निरगाठ गहनाची

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
14 Mar 2018 - 4:57 pm

दिशा, मिति, कालगति
जिथे सापेक्ष उरती
तिथे स्थिर, अविनाशी
शोधण्यात श्रमू किती ?

कार्य-कारण नियम
थिटा पडतो कशाने?
निरगाठ गहनाची
उकलेल का प्रज्ञेने ?

अंध:कार अज्ञाताचा
कधी वाट उजळेल?
मृगतृष्णा जिज्ञासेची
कोण, कधी शमवेल?

गुंता जटिल, कठिण
कधी सुटेल की नाही?
जड-चैतन्यामधली
सीमा धूसरून जाई

माझी कवितामुक्तक