...... कशाला ?

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
23 Mar 2018 - 8:26 am

पुन्हापुन्हा मी क्षणोक्षणी सावरू कशाला
उगाच ऐना बघून मी मोहरू कशाला

पुन्हा नभावर जरा दिसावी उनाड स्वप्ने
तुझे पसारे घडोघडी आवरू कशाला

तिला जरासा हवा अबोला रुसावयाला
जुनीच आहे सवय तिची बावरू कशाला

असे कसे बोलणे सखीचे मला कळेना
जरी तिचे वागणे दुटप्पी स्मरू कशाला

अजून सुद्धा तिच्याविना मी जगेन म्हणतो
जुनीच स्वप्ने पुन्हा अता वापरू कशाला

मरण मनोहर प्रिये तुझ्यासह असेल नक्की
तुझ्याविनाही जगेन मी घाबरू कशाला

जगावयाला हवे कशाला नवे बहाणे
सुखे तुझ्या सोबतीतली ठोकरू कशाला

वृत्त : सती जलौघवेगा
लगालगागा लगालगागा लगालगागा

© विशाल कुलकर्णी

mango curryमराठी गझलगझल

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Mar 2018 - 10:03 am | ज्ञानोबाचे पैजार

कधिकधी असल्या लटक्या (खोट्या) समर्थनाची गरज लागते प्रत्येकाला,

पैजारबुवा,

प्रसाद गोडबोले's picture

24 Mar 2018 - 7:57 am | प्रसाद गोडबोले

खुप सुंदर गज़ल विकुशेठ !

" आमचे एक ज्येष्ठ गज़लकार मित्र एका कट्ट्याला म्हणालेले कि काफिया रदीफ वृत्त वगैरे क्ठोर बंधने पाळायची म्हणजे कृत्रिमता असणारच पण त्या कृत्रिमतेतही सौंदर्य असणे ही गझलियत आहे ! आईंचं आईं होणं हि कविता आहे पण बापाचं आई होणं ही गझलियत आहे !! "

ह्या वाक्याची आठवण झाली ! कृत्रिमता आहे पण ती असुनही वाह क्या बात है अशी दाद मनात येणे हेच गज़लेचे यश मानतो आम्ही !

पुन्हा नभावर जरा दिसावी उनाड स्वप्ने
तुझे पसारे घडोघडी आवरू कशाला

वाह क्या बाय है !!
कसलं भारी लिहिलंय राव!!

_________/\____________

ह्या क्षेत्रातील आमचे ज्ञान अत्यंत खुजे आहे , आपलेपणा आहे म्हणुन कृत्रिमता वगैरे बोललो, राग नसावा ! आनंदकंद किंव्वा भुजंगप्रयात जितके नैसर्गिक वाटते तितके हे वृत्त ( मला माझ्या अप्लस्वल्प वाचनामुळे) नैसर्गिक वाटत नाही इतकेच म्हणायचे होते.

अधिकार नसता लिहिले | क्षमा केले पाहिजे !!

विशाल कुलकर्णी's picture

12 Apr 2018 - 10:48 am | विशाल कुलकर्णी

येताना डबाभर चाकलेटं घेवून या, म्हणजे क्षमा करायची की नाही ते ठरवता येइल ;)
मनःपूर्वक आभार देवानू !

नाखु's picture

12 Apr 2018 - 12:05 pm | नाखु

भरघोस पाठिंबा आणि कवितेला कौतुक पुष्प देण्यात येत आहे.

एक बाण दोन लक्ष्यवेध प्रिय नाखु

विशाल कुलकर्णी's picture

12 Apr 2018 - 5:03 pm | विशाल कुलकर्णी

तुमाखमि नाखुशेठ :)

पैसा's picture

12 Apr 2018 - 12:11 pm | पैसा

वाह!

विशाल कुलकर्णी's picture

12 Apr 2018 - 5:03 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद !

चाणक्य's picture

12 Apr 2018 - 5:13 pm | चाणक्य

आवडली.

सस्नेह's picture

12 Apr 2018 - 9:56 pm | सस्नेह

मस्त !
कवितेपेक्षा कैफं आवडला.