तो,ती आणि अबोल प्रेम

Primary tabs

mr.pandit's picture
mr.pandit in जे न देखे रवी...
15 Jan 2018 - 6:42 pm

त्याने 'तुझ्यावर प्रेम आहे' म्हटल
तर ती खळखळुन हसते
हो किंवा नाही काहीही सांगत नाही
फक्त्त् थोडी अबोल होते

ती अबोल झाली की
त्याच्याही जीवाची तगमग होते
त्याची होणारी तगमग पाहुन
ती पुन्हा खळखळुन हसते.

त्याच्या या प्रेमापुढे नेहमी
अस्वस्थ् उदास होते ती
तिचही आहे त्याच्यावर प्रेम्
पण सांगत नाही ती

तिच्या अशा वागण्याने
तो ही हतबल निराश होतो
आता थांबायला हव आपण
अस वाटुनही पुन्हा अडकतो

याचा शेवट कसा होईल
हे न त्याला माहीत् न् तिलाही
पण खुप प्रेम आहे तुझ्यावर
हे सांगायचय् कधीचे तिलाही
- निखिल १५-०१-२०१८

कविता माझीकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

15 Jan 2018 - 7:07 pm | पद्मावति

मस्तं. आवडली कविता.

mr.pandit's picture

3 Feb 2018 - 9:52 am | mr.pandit

धन्यवाद पदमावति