मी आत्तापर्यंत जे काही किडुकमिडुक शिक्षण घेतले त्यात "असंबद्ध विचारांचा प्रतिवाद" या विषयाचा समावेश नव्हता त्यामुळे माझ्यामध्ये एक फार मोठे न्यून राहीले आहे याची मला जाणीव आहे.
माझे अनेक हितचिंतक व नातेवाईक व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी कधीच मला माझ्या "delusions of grandeur " विषयी सांगितले नाही याचे मला आश्चर्य वाटते आणि आता तर राग आला आहे. त्यांच्यावर कोणत्या कायद्या अंतर्गत दावा दाखल करता येईल का, याचा शोध घेत आहे.
नुकतेच बहुधा विकीपिडीयावर भारत हे सर्वात कमी आय० क्यु० असेलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे असे वाचले. आता हे "सत्य" जर इथे किंवा भारतात कुठेही चर्चेला आले तर भारतीयांचा आय० क्यु० कमी का हा प्रश्न न विचारता, आय० क्यु० ही कल्पना कशी चूकीची किंवा भंकस आहे यावर भारतीय लोक रक्त आटवतील आणि निपचित पडतील.
सुमारे १९८४ च्या सुमारास पुण्याच्या गुडलक चौकात एक कम्युनिस्टांची सभा चालू होती. मी तिथून जवळून जात होतो तेव्हा एक वक्ता बेंबीच्या देठापासून संगणकाला शिव्या घालत होता. नंतर काय झाले हे इतिहासाला ज्ञात आहेच...
सध्या अधिजनुकशास्त्राला निकालात काढणारे सर्व विचारवंत नंतर कधीतरी "वेदातल्या मंत्रांमध्ये अधिजनुक बदल घडविण्याचे सामर्थ्य" असा संशोधन निबंध एखाद्या श्वेतकाय फिरंग्याने प्रसिद्ध केला की बाह्या सरसावून हेच भारतीय अधिजनुकशास्त्राला डोक्यावर घेतील, याची मला खात्री आहे.
त्यामुळे मिसळपाववरील सर्व वैयक्तिक हल्ले आणि इतर प्रतिक्रियांकडे मी बुद्धाच्या करूणामय दृष्टीने पाहतो, एव्ह्ढेच सांगून माझ्यासाठी हा विषय इथेच थांबवतो.
प्रतिक्रिया
6 Apr 2018 - 10:31 am | सुबोध खरे
नुकतेच बहुधा विकीपिडीयावर भारत हे सर्वात कमी आय० क्यु० असेलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे असे वाचले.
याचे कारण साधे आणि सोपे आहे.
जास्तीत जास्त आय क्यू हा काही अति महत्त्वाच्या व्यक्तींनी घेऊन टाकल्यामुळे आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींकडे उरला सुरला गाळ आयक्यू आला आहे.
6 Apr 2018 - 1:09 pm | माहितगार
विकिपीडियावरून आठवले
Adam Rutherford (Adam Rutherford is a former geneticist, ) यांचा गार्डीयन मध्ये लेख आहे , Beware the pseudo gene genies (Sun 19 Jul 2015 06.59 BST) त्यात ते म्हणतात :
.
तिन्हींचा संदर्भ
आपल्या लेखांमुळे विषयाबद्दल उत्सुकता जागवली हे म्हणतानाच काही शंकाही जाग्या झाल्या , माझ्या शंका मी क्रमवारे मांडल्या काहींची उत्तरे दिली जाण्याचा अत्यल्प प्रयत्न झाला नाही असे नाही पण शंका विचारणार्याचे समाधान झाले का ? तर तुर्तास तरी नाही हे प्रांजळ मत असेल .
बाकी इतरांसोबत झालेल्या चर्तत काही ठिकाणी वादाला प्रतिवाद हे स्वरुप दिसले वाद प्रतिवाद नेहमीच होतात. कुठे-कुटे अहंकाराच्या झालरींचे प्रदर्शन होतना दिसले ते स्पृहणीय होते का हा ज्याचा त्याचा खासगी प्रश्न आहे . एक वाचक म्हणून अहंकाराने रुळावरुन घसरलेल्या गाडी सोबत धावणे जरासे कठीण जाते. असो.
तरीही लेखक द्वयांचा उत्साह कौतुकस्पद आहे. अशीच नवी नवी माहिती अभ्यासपूर्णपणे सादर करण्याचा आपला उत्साह कायम राहो. त्यासाठी आगामी प्रकाशना साठी अनेक शुभेच्छा. आणि अनेक आभार
6 Apr 2018 - 1:29 pm | गवि
ओके.
6 Apr 2018 - 2:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
"प्रत्येक दाव्याच्या खरेपणाबद्दल संशय घेऊन खात्री करणे" हा आधुनिक शास्त्रांचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे, आपल्या दाव्यांच्या बाजूचे पुरावे विचारल्यावर किंवा त्यांच्या सबळतेवर प्रश्न उभे केल्यावर चिडणे, उद्धट उत्तरे देणे, थयथयाट करणे, इत्यादी आधुनिक शास्त्रांत बसत नाही, केवळ सबळ पुराव्यांच्या मदतीने केलेला प्रतिवाद योग्य ठरतो. अन्यथा, पुराणवादी शास्त्रांच्या पाठीराख्यांत आणि आधुनिक शास्त्रांच्या पाठीराख्यांत फरक राहणार नाही, हे कळायला फार मोठ्या आय० क्यू० ची गरज नाही. :)
तेव्हा, हतोत्साह न होता, तुमची मते व त्यांना पुरक पुरावे शांतपणे सांगत रहावे, ते बरोबर असल्यास एक दिवस जनतेला मानावेच लागतील... असे सुचवतो.
6 Apr 2018 - 3:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
नुकतेच बहुधा विकीपिडीयावर भारत हे सर्वात कमी आय० क्यु० असेलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे असे वाचले.
या ढोबळ विधानाला काही सबळ पुरावा आहे का ? असे गंभीर विधान करताना एखादा सबळ पुरावा असलेला दुवा देणे जास्त शास्त्रीय ठरले असते, नाही का ?
असे ढोबळ विधान शास्त्रिय नसते याची नोंद घ्यावी. तसेच, रागाच्या भरात मनाचा तोल जाऊ देणे आणि असंबद्ध व उद्धट प्रतिक्रिया देणे शास्त्रिय प्रणालीत योग्य समजले जात नाही, याची आठवण करून द्याविशी वाटते.
तुमच्या नावावरून तुमचे मूळ भारतिय आहे असे वाटते... म्हणजे वरचे विधान तुम्हालाही लागू होते किंवा कसे ? शिवाय, अनेक सहस्त्र वर्षे ज्या देशाने जगाला ज्ञान आणि बुद्धिवान माणसे पुरवली आहेत त्या आपल्या मायभूमीबद्दल असे विधान करणे कितपत समतोल विचार असून शकतो ?
चला मी तुम्हाला एक जागतिक स्तरावरच्या IQ पाहणीचा दुवा देतो. त्यातले "भारताचे स्थान" आणि "शतकानुशतके जगभरातून बुद्धी आयात करण्यात अग्रगण्य असलेल्या यु एस ए चे स्थान" यांची तुलना करणे रोचक होईल. अर्थात, सर्व घटकांचा तौलनिक अभ्यास करून या दुव्यातील निरिक्षणांचा "स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स" समजून घेण्याइतपत तुमचे ज्ञान असल्याचा दावा तुमच्या लेखांमध्ये अनेकदा दिसला आहेच, तेव्हा ते काम मी करण्याचे धाडस न करता तुमच्यावरच सोपवत आहे.
अजून काही उपयोगी दुवे...
वगैरे, वगैरे, वगैरे. (ज्या विकिपेडियाचा तुम्ही आधार घेतला आहे, तेथे या विषयावर, अजून अनेक पोतीभरून दुवे आहेत.)
एखाद्या निरव संध्याकाळी, मन सैरभैर नसताना, शांतपणे वरचे दुवे उघडून वाचून त्यांचे मनन केल्यास बरेच काही सापडेल, समजेल, उमजेल, असे वाटते.
6 Apr 2018 - 5:08 pm | युयुत्सु
परत एकदा आठवण करून देतो की हा विषय मी माझ्या साठी संपवला आहे आणि मला इथे मला मराठी व्याकरणाचा तास घ्यायची अजिबात इच्छा नाही!
6 Apr 2018 - 10:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
असे अवमानकारक व उद्धट विधानांचे दगड एकाद्या व्यक्तिवरच नव्हे तर एका देशावरही मारून, नंतर विरोधी पुरावे पुढे आल्यावर, पळून जाणे बरे नव्हे !... ही शास्त्रिय कृती तर अजिबात नाही. शिवाय, ते वैयक्तिक इगोसाठीसुद्धा अजिबात बरे नाही ! ;)
गल्ली क्रिकेटमध्ये, हमरीतुमरीवर येणे आणि "माझी बॅटिंग संपली. आता मी माझी बॅट घेऊन घरी जातो." असे करणे (योग्य नसले तरी) चालून जाते. पण शास्त्रिय संवादात असे करणे निषिद्ध असते.
तुमच्या मागे एका (एमडी) वैद्यकिय पदवीधराचा पाठींबा असल्याचे किंबहुना ते पुस्तक त्यांनी लिहिले आहे, असे तुम्ही खास सांगितले आहे म्हणून काही माहिती...
(१) तुमच्या डॉक्टरांची एमडी अमेरिकन की भारतिय ते सांगितले नाहीत. त्यांच्या नावावरून ते भारतिय वंशाचे वाटतात म्हणून काही माहिती :
...........(१.अ) भारतिय 'एमबीबीएस' = अमेरिकन 'एमडी' = वैद्यकीय क्षेत्रातली बॅचलर स्तराची पदवी
...........(१.आ) भारतिय 'एमडी' = अमेरिकन 'बोर्ड सर्टिफिकेशन' = वैद्यकीय क्षेत्रातली पोस्ट-ग्रॅजुएट / मास्टर्स स्तराची पदवी
अजून बरेच फरक आहेत पण सद्या इतकेच पुरे.
(२) मिपावर माझ्यासह अनेक लोक 'एमबीबीएस / एमडी + अनेक दशकांचा अनुभव' असलेले आहेत. त्यातले बरेच जण स्वतःच्या आयडीमध्ये 'डॉ' हा शब्द वापरत नाहीत (मी अपवाद आहे). तेव्हा, प्रत्येक प्रतिसाद अज्ञ जनतेचा आहे असे समजणे चूक होईल... आयडीच्या ऐवजी प्रतिसादातल्या मजकूराचे योग्य मूल्यमापन करून त्यावर प्रति-प्रतिसाद करणेच शास्त्रिय आणि जास्त योग्य व्यवहार होईल. तुम्ही दिलेल्या डॉक्टरांच्या * इंग्लिश मजकूरातल्या मुद्द्यांत बराचसा विस्कळीतपणा आहे आणि तो मजकूर इंग्लिश व्याकरणाबद्दलच्या बर्याच अपेक्षा पुर्या न करणारा आहे (has left much to be expected) असे नमूद करू इच्छितो. हे मी माझ्या १९७५ पासूनच्या राष्ट्रिय व आंतरराष्ट्रिय स्तराच्या वैद्यकीय संशोधनपर आणि इतर शास्त्रिय/व्यवस्थापनपर लेखनाच्या अनुभवावरून सांगू शकत आहे **.
(३) तुमच्या इपिजेनेटिक्ससंबंधींच्या विधानांत अनेक तृटी असूनही मी त्यावर टीप्पणी केली नव्हती. कारण संशोधनात तुमचा किती सहभाग होता त्याबद्दल तुम्ही लिहिले नाही. तरीही, मला वाटले होते की लेखावर आलेल्या प्रतिसादांवर तुमची अभ्यासू उत्तरे येतील. पण तुमचे बहुतेक प्रतिसाद, शास्त्रिय प्रतिवादाऐवजी वैयक्तिक खिल्ली उडवणारे आणि उद्धट मजकूर असलेले होते, हे खेदाने नमूद करावे लागत आहे. मुक्त संस्थळ असलेल्या मिपावर ते चालून गेले असले तरी, असे जर त्या पुस्तकाबाबत शास्त्रिय जगतात केले गेले तर त्याचे परिणाम गंभीर असतील. हे तुम्हाला कळकळीने सांगत आहे कारण, त्या डॉक्टरांनी त्यांच्या पुस्तकात खरेच सबळ पुराव्यांसकट काही संकल्पना पुढे आणल्या असल्या तरी; अशी कृती लोकांचे लक्ष त्या संकल्पनांवरून वळवून ती कृती करणार्याच्या 'अहं'कडे वळवण्याचीच जास्त शक्यता आहे. असे होणे संशोधनाला मारक ठरते.
असो.
========================
* : डॉक्टरांचे नाव अनवधानाने नव्हे तर मुद्दाम (बाय डिझाईन) टाळले आहे. कारण, तुम्ही दुरान्वयाने उधृत करत असलेल्या संशोधनाचे ते मुख्य संशोधक आहेत आणि शास्त्रिय संशोधक आपले संशोधन करताना आणि ते प्रस्तूत करताना कोणती भाषा आणि कोणती प्रणाली वापरतात याबाबत त्यांना चांगली कल्पना असणे गृहित आहे. तेव्हा तुमच्या मजकूरासाठी त्यांचे नाव घेऊन काही मतप्रदर्शन करणे मला प्रशस्त वाटले नाही... प्रोफेशनल कर्टसी.
** : एमडी + एक्झेक्युटिव्ह एमबीए + पीएमपी
+ मानवांवरचे संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेले सर्टिफिकेशन (१. NIH, USA चे PHRP certificate आणि २. Royal College of Physicians, London चे ICH GCP certificate)
+ ICH GCP certificate मिळविण्यासाठी अभ्यास करणार्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्याचे प्रशिक्षण (Training of Trainers) मी घेतले आहे.
माझा मुद्दा स्पष्ट करायला हे इतके पुरे आहे, तेव्हा येथेच थांबतो.
========================
6 Apr 2018 - 10:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
जाता जाता, हा तुमच्या आवडत्या यु० एस० कडून तुम्हाला आलेला आहेर, साभार...
India is the biggest exporter of intelligent people to US
7 Apr 2018 - 9:02 am | arunjoshi123
सुहासजी, आपल्याइतक्या क्वालिफाइड आणि प्रोफेशनल आणि सौजन्यशील माणसाशी संवाद करावा अशी युयुत्सुची कोणतीच अर्हता नाही हे केव्हापासून दिसत आहे. कृपया आपला मूल्यवान वेळ वाया घालवू नकात.
7 Apr 2018 - 12:12 pm | सुबोध खरे
एक्का साहेब
डॉ जगन्नाथ दीक्षित हे माझ्या सारखेच एक रेडियोलॉजिस्ट आहेत आणि ते अमेरिकन बोर्ड सर्टिफाईड रेडिओलॉजिस्ट म्हणून अमेरिकेत काम करत असत(तेथेच स्थायिक आहेत)
याच प्रकल्पासाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी माझ्याकडे विचारणा केली होती. पण मूळ विषयापासून(radiology) फारकत नको म्हणून मी ती नम्रपणे नाकारली होती. त्यांचा आणि माझा काही वर्षांपूर्वी इ मेल मधून संपर्क होत असे आणि त्यांचे अनेक संशीधनपर लेख ते मला पाठवत असत. उदा हळदीतील कुरक्युमिन.
डॉ दीक्षित हे अतिशय विद्वान असे गृहस्थ असून ते पुराव्याशिवाय बोलत नाहीत असा माझा अनुभव आहे.
युयुत्सु हे त्यांचे सहाय्यक म्हणून या प्रकल्पात संशोधनपार काम करीत आहेत असे युयुत्सूनच्या लिखाणावर आढळते. परंतु अतिशयोक्त दावे करणे आणि ते खोडून काढल्यावर त्याला प्रतिसाद न देणे अशा गोष्टी युयुत्सुंनी टाळल्या असत्या तर बरे झाले असते.
बाकी आपल्यालाच सर्व समजते हा त्यांचा अंधविश्वास( delusion- false but unshakable belief) हा delusion of grandeur चा एक भाग आहे असेच मी समजतो. त्याला उत्तर द्यायची गरज नाही असे मला वाटते.
बऱ्याच वेळेस मंदिरात जाताना देवाच्या आधी नमस्कार केल्यामुळे शंकरापेक्षा नंदीला आपण श्रेष्ठ आहोत असे वाटू लागते.
त्याला इलाज नाही.
ता. क.-- याचा वरच्या प्रतिसादाशी संबंध नाही.
6 Apr 2018 - 6:12 pm | arunjoshi123
https://iq-research.info/en/average-iq-by-country
=========================
युयुत्सु हा माणूस प्रचंडच निर्बुद्ध दिसतो. पण असो. तो इतका जास्त निर्बुद्ध आहे कि मी इतका निर्बुद्ध का याचा विचार न करता तसं प्रतिपादन करणार्या अरुण जोशींवर डाफरेल. म्हणून तो विषय नको.
6 Apr 2018 - 6:23 pm | arunjoshi123
पुन्हा तोच मूर्खपणा. निर्जिव, चेतनाहिन आणि असम्यक अशा मूलद्रव्यांतून कोण्या बुद्धीमान ईश्वराशिवाय केवळ ए डि सी जी हे चार घटक वापरून कोड, कोड रिडर, कोड डेवलपर, कोड मशिन, कोड टूल्स, कोड प्रॉडक्ट, कोड चेन, इ इ बनत असेल तर सजीव, बुद्धीमान, सचेतन अशा वेदकालीन ब्राह्मणांच्या ४०- ५० घटक वापरून बनवलेल्या मंत्रात अशा कोडमधे मायनर बदल घडवायचे सामर्थ्य नसावे?? काय राव????
6 Apr 2018 - 7:24 pm | युयुत्सु
6 Apr 2018 - 7:55 pm | कानडाऊ योगेशु
एप्रिल "फूल" बनाया..तो उनको गुस्सा आया!
7 Apr 2018 - 12:48 am | manguu@mail.com
"वेदातल्या मंत्रांमध्ये अधिजनुक बदल घडविण्याचे सामर्थ्य"
मी आधीच बोललो होतो.. आकडेवारी , शास्त्र वगैरे झाले की अखेर धागा गूढ शास्त्राकडे वाटचाल करेल. . म्हणजे वेद , अग्निहोत्र , यज्ञ इ इ इ इ ( हे केवळ उदाहरण म्हणून लिहिले , हेच असेल असे नाही , something like this )
7 Apr 2018 - 12:54 am | manguu@mail.com
http://www.misalpav.com/comment/988139#comment-988139
7 Apr 2018 - 1:14 am | manguu@mail.com
ATGC
अडेनिन थायमिन
ग्वानिन सायटोसिन
7 Apr 2018 - 8:48 am | arunjoshi123
ओके ओके, शेवटी ४-५ च झाले ना?
7 Apr 2018 - 12:31 am | गामा पैलवान
अवांतर :
युयुत्सु,
१.
रोचक विधान आहे. हे सापडलं (इंग्रजी दुवा) : https://www.quora.com/What-are-the-Limitations-of-IQ-tests
२.
कुतूहल म्हणून एक विचारतोय. इथे तुम्हांस गौरकाय फिरंग्याच्या प्रशस्तीमुळे नेत्रदीपन अपेक्षित आहे की वेदमंत्रांमुळे?
आ.न.,
-गा.पै.
7 Apr 2018 - 9:00 am | arunjoshi123
मराठीत पलायनत्सु असा शब्द आहे का?
7 Apr 2018 - 11:42 am | युयुत्सु
पूर्व प्रसिद्धी - रविवार सकाळ, १९.०४. १९९८
राजा विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर ऒढून घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटतॆ. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतॊ."
"फार पूर्वी या पृथ्वीतलावर प्रवृत्तिपाद आणि निवृत्तिपाद या नावाचे दोन फार मोठे राजे होऊन गेले. प्रवृत्तिपादाच्या राज्याचे नाव होते प्रवृत्तिपुर आणि निवृत्तिपादाच्या राज्याचे नाव होते निवृत्तिपुर. एका राज्यातून दूस-या राज्यात जाताना अनेक डोंगरद-या, नद्यानाले, हिंस्र श्वापदांनी भरलेली घोर अरण्ये आणि सात समुद्र पार करावे लागत. दोन्ही राजांच्या प्रजेची राहणी फारच भिन्न होती. दोन्ही राजांच्या नावाप्रमाणे एक राज्य प्रवृत्तीचे उपासक होते तर दूसरे निवृत्तीचे. निवृत्तिपुराची लोकसंख्या प्रवृत्तिपुराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त होती, तर प्रवृत्तिपुराच्या प्रजेची समृद्धी अधिक होती. राजा प्रवृत्तिपाद आपल्या प्रजेला सर्व प्रकारची ऐहिक सुखे उपभोगत यावीत म्हणून झटत असे. त्याने राज्याची भरभराट व्हावी म्हणून व्यापार, उद्योगधंदे, शिक्षण यांना उत्तेजन दिले. प्रवृत्तिपुरातील व्यापारी माती सोन्याच्या भावाने विकत, तर निवृत्तिपुरात सोने मातीच्या भावाने विकले जाई."
"प्रवृत्तिपुरातील विद्यापीठे देशोदेशींच्या विद्वानांनी गजबजून गेली होती. या विद्यापीठांचे जगभरच्या बुद्धिमान विद्यार्थ्यांमध्ये खूप आकर्षण होते. निवृत्तिपुरात मात्र वेगळी परिस्थिती होती. निवृत्तिपुराला हजारो वर्षांचा इतिहास लाभला होता. या इतिहासाचा खराखोटा अभिमान तेथील पौरजन त्यांच्या साध्यासाध्या व्यवहारांमध्ये पण लपवू शकत नसत. निवृत्तिपुरात अनेक उद्योगधंदे चालत. चालणारे चालत, न चालणारे आजारी पडत. आजारी उद्योगांना निवृत्तिपाद मोठमोठी अनुदाने देत असे. निवृत्तिपुरात पण विद्यापीठे होती. काही मोजक्या विद्यापीठातील मोजके विद्यार्थी सोडले, तर एका मोठया ईश्वरी लीलेमुळेच की काय, बाकीचे विद्यार्थी मोठमोठ्या पदव्या प्राप्त करून सुद्धा नोकरीच्या शोधात वणवण भटकत असत."
वेताळ म्हणाला, "हे मित्रा, सांगत काय होतो की जग जिंकण्याच्या ईर्ष्येने प्रवृत्तिपादाने मोठे सैन्य बाळगले होते. सैन्याला लागणारी अद्ययावत आयुधे तयार करणा-या मोठ्मोठ्या यंत्रशाळांची त्याने स्थापना केली होती. देशोदेशींचे कुशल कारागीर तेथे वेगवेगळी यंत्रे आणि आयुधे तयार करण्या साठी अहोरात्र खपत असत. प्रवृत्तीपादाच्या यंत्रशाळामध्ये तयार झालेले रथ मात्र संपूर्ण भूतलावर कीर्ती प्राप्त करून होते. याशिवाय, प्रत्यक्ष आदित्याच्या रथाशीच बरोबरी होऊ शकेल अशा "मरुत्सखा" नावाच्या रथांची निर्मिती तेथील कारागीरांनी केली होती. हे रथ वेगवान असल्यामुळे त्यांच्या जोरावर राजा प्रवृत्तिपाद अनेक युद्धे जिंकला होता. त्याच्या मांडलिकांकडून प्रवृत्तिपुरात निर्माण झालेल्या रथांना मोठी मागणी असे. साहजिकच या रथांची कीर्ती निवृत्तिपुरापर्यंत पोचली होती. अशा रथांची आपल्याला आवश्यकताच नाही या विचाराने प्रत्येकजण आपापल्या दिनचर्येत गुंतला होता."
"प्रवृत्तिपादाला मात्र त्याच्या हूशार प्रधानांनी एकदा सल्ला दिला, की राजा आपण उत्तमोत्तम रथ बनवले तरी ते चालवण्यासाठी लागणारे योग्य सारथी आपल्याकडे नाहीत." यावर राजा प्रवृत्तिपाद चमकला. त्याने प्रधानांना उपाय विचारला. तेव्हा एक प्रधान म्हणाला, "राजा, निवृत्तिपादाची प्रजा खूप मोठी आहे. याशिवाय तेथे विद्वानांची आणि पंडितांची खूप उपासमार होते, असे ऐकले आहे. तेव्हा आपले जुने रथ आपण निवृत्तिपुरात विकायला नेऊ आणि तेथे उत्तमोत्तम सारथी निर्माण करून आपल्या राज्यात आणू." यावर प्रवृत्तिपादाने संमती दर्शवली. पण सर्वाना प्रश्न पडला की निवृत्तिपादाच्या राज्यात रथ विकायचे कसे? यावर सर्व प्रधानांनी एकत्र विचार करून एक नामी शक्कल काढली. निवृत्तिपादाच्या प्रजेचे संस्कृतिप्रेम त्यांना ठाऊक होते. त्यांनी एक वावडी उठवून द्यायचे ठरवले, की मरुत्सखा या रथाची रचना निवृत्तिपुरात होऊन गेलेल्या एका ऋषींच्या ग्रंथात सापडली आहे.
"ही वावडी सात समुद्र, हिंस्र श्वापदांनी भरलेली घोर अरण्ये, डोंगरद-या, आणि नद्यानाले पार करून निवृत्तिपुरात आली तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा एकच धक्का बसला. सगळेजण हे आपल्याला माहित कसे नाही, असे एकमेकांस विचारू लागला. मरूत्सखाचे तंत्रज्ञान आपल्या नगरात विकास पावले, हे ऐकून सगळ्यांचा उर अभिमानाने भरुन आला. बौद्धिक स्वामित्वाची फार मोठी जाणीव निवृत्तिपादाच्या प्रजेला यानिमित्ताने झाली. या घटनेला उपलक्षून निवृत्तिपादाने मोठ्या दक्षिणा देऊन विद्वत्परिषदा आणि पंडितचर्चा घडवून आणल्या. सर्व चर्चा आणि परिषदांतून निवृत्तिपुराच्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान जोमाने बाहेर पडला. आपल्या राज्यात एखादी कल्पना मांडली जावी आणि ती प्रवृत्तिपादाच्या राज्यात विकास पावावी, हे निवृत्तीपादाला रूचेना. त्याने वाट्टेल ती किंमत मोजून रथांची आयात करायचे ठरविले. आयात केलेले रथ चालविण्यासाठी सारथी तयार करणा-या शाळा काढल्या. या शाळातून बाहेर पडलेले सारथी प्रवृत्तिपादाच्या राज्यात जाऊन उपजीविका करू लागले. पण गमतीची गोष्ट अशी, की प्रवृत्तिपादाने मरूत्सखा सोडून सर्व प्रकारचे रथ निवृत्तीपादास विकले. पण राजा निवृत्तिपाद यामुळे खूप अस्वस्थ झाला.
त्याला चैन पडेना. त्यावर त्याच्या प्रधानांनी सल्ला दिला, "राजन, आ
पण एका संशोधन मंदिराची स्थापना करून प्रति-मरूत्सखाची निर्मिती करावी." आश्चर्य म्हणजे ही कल्पना राजाला ताबडतोब पटली. त्याने लगेच निधी मंजूर करून प्रति-मरूत्सखा संशोधन मंदिराची स्थापना करण्याच आदेश दिला. रात्रंदिवस खपून एखाद्या मयसभेप्रमाणे वाटणा-या या संशोधन मंदिराची निर्मिती केली गेली. अनेक बुद्धिमान लोकांना निवृत्तिपादाने तेथे नेमले. ही बातमी प्रवृत्तिपुरात जेव्हा पोचली तेव्हा प्रत्येक जण निवृत्तिपुरास परतण्याचे स्वप्न रंगवू लागला."
"प्रति-मरूत्सखा संशोधन मंदिरात अनेक चित्र-विचित्र कौशल्याचे कारागिर अहोरात्र खपू लागले. निवृत्तिपुराच्या इतिहासात लिहिले गेलेले सर्व ग्रंथ, पोथ्या-पुराणे अभ्यासण्यात आले. तसेच, रथाच्या निर्मिती सर्व प्रकारचे सर्व भाग आयात करण्यात आले. एका चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर प्रति-मरूत्सखाची निर्मिती करण्यात आल्याचे निवृत्तिपादाने जाहिर केले. ब्रह्मवृंदाकरवी षोडषोपचारे पूजा करून झाल्यावर प्रति-मरूत्सखा पौरजनांना दर्शनासाठी खुला केला गेला. निवृत्तिपादाच्या राजवाड्यावर प्रति-मरूत्सखा बघण्यासाठी ही मोठी गर्दी लोटली. प्रत्येकाला उत्सुकता होती, की प्रति-मरूत्सखा चालतो कसा? कल्पनेला ताण देऊन प्रत्येकजण आपापसात पैजा मारू लागला. राजाने पण आनंदाच्या भरात एका नव्या रथाच्या निर्मितीची घोषणा केली. अशाच एका चैत्र शुद्ध प्रतिपदेला विधिवत पूजा करून तो सर्वांना बघण्यासाठी खुला केला."
वेताळ पुढे म्हणाला, " ही बातमी दूतांमार्फत प्रवृत्तिपादाच्या राजवाड्यावर पोचली, तेव्हा
तो निद्राधीन झाला होता. प्रधानांना कळेना राजाला उठवून सांगावे की नाही. शेवटी एका प्रधानाने धीर करून प्रवृत्तिपादाला उठवून
प्रति-मरूत्सखा निर्मितीचे वृत्त सांगितले, पण यावर राजाने मात्र 'ठीक आहे' असे म्हणून कुस बदलली आणि तो पुन्हा घोरू लागला."
येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "मित्रा, प्रवृत्तिपादाला ही बातमी ऐकून काहीच कसे वाटले नाही? या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असून तू दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील."
यावर विक्रमादित्याने आपले मौन सोडले आणि हसून तो म्हणाला, " हे बघ, निवृत्तिपादाला जग जिंकायची इच्छा कधीच नव्हती आणि
प्रति-मरूत्सखाची निर्मिती फसव्या अभिमानातून झाली, हे लक्षात घे. शिवाय तो चालतॊ कसा हे कुणीच कधी बघितले नव्हते. युद्ध जिंकण्याची गोष्ट दूरच राहू दे."
या उत्तराने वेताळ खूष झाला आणि विक्रमादित्याचा मौनभंग झाल्याने प्रेतासह झाडावर जाऊन लोंबकळू लागला.
7 Apr 2018 - 11:57 am | मार्मिक गोडसे
तुमचे मागील लेख व त्यावरील तुमचे प्रतिसाद वाचून तुमचे पुस्तक विकत घेवून वाचण्याची इच्छा मरून गेली होती, परंतू तुमच्या पुस्तकात 'अशा 'कथा असतील तर नक्कीच तुमचे पुस्तक मी दुप्पट किमतीला घेवून वाचीन.
7 Apr 2018 - 3:23 pm | गामा पैलवान
युयुत्सु,
तुमची प्रवृत्ती निवृत्तीची कथा आवडली. विक्रमाची कारणमीमांसा बरोबर आहे. शेवटी प्रवृत्तीस औषध नाही परंतु निवृत्तीस औषध आहे हेच खरं, नाहीका?
आ.न.,
-गा.पै.
7 Apr 2018 - 3:38 pm | दीपक११७७
डाॅ. दीक्षितांनी भिडु निवडताना काही चुकी केली अशी धारणा होत आहे कृ पक्की व्हावी
7 Apr 2018 - 4:02 pm | arunjoshi123
असं देखील नसावं. सोशल मिडियावर संवाद नक्की कुणीकडे जाईल याची जाणिव नवख्यांना नसते. सुरुवातीला भलत्या सेंटिमेंटल प्रतिक्रिया असू शकतात.
7 Apr 2018 - 11:33 pm | दीपक११७७
पण श्री युयुत्सु हे तर गेल्या दहा वर्षा पासुन मिपा सदस्य आहेत.
त्यांचा सोशल मिडीया चा अनुभव दांडगा आहे.
7 Apr 2018 - 11:43 pm | arunjoshi123
मला कल्पना नव्हती. ते दहा वर्षे सदस्य होते तर अधिक उत्तम प्रतिचे प्रतिसाद अपेक्षित आहेत.
9 Apr 2018 - 3:37 pm | पुंबा
चला. बरं झालं..
10 Apr 2018 - 8:56 pm | दीक्शित
Epigenetics: it ain’t over until the fat lady sings…
I am compelled and motivated to join this forum and write this response since the discussion has gone completely out of control. Rajeev Upadhye in his own write up has made quite clear several times that epigenetics, a relatively new science is not about autosomal mutations, selective adaptations or polymorphism, etc. If you are not knowledgeable about the subject just ask questions, do not write your “theories” based on your ignorance. Even then if you do not agree, keep them to yourself - as they say how Texas Juries in US with 8th grade education make decisions in the court - they say “ I have already made up my mind (who is guilty or not ) - Please don’t confuse me with facts.” Rajeev Upadye’s write up here is not a “free lance at large fiction,” but a science write up. And sometimes one has to even hypothesize to find the unknown. Conclusions may differ. The book is different. In the book, however, I am solely responsible for scientific validity and accuracy, if there is any problem in “Marathikaran,” blame it on Rajeev.
In one post comment- Stopping Leaded gasoline used recently does NOT wipe out damage already caused by cumulative epigenetic harm to the embryos in the last 30 years in women. Exposure may vary at places. And extent of the damage cannot be separately measured precisely at the present.(Currently stopping use of leaded gas will only prevent some immediate epigenetic damage to the sperms., which are produced all the time in men at least upto the age of 80).
In lab experiments rats by nature are the only mammals very close to human behavior, eating habits (Rats prefer Pizza, French fries, Coke, and other our fried spicy junk food over the healthy food choices, they like fried, fatty, salty and hyper sweet food, just like humans). And because their life span is shorter effect of several generations can be easily studied in the lab. In a controlled study rats change their behavior from" nice" to SOB when overpopulation puts pressure on them of own survival. India has to find its own solutions that will work for colossal 1.3 billion people mushroomed under its own rule infested with corruption, lawlessness, massive poverty, pollution, lack of education, religious intolerance, poor health care, lack of hygiene, lack of morality, ethics, and dwindling resources which cause cumulative epigenetic harm.
Physicians always look for the diagnosis but apart from diagnosis, and treatment etc., you always look for the prognosis and what to tell the “patient.” Current high tech movement etc., may bring some temporary short term prosperity to India, but intermediate and long term prospects are NOT good. Pathologial slide images of many cancers under low magnification in humans and the images of growth of many urban cities from satellites, especially in India show striking resembalance. Although rats are not exactly like humans in some aspect, hence findings cannot be extrapolated to humans in exact fashion and more human trials become necessary. And that is a long process, and results may not be available for next half a century or so, provided there is adequate funding for the long term longitudinal studies. This is similar to Sinclair Sirtis SRT 501 compound “anti aging” drug’s spectacular fall over 700 million dollars loss (analog to resveratrol) worked wonders in mice making them young again and live long, but miserably failed in humans.
Primary intention of Rajeev Upadhye’s write up is not sensationalization but really to focus not on whether Mumbai is better than Manjari Budruk, but to bring attention to the environmental pollutant damage to human epigenome is real and is long term cumulative. Epigenetically immediately and somewhat slower genetically. Issue is how not to stimulate disease promoting genes, but stimulate life enhancing processes. The entire South East Asia is actually at a greater risk.
Since millions of genes are activated and inactivated every second in trillions of cells, how to keep good ones “on,” position most of the time is a challenge. For example, in one Danish study researchers used a stationary bike with pedal only on one side. Participants peddled this bike with only one leg for few weeks. Then researchers took biopsy of the muscles (that is painful part- thanks for the courage of the participants) of calves on both sides. Sure enough- the leg which was exercised showed more “methylation,” showing epigenetic stimulation of several good genes, promoting endurance, strength, better metabolism of glucose and insulin sensitivity and faster elimination of waste products. On the other hand things such as just one glass of alcohol eliminates activation of many good genes. Alcohol in any form is like a “eraser” of good genes. Most troubling is alcohol action on hippocampus where it prevents formation of new permanent memories, erases your ability to learn new things etc. Appropriate genetic and frequent epigenetic testing for specific effect is expensive and trials are complicated.
For example, in a controlled trial Turmeric and its extract - curcumin administered in a certain way in the diet, people with propensity for certain cancers whose cancer genes were in “on,” position, after just 6 weeks of such diet those bad genes were turned off. Read more in the book about how to take many other dietary supplements and turmeric in "DIXIT PROTOCOL"© OF CURCUMIN. It is copyrighted in US , but it is a free application use for the common man. It tells you how much to take, how and when to take to prevent many cancers and inflammatory and neurodegenerative diseases. Longitudinal studies have just begun at few places in US, to verify the protocol, but one will have to wait years to find the results; however, because it is used in India by millions of people over the last 5000 years, we know it is safe. Those who want to know technical details; The book in layperson terms explains how curcumin suppresses the genes expressing production of enzymes, and cytokines such as cyclin D1, Cox 2, MMP9, TNF, iNOs, IL12, IL8, IL6, Egr1, CBP, HER2, Akt, JNK, 5- LOX, MEK, XOD, or enzymes such as Xanthine oxidase, Protein Kinases, etc. Turmeric suppresses transcription factors such as AP-1, STATS or 1, and 3, NF kappa B, etc. Turmeric at the same time stimulates genes producing enzymes (good guys) such as glutathione oxidase, catalase, etc., to build and make our each and every cell in the body to be better. Turmeric alone is effective over approximately 45 enzymes, cytokines, and transcription factors, etc. in the body. The message from epigenetics is clear- although you may be unlucky to have inherited the best genome or a “bad,” epigenome,” you can significantly change it by your habits, diet, nutrition,exercise and the company you keep and best yet- you can pas those effects to the next generation.
10 Apr 2018 - 9:58 pm | arunjoshi123
ईश्वर करो असंच असो.
11 Apr 2018 - 12:28 pm | गामा पैलवान
डॉक्टर दीक्षित,
तुमचा वरील संदेश वाचला. तो वाचल्यावर मला एक अवांतर प्रश्न पडला आहे : एपिजेनेटिक्स हे जेनेटिक्स पासून वेगळं कसं?
या प्रश्नातून उद्भवणारा आजूनेक प्रश्न म्हणजे आधुनिक जनुकशास्त्र हे शास्त्र कमी व अभियांत्रिकी जास्त आहे का? कारण की या 'शास्त्रा'त जनुके बदलण्याचे सतत प्रयोग करून पेशींत जे बदल घडतात त्यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे हा बदलांचा अभ्यास आहे. तसं असल्यास हे शास्त्र अभियांत्रिकीकडे अधिक झुकणारं वाटतं. कृपया यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
मला या विषयांत थोडाफार रस जरी असला तरी गती अजिबात नाही. त्यामुळे मी सध्या योग्य प्रश्नांच्या शोधात आहे. वरील दोन प्रश्न उचित असतील अशी आशा आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान
11 Apr 2018 - 8:51 pm | दीक्शित
I will make it simple for a lay person to understand, but I will have to write it in English- easier on me. Just imagine you have a house and it has TV, microwave oven, computer, dishwasher, washer dryer for cloths, or bread making machine, etc, snd all those wonderful gadgets to run and make your life easier and functional. But if you do not know when and how to turn tem "on," or "off," you would be at loss.
Consider all those things in the house as your "Genome," or genetics and now consider the knowledge where those switches are located and knowledge to when and how to turn them on and off at the right time is "Epigenetics," These switches are tiny molecules which act as keys and get added on or deleted in your life - they are not part of the genes. We are just beginning to understand this huge complex puzzle - how permutation and combination of these about 25000 genes turn on and off like keys of a piano to make music of our life, why with same genome one gets cancer other doesn't. One becomes great other....
11 Apr 2018 - 11:10 pm | गामा पैलवान
डॉक्टर दीक्षित,
खुलाशाबद्दल धन्यवाद!
अधिजनुकशास्त्र म्हणजे जनुकांची थेट काटछाट न करता युक्त आहार, युक्त विहार, युक्त औषधी इत्यादिंच्या सहाय्याने यथोचित जनुके उघडझाप कर(वि)णे असं ढोबळमानाने म्हणता येईल काय? बहुधा होय.
आभार!
आ.न.,
-गा.पै.
11 Apr 2018 - 9:15 pm | मार्मिक गोडसे
Pathologial slide images of many cancers under low magnification in humans and the images of growth of many urban cities from satellites, especially in India show striking resembalance.
ह्याचा काय अर्थ लावायचा?
11 Apr 2018 - 11:14 pm | दीक्शित
Once I get used to your forum, I will try to write in Marathi and paste some slides.
Cancers grow just like unregulated cities- along the path of least resistance. Cities will spread where there are no police, no zoning laws, nobody is watching, where there is food, water., etc. Cancers grow just like that along the interstitium, vessels, where there is no immune force, they send false application molecules to get them "permits" to get water, food, etc. and since their walls are not properly glued, the loose cells will travel at distance and will find a place and lodge where there are no regular immune police at work such as bones, brain, etc. China is currently planning "one city" of 120 million people- That is like bringing entire population of Maharashtra concentrated at one tight place under one roof (Imagine what can go wrong in the equation even well planned as Chinese claim !!!)
11 Apr 2018 - 11:45 pm | मार्मिक गोडसे
ओके. असं सोप्या भाषेत लिहित जा फारच गहन लिहिता तुम्ही. धन्यवाद.
10 Apr 2018 - 9:56 pm | चित्रगुप्त
दिक्षित (दिक्शित..??) साहेब,
मिसळपाव वर लेखन आणि प्रतिसाद फक्त मराठीतूनच यावेत, हे योग्य. एवढे श्रम इंग्रजी टंकवण्यासाठी घेतले आहेत, तर आणखी थोडे श्रम मराठीसाठी घ्यावेत ही विनंती.
10 Apr 2018 - 10:00 pm | arunjoshi123
त्यांना खूप मोठा प्रतिसाद लिहायचा होता. मराठी टायपिंगची सवय नसणारांस प्रारंभी हे फार क्लिष्ट आहे.
====================
शिवाय इंग्रजीतच लिहायची सवय असणारांस तेच म्हणणे मराठीत म्हणणे सुरुवातीला फार अवघड जाते. समजून घ्यायला हरकत नाही.
11 Apr 2018 - 7:26 am | जेम्स वांड
आम्हाला इंग्रजी टायपिंग वरून अक्कल शिकवणारे एक महान चोंबडे पात्र इथं फिरकले नाही म्हणजे नवल आहे!
10 Apr 2018 - 10:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
समतोल लिखाण.
या मजकूरात अभाव असलेली (अ) खळबळजनक विधाने आणि (आ) उद्धटपणा या दोन गोष्टी मिपावरच्या लेखांमध्ये व इतर प्रतिसादांमध्ये नसत्या तर पुस्तकाबद्दल जास्त उत्सुकता आणि जास्त आत्मियता निर्माण झाली असती... ते संशोधन भारतिय आणि खासकरून मराठी मूळाच्या संशोधकाकडून केले गेले आहे, हे समजल्यावर तर जरा जास्तच !
कोणत्याही शास्त्रिय संशोधनाच्या प्रस्तुतीची सुरुवात त्यात असलेल्या मर्यादांच्या (constraints) सूचीने होते. आपल्या मर्यादांना नीट जाणल्यामुळे अर्थातच, अतिशयोक्त/खळबळजनक विधाने सहजपणे टाळली जातात. वरील मजकूरात त्याचेच प्रतिबिंब आहे.
डॉ दिक्षित यांना त्यांच्या या आणि इतर सर्व यशस्वी संशोधनासाठी अनेकानेक हार्दीक शुभेच्छा !
11 Apr 2018 - 12:27 pm | सुबोध खरे
या फॉन्ट मधील विधाने श्री युयुत्सु यांची आहेत.
अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान
हे शीर्षक ( विज्ञान हे कधीच गैरसोयीचे नसते -सोय गैरसोय हा वैयक्तिक भाग असतो हि अतिशय मूलभूत बाब विसरून अभिनिवेश केला आहे)
माणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात.
हे सुरुवातीचे (पहिलेच) वाक्य.
याचा अर्थ ""मलाच सत्य समजले आहे आणि बाकी कुणाला नाही"" असे म्हणणे आहे.
तेंव्हा मी काय सांगतो आहे तेच सत्य आणि ते सांगण्याबद्दल मला सुळावर चढवले जाणार आहे हे समजूनही मी हे लिहिण्याचे धाडस करतो आहे म्हणजे मी किती हुच्च आहे असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे
यानंतर
या सगळ्या उपद्व्यापामागे माणसे इतर जीवांसाठी जी मूल्ये विकसित करतात ती मूल्ये स्वत:साठी मात्र झिडकारतात. (उदा. द्यायचे झाले तर संततीच्या लिंगाची निवड किंवा उत्तम वाणाची संतती हा विचार मनुष्य स्वत:च्या बाबतीत स्वीकारणार नाही. असो.)
जन्माला येणार्या बाळाचा काही (अर्ध्यापेक्षा कमी) जनुकीय वारसा वडिलांच्याकडून येत असला तरी पुरुषांचे शुक्रजंतू तूलनेने ताजे असल्याने सदोष संततीचा दोष (दूर्दैवाने) स्त्रियांकडे जास्त जातो, हा गैरसोईच्या सत्याचा महत्त्वाचा भाग.
यात "गैरसोय कुणाची आणि का झाली" याचे कधीही स्पष्टीकरण नाही
अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत.
हे "भयजनक" वाक्य लिहिण्याचे कारण काय? आणि नंतर याचे विकृतीकरण हि करून झाले
त्यामुळे आपले कर्तृत्व मनगटापेक्षा आजुबाजुच्या वातावरणाने जास्त नियंत्रित होईल. वर श्री स्टीफन हॉकिंग यांचे उदाहरण दिले त्यांना स्वतःला साधा अधिजनुकीय नव्हे तर गंभीर जनुकीय आजार होता.
पण उत्तम संतती होण्याकरता उपाय
मुंबईसारख्या महानगरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलींशी लग्न न करणे
प्रजननाचा हक्क सोडून द्यायचे आवाहन करायचे
- बिजांडे लहान वयात गोठवून ठेवायचे तंत्रज्ञान विकसित करायचे.-- कुणी कसे आणि कधी? याबद्दल सोयीस्कर मौन
डीएनए मॅचिंग --याची किंमत आज रुपये २५,००० आहे मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी आहे यात १० लाख प्रजननक्षम जोडपी असतील तर डीएनए मॅचिंगचा खर्च अडीच हजार कोटी रुपये येईल हा खर्च कुणी करायचा? सरकारने कि लोकांनी?
तुम्हाला ताजे प्रतिसाद पहाता अधिजनुकीय संक्रमण आणि जनुकीय संक्रमण यातला फरक तुम्हाला कळलेला नाही किंवा तो मान्य करायचा नाही असे दिसते, त्यामुळे मला आता तुमच्याशी युक्तीवाद करण्यात रस संपत आला आहे.
तेव्हा मिसळपाववर हा विषय हाणून पाडायचा जरी कितीही प्रयत्न झाला तरी ते चहाच्या पेल्यातील वादळ ठरेल याची मला खात्री आहे.
मिसळपाव वर हा विषय हणून पडायचा कुणाचाही हेतू नाही पण श्री युयुत्सुंनी केलेले अतिरंजित आणि हास्यास्पद दावे बेफाट विधाने आणि भयजनक वाक्ये मात्र पुराव्यासकट खोडून काढायचा हेतू मात्र नक्की आहे
इथल्या थयथयाटवीरांनी जिवाच्या आकांताने मी कसा चुकलो आहे हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न केला, पण त्यांना अधिजनुकशास्त्र काय कळलं आहे, हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची!
मला वैद्यकीय जगतात डॉक्टरांचे दोन प्रमुख प्रकार आढळले आहेत - १ला प्रकार लोकांना शहाणे करण्यासाठी झटतो. २र्या प्रकारातले डॉ. लोकं अडाणीच राहावेत याबाबत आग्रही असतात. तुम्ही मला या दूसर्या प्रकारातले दिसता. अधिजनुकशास्त्र बहुधा तुम्ही ऑप्शनला टाकले असावे.
आम्ही "किडकी प्रजा" जन्माला घालायची का? हा प्रश्न लोकांनी व्यवस्थेला विचारायला हवा. पण लेखाच्या सुरुवातीला कबूल केल्या प्रमाणे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा उद्योग मी केला असल्याने मला सुळावर चढवले जाइल याची मला कल्पना होतीच.
हे प्रतिसाद/ लिखाण पहिल्या भागातीलच आहे. यात दर्पोक्तीपूर्ण उद्गार, मलाच सगळं समजतं दुसरे मूर्ख आहेत असा अविर्भाव आणला नसता आणि सनसनाटी आणि भयगंड निर्माण करणारी वाक्ये लिहिली नसती तर लोकांनी लेख नक्कीच स्वीकारला असता.
मी पाठवलेल्या बहुसंख्य दुव्यांना किंवा प्रश्नांना त्यांनी सोयीस्कर बगल दिली आहे.
पुढच्या भागातील अतिशयोक्ती आणि विरोधाभास बद्दल नंतर सविस्तरपणे.
11 Apr 2018 - 12:34 pm | सुबोध खरे
The message from epigenetics is clear- although you may be unlucky to have inherited the best genome or a “bad,” epigenome,” you can significantly change it by your habits, diet, nutrition,exercise and the company you keep and best yet- you can pas those effects to the next generation.
हे साध्या सरळ शब्दात श्री युयुत्सुंनी मराठीत लिहिले असते तर इतके वादविवाद कशाला झाले असते?
पण मीच हुशार आणि बाकी सारे मूर्ख त्यांना अधिजनुकशास्त्र कळतच नाही किंवा त्यांनी ऑप्शनला टाकले असेल असले आरोप केल्यावर काय लोक गप्प बसतील?
मी हृदयरोग तज्ज्ञ आहे आणि हृदयरोग शास्त्रात ५० वर्षे काम केले असले तरी रुग्णाला तू मूर्ख आहेस सांगितले तर तो डॉक्टरचा सल्ला न घेताच जाईल.
समाज प्रबोधन करायचे असेल तर मीच हुशार असा अविर्भाव घेऊन चालत नाही.
अर्थात वातानुकूलित प्रयोगशाळेत बसून उत्तर ध्रुवावर राहणाऱ्या अस्वलाच्या उवांवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाने इतर सर्व मुर्ख आहेत असे म्हणणे शोभूनच दिसते
11 Apr 2018 - 2:07 pm | arunjoshi123
खरे सर, लोकांना ऑफिसांत बसून गंभीर चेहरा करून साइड साइडला मधे मधे मिपा वाचायचे असते हे आपण पूर्णतः विसरत आहात.
11 Apr 2018 - 5:47 pm | सुबोध खरे
-))((-
11 Apr 2018 - 5:56 pm | अभ्या..
जोशीबुवा तुम्ही मधल्या फावल्या वेळात मिपा मिपा खेळता? फावल्या वेळात ? ;)
12 Apr 2018 - 2:23 pm | arunjoshi123
अर्थातच.
फावल्या नसलेल्या वेळात आमच्या अजोकिबोर्डातून १००-२०० पानी करार पडत असतात.
12 Apr 2018 - 3:52 pm | युयुत्सु
"In 2015, a study was published claiming that the children of Holocaust survivors were more likely to develop depression, anxiety and other psychological disorders. The implication was that trauma could be transmitted across generations via epigenetic alterations."
12 Apr 2018 - 4:01 pm | arunjoshi123
आणि त्यांनी इस्र्तायलची स्थापना केली?
12 Apr 2018 - 7:41 pm | गामा पैलवान
सही पकडे है! बाकी नाझी आणि झायोनिस्ट यांच्या शय्यासोबतीवर लिहावें तितुकें थोडेंच.
-गा.पै.