भाषा - फ्रेन्चचा ढासळता बुरुज

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
23 Oct 2008 - 2:35 pm

गेल्या महिन्यात एक घटना घडली. जगाच्या दृष्टीने म्हटले तर अगदीच क्षुल्लक वाटणारी. भारतातील वृत्तपत्रात तर शेवटच्या पानावरदेखिल तिला स्थान मिळाले नसावे. पण फ्रान्समध्ये मात्र त्या घटनेने मोठा गदारोळ उठला.

अशी काय होती ती घटना?

रवांडा हा अफ्रिकेतील एक टिनपाट देश. अधिकृत भाषा फ्रेन्च. पण गेल्याच महिन्यात रवांडा सरकारने इंग्लीश ही अधिकृत भाषा करण्याचे संकेत दिले. येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांत फ्रेन्चऐवजी इंग्लीश शिकविण्याचे ठरविले. आणि फ्रान्समध्ये हलकल्लोळ माजला!

आपल्या भाषेविष्यी, जगातील तिच्या स्थानाविषयी फ्रान्स अतिशय हळवा आहे. आपल्या भाषेच्या जपणूकीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायचीही त्याची तयारी असते. मात्र वारे आता इंग्लीशच्या दिशेने वाहताहेत, जागतिक स्पर्धेत इंग्लीशबरोबरची लढाई आपण दोन शतकांपूर्वीच हरलो आहोत हे कळूनही न वळण्याची त्याची वृत्ती मात्र अनाकलनीय आहे.

मानवी इतिहासात असे कालखंड येऊन गेले की, त्या त्या कालखंडात एखादी भाग्यवान भाषा आपल्या मूलस्थानापेक्षाही अधिक मोठ्या भूभागावर प्रभाव गाजवून गेली.

एक काळ संस्कृतचा होता. पार मलेशिया-इंडोनेशिया पर्यंत तिचा प्रभाव गेला होता. तेथिल स्थानिक भाषांवर आजही संस्कृतचा प्रभाव जाणवून येतो.

अलेक्झांडरच्या स्वारीनंतर शेकडॉ वर्षे - ज्याला बायझेंटाइन काळ म्हणतात - तेव्हा ग्रीक भाषेने हे वैभव भोगले.

मध्ययुगीन काळात फ्रेन्चचा दबदबा होता. रशियापासून ते इंग्लंड पर्यंतचे राजेरजवाडे (हॅनोवर घराण्यातील पहिला जॉर्ज हा अपवाद) तर फ्रेन्चमध्ये बोलीतच पण युरोपातील इतरही धनिक्-वणिक उच्चभ्रू हे देखिल फ्रेन्चमध्ये बोलणे हे अधिक प्रतिष्ठेचे मानीत.

मात्र ह्या सर्वांपेक्षाही इंग्लीशचे भाग्य अधिक थोर आहे! वरील भाषांचे प्रभाव क्षेत्र हे त्या त्या भाषेच्या मूळस्थानापेक्षा मोठे असले तरी तसे मर्यादितच होते. शिवाय प्रभावकाळही काही शतकांचाच होता/असावा. इंग्लीशच्या प्रभावक्षेत्रात संपूर्ण जग तर आले आहेच पण तिचा प्रभावही दीर्घकाळ टिकेल असे दिसते आहे.

इंग्लीशला तीन दाने अतिशय अनुकुल अशी पडली.

पहिले, वसाहतवादाच्या स्पर्धेत इंग्लंडला मिळालेले यश. स्पेन आणि पोर्तुगालच्या नंतर उतरूनही इंग्लंडने मारलेली मजल लक्षणीय होती. खेरीज, तिच्या पूर्वीच्या वसाहतींतून इंग्लीश भाषा केवळ टिकलीच नाही तर, चक्क फोफावली.

दुसरे दान औद्योगिक क्रांतीचे. ह्या क्रांतीची मुहुर्तमेढ इंग्लंडमध्ये रोवली गेली. त्यातून अनेक नवीन शब्द इंग्लीशमध्ये घडवले गेले - उदा रेल्वे - हे शब्द जगभरच्या भाषांत झिरपले गेले.

आणि तिसरे दान - खरेतर त्सुनामीच म्हणायले हवे - ते म्हणजे संगणक आणि इंटरनेट यांचा अमेरिकेत लागलेला शोध. जगातील एकही भाषा ह्या झंझावातातून सुटली नाही.

दिवसागणिक इंग्लीशचा प्रभाव वाढतो आहे. फ्रेन्चमात्र आपल्या गतवैभवाच्या नॉस्टेलजियातून बाहेर पडायला तयार नाहीत. रवांडाच्या निर्णयाने त्याच्या ढासळत्या बुरुजाचा एक दगड कोसळला इतकेच.

समाजविचार

प्रतिक्रिया

नंदन's picture

23 Oct 2008 - 2:59 pm | नंदन

लेखातल्या निरीक्षणांशी सहमत आहे. नुकताच साहित्याचा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखक ल क्लेझिओ यांना मिळाला. त्यावर फ्रान्सच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया 'फ्रेंच संस्कृती/प्रभावाच्या तथाकथित र्‍हासाच्या आरोपाला हे चोख उत्तर आहे' अशी टिपीकल राजकीय होती.

रवांडा वगळले तरी इतर पंचवीस-एक देशांत अजूनही फ्रेंच अधिकृत भाषा आहे. मात्र इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे तिचे प्रभावक्षेत्र ओसरते आहे, हे नक्की. तुम्ही घेतलेला जगातल्या सर्वात प्रभावी भाषांचा धावता आढावा आवडला. कदाचित मँडरीन सोडली, तर इंग्रजीच्या प्रभावक्षेत्राला धक्का लागेल असे वाटत नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

23 Oct 2008 - 4:17 pm | सहज

भाषेविषयक टिपण्णी आवडली. इंग्रजीचे भाग्य / पारडे तुम्ही म्हणालात तसे जरा भारी आहे.

बाकी रवांडा हा अफ्रिकेतील एक टिनपाट देश. मला टिनपाट शब्दाचा नेमका अर्थ माहीत नाही. कोणास माहीत असल्यास सांगावा. प्रथमदर्शनी तरी टिनपाट हा उल्लेख हिणकस वाटतो आहे. सुनिल यांचे लेखन व मत वाचनीय असते म्हणुन विनंती की जमल्यास त्या वाक्यात सुधार करावा. तुम्हाला आवडेल का तुमच्या देशाचा असा हलका उल्लेख कोणि केला तर?

प्रभाकर पेठकर's picture

23 Oct 2008 - 4:28 pm | प्रभाकर पेठकर

मुळ शब्दटिन पॉट असा आहे. पत्र्याचा डबा. 'टिनपाट' हा अपभ्रंश आहे.
कमी महत्त्वाचा, कमी किमतीचा, नगण्य, चिल्लर, हिणकस असा अर्थ डिक्शनरीत दिला आहे.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

प्रभाकर पेठकर's picture

23 Oct 2008 - 4:29 pm | प्रभाकर पेठकर

चुकून दोनदा प्रतिसाद प्रसिद्ध झाला.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2008 - 9:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाषेविषयक टिपण्णी आवडली. इंग्रजीचे भाग्य / पारडे तुम्ही म्हणालात तसे जरा भारी आहे.

लिखाळ's picture

23 Oct 2008 - 4:32 pm | लिखाळ

भाषांच्या प्रभावासंबंधीचा आढावा आवडला. इंग्रजीचे पारडे जड आहे आणि राहिल असेच वाटते.
लेख आवडला.

सहज यांनी टिनपाट शब्द बदलवा असे सुचवले आहे त्याला मी सुद्धा सहमत आहे.
--लिखाळ.

सुनील's picture

23 Oct 2008 - 7:05 pm | सुनील

प्रतिसादकांचे आभार!

सहज / लिखाळ,
तुमचा टिनपाट ह्या शब्दाबद्दलचा आक्षेप समजला. खरे म्हणजे हा शब्द वापरण्यामागे मला रवांडा हा (फ्रान्सच्या) तुलनेने कसा यकश्चित, बिन महत्वाचा आहे, असेच सुचवायचे होते. यात रवांडाला हिणवणे हा हेतू अजिबात नाही. उलट फ्रान्ससारख्या पाच "बड्या" देशांपैकी एकाला, त्यांच्या भाषेला हा (नगण्य असूनही) कसे जाहीर आव्हान देतो, हेच दाखवायचे होते. आणि ते सगळे टिनपाट ह्या शब्दातून ते व्यवस्थित व्यक्त होते असे मला वाटते. दुसर्‍या शब्दाने तो परिणाम कदाचित साधला जाणार नाही.

सुनिल यांचे लेखन व मत वाचनीय असते
कसचं कसचं!

नंदन,
फ्रान्सच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया 'फ्रेंच संस्कृती/प्रभावाच्या तथाकथित र्‍हासाच्या आरोपाला हे चोख उत्तर आहे' अशी टिपीकल राजकीय होती
काय गंमत आहे! खरे म्हणजे हा लेख लिहायला कारणीभूत ठरली ती हीच प्रतिक्रिया. तसा रवांडाचा निर्णय होऊन बराच काळ लोटला होता.

पेठकर,
टिनपाट शब्दाची व्युत्पत्ती इथे सांगितल्याब्द्दल धन्यवाद.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संदीप चित्रे's picture

23 Oct 2008 - 11:29 pm | संदीप चित्रे

आवडला भाषांचा...
फ्रेंचांचे 'इंग्लिशप्रेम' (!) मी ही अनुभवलंय :)

विसोबा खेचर's picture

24 Oct 2008 - 12:23 am | विसोबा खेचर

दिवसागणिक इंग्लीशचा प्रभाव वाढतो आहे. फ्रेन्चमात्र आपल्या गतवैभवाच्या नॉस्टेलजियातून बाहेर पडायला तयार नाहीत. रवांडाच्या निर्णयाने त्याच्या ढासळत्या बुरुजाचा एक दगड कोसळला इतकेच.

वा!

सुनीलराव, उत्तम लेखन...

तात्या.

भास्कर केन्डे's picture

24 Oct 2008 - 12:59 am | भास्कर केन्डे

भाषांच्या जागतिक जडण घडणीचा व सद्य परिस्थितीचा अतिशय मोजक्या शब्दांत व साध्या भाषेत घेतलेला वा लघु-अढावा आवडला.

आपला,
(प्रभावित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

धनंजय's picture

24 Oct 2008 - 3:11 am | धनंजय

आणि मराठी संकतस्थळांवरील हल्लीच झालेल्या लेखांत उपयोगी पडेल असा जागतिक विदा.

फ्रेंच आणि इंग्लिश भाषेत नेमका काय फरक आहे?

लिपी, व्याकरण आणि शब्द या अर्थाने थोडा खुलासा / माहिती दिली तर बरे होईल.

सुनील's picture

24 Oct 2008 - 2:56 pm | सुनील

फ्रेंच आणि इंग्लिश भाषेत नेमका काय फरक आहे?

लिपी, व्याकरण आणि शब्द या अर्थाने थोडा खुलासा / माहिती दिली तर बरे होईल.

मी काही फ्रेन्चचा जाणकार नाही (तसा इंग्लीशचाही फार जाणकार आहे अशातलाही भाग नाही). पण जेवढे ठाउक आहे ते सांगतो.

मूळात इंग्लीश ही इंडो-युरोपियन कुटुंबातील जर्मॅनिक शाखेतील भाषा आहे तर, फ्रेन्च ही त्याच कुटुंबातील रोमन गटातील भाषा आहे.

लिपी - दोन्ही भाषा रोमन लिपीच वापरतात. फ्रेन्च त्यांच्या उच्चाराच्या सोयीसाठी काही अक्षरांवर एक्सेन्ट (आडव्या रेषा) देतात. (जर्मन उमलाऊट देतात).

व्याकरण - (मिपावर व्याकरणावर लिहायला बंदी आहे!) फ्रेन्चमध्ये फक्त दोनच लिंगे आहेत - पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. नपुंसकलिंग हा प्रकार फ्रेन्चांना व्याकरणातही मान्य नाही!

याउप्पर फ्रेन्च व्याकरण मला ठाउक नाही.

शब्द - वर सांगितल्या प्रमाणे, इंग्लीशमधील बरेच शब्द हे जर्मन मूळ असलेले आहेत (विशेषतः क्रियापदे) तर फ्रेन्चची बरीच शब्दसंपदा लॅटीनमधून आलेली आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदन's picture

24 Oct 2008 - 10:48 pm | नंदन

१. काही अपवाद असले तरी इंग्रजीपेक्षा फ्रेंच स्पेलिंग आणि उच्चार बरेचसे फोनेटिक आहेत.

२. इंग्रजीत - किमान विलायती आणि अमेरिकन इंग्रजीत, एखाद्या शब्दाचा उच्चार करताना त्यावर कुठे जोर द्यायचा हे महत्त्वाचे आहे. फ्रेंचमध्ये तसे नाही.

३. कर्माचे लिंग माहीत असणे महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे प्रेपोझिशन (मराठी शब्द विसरलो :(.) बदलते.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विजुभाऊ's picture

24 Oct 2008 - 9:49 am | विजुभाऊ

युरोपीयन भाषा या बहुतांशी रोमन लिपी वापरतात.
इंग्रजी आणि फ्रेंच या शेजारच्या भाषा असूनही लिपी सारखी असुनही वेगळ्या आहेत. फ्रेंच चा पराभाव हिण्यामागचे कारण इंग्लंड मधली इम्ग्रजी नसून अमेरिकेतली इंग्रजी आहे
व्यापारासाठी जास्त प्रमाणात वापरली जात असलेली भाषा म्हणून तिचा प्रभाव वाढला
शिवाय नवे शब्द आत्मसात करणे हा इंग्रजीचा सर्वात मोठा विषेश गुण इंग्रजीचे प्रस्थ वाढण्याचे एक महत्वाचे कारण अहे.
सर्व्हावल ओफ द फिटेस्ट ...हा नियम भाषेलाही लागु होतो.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

अभिरत भिरभि-या's picture

24 Oct 2008 - 3:35 pm | अभिरत भिरभि-या

शिवाय नवे शब्द आत्मसात करणे हा इंग्रजीचा सर्वात मोठा विषेश गुण इंग्रजीचे प्रस्थ वाढण्याचे एक महत्वाचे कारण अहे.

प्रशासकीय अनुमती हा प्रकार फ्रेंचमधे ही आहे काय ? म्हणून ते आणि हे दोन्ही ढेपाळले काय ? :D

स्वाती दिनेश's picture

24 Oct 2008 - 12:35 pm | स्वाती दिनेश

भाषांच्या प्रभावाबद्दलचा लेख आवडला,
स्वाती

स्वाती दिनेश's picture

24 Oct 2008 - 12:35 pm | स्वाती दिनेश

भाषांच्या प्रभावाबद्दलचा लेख आवडला,
स्वाती

अभिरत भिरभि-या's picture

24 Oct 2008 - 3:33 pm | अभिरत भिरभि-या

टोपीकर, वलंदेज असा कोणता शब्द फ्रेंचांबाब्त जुन्या मराठीत होता काय ?
टोपीकर म्हणजे बहुतेक इंग्रज करेक्ट ?

सुनील's picture

24 Oct 2008 - 3:36 pm | सुनील

टोपीकर म्हणजे इंग्रज पण वलंदेजी म्हणजे डच. कदाचित, वलंदेज हा हॉलंडचा अपभ्रंश असावा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिरत भिरभि-या's picture

24 Oct 2008 - 3:41 pm | अभिरत भिरभि-या

सुनिलशेठ,
धन्यवाद. माझा तर्क बरोबर निघाला :)
इतरांना शब्द काय ? पोर्तुगिज आणि फ्रेंचांना ? जर्मन लोकांसाठी शब्द नाही .. बरोबर ?
--
अवांतर
( गेस आणि लॉजिक या दोन्हीसाठी मराठीत एकच शब्द आहे का ? - तर्क)

सुनील's picture

24 Oct 2008 - 4:24 pm | सुनील

पोर्तुगिजांना बहुधा फिरंगी हा शब्द वापरीत. सध्या फिरंगी हा शब्द सर्वच परदेशींना सर्रास वापरतात.

फ्रेन्चांचा मराठ्यांशी थेट संबंधच आला नाही. म्हणून कदाचित त्यांच्यासाठी वेगळा शब्द नसावा.

जर्मन हे सर्वात अयशस्वी वसाहतकार. तसा त्यांनी अफ्रिकेत प्रयत्न केला होता पण तो फसला. भारतात तर ते आलेच नाहीत!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कलंत्री's picture

24 Oct 2008 - 10:19 pm | कलंत्री

जर्मनीचे जहाज भारतात येण्याच्या मार्गावर होते, पण त्याला अपघात झाला आणि ते जहाज बुडले आणि जर्मनीचा प्रयत्न संपला. ( १४९८ च्या सुमारास).

सखाराम_गटणे™'s picture

24 Oct 2008 - 10:26 pm | सखाराम_गटणे™

मी तर समजत होतो,
जर्मेन खुप चिकट असतात.

तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

झकासराव's picture

24 Oct 2008 - 11:12 pm | झकासराव

( गेस आणि लॉजिक या दोन्हीसाठी मराठीत एकच शब्द आहे का ? - तर्क)>>>>>>
गेस म्हणजे अंदाज आणि लॉजिक म्हणजे तर्क.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao