

(२) ही कृती चुकीची आणि अनैतिकसम/अर्ध-अनैतिक (quasi-immoral) असल्याचे खुद्द काँग्रेसच्या अनेक उच्च न्यायालयात वरीष्ठ वकील असलेल्या संसद सदस्यांनी टीव्हीच्या राष्टीय वाहिन्यांवर स्पष्टपणे सांगितले आहे आणि महाअभियोगाच्या अर्जावर सह्या करण्यास नकार दिला आहे.

(३) त्या मुद्द्यांवरून बरखास्ती होणार नाही, हे न समजण्याइतके काँग्रेसमधील जानेमाने वकील अज्ञ नक्कीच नाहीत. तेव्हा त्या अर्जाला उपराष्ट्रपतीच केराची टोपली दाखवतील असे दिसते. असे केल्यास, "बघा, बघा, भाजपचे सरकार कसे हिटलरशाही करते आहे. लोकशाही खतरेमे आ गयी" असा गदारोळ करण्याचे सर्व व्यवस्थापन अगोदरच झालेले नसले तरच आश्चर्य असेल !

(४) वादासाठी, जर कारवाई लोक/राज्यसभेपर्यंत पोचली, तर बरखास्तीचा प्रस्ताव पास करून घ्यायला अर्जाच्या बाजूने लाज राखली जावी इतपतही मते नाहीत ! इतकेच काय त्या सर्व पक्षांचे सर्व उमेदवार प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार नाहीत (कारण अनेक सभासदांनी माध्यमांत प्रस्तावाच्या विरुद्ध मत नोंदवले आहे तर अनेक विरोधी पक्षांनी त्या प्रक्रियेतून अंग काढून घेतले आहे). तेव्हा, अर्जदार तो अर्ज उपराष्ट्रपतींनी अमान्य करावा व आपली लाज वाचावी आणि त्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे गोंधळ घालता यावा अशी आशा धरून बसलेले असतील. :) आता हा चक्रव्यूह भेदायला उपराष्ट्रपती कोणती रणनीति वापरतात हे पाहणे रोचक असेल ! :)

(५) सह्यांसह अर्ज खूप दिवस आधीपासूनच तयार होता... किंबहुना, तो दाखल करेपर्यंत मधल्या काळात त्यावर सह्या असलेल्या काही सभासदांचा कार्यकालही संपला... असे असताना जस्टिस लोया केसचा निर्णय विरुद्ध गेल्यावर तो अर्ज दाखल करण्यात आला. यावरून, जस्टिस लोया केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी उच्च न्यायालयावर (मुख्यतः मुख्य न्यायाधिशांवर) दबाव टाकायच्या उद्येशाने तो अर्ज प्रथम तयार केला आणि आता निकाल विरुद्ध गेल्याने चिडून मुख्य न्यायाधिश व उच्च न्यायालयाच्या प्रतिमेवर शिंतोडे उडविणे चालू आहे, हे स्पष्ट होत आहे.

लोकशाही किंवा गैरलोकशाही मार्गांनी जनतेला उसकवण्यात अपयश येत आहे आणि निवडणूकांत तर सतत पिछेहाट होत आहे. यामुळे, विरोधी पक्ष काकुळतीला आले आहेत आणि "स्वतःचे तेच खरे" अश्या बालहट्टासाठी ते कोणत्याही लोकशाही/वैधानिक संस्थेवर/व्यवस्थेवर दबाव आणण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत... मग तसे करताना भारताची परदेशात नाचक्की करायला लागली किंवा भारतिय संवैधानिक संस्थांना सुरुंग लावायला लागला तरी बेहत्तर... हे परत एकदा सूचीत झाले आहे. परत हे सगळे करताना लोकशाहीला वाचवण्याचा आव आणणे हे कसब तर केवळ असामान्य आहे ! :(

जेम्स वांड's picture

23 Apr 2018 - 12:02 pm | जेम्स वांड

सोळा आणे सच खणखणीत अन तार्किक स्वरूपात मांडल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन अन कौतुक वाटतं.

पोस्टकार्ड न्यूज वरून आठवलं हल्लीच अटक झालेला त्यांचा संपादक महेश विक्रम हेगडे ह्याचं पुढे काय झालं, माननीय कोर्टाने त्या केस मध्ये काही निर्वाळा दिलाय का? केस प्रोसिडींग कुठवर आले काही कल्पना आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2018 - 12:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरुवात बरी वाटावी अशी करून लगेच व्हॉटअबाऊटरीवर आलात आणि... =)) =)) =))

प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या सत्यावर/वजनावर तोलणे जास्त समतोल असते. "एक चूक म्हणजे दुसरेही चूकच असायला पाहिजे" किंवा "एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होते" ही दोन्हीही वचने असमतोल म्हणून चूक आहेत. :)

अटक काय मोठ्ठ्या समजल्या जाणार्‍या लोकांनाही होणे शक्य असते आणि मजबूत पुरावे असुनही बेलवर बाहेर येऊन उजळ माथ्याने दुसर्‍यांना दोष देत हिंडत असतात आणि पक्षाचे सर्वोच्च पदावर निवडून पण येऊ शकतात... त्यामानाने एकाद्या संस्थळाचा मालक/संपादक किस झाडकी पत्ती. :)

जेम्स वांड's picture

23 Apr 2018 - 1:05 pm | जेम्स वांड

घाऊक गैरसमज करून घेतलेला दिसतोय आपण.
१. पोस्टकार्ड बद्दल हल्लीच वाचनात आले होते म्हणून लिहिले
२. रेफरन्स सोर्स चुकीचा असला तर तुमच्याच उत्तम प्रतिपादनाला कमीपणा येईल ही भीती होती.

अर्थात तुम्हाला ते व्हॉटअबाउटरी वाटली हे आमचं दुर्दैव. :(

तरीही गैरसमज नसावा. इतकी विनंती मात्र करू शकतो.

सुबोध खरे's picture

23 Apr 2018 - 1:51 pm | सुबोध खरे

http://indianexpress.com/article/india/a-horribly-black-day-fali-nariman...

http://www.newindianexpress.com/nation/2018/mar/28/impeachment-motion-ag...

श्री सोली सोराबजी आणि श्री फली नरिमन हे अतिशय मान्यवर आणि अत्यंत वरिष्ठ विधीतज्ञ(eminent jurist) मानले जातात.
यांनी पण या महाभियोगावर टीका केली आहे.

नॅशनल हेराल्ड केस पासून कर्टी चिदंबरम यांच्यावर असलेली भ्रष्टाचाराची केस ,
श्री डी राजा यांच्या मुलिवर(अपराजिता) असलेली जे एन यु मधील केस
http://www.dailymotion.com/video/x5jo15m

बाबरी मशीद केस पर्यंत सगळ्या केसेस २०१९

निवडणुकीच्या अगोदर

बोर्डावर येऊ नयेत यासाठी काँग्रेस आणि इतर विरोधक जंग जंग पछाडत आहे

त्यासाठी त्यांनी चार न्यायाधीशांना फूस लावली हि गोष्ट न्या चलमेश्वर याना डी राजा हे पत्रकार परिषद झाल्या झाल्याच भेटले तेंव्हाच उघड झाली होती.

परंतु सरन्यायाधिशानी त्यांना अजिबात भीक घातली नाही.

म्हणून आता हा महाभियोगाचे नाटक चालू केले आहे. या महाभियोगाच्या अर्जावर सलमान खुर्शीद ( हे सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत) आणि डॉ मनमोहन सिंह यांनी सह्या करण्यास नकार दिला आहे.

महाभियोग होऊन न्या. मिश्रा याना निवृत्त केले जाण्याची शक्यता शून्य टक्के असतानाही महाभियोग चालू असेपर्यंत सरन्यायाधिशानी खटले ऐकू नयेत म्हणून काँग्रेसने आता धोशा लावला आहे. हलकट पणाची किती खालची पातळी गाठू शकतात याचा नवनवीन विक्रम करणे चालू आहे.

https://www.hindustantimes.com/india-news/cji-misra-should-consider-recu....

http://www.business-standard.com/article/current-affairs/cji-impeachment...

कारण सरन्यायाधीश ऑकटोबर मध्ये निवृत्त होतील त्यानंतर सेवाज्यष्ठतेप्रमाणे सरन्यायाधीश होणारे जस्टीस रंजन गोगोई यांचे तीर्थरूप श्री केशबचंद्र गोगोई काँग्रेसच्या सरकारात आसामचे मुख्यमंत्री होते.

जब सैया है कोतवाल तो डर काहे का?

जेम्स वांड's picture

23 Apr 2018 - 2:24 pm | जेम्स वांड

आज सकाळी तर रिपब्लिकवर उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू ह्यांनी महाभियोग प्रस्ताव दाखलच करून घेतला नाहीये अन त्याच्यावरून (प्रस्तावावरूनच) काँग्रेसची कडक शब्दात निंदा केलीये असे काहीसे ऐकले होते, न्यायमूर्ती आर एस सोढी ह्यांनी प्रशांतभूषण ह्यांच्यावर पूर्ण दोष ठेऊन प्रशांतभूषण कसे चुकलेत हे साधार सप्रमाण सांगितले होते सकाळीच. बहुतेक काँग्रेसकडे प्रस्तावास पुरेसे प्रस्तावकच नाहीयेत अशीही गोची कानावर येत होती. चूक भूल देने घेणे.

जेम्स वांड's picture

23 Apr 2018 - 2:25 pm | जेम्स वांड

आज सकाळी तर रिपब्लिकवर उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू ह्यांनी महाभियोग प्रस्ताव दाखलच करून घेतला नाहीये अन त्याच्यावरून (प्रस्तावावरूनच) काँग्रेसची कडक शब्दात निंदा केलीये असे काहीसे ऐकले होते, न्यायमूर्ती आर एस सोढी ह्यांनी प्रशांतभूषण ह्यांच्यावर पूर्ण दोष ठेऊन प्रशांतभूषण कसे चुकलेत हे साधार सप्रमाण सांगितले होते सकाळीच. बहुतेक काँग्रेसकडे प्रस्तावास पुरेसे प्रस्तावकच नाहीयेत अशीही गोची कानावर येत होती. चूक भूल देने घेणे.

मार्मिक गोडसे's picture

23 Apr 2018 - 2:02 pm | मार्मिक गोडसे

सेवाज्यष्ठतेप्रमाणे सरन्यायाधीश होणारे क रंजन गोगोई यांचे तीर्थरूप श्री केशबचंद्र गोगोई काँग्रेसच्या सरकारात आसामचे मुख्यमंत्री होते.
त्याने काय फरक पडतोय?

सुबोध खरे's picture

23 Apr 2018 - 2:07 pm | सुबोध खरे

गोडसे साहेब
कोणती केस बोर्डावर (सुनावणीसाठी) घ्यायची आणि कोणती नाही याचे डकवर्थ लुईस फॉर्म्युला असतात.
आणि हे सर्वोच्च न्यायालयातहि चालते
(याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.)

मार्मिक गोडसे's picture

23 Apr 2018 - 2:17 pm | मार्मिक गोडसे

म्हणजे आम्ही समजतो तितकं आलबेल नसतं तिकडेही.

सुबोध खरे's picture

23 Apr 2018 - 6:31 pm | सुबोध खरे

तेच सांगतोय.

उगाच वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून किंवा पिचक्या टाकणाऱ्या लोकांचे लेख वाचून मतं बनवू नका.

सर्वोच्च न्यायालयात सुद्धा केवळ गुणवत्ता हा निकष नसून जात धर्म लिंग या सर्वांचे प्रतिनिधित्व असावे म्हणून बऱ्याच वेळेस न्यायाधीश निवडले जातात.

पत्रकार परिषद घेणाऱ्या चार न्यायाधिशांपैकी न्या कुरियन जोसेफ याना "ख्रिश्चन प्रतिनिधित्व" असावे म्हणून उच्च/सर्वोच्च न्यायालयावर निवडले गेले असे माझ्या वाचनात आले होते. दुवा मिळालं कि जरूर देईन.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/for-last-six-yea...

नशीब अजून तरी खेळ किंवा लष्करातही जात धर्म लिंग या निकषावर खेळाडू किंवा लष्करी अधिकारी निवडले जात नाहीत.

जेम्स वांड's picture

23 Apr 2018 - 6:50 pm | जेम्स वांड

महाभियोग होणारच नाहीये न? का होणारे? काही कळायला मार्ग नाही, काहीतरी सुस्पष्ट सांगा की डॉक्टर साहेब. पारच बेंबटू होतोय जीवाचा

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 9:39 am | सुबोध खरे

महाभियोगाच्या नाटकाला उपराष्ट्रपती श्री वेंकय्या नायडू यांनी नकार घंटा वाजवली. त्यामुळे कपिल सिब्बल रणदीप सुरजेवाला सारख्या काँग्रेसी लोकांचा थयथयाट चालू आहे

जेम्स वांड's picture

24 Apr 2018 - 2:58 pm | जेम्स वांड

म्हणजेच महाभियोग होणार नाहीये हे तर निश्चित आहे न?

सुबोध खरे's picture

23 Apr 2018 - 6:36 pm | सुबोध खरे

हा एक दुवा मुद्दाम वाचून पहा.

http://www.thehindu.com/opinion/op-ed/judges-castes-and-social-justice/a...

मार्मिक गोडसे's picture

24 Apr 2018 - 2:27 pm | मार्मिक गोडसे

माझ्या गूगल बाबाला गालीच्या खाली लपवलेले मागील चार वर्षांतील पेट्रोल व डिझेल चे दर सापडत नाहीयेत. काय बरं करावं? कोणाला सांगावं?

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2018 - 2:58 pm | श्रीगुरुजी

पोकळ बांबू गालिच्याचा खाली घालून गालिचा वर उचला. लपविलेले दर दिसू लागतील.

मार्मिक गोडसे's picture

24 Apr 2018 - 3:02 pm | मार्मिक गोडसे

अच्छा म्हणजे गालिच्याखाली लपवलंय हे खरं आहे तर?

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2018 - 3:26 pm | श्रीगुरुजी

गालिच्याखाली लपवलेत असा तुमचा समज आहे. म्हणूनच म्हटलं की पोकळ बांबू गालिच्याच्या खाली घालून गालिचा उचलून बघा. नाहीतरी त्या बांबूचा काय उपयोग आहे?

अभ्या..'s picture

24 Apr 2018 - 4:06 pm | अभ्या..

काय हे गोडसे गुरुजी?
जाऊ देत जावा ना. कुणीतरी एकाने माघार घ्यावी. उगी शब्दाला शब्द, प्रतिसादाला प्रतिसाद. साध्य काय तर काही नाही.
मान्य आहे तुम्ही दोघे कट्टर आहात, एकमेकाची मते पटणार नाहीत तुम्हाला पण प्रत्येक धाग्यात तीच पोकळ साठमारी करण्यापेक्षा एकतर दुर्लक्ष करा किंवा पाडून टाका कंडका.

मार्मिक गोडसे's picture

24 Apr 2018 - 7:26 pm | मार्मिक गोडसे

काय हे गोडसे गुरुजी?
जाऊ देत जावा ना. कुणीतरी एकाने माघार घ्यावी

मी सर्वसाधारण प्रश्न विचारला होता, परंतू गुरुजीच ट्रोल करत आहेत. इतर धाग्यावरही गुरुजी आणि जोशी वस्तरे आणि बांबूचा उल्लेख करून व माझे नाव घेऊन ट्रोल करत आहेत. मी तेथेही दुर्लक्षच केलं आहे.

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2018 - 8:24 pm | श्रीगुरुजी

मूळ प्रश्न खोडसाळ व ट्रोल करणारा होता. त्यावर तसेच उत्तर येणार.

इतर धाग्यावरही गुरुजी आणि जोशी वस्तरे आणि बांबूचा उल्लेख करून व माझे नाव घेऊन ट्रोल करत आहेत.

कृपया माझ्यावर असा आरोप करू नकात. नोटबंदी फेल गेली आहे अशा स्वतःच काढलेल्या बालिश निर्णयातून जगत्प्रिय अशा भारतीय पंतप्रधानांना आपण ज्या बोळात राहता त्या बोळातल्या चौकात थांबून पोकळ बांबूच्या फोकाने त्यांच्या पार्श्वभागावर वार करण्याची आपली महत्त्वाकांक्षा अनोखी आहे. यात ट्रोलींग काय आहे? आपला आयडी जितक्यांदा डोळ्यासमोर येतो तितक्यांदा माझ्या डोळ्यासमोर एक चित्र निर्माण होतं. इतकी चित्रदर्शी आणि परिणामकारक विधानं मी मिपावर पाहिलेलीच नाहीत.
===============
शिवाय पाकिस्तानी मराठी लोक देखील असतातच.

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 4:06 pm | मार्मिक गोडसे

माझे एका धाग्यावरचे वाक्य तुम्ही प्रत्येक ठिकाणी न विसरता ओढून ताडून आणत असाल तर त्याला ट्रोल नाही तर काय म्हणायचे?
शिवाय पाकिस्तानी मराठी लोक देखील असतातच.
हां, मग?

तुम्ही असं करा, तुम्ही ते विधान मागं घ्या. (ते जोपर्यंत व्हॅलिड आहे तोपर्यंत ते कितीदाही साइट करता येईल.)

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 4:49 pm | मार्मिक गोडसे

माफ करा जोशिसाहेब, तुम्ही जरा जास्तच बोलत आहात. तुमचा वस्तरा तुमच्यासाठीच वापरा.

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 6:06 pm | सुबोध खरे

http://www.mycarhelpline.com/index.php?option=com_latestnews&view=detail...

Month Petrol / Litre Diesel / Litre Difference / Litre
Apr-06 Rs 43.5 Rs 30.45 Rs 13.05
Apr-07 Rs 43 Rs 30.25 Rs 12.75
Apr-08 Rs 45.5 Rs 31.76 Rs 13.74
Apr-09 Rs 44.7 Rs 30.86 Rs 13.84
Apr-10 Rs 48 Rs 38.1 Rs 9.9
Apr-11 Rs 58.5 Rs 37.75 Rs 20.75
Apr-12 Rs 65.6 Rs 40.91 Rs 24.69
Apr-13 Rs 66.09 Rs 48.63 Rs 17.46
Apr-14 Rs 72.26 Rs 55.48 Rs 16.78
Apr-15 Rs 60.49 Rs 49.71 Rs 10.78
Apr-16 Rs 59.68 Rs 48.33 Rs 11.35
Jul-16 Rs 62.51 Rs 54.28 Rs 8.23

मार्मिक गोडसे's picture

24 Apr 2018 - 7:17 pm | मार्मिक गोडसे

हे दर जुलै १६ पर्यंतचे आहेत, मी फक्त मागील चार वर्षांचे म्हणतोय. त्यात १७ -१८ ही येतं. ते गालीच्या खाली का?

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 8:25 pm | सुबोध खरे

https://tradingeconomics.com/india/gasoline-prices

थोडंसं खणलं कि लगेच मिळतंय कि
या दुव्यावर मागच्या ५ वर्षाच्या किमतीवर टिचकी द्या आलेखासकट मिळेल कि.
उगाच चिडचिडल्यासारखं का करताय?

https://www.news18.com/news/business/petrol-price-hike-from-rs-8-to-rs-5...

हे हि वाचून घ्या

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2018 - 8:30 pm | श्रीगुरुजी

ट्रोलिंग सुरू आहे हो. म्हणून तर गालिचा आलाय.

मार्मिक गोडसे's picture

24 Apr 2018 - 10:34 pm | मार्मिक गोडसे

पहिल्या दुव्यात दर डॉलर मध्ये आहेत, दुसऱ्या दुव्यात २०११ पर्यंतचे दर आहेत. १७-१८ गायब.

सुबोध खरे's picture

25 Apr 2018 - 9:38 am | सुबोध खरे

तुम्ही शोधा कि
सगळं चमच्याने भरवायला हवं आहे का?

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 4:17 pm | मार्मिक गोडसे

तुम्ही शोधा कि
सगळं चमच्याने भरवायला हवं आहे का

तुम्ही स्वतःहून ताट चमच्या घेवून पुढे आले व ताट रिकामे दिसले, म्हणून चिडून खा मेल्या , माझ्याकडे वेळ नाही असं म्हणून सटकलात.

तुमचा डाउट काय आहे साहेब?

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 6:06 pm | सुबोध खरे

http://www.mycarhelpline.com/index.php?option=com_latestnews&view=detail...

Month Petrol / Litre Diesel / Litre Difference / Litre
Apr-06 Rs 43.5 Rs 30.45 Rs 13.05
Apr-07 Rs 43 Rs 30.25 Rs 12.75
Apr-08 Rs 45.5 Rs 31.76 Rs 13.74
Apr-09 Rs 44.7 Rs 30.86 Rs 13.84
Apr-10 Rs 48 Rs 38.1 Rs 9.9
Apr-11 Rs 58.5 Rs 37.75 Rs 20.75
Apr-12 Rs 65.6 Rs 40.91 Rs 24.69
Apr-13 Rs 66.09 Rs 48.63 Rs 17.46
Apr-14 Rs 72.26 Rs 55.48 Rs 16.78
Apr-15 Rs 60.49 Rs 49.71 Rs 10.78
Apr-16 Rs 59.68 Rs 48.33 Rs 11.35
Jul-16 Rs 62.51 Rs 54.28 Rs 8.23

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 6:07 pm | सुबोध खरे

या किमती दिल्लीतील आहेत
महाराष्ट्रात अधिक करांमुळे किमती अजून जास्त आहेत.

manguu@mail.com's picture

24 Apr 2018 - 6:48 pm | manguu@mail.com

आणि क्रुड ऑईलच्या किमतीचं काय करायचं ओ ?

विशुमित's picture

24 Apr 2018 - 11:26 pm | विशुमित

ते गालिच्या च्या खाली 10 फुट खड्डा खाणून ठेवले आहेत.

manguu@mail.com's picture

25 Apr 2018 - 9:23 am | manguu@mail.com

ओला ड्रायव्हर मुस्लिम होता म्हणून ओला नाकारून ते व्हाट्सप फेसबुकवर मिरवणार्या भाजप्याना क्रुड ऑइल मुसलमान पुरवतात , हे भयानक टोचत असेल , म्हणून रेट झाकले असतील.

सुबोध खरे's picture

25 Apr 2018 - 9:42 am | सुबोध खरे

ते क्रूड ऑइल इंग्लंड अमेरिकेने "काढायचे कसे" ते दाखवले
नाही तर अरब लोक उंटावर बसून खजूर खात फिरतच होते वाळवंटात.
तरी नशीब हे हलाल नाही म्हणून उगाच तेल विहिरीवर वाळू टाकून बुजवली नाही.
साधा टेलिफोन बसवायचा होता सौदीत तर म्हणे तारेवर सैतानाचा अंमल आहे.
एका हुशार अमेरिकन माणसाने सांगितले कि इकडे कुराणातील आयते म्हणा तिकडे ऐकू अली तर सैतान नाही हे सिद्ध होईल.
तसे झाल्यावर हे मुल्ला मौलवींनी टेलिफोन बसवायला परवानगी दिली.
दळभद्री कुठचे.

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 9:52 am | मार्मिक गोडसे

आपल्याकडेही काही वेगळी परिस्थिती नव्हती, आगीच्या इंजिनला लोकं घाबरायची, इंग्रज नसते आले तर आजही बैलगाडी आपले वाहन असते.

सुबोध खरे's picture

25 Apr 2018 - 9:54 am | सुबोध खरे

हो पण घाबरणारी लोक सत्ताधीश नव्हती किंवा भारत हे धर्माधिष्ठित राज्य हि नव्हते

सुबोध खरे's picture

25 Apr 2018 - 9:57 am | सुबोध खरे

बाकी सौदी अरेबिया हा भारताच्या अगोदर स्वतंत्र झालेला देश आहे. पण तंत्रज्ञान शिक्षण विचारसरणी इ बाबतीत मध्य युगातच आहे. तेलामुळे आलेला केवळ अमाप पैसा आहे.

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 10:00 am | मार्मिक गोडसे

तुम्ही काहीही म्हणा परंतु आधुनिक तंत्रज्ञान त्यांनीच आणले ना?

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2018 - 10:05 am | श्रीगुरुजी

LLRC

सुबोध खरे's picture

25 Apr 2018 - 10:13 am | सुबोध खरे

आधुनिक तंत्रज्ञान आणले आणि देश लुटून गाढवाचा नांगर फिरवला.

आणि तुम्ही नांगर फुकट मिळाला म्हणून खुश होताय

धन्य आहे

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 9:46 am | मार्मिक गोडसे

कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही.

सुबोध खरे's picture

25 Apr 2018 - 9:50 am | सुबोध खरे

काय सांगताय?

सूर्य रोज उगवतो

कोंबडं नसलं तरी चालतंय.

तेलाचं तसं नाहीये बघा.

जगात अनेक देशांकडे तेल आहे पण ते काढायचं तंत्रज्ञान नाहीये.

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 9:56 am | मार्मिक गोडसे

इंधन दर लपवण्याच्या संदर्भात ती म्हण वापरली होती.

सुबोध खरे's picture

25 Apr 2018 - 10:10 am | सुबोध खरे

लपवायची गरज काय?
तुम्हाला सापडत नाही म्हणून लगेच लपवायचा आरोप?

क्रूडची किंमत वाढली म्हणून पेट्रोल डिझेलची किंमत वाढली. UPA सरकारला पेट्रोलियम नियंत्रण मुक्त करायचं होतं. तेंव्हा क्रूडचे भाव अस्मानाला भिडलेले होते.

त्यामुळे सबसिडी काढून घेऊन "राजकीय आत्महत्या" त्यांनी केली नाही.

मोदि सरकार सत्तेवर आले तेंव्हा त्यांच्या नशिबाने क्रूडची किंमत ५० डॉलर पेक्षा खाली आली होती.

मोदी सरकारने पेट्रोल च्या किमती तितक्या खाली न उतरवता पेट्रोलियम पदार्थांवर अबकारी कर वाढवून त्या पैशातून आपले राखीव साठे भरून घेतले. (आता आपल्याकडे ९० दिवस पुरतील इतके राखीव साठे उपलब्ध आहेत)शिवाय पेट्रोल आणि डिझेल नियंत्रण मुक्त केले. यामुळे आता क्रूडचे भाव वाढले तर पेट्रोल डिझेलचे भाव वाढणारच.

यात UPA सरकारची फारशी चूक होती असेही मी मानत नाही फार तर ती राजकीय अपरिहार्यता (POLITICAL COMPULSION) म्हणता येईल.
(निवडणूक वर्षात भाववाढ करणे हे परवडणारे नाही)

आणि मोदी सरकार सत्तेवर आल्यावर सवंग लोकप्रियतेसाठी त्यांनी पेट्रोलचे भाव खूप खाली आणले नाहीत हि गोष्ट नक्कीच चांगली आहे.

कारण आपल्या लोकांना कोणतीही गोष्ट अवाजवी कमी किमतीत मिळाली कि तो हक्कच वाटायला लागतो. स्वस्त ते सकस आणि फुकट ते पौष्टिक हि आपली विचार सरणी आहे.

लोक पेट्रोलच्या भावात आपल्या राजकीय विचारसरणी प्रमाणे काळं आणि पांढरं शोधत असतात.

सुबोध खरे's picture

25 Apr 2018 - 10:16 am | सुबोध खरे

https://blogs.timesofindia.indiatimes.com/Swaminomics/modi-must-resist-u...

हे लेख मुळापासून वाचून पहा. तुमच्या मनातील पेट्रोल किमतीची पक्षीय दृष्टीकोनाची जळमटे साफ होतील

सुबोध खरे's picture

25 Apr 2018 - 10:23 am | सुबोध खरे

हे स्वामिनाथन अय्यर मणिशंकर अय्यर यांचे सक्खे भाऊच आहेत.

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 10:46 am | मार्मिक गोडसे

तुम्हाला सापडत नाही म्हणून लगेच लपवायचा आरोप?
ह्यापूर्वी लगेच सापडायचे, आता सहज सापडत नाही म्हणून शंका आली. परंतू सरकार इंधन दर आणि वित्तीय तुटीच्या कैचीत अडकलेले आहे .
भाववाढीवर मी अजून भाष्यच केलं नाही. कर नाही त्याला डर नाही सरकारने घाबरु नये.

सुबोध खरे's picture

25 Apr 2018 - 10:50 am | सुबोध खरे

भाववाढीवर मी अजून भाष्यच केलं नाही. कर नाही त्याला डर नाही सरकारने घाबरु नये.

सरकार ने कुणाला घाबरायचे?

तुम्हाला

ह ह पु वा

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2018 - 10:04 am | श्रीगुरुजी

हिंदूद्वेषाची पिचकारी टाकण्याआधी हे वाचलं असतं तर पिचकारी टाकायची हिंमत झाली नसता. हनुमानाचे चित्र होते म्हणून मी उबेरची गाडी नाकारली हे अभिमानाने सांगणा-या महिलेला प्रत्त्युत्तर म्हणून ती प्रतिक्रिया आली होती व ती योग्य होती.

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 10:16 am | बिटाकाका

मंगू "हे" वर क्लिक करून पाहतील का? पाहिलं तरी प्रतिक्रिया देतील का?

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 10:17 am | मार्मिक गोडसे

हो ना, ओला किंवा उबरच्या चालकाचे नाव 'विकास' असेल तर ग्राहक ती गाडी कॅन्सल करतात म्हणे. तो येऊच शकणार नाही ह्याची खात्री असते त्यांना.

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 11:13 am | बिटाकाका

तसं काही नाही हो! अशा पद्धतीने कॅन्सल करणारे गाडी येऊ देतात, त्याच्या काचेवर कमळाचे चित्र असेल तर "हा विकास असूच शकत नाही म्हणून कॅन्सल करतात" आणि पंजा असेल तर तो विकास असू नाय तर नसू घ्या बसून, पंजा हाय ना गरिबा के साथ" म्हणतात . लैच मज्जा हाय बगा!

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 11:24 am | मार्मिक गोडसे

म्हणजे लोकांचा विश्वास संपादन करण्यात सरकार कमी पडतंय की लोकं फसत नाही म्हणायचं.

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 11:36 am | बिटाकाका

भाजप सरकार कधीच काँग्रेसच्या लोकांचा/काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या लोकांचा विश्वास संपादन करू शकत नाही. कॉन्व्हर्स इज आल्सो ट्रू!

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 12:45 pm | मार्मिक गोडसे

डाव्यांचा? लाल बावटा.

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 12:55 pm | बिटाकाका

अवघड आहे!

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 12:59 pm | मार्मिक गोडसे

का ? अवघड आहे? भारतात फक्त कमळ आणि पंजाच आहे का?

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 1:39 pm | बिटाकाका

मुद्दा समजावणं अवघड आहे असं म्हणालो.
असं वाचा म्हणजे मुद्दा समजेल.
"अ" सरकार कधीच "ब"च्या लोकांचा/"ब"ला पाठिंबा देणाऱ्या लोकांचा विश्वास संपादन करू शकत नाही. कॉन्व्हर्स इज आल्सो ट्रू!

अभ्या..'s picture

25 Apr 2018 - 10:48 am | अभ्या..

लैच भारी दिसतंय राव ते हनुमानाचे चित्र. खतरनाक दिसतेय रिअर विंडो.
आपली गाडी आली की हेच करायचे चित्र.
जय हनुमान.