शुद्धलेखनावर आलेल्या एका प्रतिक्रियेला प्रतिसाद
मनुवादी आचरटपणा
तुम्ही कपडे न घालता बाजारातुन हिन्डता का ?
मग शारदेचा अपमान का करावा
शुद्धलेखनाला मनुवादी आचरटपणा म्हणण्यापुर्वी
स्वतः नागडे फिरुन दाखवा
अशुद्ध लेखनाला विरोध नाही माझा
माझा रोष आहे त्याला मनुवादी म्हणण्याला
तुला जन्म दिला तेव्हा वासनावादी
म्हणाला होतास का तुझ्या बापाला
मनु माझा पुर्वज होता
तो हसतोय तुझ्या या स॑भ्रमाला
कारण द्विज रुपी कल्की जन्मला आहे
तुझ्यासम दुष्टा॑च्या निर्दालनाला
खबरदार जर पुन्हा गरळ ओकलीस
तर सुज्ञपणा हरवील
काय करायचे तुझ्या अधम वाक्या॑चे
सारे निय॑ताच ठरवील
--------------------------द्विज (the revolutionary principle )
प्रतिक्रिया
23 Oct 2008 - 12:40 pm | जैनाचं कार्ट (not verified)
=))
उडालात समजा !
ईनो द्या रे कोणी तरी !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
23 Oct 2008 - 12:54 pm | सखाराम_गटणे™
>>उडालात समजा !
सहमत
पण कविता चांगली आहे.
आम्ही विरोधकांची सुदधा स्तुती करतो.
23 Oct 2008 - 12:57 pm | द्विज
एनोची गरज नाही. सत्याकडे पाठ फिरवणारे तर माझ्यामते साहित्यिक नाहीत
------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो
23 Oct 2008 - 1:00 pm | जैनाचं कार्ट (not verified)
>>>एनोची गरज नाही.
ईनो चा उल्लेख मिपावर एकाद्या विषयावर जळजळ व्यक्त करणा-यासाठी आहे तेव्हा वाईट वाटून घेऊ नका !
** ज्या पोष्टमनाला व त्याच्या सख्या सावत्र भावांना किलोच्या हिशोबाने इनो लागतो ती गोष्ट वेगळी !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
23 Oct 2008 - 1:24 pm | विसोबा खेचर
शुद्धलेखनाला मनुवादी आचरटपणा म्हणण्यापुर्वी
स्वतः नागडे फिरुन दाखवा
हे सांगणारे तुम्ही कोण??
तुला जन्म दिला तेव्हा वासनावादी
म्हणाला होतास का तुझ्या बापाला
माझ्या आवशीशी रीतसर लग्न न करता जर त्याने असे काही धंदे केले असते तर जरूर म्हटले असते!
बाय द वे, शुद्धलेखन/अशुद्धलेखन या विषयात एखाद्याच्या आईबापापर्यंत पोहोचणे ही मनुवादाचीच शिकवण काय? ;)
मनु माझा पुर्वज होता
तो हसतोय तुझ्या या स॑भ्रमाला
हसतील त्यांचे दात दिसतील.. :)
कारण द्विज रुपी कल्की जन्मला आहे
तुझ्यासम दुष्टा॑च्या निर्दालनाला
वाट पाहतो आहे त्या कल्कीची!
काय करायचे तुझ्या अधम वाक्या॑चे
सारे निय॑ताच ठरवील
ठरवू देत ना! साला, घाबरतोय कोण?
बाय द वे, मनुच्या राज्यात ही कविता इथे राहिलीच नसती! ;)
असो, कविता खूप आवडली, छान आहे! :)
तात्या.
23 Oct 2008 - 1:50 pm | घाटावरचे भट
अरे, या द्विजास माफ करा!!!
--ट्रोजन भटोबा
23 Oct 2008 - 3:11 pm | llपुण्याचे पेशवेll
मला आधी वाटले मनुवादी आचरटपणा म्हणजे काहीतरी बसपा वाले लिखाण दिसत आहे..पण कविता छान वाटली.
पुण्याचे पेशवे
23 Oct 2008 - 4:19 pm | ब्रिटिश टिंग्या
बाकी काहीही असो, कविता मात्र आवडली! :)
- लंडनचे पेशवे!
23 Oct 2008 - 7:51 pm | वेताळ
काहिच कळाले नाही.
वेताळ
23 Oct 2008 - 9:03 pm | शेखस्पिअर
...द्विज ऐवजी "द्विधा" नाव समर्पक आहे.
कविता कळाली ...
आरशात बघुन लिहिली का?
23 Oct 2008 - 9:03 pm | चतुरंग
(अनुवादी आचरटपणा)
तुम्ही स्वतःला कवी समजून जालावर बरळंत हिन्डता का?
मग कवितेचा अपमान का करावा
कोणत्याही लेखनाला काव्य म्हणण्याचा आचरटपणा करण्यापूर्वी
स्वतः कविता शिकून दाखवा
कविता लेखनाला विरोध नाही माझा
माझा रोष आहे तो बरळण्याला कविता समजण्याला
तुला 'कविता झाली' तेव्हा वास्तववादी
विचारात होता का तुझा मेंदू?
मनु तुझा पूर्वज होता
तो हसतोय तुझ्या या स॑भ्रमाला! खरंय, हसेलच तो!!
कारण 'रंगा' रुपी विडंबक सावध आहे
तुझ्यासम किंचित कवींच्या निर्दालनाला
खबरदार जर पुन्हा बरळलास
अज्ञपणा दाखवत तर!
काय करायचे तुझ्या गर्दभ वाक्या॑चे
सारे संपादकच ठरवील!
तोपर्यंत प्रेमाचा सल्ला, "चड्डीत रहा ना भौ!!"
--------------------------भजं (the revolutionary idiot)
चतुरंग
23 Oct 2008 - 9:39 pm | भास्कर केन्डे
व्वा!
आपला हजर जबाबी पणा आवडला.
पण मूळ विषय अजूनही कळला नाही. मला वाटले होते सपा, बसपा वा शिवधर्मावाला आहे. पण प्रकरण जरा वेगळेच आहे असे वाटते.
आपला,
(संभ्रमित) भास्कर
आम्ही येथे वसतो.
23 Oct 2008 - 9:53 pm | लिखाळ
कविता आणी विडंबन दोनही छान.
विडंबनातले भजं तर फारच आवडलं :)
तसेही मिपावर आणिबाणीच्या काळात शुद्धलेखनावर चर्चेला बंदी आहे असे वाचले होते..
--लिखाळ.
आणिबाणीच्या काळात मौन पाळणे बरे असते (वासूनाना-तुझं आहे तुजपाशी)
24 Oct 2008 - 12:03 am | विसोबा खेचर
रंगा, शाबास आहे रे बाबा तुझी..! :)
लै भारी विडंबन...
तात्या.
24 Oct 2008 - 4:02 am | बिपिन कार्यकर्ते
रंगाशेठ, भजं मस्तच...
बिपिन कार्यकर्ते
23 Oct 2008 - 9:22 pm | प्राजु
कविता चांगली आहे...
खर्डेकर सर, इतके मनावर घेऊ नका. इथे शुद्धलेखन केलेच पाहीजे असा नियम नाही आहे याचा अर्थ शुद्धलेखनाला विरोध आहे असा नव्हे. नेव लोक लिहिताना चुकतात. पण ज्यांना जाण आहे ते शुद्धच लिहितात.
आणि मिपाकर थोडे खेळकर आहेत. त्यांच्या बोलण्याने असे व्यथित होऊ नका. इथे इनो सारखे शब्द क्रिप्टीक आहेत. हळू हळू समजेल तुम्हाला.. तेव्हा इथला आपला वावर एन्जॉय करा इतकंच मी मिपाची एक जुनी सभासद म्हणून सांगेन. :)
चतुरंग..
एकदमच षटकार...! लगे रहो.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Oct 2008 - 12:34 am | सर्किट (not verified)
आलोच होतो मी नाविण्याची इथे अनुमति घेउन
अज्ञानाचे अलन्कार ह्रुदयावर लेवुन
ह्या कवितेतून कवीला शुद्धलेखनाविषयी वाटणारी कळकळ दिसून येते.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
24 Oct 2008 - 12:43 am | विसोबा खेचर
बर्याच दिवसांनी खास सर्किट -टच असलेला प्रतिसाद वाचला.. :)
असो..!
तसं आमचं आणि सर्किटचं तेवढं सख्य नाही, परंतु इतके दिवस कुठे उलथला होता याची काळजी लागून राहिली होती. आज हजर सभासदात नाव पाहून बरे वाटले! :)
तात्या.
24 Oct 2008 - 4:01 am | बिपिन कार्यकर्ते
तात्याशी सहमत.... फक्त सर्किट टच बद्दल.... :)
बिपिन कार्यकर्ते
24 Oct 2008 - 4:33 am | कोलबेर
अच्छा! म्हणजे आज हजर सभासदात सर्किटचे नाव पाहून बरं नाही वाटलं असंच का? ;)
24 Oct 2008 - 12:48 pm | बिपिन कार्यकर्ते
ओ भाऊ, सकाळी सकाळी मीच भेटलो काय? ;)
'सर्किट परतून आला' म्हणून आम्हाला झालेला आनंद आम्ही त्यांच्यापाशी व्यक्त केलाच आहे. तात्याच्या प्रतिसादातील बाकीचा भाग हे त्यांचं पर्सनल अकौंट मधलं डेबिट-क्रेडीट आहे. मी काय बोलणार? :)
बिपिन कार्यकर्ते
24 Oct 2008 - 4:46 am | धनंजय
आताच नीट वाचली कविता.
कवीचे जे काही मोठ्या कळकळीचे म्हणणे आहे, ते वेगळ्या तर्हेने मांडले असते, तर संदेश पोचू शकला असता. कवीची पहिली उपमा कपड्यांची आहे - ती थोडक्यात सांगितल्यामुळे प्रभावी झालेली नाही. पुढच्या (आणि शीर्षकातल्या) "मनुवादा"कडेच वाचक म्हणून जास्त लक्ष जाते.
मला वाटते की "मनुवाद" मनुस्मृतीच्या कायद्यांच्या संदर्भात वापरतात. कदाचित शुद्धलेखनाच्या संदर्भात अलंकार म्हणून कोणीतरी वापरला असेल ("शुद्धलेखनाचे कायदे"). मनुस्मृती मोठे रोचक पुस्तक आहे. सर्वांनी जरूर वाचावे असे. कवीने मनुवाद म्हणजे पुराणातला आदिपितर मनू, त्याच्याबद्दल वाद, असा काही अर्थ घेतलेला दिसतो.
पण ती उपमा फारशी पुढे रेटण्यात अर्थ नव्हता असे मला वाटते. येथे कवी कल्की होऊन मनुस्मृती धुडकावणार्याचे निर्दालन करतो. म्हणजे बहुधा "मनुवादाचा धिक्कार करणार्या" अशुद्धलेखन करणार्याला कुठल्यातरी विशेष पद्धतीने शिक्षा करणार आहे. पण या अर्थाने अलंकार वापरणे म्हणजे उपमेवर व्याज अतिशयोक्ती होईल.
शाळाशिक्षक आणि संपादक - फक्त हे दोघेच कोणाच्या लिखाणावर लाल रेघोट्या-गोळे काढून कुठले खरेखरचे नुकसान करू शकतात. त्यामुळे कवी "मनुवादाचा धिक्कार करणार्या" अशुद्धलेखकांचे कुठल्या प्रकारे निर्दालन करेल हे समजत नाही - कवी शाळाशिक्षक किंवा संपादक आहे काय? असेल तरीही तो दुसरा लेखक कवीचा विद्यार्थी आहे काय?
शिवाय "द्विज" आणि "मनुवाद" यांचा एकत्र उल्लेख केल्यामुळे कवीला हल्लीच्या जातींच्या राजकारणाशी शुद्धलेखनाचा काही संबंध लावायचा आहे, असे भासते. पण कित्येकदा या शुद्धलेखनाच्या वादात दोन्ही बाजूचे "सवर्ण" (किंवा दोन्ही बाजूचे "असवर्ण") जातीचे लोक सापडतात. त्यामुळे या संबंधाला जोडून कवीला नेमके काय म्हणायचे आहे, ते कळत नाही.
असो. चार स॑केतस्थळांवर हिन्डल्यावर ह्रुदयात ज्या काही नाविण्याच्या कल्पना येतात, त्यांना काव्यबद्ध करण्याबद्दल शुभेच्छा.
24 Oct 2008 - 8:42 am | धोंडोपंत
नमस्कार,
कविता आवडली. शीर्षकाचा विचार व्हावा. शीर्षक जरा भडक वाटते.
शुद्धलेखनाला नावे ठेवणार्यांना चांगली चपराक हाणली आहे.
आपला,
(पंतोजी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
24 Oct 2008 - 11:02 am | सुक्या
त्येचं आसं अस्तय बरका धोंडोपंत सुद्लेकन / असुद्लेकन हे म्हत्वाचं नस्तय. मानुस आन तेचे इचार जास्ती म्हत्वाचे अस्त्यात. म्हंजी बगा, मला कायतरी लिवायच हाय तर त्ये लिवनं म्हत्वाचं. त्ये कसं लिवलय, काना, मात्रा, इलांटी बराबर हाय का नाय हे म्हत्वाचं नसतयं. मानसाचे इचार चार लोकांना कळले म्हंजी झालं. आता काय लिवायचं तेच्यापरीस म्या जर काना, मात्रा, इलांटी ह्यात जर डोकं लावत बसलु तर मला काय लिवायचं त्ये बोंबललं की वो.
आता ज्या लोकांला सुद मराठी लिवता येतं त्ये लिवत्याच की. आन लोकं प्रयत्न करत्यात सुध लिवायचा. एकडाव चुकतील, दोनडाव चुकतील पर शिकतील सुद लिवायला. आता माला तुमी सांगा, तुमी क्याम्पुटर चा किबोर्ड (संगणकाचा कळफलक हो) जेव्हा पयल्यांदा (एकदम पयल्यांदा) वापरला तवा कळ (की हो) शोधताना हाताला आन डोक्याला कळ आली होती का नाय? का तुमी पयल्यांदा बसले आन धाड धाड टायपिंग केली. नाय ना? माणुस चुकतो, आन शिकतो. ग्यानदेवानं सुद मराठीत पोथी लिवली. लय मोठं संत बगा. तसं चोखामेळ्यानं पन आभंग लिवले. त्ये पन मोठे संत. म्हुन म्हंतो काय लिवलं त्ये म्हत्वाचं कसं लिवलं त्ये नंतर.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
24 Oct 2008 - 11:12 am | धोंडोपंत
सहमत आहोत.
तुम्ही माऊलीचे आणि चोखोबांचे नाव घेतलेत. आम्ही भारावलो.
ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा
काय भुललासी वरलीया रंगा?....
आपला,
(चोखोबाचा अनुयायी) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्यांना आम्ही फाट्यावर मारतो.)
24 Oct 2008 - 11:39 am | फटू
कशाला ज्ञानदेव आणि चोखामेळा या महान संतांच्या लेखनाचे दाखले देताय... त्यांनी ज्या भाषांमध्ये लेखन केलं त्या भाषा त्यांच्या वेळच्या बोलीभाषा होत्या...
बोलीभाषा म्हणजे लोकांमध्ये बोलली जाणारी भाषा... माझी बोलीभाषा कोणती तर जी मी रोजच्या व्यवहारात, घरा-दारात वापरतो ती भाषा... तुम्ही वर लिहलेला प्रतिसाद ज्या भाषेत आहे ती भाषा नक्कीच तुमची बोलीभाषा नसावी...
ज्यांना खरंच शुद्ध बोलता लिहता येत नाही त्यांना बोलू दया, लिहू दया त्यांच्या अशुदध भाषेत... त्यांनी शुदध बोलावं किंवा लिहावं हा अटटाहास नको हे म्हणणं एकदम योग्य आहे... किंबहुना त्यांना अशुदध किंवा गावठी म्हणून हिणवणं हे सुदधा असंस्कॄतपणाचं लक्षण आहे...
पण जे शिकलेले आहेत, ज्यांना शुदध बोलता येतं, लिहता येतं त्यांचा हा जाणूनबुजून अशुदध बोलण्याचा अटटाहास मात्र आकलनाच्या पलिकडे आहे... कधी कधी प्रश्न पडतो, इथे शुदधलेखनाची खिल्ली उडवणारे किती जण पुण्या मूंबईसारख्या शहरात घरी दारी वावरताना या त्यांच्या " असुद" भाषेत बोलत असतील... अगदी लांब कशाला, इथले खुप जण जाल अनुदिनी लिहितात... किती जण आपल्या अनुदिनीवर या भाषेत लेखन करत असतील...
वाटतं की जाणूनबुजुन अशुदध बोलणं ही इथली "फॅशन" झाली आहे...
सुक्याभाऊ, हा प्रतिसाद तुमच्यासाठी नाही. तुमच्या प्रतिसादाला उत्तर हे केवळ निमित्त आहे... आशा आहे हे वैयक्तिक नाही हे तुम्ही समजून घ्याल...
(वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत खेड्यात राहिल्यामुळे अशुदध बोललेला)
सतीश गावडे
मी शोधतो किनारा...
24 Oct 2008 - 12:07 pm | मराठी_माणूस
सहमत
ईंग्रजीत चुकीचे स्पेलींग लीहले तर चालेल का ? तिथे कोणी हसु नये म्हणून आपण काळजी घेतो च ना
सुटबूट व्यवस्थीत असायला हवा , पण धोतर कसे ही घातले तरी चालेल असे का ?
माणसाचे विचार मह्त्वाचे असले तरी ते कसे व्यक्त होत आहेत हे ही महत्वाचे आहे. न्,ण्,द,ड, स,श हे जिथल्या तिथे नसले तर वाचायला कसे वाटते. उद्या पासुन जर वर्तमान पत्रे कसही छापायाला लागली तर कसे वाटेल.
इथे ही काही जण रोमन मधे टंकतात तेन्व्हा आपण त्याना 'टंकलेखन सहाय्य" वापरायला सुचवतो. रोमन वापरणे सोपे जाते म्हणून ते प्रथम वापरले जाते पण हा सवयीचा भाग आहे. तसेच शुध्द्लेखना कडे ही सरसकट दुर्लक्ष करण्या पेक्षा हळु हळु प्रयत्न करायला हवा
24 Oct 2008 - 12:19 pm | सुक्या
तुमचा उद्वेग मी समझु शकतो. केवळ शुद्धलेखन ठीक नाही म्हनुन एखाद्यावर टीका करनं किवा एखाद्याला शुद्ध लिहीता येतं म्हनुन हे लिहीलेलं कसं खराब आहे हे जाणुनबुजुन सांगनं हे मला जाला वर फिरताना पाहील्यावर आवडले नाही. काही ठीकाणी तर "मघाशी लेख ठीक वाचता येत नव्हता, परीच्छेदही नव्हते. विरामचिन्हे ही नव्हती. आता ठीक आहे. छान लेख" अशा प्रतीक्रीया पहायला मिळाल्या. या प्रतीक्रीयेतुन नक्की काय सांगायचे आहे तेच कळत नाही.
राहीला प्रश्न "ग्रामीन" लिखानाचा. माझी वरची प्रतीक्रिया ही एखाद्याचे लिखान महत्वाचे असते, लेखकाला काय सांगायचे आहे ते महत्वाचे असते. व्याकरण / शुद्धलेखन हे दुय्यम आहे याचसाठी होती. आयष्याचा बराच काळ मी खेड्यात राहील्याने ग्राम्य भाषेवर जरा जास्तच प्रेम आहे. रोजच्या व्यवहारात हे करता येत नसल्याने कधी कधी त्या भाषेत प्रतीक्रिया देत असतो. हे सारे त्या बोलि च्या प्रेमपोटी. असो.
शुद्धलेखन हा भाषेचा अविभाज्य घटक आहे. पन त्याला अवास्तव महत्व नको एवढेच माझे सांगने आहे.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
24 Oct 2008 - 1:46 pm | विसोबा खेचर
वाटतं की जाणूनबुजुन अशुदध बोलणं ही इथली "फॅशन" झाली आहे...
आहे हे असं आहे! असो...
तात्या.
24 Oct 2008 - 12:01 pm | अरुण मनोहर
अशुद्ध (बोलणे) लिहीणे ही मिपावर 'इन थिंग' आहे असे वाटायला लागले आहे. 'When in Rome, dress like Romans' तत्वाला जागून मीही कित्येकदा तेच करत असतो. पण मला वाटते, ह्यात चांगलं किंवा वाईट हा भाग नाही. कधीकधी लिखाणाची शैली म्हणून अशुद्ध भाषा मुद्दाम वापरली जाते.
उदा.-- http://www.misalpav.com/node/4201
24 Oct 2008 - 12:05 pm | विजुभाऊ
रंगा भौ मस्त विडम्बन
भज विडम्बन भज बिडम्बन भजविडम्बन
बाकी त्या मनुवादी सूद लेखणाबद्दल
सूद ल्ह्या की आसूद ल्ह्या लै फरक पडत नाय
आगदी शीक्षक दीन आसे ल्ह्यु णका म्हंजे झालं.
बाकी त्यो मणू वाद की मनुकावाद त्यो आमाला जर्रा जडच जातु बर्का. कंचीबी भाषा एक प्रमाणवाद मानतच अस्ते
पण प्रमाण म्हंजे एक मार्गीका आहे. त्या मार्गाच्या आगदी इरुद्ध जाउ नका
पन बोली भाषा बी चांग्लीच अस्ते. कंचबी लेखण जोवर त्या अर्थ लोकास्नी कळ्तो तवर सूद्द च अस्ते.
तुम्ही कपडे न घालता बाजारातुन हिन्डता का ?
लहान मूल नागवे हिंडते. ते किती गोड निर्मळ निर्व्याज वाटते....बोली भाषेचे तसेच आहे.
तसेच प्रत्येकाला प्यान्ट शर्ट च असला पाहिजे असे कुठे आहे. पाच वारी साडी / नऊ वारी साडी / इरकल / मद्रासी हाफ साडी हे सगळे पोषाखच आहेत ना? प्रत्येक बोली भाषेला आपले स्वतःचे कपडे आहेत. ते ओळखायला शिका.
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
24 Oct 2008 - 12:20 pm | सखाराम_गटणे™
सहमत
--
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
24 Oct 2008 - 3:28 pm | लिखाळ
अशुद्ध भाषा आणि अशुद्ध लिखाण यावर येथे आणि मनोगतावर अनेकदा अनेक चर्चा झालेल्या दिसतात. पुन्हा पुन्हा त्या होतच राहतात. त्या होऊ दे. पण या संकेतस्थळावर भाषा-शुद्धलेखन या विषयावरील चर्चेला बंदी घातली आहे. आणि असे असताना ही कविता आणि प्रतिसाद येथेच आहेत याबद्दल नवल वाटते. की बंदी शिथील केली आहे? तसे असेल तरी उत्तम !
भाषा कोणतीच अशुद्ध नसते असे काहिंचे म्हणणे आहे. तर अशुद्ध हा शब्द अशूद्ध असे लिहिण्याला काही लोक अशुद्धलेखन म्हणतात असा माझा समज आहे. तुम्ही कोणतीही बोली बोला पण बोली हा शब्द बोलि असा लिहू नका असे म्हणणे असते. त्यामुळे 'गावठी' बोली मध्ये लिखाण करणे आणि शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करणे हे दोन वेगळे प्रकार आहेत असे मला जालावरील तज्ञांच्या लिखाणातून समजले आहे.
प्रमाण मराठीमधले अपेक्षित शुद्धलेखन मला जमत नाही. त्यामुळे या बाबत माझे खास असे काहिच म्हणणे नाही.
--लिखाळ.