प्रथमच तानुली आज आजा,आजीला सोडून सियरा मौन्टनवर बर्फ़ावरची मौजमजा करायला गेली होती.आजा,आजी तिच्याबरोबर येणार नाहीत म्हणून ती खूप उदास झाली होती.
"तुम्हाला थंडीचा त्रास होत असेल तर डबल डबल कपडे का नाही घालत?"
म्हणून मागे लागली होती.प्रेमळपणा हा तानुचा उपजत गूण आहे.तानुच्या गैरहजेरीत रात्री ती स्वपनात आली. स्वपनात तिला पाहून आणि तिचा चौकसपणा पाहून तिच्या आईची तिच्या बालपणाची आठवण आली.त्यानंतर जे विचार मनात आले ते कवितेच्या रुपाने देत आहे.
आजाचं गुपीत
एक होती तानुली
तिचं वय होतं सहा
आणि गम्मत पहा
तिचा एक होता आजा
त्याचे वय होतं सहा वर सहा
तानुली आजावर खूप प्रेम करायची
आजा पण तानुली वर खूप प्रेम करायचा
कधी कधी तिला आंघोळ घालायचा
तिचं अंग पुसून कपडे घालायचा
केस पुसून वेणी घालायचा
आणि डोळे मिटून गप्प बसायचा
तानुली म्हणायची थॅंक्यू आजा
आणि आजा म्हणायचा वेल्कम तानु
कधी कधी तानुली पण आजाला मदत करायची
आजा म्हणायचा थॅंक्यू तानु
आणि तानु म्हणायची वेल्कम आजा
आणि आजा डोळे मिटून गप्प बसायचा
एकदा तानुली म्हणाली
आजा तू डोळे का मिटतोस?गप्प का रहातोस?
आजा म्हणाला ते आहे एक गुपीत
मला गुपीत सांगशील का?
असं विचारलं तानुने
ओके तानु असं म्हटलं आजाने
ऐक
एक होती मुलगी
तिचं वय होत सहा
आणि तिचा एक होता डॅडी
त्याचे वय होत तिनावर सहा
ती डॅडीवर खूप प्रेम करायची
तिच्यावर डॅडी खूप प्रेम करायचा
कधी कधी तिला आंघोळ घालायचा
अंग पुसून कपडे घालायचा
केस पुसून वेणी घालायचा
आणि उघडया डोळ्याने
तिच्या कडे बघत बसायचा
मग ती खूप खूप हंसायची
आणि डॅडी तिला जवळ घ्यायचा
हे ऐकून तानुली हसली
अन
आजाला त्या मुली सारखी दिसली
आजाने तानुलीला जवळ घेतलं
आणि तानुलीला गुपीत कळलं
गुपीत फ़ोडताना आजाला झाली घाई
कारण ती मुलगी होती तानुलीची आई.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
26 Oct 2008 - 1:04 pm | सोनि
अतिशय सुरेख!!
26 Oct 2008 - 1:27 pm | जैनाचं कार्ट (not verified)
छान !
लय मस्त सापडला वाचताना !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
26 Oct 2008 - 5:01 pm | सखाराम_गटणे™
मस्तच, मला पण लहान मुले खुप आवडतात.
--
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
27 Oct 2008 - 1:50 am | टारझन
लै भारीये
टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा
27 Oct 2008 - 4:53 am | श्रीकृष्ण सामंत
सोनि,जैनाचं कार्ट,सखाराम_गटणे, टारझन,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com