‘आणि अखेर
करुणेचा कटोरा घेऊन
उभे रहातो खालच्या मानेने
आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी’
बेलवलकरांच्या अस्तित्वाचा गाभारा
नीरव-अतीव शांततेने केव्हा भिजणार?
कोलाहल हा कधी थांबणार?
काळाचा ओघ कधी थिजणार?
सत्वाची विटंबना
स्वत्वाचे विडंबन
अजस्र महाकाय बीभत्स
प्रचंड गदारोळात जो तो आपला
मी माझा
- दिपोटी
प्रतिक्रिया
12 Feb 2018 - 2:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता दमदार लिहिता, लिहित राहा...!
-दिलीप बिरुटे
14 Feb 2018 - 3:32 am | दिपोटी
दिलिपजी,
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!
- दिपोटी