समजा दोन सरकारी स्कीम्स आहेत. ह्यांतील कुठली स्कीम जास्त चांगली आहे असे तुम्हाला वाटते ?
१. फक्त अल्पसंख्यांक लोकांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती
२. फक्त अल्पसंख्यांक लोंकासाठी पण फक्त मुलींसाठी शिष्यवृत्ती ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे !
सोर्स : https://twitter.com/realitycheckind/status/953285874136969217
आणखीन : https://twitter.com/TormundsMember0/status/953390737281908736
प्रतिक्रिया
17 Jan 2018 - 4:36 am | रुस्तम
२. फक्त अल्पसंख्यांक लोंकासाठी पण फक्त मुलींसाठी शिष्यवृत्ती ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे !
17 Jan 2018 - 4:44 am | मुक्त विहारि
पण त्यात मुलगा/मुलगी असा भेद नको. पण २च अपत्ये हवीत, असा नियम मात्र हवा.
17 Jan 2018 - 9:33 am | बापू नारू
ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे(पण २च अपत्ये हवीत, असा नियम मात्र हवा)
17 Jan 2018 - 10:12 am | साहना
पहिली स्कीम जास्त चांगली आहे !
"सगळ्यांत गरीब लोक शोधा आणि त्यातील फक्त मुस्लिम मुलींनाच मदत करा !" हे अतिशय वाईट आहे. इथे बिगर मुस्लिम लोकांवर फार अन्याय होतो त्याशिवाय मुलांवर अन्याय होतो तो वेगळा.
आता खालील प्रिन्सिपल वाचा आणि सांगा कि तो चांगला आहे कि नाही ?
"मुस्लिम लोकांना शक्य असेल तिथे जीवनदान द्या आणि जे गरीब मुस्लिम असतील त्यांना प्राधान्य द्या." वर करणी हे चांगले वाटले तरी प्रत्यक्षांत त्याचा परिणाम काय होतो?
बोट बुडत आहे आणि समजा शेकडो लोक गटांगळ्या खात आहेत. इथे फक्त मुस्लिम लोकांना वाचविले जाईल आणि त्यांत गरीब मुस्लिमाना प्राधान्य मिळेल. हे तुम्हाला चालेल काय ?
17 Jan 2018 - 3:44 pm | मुक्त विहारि
असो,
17 Jan 2018 - 11:11 am | श्रीगुरुजी
दोन्ही योजना एकसमान वाईट आहेत.
17 Jan 2018 - 7:47 pm | ट्रेड मार्क
टायटल बघून मला वाटलं तुम्हाला वैयक्तिक मदत पाहिजे.
पण प्रश्न आणि त्यावरचा तुमचा प्रतिसाद बघता रोख आणि पुढची वाटचाल लक्षात आली, त्यामुळे प्रतिसाद द्यायची इच्छा नाहीये.
फक्त सहज दिसलेली विसंगती दाखवून द्यायचा मोह आवरत नाहीये. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि जीवनदान याची तुलना चुकीची आहे.