दुखतामां?, दुखतालाचतां,दुखुकच व्होयां(दुखतंना? दुखणारच ते,दुखायलाच हवं)

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
23 Oct 2008 - 10:07 pm

अण्णांना त्यांच्या आयुष्यात दोनदा स्ट्रोक आला.एकदा त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी आणि नंतर दहा वर्षानंतर,म्हणजे पन्नासाव्या वर्षी.पहिल्या खेपेला ते लवकरच बरे झाले.एक तर ते तरूण होते,आणि स्ट्रोक त्यामानाने माईल्ड होता.त्यांची डावी बाजू पर्‍यालेसीसमुळे निकामी झाली होती.पण लवकरच बरे होवून ते कामावर जावू लागले होते.

कामावर जॉईन होण्यापुर्वी त्यांची मेडिकल टेस्ट घेतली गेली.त्यांच्या सांगण्याप्रमाणे डॉक्टरने त्यांना पेन उचलून उघडून द्यायला सांगीतलं .ते त्यांनी केलं पण देतांना उलट करून न देता पेनची बाजू डॉक्टरच्या हातात दिली.त्यामुळे त्यांचं फिझीकल आणि मेंटल काम कोऑर्डिनेट होत नाही असं अनमान काढून त्यांना नोकरीवर नाकारलं होतं.नंतर वरच्या डॉक्टरकडे परत तपासणी केल्यावर त्याने कामावर जाण्यास परवानगी दिली असे ते म्हणाले.त्यामुळे ते नोकरीवर जॉईन झाले.

दुसरा स्ट्रोक जरा जास्त जोरदार असल्याने आणि वाढलेलं वय सांथ न देऊं शकल्याने त्यांचे दोन पाय आणि डावा हात कमकुवत झाला होता.अशा स्थितित ते बारा वर्षे अंथरुणावर पडून होते.आम्ही सर्व त्यांची परी,परीने सेवा करीत होतो.

अण्णाकडून घेण्यासारखं म्हणजे ते कधीही कसलीच कुरकुर करीत नसत.विनोद करीत असत,गम्मती सांगत असत,कडूतले कडू औषध घेण्याची त्यांची तयारी असे,घरचे सर्व हिशोब तोंडपाठ असत.

तर सांगायची गोष्ट अशी की,त्यांना मालीश करायला एक गृहस्थ यायचे.त्यांचं नांव कुष्णमुर्ती.पुर्वी ते सर्कसमधे काम करीत असत.सर्कसचं काम सोडल्यावर व्यायामाचा आभाव आणि खाण्याला अंत नाही त्यामुळे हे गृहस्थ एखाद्या हत्ती सारखे दिसायचे.

अण्णांचं सगळं अंग चोळून चोळून मालीश करायचे.त्यामुळे अण्णा बरे होतील असे त्यांना वाटत होतं.मालीश करून मेंदुतल्या तुटलेल्या नसां(नर्व्झ) परत जोडल्या जातील अशा खुळचटत समजुतीच्या आहारी जाण्याईतके अण्णा अशिक्षीत मुळीच नव्हते.ते म्हणायचे "एकदां माणूस आजारी झाला की सुश्रुषा करणार्‍या इतरावर त्याला अवलंबून रहावं लागतं."

मालीश करायला कृष्णमुर्ती आल्यावर त्याला ते म्हणायचे,
"अंग फार दुखतं हो"
ते ऐकून तो म्हणायचा,
"दुखतांमां, दुखतालाच तां, दुखुकच व्होव्यां"
आणि हा संवाद त्यांचा दोघांचा रोजचाच असायचा.
नंतर हा संवाद आमच्या घरी विनोदाचा विषय झाला होता.

श्रीकृष्ण सामंत

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

23 Oct 2008 - 10:15 pm | लिखाळ

>"एकदां माणूस आजारी झाला की सुश्रुषा करणार्‍या इतरावर त्याला अवलंबून रहावं लागतं."<
खरं आहे.. मुकाट आजारपण भोगायलासुद्धा मनोबल लागते ! तेथे पुस्तकात वाचलेल्या उभारीच्या कल्पनांना अनेकदा थारा नसतो !
--लिखाळ.

श्रीकृष्ण सामंत's picture

23 Oct 2008 - 11:41 pm | श्रीकृष्ण सामंत

लिखाळ ,
एक्दम सहमत
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

रेवती's picture

24 Oct 2008 - 4:34 am | रेवती

अर्धांगवायू झाल्यावर सगळी शुशृषा घरातले सगळे मिळून करीत पण तीचा व्यायाम करवून घेण्यासाठी एक बाई येत. आज्जी त्यांच्याकडे बघून वराचवेळ वाक्य तयार करायचा प्रयत्न करायची. शेवटी त्या बाई गेल्यावर तीचे वाक्य तयार व्हायचे. मग ती ते आम्हाला सांगायची. बाईंच्या छान सिल्कच्या साडीबद्दल तीला बोलायचे असायचे.मग दुसर्‍या दिवशी त्या आल्यावर आई किंवा काकू आठवण करून द्यायच्या व आज्जी त्यांना सांगायची कालच्या साडीबद्दल.
सामंतकाका आपल्या लेखामुळे त्या प्रसंगाची आठवण झाली. आज्जीची आठवण नेहमीच येते. :)

रेवती

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Oct 2008 - 1:11 am | श्रीकृष्ण सामंत

रेवती,
आपल्या आजीची कथा वाचून बरं वाटलं.आजीची आठवण आली हे ही वाचून बरं वाटलं
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

25 Oct 2008 - 7:31 am | विसोबा खेचर

"योगापेक्षा भोग मोठे आहेत.." असं आम्ही नेहमीच म्हणत असतो..

तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Oct 2008 - 8:29 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
मला ही आपल्यासारखंच वाटतं.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com