हरवलेला डबा
फार नाही ३० वर्षा पूर्वीची गोष्ट असेल. मला माझ्या वस्तू हरवायची खुप सवय होती. आणि तेंव्हा माझ्या कड़े हरवणया सारख्या वस्तूही खुप होत्या. कधी पेन्सीळ, कधी कंपास तर कधी फक्त वही. पण त्यातल्या त्यात माझी आवडीची हरवायची वस्तू होती ती म्हणजे माझा खाऊचा डब्बा. हा मी एक दिवसा आड़ हरवायचोच. सुरुवातीला वेन्धळ ट पणा ने डबा हरवणारा मी नंतर नंतर सवयीने डबा हरवायला लागलो. माझ्या सोयीसकर डबा हरवणयालाही एक कारण होत. ते अस की माझा हरवलेला डबा शोधणयाच्या निमित्ताने माझी आई मला शाळेत सोडायला यायची आणि मग "हरवलेल्या वस्तूच्या " खोलीत आम्ही दोघ मिळून माझा डबा शोधायचो.तितका वेळ मला आईचा आणिक सहवास लाभायचा आणि खुप भारी वाटायच. परत दोस्त लोकात "आज माझी आई मला सोडायला आली होती" म्हणून मी भाव खायचा तो वेगळाच. हरवलेल्या वस्तूनच्या खोलीचा सर्वो सर्वा शिवगण शिपाई सुद्धा हे नेहेमीचच गिरहाईक आहे म्हणून आमच्या कड़े काणा डोळ करायचा. सांगायचं आस की हरवलेला डबा शोधण हे केवळ एक निमित्त होत. महत्वाचे होत ते आई मुलाचा अधिकचा सहवास. माझा हा कावा आईला नक्कीच कळला असणार पण तिला कळल आहे है तीनी मला कधी कळू दिल नाही.माझ्या बरोबर तीही हा खेळ आवडीने खेळत असावी. पुढे थोड़ा मोठा झाल्यावर डबे हरवेनासे झाले खेळ रंगेनासा झाला. अगदी परवा परवा पर्यन्त हा खेळ मी विसरुन सुद्धा गेलो होतो. तोच काल माझी पहिलीतली मुलगी येऊन मला सांगायला लागली पप्पूली आज माझा डबा हरवला
आणि खर सांगायचं तर तेंव्हा मला माझा शाळेत हरवलेला डबा काल पुन्हा एकदा सापडला.
प्रतिक्रिया
17 Apr 2018 - 2:38 pm | अंतरा आनंद
छान. अजून खुलवायची होतीत आठवण.
17 Apr 2018 - 2:48 pm | एस
:-) गोड!
17 Apr 2018 - 4:13 pm | श्वेता२४
थोडक्यात पण थेट काळजाला भिडला लेख
17 Apr 2018 - 5:56 pm | प्राची अश्विनी
+११
17 Apr 2018 - 4:37 pm | पैसा
खूप छान!
17 Apr 2018 - 6:06 pm | जेम्स वांड
आपली छटा पोरांत दिसते तो क्षणच भारी एकदम.
17 Apr 2018 - 6:38 pm | सिरुसेरि
+१ छान
17 Apr 2018 - 8:10 pm | अमरेंद्र बाहुबली
वा. चांगलय. मी डबा हरवला तर आई दोन धपाटे द्यायची.
17 Apr 2018 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
हृद्य मनोगत ! शेवट काळजाला भिडला.
18 Apr 2018 - 1:47 am | रुपी
खूप छान :)
18 Apr 2018 - 4:09 am | चित्रगुप्त
गोड.
18 Apr 2018 - 6:14 am | कंजूस
छान!