प्रेरणा वगैरे

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
19 Dec 2017 - 5:03 pm

'तू माझ्या कवितेची प्रेरणा आहेस....'
असं काही नसतं गं
कारण
तू जवळ असताना
मला कविता लिहावीशी वाटणं
हा तुझा अपमान तरी आहे
.
.
.
किंवा पराभव तरी....

कविता

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Dec 2017 - 5:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रेरणा जवळ असताना कशाला कविता वगेरे करायच्या, कविता काय फावल्या वेळात लिहिता येते.
जवळ आलेल्या प्रेरणेला सोडून इकडे तिकडे पहाण्याचा उद्योग कशाला करायचा?
पैजारबुवा,

चाणक्य's picture

19 Dec 2017 - 6:08 pm | चाणक्य

अहो पैजारबुवा, तेच तर ...

नाखु's picture

19 Dec 2017 - 10:28 pm | नाखु

प्रेरणा कायप्पावर व्यस्त असेल, त्या मध्यंतरात चार ओळी रचल्यात, गोड माणून घेणे.
का वैभवशाली अस्त्र हवं ते ठरवा

अखिल मिपा का कवी प्रोत्साहन, संरक्षण, संगोपन व संवर्धन पुनर्वसन समिती सदस्य