ग्वेंडोलिन ब्रूक्स (१९१७-२०००) ही अमेरिकेतील कृष्णवर्णीयांमधील एक महत्त्वाची कवयित्री होऊन गेली. तिची कर्मभूमी शिकागो शहराचा दरिद्री आणि ओबडधोबड दक्षिण भाग. त्या परिस्थितीत पिचणारी, त्या परिस्थितीतही भोग भोगणारी, अशी माणसे तिच्या कवितांमध्ये उतरली आहेत. तिच्या एका कवितेचे भाषांतर/रूपांतर येथे देत आहे.
- - - - - - - - - - - -
शांती अन् मुक्ता
मुक्ता गेली कॉलेजात
शांती राहिली घरी -
जीवन विंचरून काढलेन
घेऊन बारीक फणी
एकही गुंता ठेवला नाही
सोडवला केसन् केस
असली जिंदा पोट्टी नसणार
धुंडून घेता देश
शांतीला झाल्या दोन पोरी
क्वारंच नाव लावून
मुक्ता-आई-बाबा झाले
अर्धे मेले शरमून
शांती सोडून सगळे झाले
अर्धे मेले शरमून
शांती अखेरचा "येते!" म्हणता
पोरींनी रस्ता घरला
(शांतीनं आपल्या बारीक फणीचा
तेवढा वारसा सोडला.)
कॉलेजमध्ये गेलेली मुक्ता
चिचुंद्रीए बिचारी
एकटीच जीवन जगतेय
जुन्या घरदारी
- - - - - - - - - - - -
(प्रत अधिकाराचे उल्लंघन होऊ नये म्हणून इंग्रजी कविता दिली नाही आहे.)
इंग्रजी कविता येथे वाचून दाखवतो (१ मिनिटाची क्लिप)
Get this widget | Track details | eSnips Social DNA
मराठी भाषांतर येथे (१ मिनिटाची क्लिप) :
Get this widget | Track details | eSnips Social DNA
प्रतिक्रिया
24 Oct 2008 - 10:01 am | विसोबा खेचर
वा धन्याशेठ!
अरे क्या बात है यार...!
कविता तर सुंदरच आहे आणि तू कविता फारच सुरेख म्हणतोस रे! आघात, उच्चार, पॉजेस सगळंच एकदम नाट्यमय आणि कवितावाचन ह्या प्रकाराला शोभणारं! तू एक उत्तम पद्य पर्फॉर्मर आहेस हे ठाऊकच नव्हतं मला!
जियो बॉस, आपा तो साला जिनियस हो! :)
तुझ्या ह्या कवितावाचनाचं कौतुक भाईकाका अन् सुनिताबाईंनी अगदी नक्की केलं असतं! ते दोघे फार सुंदर कवितावाचन करत. मला विशेषत: गुरुजींपेक्षा सुनिताबाईंचं कविता म्हणणं/कविता वाचन अधिक आवडायचं!
असो,
मिपा दिवसेंदिवस अतिशय श्रीमंत संस्थळ होत आहे यात दुमत नसावे..!
आपला,
(धन्याशेठचा फ्यॅन) तात्या.
25 Oct 2008 - 10:27 pm | चित्रा
कविता तर सुंदरच आहे आणि तू कविता फारच सुरेख म्हणतोस रे!
असेच म्हणते.
24 Oct 2008 - 10:12 am | सहज
आवाज सही.
बाकी कविता काय आहे नीटसे समजले नाही. केवळ तर्क... :-( शांतीची पोरगी मुक्ता, मुक्ता बहुतेक सिंगल मदर झाली.. स्टोरी कंटिन्युज?
24 Oct 2008 - 11:11 am | धनंजय
सिंगल मदर झाली ती शांती. तिची बहीण मुक्ता, तिची आई, तिचे बाबा सर्वांना लाज वाटली.
मुक्ता भेदरट चिचुंद्री म्हणून घरात एकटीच राहिली.
24 Oct 2008 - 11:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अर्थ आवडला. खूप छान आहे मूळ कविता आणि भाषांतरही.
अवांतरः इंग्लिश पठण मराठी वाचनापेक्षा जास्त चांगलं वाटलं. का कोण जाणे, मराठीत थोडं नाटकी वाटलं.
अदिती
25 Oct 2008 - 10:38 pm | प्राजु
कविताही छानच आहे..
आपण वाचताही सुरेख. आपली गझल ऐकली होती.. काही कारणाने तो कार्यक्रम करता येणार नाही असे इप्रसारणकडून सांगण्यात आले त्यामुळे तो विषय तिथेच राहिला..
पण आपण तर "अष्टपैलू" आहात..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Oct 2008 - 10:39 pm | चतुरंग
अनुवाद सुंदरच झालाय!
इंग्लिश कवितावाचन एकदम अस्खलित, उच्चार, आवाज, मॉड्यूलेशन फारच छान!
मराठी वाचन सुंदर आहे पण किंचित कृत्रिम वाटलं (रोजच्या वापरात मराठी बोलण्याचा सराव नसल्याचा परिणाम असावा कदाचित)
पण तू एक उत्तम दर्जाचा परफॉर्मर आहेस ह्याची साक्ष देणारं वाचन आहे हे नक्की!
जियो!!:)
चतुरंग
25 Oct 2008 - 11:02 pm | ऋषिकेश
वा! आवाज एकदम छान कसदार आहे तुमचा! वाचनाची पद्धत अतिशय भारी!
कविता फारशी कळली नव्हती.. पण तुमचं वाचन आवडलं
त्यातही इंग्रजी वाचन खूप आवडलं.. मराठी मात्र प्रयत्नपूर्वक चुका होणार नाहित याची दक्षता घेत / काहिशा दडपणाखाली असलेलं वाटलं
-(श्रोता) ऋषिकेश
26 Oct 2008 - 6:56 am | सर्किट (not verified)
धनंजय,
तुझं कविता वाचन ऐकून तू येथे म्हणजे बे एरियात १४ ते सोळा पेब्रुवारीला येणार आहेस का ते कळव.
नव्हे, तू इथे असायला हवाच आहेस.
विरोप पाठवला आहे. कळव.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
26 Oct 2008 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धनंजय,
काव्यावाचन आवडले, शब्दांवर दिलेला जोर आणि आवाजातील चढ-उतार क्या कहने.
कवितेच्या भाषांतरासाठी निवडलेली कविता तितकीच चांगली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे