इंग्रजी कादंबरी प्रकाशनासंदर्भात माहिती आणि मदत

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
27 Feb 2018 - 12:04 pm

नमस्कार मिपाकर्स,

बर्‍याच दिवसांनी भेट होतेय. तसे मी वाचन मोडमध्ये असतोच आणि काही धाग्यांवर प्रतिक्रियादेखील देत असतो पण आताशा जरा माझा मिपावरचा वावर कमी झालेला आहे. मागील वर्षी मार्चमध्ये आमच्याघरी बाळराजांचे सुखद आगमन झाले. ठरलेल्या तारखेच्या दोन महिने आधीच बाळराजांचे आगमन झाल्याने आम्हाला जवळपास दीड महिना अतिदक्षता विभागात बाळाची काळजी घ्यावी लागली. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत मिपावरच काय इतरत्र कुठेच फारसे जाता आले नाही. असो.

आजच्या या धाग्याचे प्रयोजन मिपावर इंग्रजी कादंबरीच्या प्रकाशनासंदर्भात काही मदत मिळू शकते का हे आहे. मी गेल्या काही महिन्यांमध्ये साधारण एमएस वर्डची २३४ पाने भरतील एवढी इंग्रजी कादंबरी लिहिली आहे. विषय माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, नायकाचे या क्षेत्रातील आयुष्य, अडचणी, लेऑफची भीती, प्रेम, एक रहस्यमय मुलगी, स्टार्ट-अप अशी वळणे घेत बर्‍याच महत्वाच्या प्रश्नांना स्पर्श करणारा आहे. आजचा तरुण आणि आजचे ४०-६० वयोगटातले प्रौढ ही कादंबरी निश्चितच वाचतील आणि त्यातील कथेचा, प्रसंगांचा आनंद लुटतील असा विश्वास वाटतो.

मी बर्‍याच प्रकाशकांना नमुना प्रकरणे पाठवली; परंतु नवोदित लेखकाला जसा अनुभव साधारणपणे येतो तसाच मलाही आला. कुणाचेच उत्तर आले नाही. ही कादंबरी प्रकाशित व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. स्वतः खर्च करून ही कादंबरी प्रकाशित हे बरेच महाग प्रकरण आहे. माझा प्रयत्न असा एखादा प्रकाशक शोधणे जो या कादंबरीचे व्यवस्थित मार्केटिंगदेखील करू शकेल आणि परंपरागत पद्धतीने ही कादंबरी प्रकाशित करू शकेल हा आहे. मराठीतले प्रकाशक ही मदत करू शकतील का याविषयी मला कल्पना नाही. मला पैसे मिळावेत किंवा अमुक इतकाच नफा मिळावा अशी माझी अट नाही. नवीन लेखकाने नफा वगैरेचा विचारही करणे मूर्खपणाचे आहे हे मला माहिती आहे. नवख्या लेखकाला अशा अटी ठेवत येत नाहीत याची मला जाणीव आहे. परंतु अशा पद्धतीने माझी कादंबरी कुणी प्रकाशित आणि वितरित करू शकेल का याबाबत मला माहिती आणि मदत हवी आहे.

या संदर्भात मदत करावी ही माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद!

धन्यवाद,
समीर

साहित्यिकमदत

प्रतिक्रिया

पहिलीच असेल तर किंडलवर प्रकाशित करुन अंदाज घ्या. शुभेच्छा..

बार्नी's picture

28 Feb 2018 - 9:55 pm | बार्नी

पुस्तक इंग्रजी असल्याने r/india आणि r/indianbooks इथे धागा काढल्यास मदत मिळू शकते . तसेच हा

Can we make a list of Publishers in India who can be approached by budding writers?

आणि हा धागाही एकदा बघावा . फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत. तुम्हाला यश मिळो !

समीरसूर's picture

1 Mar 2018 - 1:59 pm | समीरसूर

दोघांनाही मनापासून धन्यवाद! हे करून बघतो.

समीर

आदूबाळ आणि गवि ह्या दोघांना प्रकाशन ह्या प्रकरणाची खूप माहिती आहे.
मद्यंतरी ते दशानन (राज जैन) नामक आयडी असायचे मिपावर. त्यांनाही प्रकाशनाची म्हैती होती. बहुधा ते स्वतःहि करायचे प्रकाशन.

आणि मला तर कित्येकदा वाटते मिपावर लिहिणारे काही लेख असतील तर त्यांची पुस्तके इथेच प्रसिद्द व्हावीत. ई बुकच्या स्वरुपात. आधीच्या लेखनाची झालेली आहेतच पण आता येणार्‍या इच्छुक लेखकांच्या पुस्तकांचे उतरवून घेणेबल पीडीएफ च्या स्वरुपात अगदी प्रॉपर एडिशिंग करुन पीडीएफ पब्लिश कराव्यात मिपाने.
पैशे हा विषय नंतर आपोआप येतो प्रसिध्दीनंतर. तोपर्यंत लेखकाला पदरमोड करावी लागतच असते. मग इथे पब्लिश करायला काय अडचण आहे?