*****************
अजून एका स्वांतञ्यासाठी....!!
*************************
मातीची महती
गात.
तुक्याचे अभंग घोकत.
रक्ताचं पाणी करतं
नुसता घाम गाळत राहूनचं
रान हिरवं गार करायचं
पण
मातीचं तरी मोल
असत का आमच्या जिण्याला
तुमच्या बंगल्यातल्या कुत्र्या इतकं ही
नशिबवानअाणि महत्वाचं अाम्ही असू
नाही
तरी या देशाचा शेतकरीराजा
अाहे असं समजून
हा देश क्रषीप्रधान अाहे
म्हणून नुसत्या टिरी बडवून
का घ्यायच्या?
शेती तंत्रज्ञान , नवीन
शोध,कार्यशाळा वैगेर असे
खास थाट करून
भाषण छान होतील
पण
रान नसतात पिकत
अशा क्रत्रीम अवसानाने
अाणि हे समजून घ्या
तज्ञाच्या मेंदूला राबवून नाही
निघत घाम
नि रक्ताचे ही नाही होत पाणी
घामाच्या धारानेच माती
भिजून पिकते,फळते
व
रक्ताच्या थेंबाथेंबाने
तिचं माती पेटू शकते
असं तुम्हाला वाटतच नाही ना?
नसेल वाटत पण
शक्यता नाकरता येत नाही
रक्तच सांडवा लागेल का
अजून ......
एका स्वातत्र्यासाठी ...!!
---------------------------------------
परशुराम सोंडगे,पाटोदा
९५२७४६०३५८
-----------------------------------------
प्रतिक्रिया
17 Feb 2018 - 8:06 am | manguu@mail.com
छान
19 Feb 2018 - 10:33 pm | सुखीमाणूस
शेतीकडे दुर्लक्श करण्यात माणसाच्या विनाशाची बीजे आहेत.
लोकसंख्या नियंत्रण आणि शेती आधारित अर्थव्यवस्था अत्यावश्यक आहे.