ग्रहण

फुंटी's picture
फुंटी in काथ्याकूट
31 Jan 2018 - 12:37 pm
गाभा: 

ग्रहणाच्या निमित्ताने whatsapp फेसबुक वर अनेक पोस्ट वाचनात आल्या.हे करा,ते करू नका ,गर्भवती स्त्रियांनी घ्यायची काळजी वगैरे वगैरे.....अशा स्वरूपाच्या सगळ्या पोस्ट होत्या...वैज्ञानिक अंगाने या गोष्टींवर कुणी बोलताना दिसत नाही.या सगळ्या गोष्टीना शास्त्रीय आधार किती आहे ?? की लोकांच्या मनस्थितीचा फायदा घेऊन असे मेसेज पसरवले जातात?? अशा वेळ खर खोट न करता केवळ बचावात्मक पवित्रा(कशाला उगाच रिस्क) म्हणून अशा रूढी पाळल्या जात आहेत असे लक्षात येते.तंत्रज्ञान ,विज्ञानाची जशी अधिकाधिक प्रगती होते आहे तशी तशी समाजात अंधश्रद्धा वाढत आहे असे स्पष्ट जाणवते.

प्रतिक्रिया

छे छे! हे सगळं अगदी शंभर टक्के खरं आहे, तुम्हांला माहीत नाही?

तंत्रज्ञान ,विज्ञानाची जशी अधिकाधिक प्रगती होते आहे तशी तशी समाजात अंधश्रद्धा वाढत आहे असे स्पष्ट जाणवते.

अगदी खरंय. शिक्षणाने लोकांमध्ये चिकित्सक, वैज्ञानिक दृष्टी रूजवल्याचे आपल्याकडे तरी जाणवत नाही.
माझा बॉस आत्ताच सांगून गेला, खडीसाखरेचं पाणी किंवा तुळशीची पाने खा गेलास की लगेच, म्हणजे ग्रहणाचा दोष नाही लागणार. ऑफिसमधला दुसरा एक सहकारी म्हणत होता, 'अरे, ये सब सायंटिफिक है, हमारे वेदों मे ऐसी ही थोडी है ये सब.' ग्रहणाचा माणसावर परिणाम होणार यावर माझ्या ऑफिसमधल्या बहुतांशांचा विश्वास दिसला. यातल्या काहींशी वाद घालून पाहिला. 'एवढा मोठा समुद्र पण त्याला भरती ओहोटी येते चंद्र- पृथ्वी गुरूत्वबलामुले, मग माणसाची काय बिशाद, होणारच की परिणाम' अश्या धाटणीचा प्रतिवाद झाला. गर्भातल्या बाळावर होणार्‍या परिणामासंबंधी जर्मनीत सम्शोधन झाल्याचे एकाने सांगितले. 'कुठे' विचारल्यास सांगता आले नाही. एकूणातच 'बाबा वाक्यं प्रमाणम' असा सगळा भोंगळ कारभार आहे.
'आमचे अजून ग्रहण सुटले नाही' हा निबंध आगरकरांनी १२०- १३० वर्षांपुर्वी लिहिला असेल. त्याचे अजूनही समयोचीत असणे हे आपले केवढे मोठे दुर्भाग्य!

मराठी कथालेखक's picture

1 Feb 2018 - 3:42 pm | मराठी कथालेखक

आमचे अजून ग्रहण सुटले नाही' हा निबंध आगरकरांनी १२०- १३० वर्षांपुर्वी लिहिला असेल

रंजक.. हा निबंध वाचायला मिळेल का कुठे ? एकूणातच आगरकरांबद्दल फारसं काही माहीत नाही. पण आता वाचायला आवडेल. काही दुवे असतील तर कृपया द्या.

पुंबा's picture

1 Feb 2018 - 3:53 pm | पुंबा

https://msblc.maharashtra.gov.in/pdf/newpdf/next47/%E0%A4%86%E0%A4%97%E0...

वरील दुव्यावर पान क्र. १०४ वर हा लेख मिळेल. आम्हाला शाळेत अभ्यासाला होता.

मराठी कथालेखक's picture

1 Feb 2018 - 6:09 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद
अनेक महत्वाच्या विषयांवर आगरकरांचे लेख दिसत आहे.. नक्कीच वाचेन

स्त्रियांना व्यावहारीक शिक्षण, कंफर्टेबल कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य, सुधारणेचा आग्रह धरताना नैतिक मुल्ये कशी जपावी यांसंबधी, घटस्फोटासारख्या आजदेखिल टॅबू असणार्‍या गोष्टीचा पुरस्कार अशा किती तरी गोष्टींवर या लेखसंग्रहात आगरकरांनी स्पष्ट मते मांडलेली सापडतील. आजदेखिल काही प्रतिगाम्यांना ती वाचून घेरी येईल, तेव्हातर त्यांना किती त्रास सहन करावा लागला असेल. पुण्यासारख्या शहरात ब्राह्मण कुटुंबात राहून कर्मट सनातन्यांशी कायम दोन हात करत सुधारणेचा झेंडा घेऊन काम करत राहणं प्रचंड ग्रेट वाटतं. माझा सर्वात आवडता लेख आहे 'बोलके सुधारक व कर्ते सुधारक'.
इष्ट असेल ते बोलणार आणी साध्य अस्ले ते करणार हा त्यांचा बाणा अंगात बाणवला तर आजचे किती तरी प्रश्न सुटतील.

मुक्त विहारि's picture

1 Feb 2018 - 7:45 pm | मुक्त विहारि

लेख दिसत नाहीत.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2018 - 6:10 am | मुक्त विहारि

गूगल क्रोम वर ओपन होत नाहीत.

धन्यवाद.....

पगला गजोधर's picture

31 Jan 2018 - 11:17 pm | पगला गजोधर

ग्रहणाच्या निमित्ताने whatsapp फेसबुक वर अनेक पोस्ट वाचनात आल्या.

.

एक एकदम गोरीचिट्टी मुलगी व एक कृष्णवर्णीय मुलगा, यांनी शेजारी शेजारी, गालाला गाल लावून काढलेली सेल्फी, मला
whatsapp वर, ' जस्ट ग्रहणा पूर्वी काहीच क्षण आधीचा फोटो', असं लेबलसाहित आलाय.

पिवळा डांबिस's picture

31 Jan 2018 - 11:42 pm | पिवळा डांबिस

आम्ही गोरे असल्याने आता गालाला गाल लावून सेल्फी काढण्यासाठी एखादी कृष्णवर्णीय महिला शोधणे आले!
काकूलाच सांगतो शोधायला! ;)

सुबोध खरे's picture

1 Feb 2018 - 9:10 am | सुबोध खरे
सुबोध खरे's picture

1 Feb 2018 - 9:11 am | सुबोध खरे

काल चंद्रग्रहण असल्याने दवाखान्यात एकही रुग्ण आला नाही असाच अनुभव मागच्या ग्रहणाच्या वेळेस आला होता. पुरोगामी महाराष्ट्रात आजही लोक असा विचार करतात याचे वाईट वाटते.
गेल्या काही दिवसात अर्धा डझन बायकांनी तरी विचारले की ग्रहणाचा बाळावर काय परिणाम होतो?
एक फायदा झाला गणेश घाट मिठागर रोड मुलुंड पूर्वला जाऊन शांत पणे भरपूर वेळ ग्रहण पाहता आले.

सुबोध खरे's picture

1 Feb 2018 - 9:11 am | सुबोध खरे

काल चंद्रग्रहण असल्याने दवाखान्यात एकही रुग्ण आला नाही असाच अनुभव मागच्या ग्रहणाच्या वेळेस आला होता. पुरोगामी महाराष्ट्रात आजही लोक असा विचार करतात याचे वाईट वाटते.
गेल्या काही दिवसात अर्धा डझन बायकांनी तरी विचारले की ग्रहणाचा बाळावर काय परिणाम होतो?
एक फायदा झाला गणेश घाट मिठागर रोड मुलुंड पूर्वला जाऊन शांत पणे भरपूर वेळ ग्रहण पाहता आले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2018 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धर्म आणि परंपरावाद्यांचं सरकार आल्यापासून काही लोकांच्या सदसद्विचाराला ग्रहण लागलंय बाकी काही नाही.
मित्रो, ग्रहणानंतर आंघोळ करुन घ्या असं फर्मान दुर्दैवाने आले नाही, हे आमचं नशीब.

झूठों ने झूठों से कहा है, सच बोलो.
सरकारी ऐलान हुआ है, सच बोलो.
घर के अंदर...झूठों की एक मंडी है,
दरवाज़े पर लिखा हुआ है सच बोलो.
(राहत इंदोरी)

-दिलीप बिरुटे
(पुरोगामी मिपाकर)

sagarpdy's picture

1 Feb 2018 - 2:23 pm | sagarpdy

उगाच कायपण !

असं फर्मान दुर्दैवाने आले नाही, हे आमचं नशीब.

:))

पुंबाशी सहमत

माहितगार's picture

1 Feb 2018 - 3:41 pm | माहितगार

...असं फर्मान दुर्दैवाने आले नाही,

जास्त वेळा स्नान हे तब्येतीसाठी तसेही उपकारकच असते. :) पण ज्यांच्या गावी पाणि टंचाई पाचवीला पुजली आहे त्यांना धास्ती वाटणे स्वाभाविक आहे. :) )

अवांतर बाकी सर पाचवीला पुजणे हा वाकप्रचार लिहिता लिहिता आला ? ह्या वाक्प्रचाराचा उद्गम काय आहे ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2018 - 4:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाळ जन्माला आलं की पाचव्या दिवशी विशिष्ट देवदेवता येऊन बाळाचं नशीब लिहितात म्हणे. आयुष्यभराची कुंडली त्या दिवशी अंतिम होते. म्हणून आलेल्या देवदेवतांचं पूजन त्या दिवशी होतं असं सांगोवांगी माहिती आहे.

पाच लहान दगड मांडतात आणि त्या दगडांना देव माणुन बाळाचं डोकं त्यावर टेकवतात. बाळाच्या गळ्यात काळा दोरा बांधून सोन्याचं पदक घालतात. घरातल्याच लोकांनी हा विधी करायचा असतो. बाहेरच्या लोकांना बोलावलं तरी लोक जात नाही.

बाळाचं आयुष्य रायटिंग् होत असल्यामुळे कदाचित इतरांची सावली (व्हायरस) त्याच्या आयुष्यात येऊ नये असेही असावे.

पाचवी, छटी, बारवी. असे सर्व बाळ पूजेचे आणि देवपूजेचेदिवस असावेत. बाकी अजून कोणाला काही माहिती असेल तर सांगवी. केवळ माहिती सांगवी. उगाच अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये असे सुचवावे वाटते.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

1 Feb 2018 - 4:57 pm | माहितगार

ओह ओके. हे सगळे माहित नव्हते. आमच्या पाचवीच्या वेळी मिपा नव्हते तरीही पाचवीच्या कुंडळीत लिहिल्या प्रमाणे आन्ही प्रतिसाद देत असतो म्हणायचे :)

सुबोध खरे's picture

1 Feb 2018 - 9:59 am | सुबोध खरे

धर्म आणि परंपरावाद्यांचं सरकार आल्यापासून काही लोकांच्या सदसद्विचाराला ग्रहण लागलंय बाकी काही नाही.
चश्मा उठाओ, फिर देखो यारो
दुनिया नयी है, चेहरा पुराना

काही बोलायचे आहे पण बोलणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2018 - 2:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं म्हणतात की, महिलांनी कुंकवाच्या बोटाला, तराट मित्र मंडळाने दारुच्या घोटाला, आणि मिपाच्या धाग्यावर प्रतिसाद लिहायला अस्सल मिपाकरांनी कधी ''ना'' म्हणू नये. :)

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

1 Feb 2018 - 3:33 pm | माहितगार

असं म्हणतात की, .....आणि मिपाच्या धाग्यावर प्रतिसाद लिहायला अस्सल मिपाकरांनी कधी ''ना'' म्हणू नये. :)

या निमीत्ताने गुरुवर्यांना शिष्याचा प्रणाम !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2018 - 4:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमचे आवडते माहितगार मित्र. _/\_

बाय द वे, लोकांना या ग्रहणाचं मेंटली प्रेशर दिसतं. आणि त्यामुळे निर्णय क्षमता कमी होऊन अपघाताची शक्यता वाढीला लागते, असे वाटले.

-दिलीप बिरुटे

हो. अगदी. ग्रहणाच्या काळात काळजी घेतलीच पाहिजे. सायंटिफिक आहे ते सगळं. त्यामागचं शास्त्र समजून घ्या. वेव्हज, gravity, क्वांटम, मेग्नेटिक, फ्लूइड असं सगळं आहे त्यात. रेडिएशन मुख्य. खूप पूर्वीच हे आपल्या ऋषींनी सांगून ठेवलंय.

ग्रहणात अन्न खाऊ तर नयेच पण पोटात चुकून काही असेल तर ग्रहणापूर्वी रेचक घेऊन पोट साफ करावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2018 - 3:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>ग्रहणात अन्न खाऊ तर नयेच पण पोटात चुकून काही असेल तर ग्रहणापूर्वी रेचक घेऊन पोट साफ करावे.

=)) थेट भिडलं.

-दिलीप बिरुटे

पगला गजोधर's picture

1 Feb 2018 - 4:28 pm | पगला गजोधर

ग्रहणात अन्न खाऊ तर नयेच

पिण्याच्या बाबतीत असं काही नियम आहेत का ?

आमच्या अनेक बाबा महाराजांपैकीच ते पण एक....

भरपूर मित्रांचे तितकेच भरपूर महाराज, अगदी वैचारिक ग्रहणच म्हणाना.कोण चिलिम वाल्या बाबांचा भक्त तर कोण जपमाळवाल्या बाबांचा भक्त .हे सगळेच बाबा, पौर्णिमा आली की खूष.(पौणिमेच्या दिवशी मानसिक रूग्णांवर परीणाम होतो का? हा एक संशोधनाचा विषय असेलही, पण उदाहरणे मिळतीलच. कुठल्याही बाबांच्या दरबारात हे असे भक्तगण पौर्णिमेला, एकादशीला आणि अमावस्येला, जे काही करतात, त्यातून संशोधन नक्कीच होवू शकेल.)

मग काय आम्ही पण आमच्या बाबांच्याकडे गेलो.

तिकडे ग्रहण सुरु असतांनाच इथे मात्र बरीच गर्दी.आमच्या बाबांच्या दरबारात खाण्या-पिण्याची चंगळ असल्याने, लोकही प्रसाद म्हणून खात-पित होतेच.नियम पोटा प्रमाणे बदलतात हे न्युटनने काही सांगीतले नाही, त्याच्या बुद्धीला त्यावेळी ग्रहण लागले असावे.

दरबारात एक एक जण येवून, बाबांना काही सांगत होता आणि आम्ही नुसते ऐकत होतो.

एकजण बाबांना सत्यनारायणाचे आमंत्रण द्यायला आला होता.बाबांनी त्यादिवशी कामात असल्याने येवू शकणार नाही असे सांगीतले,मला हळूच म्हणाले, त्यांच्या बायकोला स्वयंपाक करता न येणे, ह्याचे ग्रहण आहे.४ माणसांसाठी ४० माणसांचा स्वयंपाक करतात.अन्न वाया घालवणे हे पण एक सामाजिक ग्रहणच.मी नुसतीच मान डोलावली.आम्ही तरी वेगळे काय करत होतो? जरा पैसा मिळाला की, हिंदी सिनेमांवर खर्च करत होतोच की.आपल्या पैशांनी दुसर्‍या माणसांना पोसायचे, हे पण एक प्रकारचे ग्रहणच की.बाबांच्या संगतीने हे ग्रहण सुटले.

एक बाई म्हणाली.(बुवा तिथे बाया, हा नियम आमच्या पण महाराजांना लागू होतोच.)आमच्या मुलाचे लग्न ठरले आहे.जरा मूहुर्त काढला की लग्नाची पत्रिका घेवून येते.तुम्ही नक्की या.बाबा म्हणाले, आता ह्या आंतरजालाच्या जमान्यात, उगाच पत्रिका छापणार आणि प्रदूषण वाढवणार.त्यापेक्षा सरळ सगळ्यांना मेसेज करा.जितके पैसे वाचतील तितके अनाथांना द्या.अनावश्यक खर्च करणे, हे पण एक ग्रहणच की.(मी मनांत म्हणालो, बाबा हे जर असे सांगत बसले, तर बाबांचा धंदा नक्कीच बुडणार.एखादा छापखानेवाला गाठून द्यायचा आणि दोघांकडून देणगी घ्यायची.पण जाऊ दे....आता बाबांनाच जर पैसे कमवायची अक्कल नसेल तर आपण आपल्या जीभेला ग्रहण लाऊन घ्यावे.)

चार माणसे भेटली की, राजकारणावर चर्चा ही होणारच.कुणाची मती कशी आणि कुणाचे फड कसे रंगतात आणि कोण डरकाळी फोडतो आणि कोण शिट्टी वाजवतो? ह्यावर सुरेख चर्चा चाललेली होती.तर बाई माणसांत मालिकांबाबत.(एक बाई बोलता बोलता म्हणाली, अगं आज माझ्या नवर्‍याची बायको बघीतलीस का?"मी उडालोच. लगेच दुसरी बाई म्हणाली," छे गं आज बघायची राहिली.आता उद्या बघीन.मालिका छान आहे." दुसर्‍याच वाक्यात "मालिकेचा" उल्लेख झाल्याने जरा आमचे वैचारिक ग्रहण सुटले.) इकडून तिकडून सगळ्या व्यक्ती सारख्याच.टी.व्ही.नामक डब्यात डोके खुपसून बसणे, हे पण एकप्रकारचे कौटुंबिक ग्रहणच.

तिसरा एक जण आला.तो म्हणाला मुलाला क्रिकेटचे वेड आहे.त्याला क्रिकेट खेळायला पाठवू का?एकदा का गेला बाजार आय.पी.एल. मध्ये नंबर लागला की झाले.पैशांकडे बघून शिक्षण घेणे, हे पण एकप्रकारचे ग्रहणच की.हे असे काही केले की "रावण होणे" ठरलेलेच.बाबांनी त्याला त्याच्या मुलाची कल-चाचणी करून घ्यायला सांगीतली."स्वतःला अनावश्यक मोठे समजणे किंवा हरबर्‍याच्या झाडावर लगेच चढणे" हे ग्रहण अद्याप तरी बाबांना लागलेले नाही.

तितक्यात एक दरिद्री मनूष्य आला.त्याने एक पुस्तक बाबांना दिले.म्हणाला स्वाक्षरी पाहिजे.बाबा म्हणाले,"अरे पुस्तक दुसर्‍याचे.मी कशी काय स्वाक्षरी करणार.आणि ह्या लेखकाने जे काही लिहिले आहे.तितके जरूर वाचा."बाबा म्हणाले, हा एक येडा मनूष्य आहे.कपडे लत्ते, खाणे पिणे, गाड्या उडवणे, ह्यावर पैसा खर्च न करता, नुसतीच पुस्तके घेत बसतो.सध्या तरी ह्याला इतर गोष्टींची ग्रहणे लागलेली नाहीत."

मी पुस्तक बघीतले.तर "दासबोध."

आम्हाला अद्याप तरी, "कोण सांगत आहे?" ह्याचे ग्रहण लागलेले नसल्याने, बराच फायदा होतो. बाबा महाराजांची कृपा. त्यामुळे त्या व्यक्तीच्या बाह्य स्वरूपावर न जाता, दरबारातून पळ काढला आणि लगेच पुस्तक परत एकदा वाचायला घेतले.

या परमपूज्य बाबांना कोणत्यातरी सरकारी हुदयावर पाचारण करा (मुख्यमंत्री, गृहमंत्री अथवा कमिश्नर, RTO अधिकारी वगैरे..वगैरे). अश्याने खुप ग्रहणे सुटतिल सामान्य लोकांची..

सिंहासन सिनेमातल्या दिगू चे एक वाक्य आहे,"हे देवाला पण विकत घेतील."

आमच्या दुर्दैवाने, बाबांनी "सामना आणि सिंहासन" हे दोन्ही सिनेमे बघीतले असल्याने, ते अशा गोष्टीत भाग घेत नाहीत.शिवाय त्या काळातल्या वक्तींची आता बरीच उत्क्रांती पण झाली आहे."अण्णा, भाऊ, दादा," असे म्हणत कधी अंतराळ दाखवतील, काही सांगता येत नाही.असे बरेच अण्णा, भाऊ, दादा, आपल्या आसपास आहेतच.

इथे परत कौटिल्य येतो, "मासा जसा तळ्यातील किती पाणी पितो? हे सांगता येत नाही.तसेच अधिकारावर असलेला मनुष्य किती भ्रष्टाचार करतो? हे सांगता येत नाही."त्यामुळे अशी माणसे पदे स्वीकारत नाहीत. उदा. गाडगे महाराज.कोट्यावधी रुपये गोळा करून देखील, त्याचे विश्र्वस्त वेगळेच होते.त्यांच्या मुलांना पण त्यांनी विश्र्वस्त म्हणून नेमले नाही.

अशा व्यक्ती आपल्या देशात सतत जन्म घेत नाहीत, हे आपल्याच देशाचे ग्रहण.

अरेरे....... आम्हाला वाटले की परमपूज्य बाबा हुद्यावर गेले की नविन काही गमती वाचावयास मिळतील........
पण आता परमपूज्य बाबांचि च इच्छ्या नाही त्याला आम्ही बापड़े काय करणार.......
सुन रहा है न तू...............रो रहा हु मै..........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2018 - 5:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ग्रहण चालू असताना चखना म्हणून खेकडे खाऊ नये असे म्हणतात किती खरं आहे ?? ;)

-दिलीप बिरुटे

आपल्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी असे सांगू इच्छितो की तुम्हाला हे शास्त्र नीट समजलेले नाही किंवा समजून घेण्याची इच्छा नाही.

तुम्ही "इन ट्यून विथ द मून" वाचलंय का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2018 - 5:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मूळ धागा हा ग्रहणाबद्दलच्या काही समजाबाद्दल होता, त्यात माझ्याकडून खेकडे आणल्या गेले. दिलगीरी व्यक्त करतो.

"इन ट्यून विथ द मून" हा ग्रंथ ग्रहणाबद्दल आहे की खेकडे कसे खावेत याबद्दल आहे ? चाणक्य लेखक आहेत का ??

=))

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2018 - 8:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

IMG-20180201-WA0021
ग्रहण पाहण्याची नवी पद्धत..... ;)

IMG-20180201-WA0044
( ग्रहणाच्यावेळी रिकामं तरी कसं राहावं माणसाने)

(छायाचित्र वाट्सॅपच्या सौजन्याने)

-दिलीप बिरुटे