एक काव्यवाचन ( विनोदी लिहिण्याचा हा माझा पहिलाच व माझ्या तत्वांप्रमाणे एका बैठकित पुर्ण केलेला प्रयत्न, फ़ारसे चांगले व पठडीत बसणारे नाही, परंतू लायकी माहीती असताना सुद्धा post करतेय)
( एक सभाग्रूह, लोकांची गर्दी कमी असल्याने तो आकाराने अधिकच मोठा आहे कि काय? असे भास व्हायला लागले . काही (स्वतःला कवी/कवयित्री म्हणवणारे ) सभाग्रूहातल्या स्टेज वर, लग्न समारंभाला आल्याच्या थाटात, शाही कपडे ( व स्त्रीया चेह-याला रंगरंगोटी करून) बसले आहेत.)
कवींना आपण अ, ब, क, ड तसेच कवयित्रीना a,b.c अशी नावे देऊ.
कवी अ : श्रोतेहो, आ... ( वाक्य पुर्ण होण्या अगोदरच लोकांनी टाळ्या कूटायला सूरूवात केली, आता अंडी फ़ेकून मारतील की काय? या भीतीने अ खाली बसले. खाली बसता बसता, तावातावात येऊन शरीराला झतके देताना, आपला नवीन शेरवानीचा लेंगा "टर्र्ररर..." असा आवाज करत नको त्या ठीकाणी फ़ाटला हे "अ"च्या लक्षात आले)
तेवढ्यात ब "अ" नी न बोललेल्या गोष्टींना (ठरल्याप्रमाणे) अनूमोदन देण्यास उभे राहीले
कवी ब : तर लोकहो, (पून्हा टाळ्या)
फ़क्त ओळख करून देतो (दब्या आवाजात)
ओळखीचा कार्यक्रम लोकांनी उपकार म्हणून ऐकून घेतल्यावर ते खाली बसले.
आणि पहीला मान स्त्रीयांचा म्हणून कवयित्री (?) A कविता वाचनास उभ्या राहील्या
A : माझ्या पहील्या कवितेचे नाव आहे " तारूण्यपिटीका"
तेवढ्यात कवयित्री B पटकन टाळी वाजवून म्हणाल्या, " अय्या, पिंपळ वाटते"
(त्यांना pimple म्हणायचे होते बहूतेक, त्यांच्या शेजारी बसलेल्या कवियत्री 'C" नी त्यांच्या पदराला ओढून त्यांना खाली बसवले, यामूळे एकंदरीत सूखावलेला पूरूषवर्ग एकमेकांकडे पाहू लागला)
तर कवयित्री A पूढे म्हणाल्या,
कवयित्री A : " कवितेचे नाव तारूण्यपिटीका..
ऐका... तारूण्यपिटिका आली गाली,
लाल, हिरवी, पिवळी, काळी,
सगळे रंग गाली चढले, आणि
कळले तरूण मी झाले..
( तमाम स्त्री वर्ग आपापले गाल चाचपडून पाहत होता, पुरूषवर्गाने तसा प्रयत्न केला असता, टोकदार सूयांऐवजी हाती काही लागले नाही, आणि आता वस्तरा हातात घ्यायचि गरज आहे हे त्यांना जाणवले)
आता एकंदरीत इतरांनाही संधी मिळावी,म्हणून अ उभे राहून सर्वांना शांत राहण्याची विनंती करणार तोच उभे राहता राहता परत "ट्र्रररर,," असा आवाज आला,आता नेमक्या ठीकाणि उसवलेला लेंगा उसवत उसवत थेट पावलांपर्यंत आला, तेही दोन्ही पायांच्या बाबतीत ( ते हा शेरवानी विकत आणणा-या आपल्या सौभाग्यवतींना मनातल्या मनात शिव्यांची लाखोली देत होते , आता पूढे कोणती शिवी असा विचार करताना त्यांने इकडे तिकडे लक्ष लागेना ) आणि ्खाली बसले ते उभेच राहीनात, सगळे त्यांच्याकडे,पण ते उगाच इकडे तिकडे बघण्याचा आव आणत होते. तेव्हा वेळ मारून न्यायला कवि क उभे राहीले.
कवी क : दोस्तहो, माझ्या कवितेचे नाव आहे... "नवरा"
( समस्त स्त्री वर्गाचे कान टवकारले)
नवरा हा असतो नवरा ( मग काय भोवरा असणार? कवयित्री C हळूच कूजबूजल्या)
तर नवरा हा नवरा असतो,
आणि बायको ही बायको ,
तर बायको ही बायकॊ..
( "कसला psycho आहे हा!" कवियत्रि C आता जरा मोठ्यानंच बोलल्या, ते बहूतेक कवी क नी ऐकले, तसे लागोलाग ते खाली बसले व जाणूनबूजून कवयित्री C ना त्यांनी उभे राहायची विनंती केली, "ही बघू काय करते" असे ते मनातल्या मनात म्हणाले)
कवयित्री C : (पदर चाचपडून)
माझ्या कवितेचे नाव आहे , "भो..." ( मध्येच कुणाचतरी पोर " आई, मूतायला झाली" असं मोठ्याने ओरडले, ज्यामूळे कवयित्री थांबल्या)
तर कवितेचे नाव "भोवरा"
भोवरा फ़िरतो गोल गोल ( कवी क मध्येच वा !! वा ! असे म्हणाले)
जिभेला आला फ़ोड फ़ोड,
जिभेचा फ़ोड फ़ूटला,
भोवरा खाली पडला [:O]
भोवरा खाली पडला,
मला बाई, हसूच आले
( तेवढ्यात ते पोर काम उरकून बाहेर आले, त्याला वाटलं आपल्यालाच बोलतायत.. तेव्हा नाक लाल करून ते अजून मोठ्याने ओरडले, " तुम्हाला होत नाय का हो?"
या वाक्यावर बाईंचे सगळे अवसान गळून पडले आणि त्या खाली बसल्या)
अशा प्रकारे एकेक करून सर्व कवींनी आपापल्या उत्तमोत्तम(?) कविता वाचून दाखवल्यावर आता "अ" नी उठावे अशी सर्वांनी विनंती केली.
"अ" ची पंचाईत.. आता काय?? असा विचार करता करता बराच वेळ जायला लागला, त्यांना काही सूचेना ! तेवढ्यात त्यांनी टेबलावरचा क्लोथ खेचला, कमरेला एकदा गूंडाळून मग डोक्यावर घेतला.
कवी अ : दोस्तहो.. ( पून्हा जोरजोरात टाळ्या, इथे "अ:चा जीव घाबराघूबरा, त्यातच त्यांना कळ पण यायला लागली, कसली काय, नैसर्गिक.. नैसर्गिक आवाज)
मी एका स्त्रीच्या मानसिकतेतून लिहिलेली कविता असल्याने हा वेष घेण्याचा प्रयत्न केला, त्यामूळे जिवंतपणा येतो,
(आधी तयारी केलेली कविता वेगळी असल्याने आता काय बोलायचे हे सूचत नव्हते, त्यात नैसर्गिक call, पण त्यांचा त्यांच्या काव्यप्रतिभेवर(?) पूर्ण विश्वास.. ते सुरू झाले )
मी एक बाई, बाई साडी गं नेसून,
( "मग काय लूंगी नेसेल" कवयित्री C परत पचकल्या)
मी एक बाई, बाई साडी गं नेसून,
नेसली नेसली क्लोथ टेबलाचा,
डोळे भरून पाहते, जन समोरचा,
रंगात येते कविता, आणि रंगते.
मी बाई, साधी गं भोळी,
कूठेतरीच पडली एक ठीगळी,
त्यात वारा वाहतो जोरात,
घोंघावतो नको त्या अंगी..
( कवी अ.. लोकांचा प्रतिसाद पाहून एकदम जोशात येत होते)
माझी जाडजूड चोळी, लूगडं भारी,
पदर भरला, जसा जरदारी,
मी वाहते वा-याने (कळ आली, आता आटोपायचा प्रयत्न म्हणून)
आणि झूगारते सारी बंदी
(या जोशात त्यांनी हातात सांभाळून ठेवलेला टेबल क्लोथ झुगारला, आणि सभाग्रूहात काय झाले? तूम्हीच सांगा)
हर्षदा
प्रतिक्रिया
24 Oct 2008 - 8:45 pm | हर्षदा विनया
मूळ आधी माझ्याच ब्लोग वर आहे..प्रकाशित..
त्याची लिंक
http://www.mymoralcourage.blogspot.com/
aaNi http://www.karadyaachhata.blogspot.com/
24 Oct 2008 - 11:08 pm | प्रमोद देव
प्रयत्न नक्कीच चांगला आहे, पण थोडे संपादन करा त्यात म्हणजे मग अजून चांगले होईल.
पुलेशु!
25 Oct 2008 - 1:16 am | श्रीकृष्ण सामंत
हर्षदा विनया ,
छान लिहिलंय.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
25 Oct 2008 - 8:15 am | अरुण मनोहर
पोटेन्शीयल खूप आहे. तुमचे पुढील लिखाण उत्तरोत्तर प्रगती करेल याची खात्री बाळगा.
फाईन टचेस करायला हवेत.
ए, बी, सी ऐवजी कवींची नावे घातलीत, तर वर्णनाला जिवंतपणा येईल.
( तेवढ्यात ते पोर काम उरकून बाहेर आले, त्याला वाटलं आपल्यालाच बोलतायत.. तेव्हा नाक लाल करून ते अजून मोठ्याने ओरडले, " तुम्हाला होत नाय का हो?"
अशाप्रकारचे वर्णन टाळले तरी लेखाचे काही विषेश बिघडणार नाही.
26 Oct 2008 - 8:34 pm | हर्षदा विनया
धन्यवाद..