मिपा धुळवडः इतर मिपाकरांची उणीदुणी काढण्यासाठीचा धागा

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in जनातलं, मनातलं
10 Dec 2017 - 5:51 pm

नमस्कार मंडळी,

मी गुजरात निवडणुकांवर काढलेल्या धाग्यावर विनाकारण अन्य कुठल्या तरी धाग्यावरील गुजरात निवडणुकांशी काहीही संबंध नसलेले मुद्दे आणायचा प्रकार घडला हे सर्वांनी बघितलेच आहे. आणि जे काही मुद्दे मांडले होते त्याला मुद्दे न म्हणता एकमेकांची उणीदुणी काढणे हा प्रकार होता हे म्हणणे अधिक योग्य ठरेल. गेल्या काही दिवसात हा प्रकार अनेकदा बघायला मिळालेला आहे.

मिपावर थोडीफार इतर मुद्द्यांवर चर्चा होतेच त्याला नक्कीच ना नाही. तेव्हा गुजरात निवडणुकांवरील धाग्यावर आताच्या निवडणुकांवर चर्चा न होता व्यापक राजकारणावर चर्चा झालेली समजू शकतो. पण जो काही प्रकार तिथे झाला तो तर नक्कीच खटकण्यासारखा होता. मी त्या गुजरात निवडणुकांवरच्या धाग्यावर तयारी करण्यात बर्‍यापैकी वेळ आणि श्रम खर्ची घातले होते. आणि शेवटी त्या धाग्याचा उपयोग एकमेकांची उणीदुणी काढायला झाला हे बघून खरोखर वाईट वाटले. असल्या फालतू प्रकारासाठी व्यासपीठ आपण आपला वेळ घालवून का उपलब्ध करून द्यावे हा प्रश्नही पडला. त्यातही ताज्या घडामोडींच्या धाग्यावर विषय ओपन एन्डेड असल्यामुळे बरेच अवांतर झाले तरी समजू शकतो पण गुजरात निवडणुकांसारख्या अत्यंत क्लोज्ड एन्डेड विषयावरील धाग्यात काहीही संबंध नसलेले मुद्दे का यावेत हे समजण्याच्या पलीकडचे आहे.

हा धागा काढायचा उद्देश हा की ज्यांना अन्य मिपाकरांनी कधीतरी कुठल्यातरी वेगळ्या धाग्यावर काहीतरी लिहिले आहे त्याची चर्चा करायची आहे, एकमेकांची उणीदुणी काढायची आहेत, एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढायच्या आहेत त्याला व्यासपीठ देणे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांनी या धाग्यावर येऊन वाटेल तो धुमाकूळ घाला आणि ज्यांना ते वाचायची इच्छा असेल त्यांनी हा धागा जरूर वाचावा. पण इतर कोणीही लिहिलेल्या चांगली चर्चा अपेक्षित असलेल्या धाग्यावर जाऊन गोंधळ घालू नये ही विनंती.

तेव्हा होऊन जाऊ द्या धुळवड.

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

10 Dec 2017 - 6:06 pm | टर्मीनेटर

_/\_

एमी's picture

10 Dec 2017 - 6:10 pm | एमी

मी त्या गुजरात निवडणुकांवरच्या धाग्यावर तयारी करण्यात बर्यापैकी वेळ आणि श्रम खर्ची घातले होत. >> हे माहित आहे म्हणूनच मी त्या धाग्यावर येत होते!

हा धुळवडीसाठी वेगळा धागा काढून दिलात ते बरं केलंत. संपादकांनी तिकडचे असंबंध प्रतिसाद उडवले किंवा इकडे हलवले तर बरं होईल (सहज शक्य असेल तर)

सॉरी रे ट्रुमना.. तुझ्या कष्टांवर मी अनवधानाने पाणी फिरवले असे वाटत असेल तर संपादक मंडळाने माझे तिथले प्रतिसाद उडवण्यास माझी आजिबात हरकत नाही.

इतर कोणत्याही आरोप प्रत्यारोपांपेक्षा तुझ्या माहितीपूर्ण निवडणुकींच्या धाग्याचे महत्व जास्तीच आहे, त्यामुळे वर लिहिले आहेस तसा विचार करू नकोस.

मार्मिक गोडसे's picture

10 Dec 2017 - 8:29 pm | मार्मिक गोडसे

आवडली कल्पना.

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Dec 2017 - 11:38 pm | माम्लेदारचा पन्खा

जिथे कचरा टाकू नका असं लिहितात तिथंच कचरा टाकला जातो . . . . . .

ह्या धाग्याचा उपयोग होईल काय ?

रंगीला रतन's picture

11 Dec 2017 - 1:35 am | रंगीला रतन

उम्मिद पे दुनिया कायम है...

गामा पैलवान's picture

11 Dec 2017 - 7:03 pm | गामा पैलवान

मापं, प्रश्न अगदी रास्त आहे. भव्य एलीडी स्क्रीनवाला अलिशान संगमरवरी परसकक्ष बांधून दिला तरी उघड्यावर बसायचा मूळ स्वभाव कसा जाईल?
आ.न.,
-गा.पै.

अभ्या..'s picture

11 Dec 2017 - 7:10 pm | अभ्या..

प्रचेतस हा अगदीच होपलेस मिपाकर आहे.
त्याला काहीही सांगून उपयोग नसतो, एकतर तो स्वतःचेच खरे करतो अन्यथा न ऐकल्यासारखे करतो.
;)

अभ्या..'s picture

11 Dec 2017 - 7:16 pm | अभ्या..

असाच अजुन एक कधीच होप्स न बाळगता येणारा मिपाकर म्हन्जे प्राडॉ बिरुटे.
उगी आम्ही सर म्हणतो पण ना कधी मार्गदर्शन देणार ना कधी कौतुक करणार.
जास्त काय टायपले तर उगी सूड काढतील कुठेतरी. सध्या इतकेच.

प्रचेतस's picture

11 Dec 2017 - 7:17 pm | प्रचेतस

हे मात्र अगदी खरं, अगदी केलेल्या खरडींना पण उत्तर देत नाहीत प्राडॉ सर.आणि तू रे लेका, तुझी इच्छा असेल तेव्हा मिपावर ब्यानर लावणार नैतर नई.

बेसिक मस्ती बे, दूसरे काही नाही.
शिवाय आपल्यामुळेच मिपा चालते, आपण कशे सर्वगुणसंपन्न हे मिरवायच्या उच्च परंपरेचे पालन नको का करायला?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Dec 2017 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झाली धूणी धुवून.. कामं करारे....!

-दिलीप बिरुटे
(व्यस्त)

गॅरी ट्रुमन's picture

11 Dec 2017 - 7:17 pm | गॅरी ट्रुमन

हा धागा अप्रकाशित करण्यात यावा ही विनंती. हा धागा काढण्यामागचा उद्देश एकमेकांवर चिखलफेकीसाठी खरोखरच व्यासपीठ देणे हा नक्कीच नव्हता. तर विनाकारण एका धाग्यावरील वैयक्तिक चर्चा दुसर्‍या धाग्यावर त्या धाग्याच्या विषयाशी काहीही संबंध नसला तरी करायच्या प्रकाराविरूध्द होता.

हा धागा यापूर्वीच अप्रकाशित होईल असे वाटले होते म्हणून वाट बघत होतो. पण अजूनही तसे झालेले नाही. तेव्हा लवकरात लवकर हा धागा काढून टाकण्यात यावा ही संपादकांना विनंती. आणि इतर मिपाकरांनी दुसरीकडे कुठेतरी मांडलेले मुद्दे असतील ते तिसरीकडे असंबध्दपणे घेऊन जाऊ नयेत ही पण माझ्यासकट सगळ्यांनाच विनंती.

संपादकांना मी कधी फार कामाला लावलेले नाही. पण आज ते करावे लागत आहे त्याबद्दल दिलगिर आहे.

गामा पैलवान's picture

11 Dec 2017 - 8:14 pm | गामा पैलवान

धागा बंद करणे हा अन्याय आहे. एव्हढा अलिशान, भव्य व सुसज्ज परसकक्ष बांधला तो काय पाडून टाकण्यासाठी?
-गा.पै.

पैसा's picture

11 Dec 2017 - 11:05 pm | पैसा

असाच राहू दे. मी तर म्हणेन दखल मध्ये घ्या. इतर धाग्यात घाण करू नये एवढे काही लोकांना कळले पाहिजे. वर मोठ्या अक्षरात स्वच्छतागृह असे लिहून ठेवले पाहिजे.

संपादक लोकांना सगळे धागे बघायला वेळ नसतो, तेव्हा त्यांचीही सोय होईल. ते भक्त, फेकू, पप्पू सगळीकडे बघून जीव उबून गेलाय. फेसबुकवर एखादा प्युअर जोक शेअर केला तरी तिथे लोक दोन बाजू घेऊन भांडायला लागतात. मी आता कोणाला भांडू नका सांगण्याबदली अजून भांडा म्हणून सांगते.

टवाळ कार्टा's picture

12 Dec 2017 - 11:25 am | टवाळ कार्टा

फेसबुकवर एखादा प्युअर जोक शेअर केला तरी तिथे लोक दोन बाजू घेऊन भांडायला लागतात.

=))

शब्दानुज's picture

11 Dec 2017 - 8:28 pm | शब्दानुज

कुछ तो मिपाकर टाईप करेंगे
मिपाकर का काम है टाईप करना
अपना इतकाच काम है की उनको फाट्यावर मारने का

काय राव मी लीष्ट काढुन आलेलो.

सूडने नक्कल काय केलीन आणि रेवतीटाइम्स बंद झाला. आता पहिला दंडुका आदूबाळा मारणार.

टवाळ कार्टा's picture

12 Dec 2017 - 11:26 am | टवाळ कार्टा

सूड निरागस हो

आदूबाळ's picture

14 Dec 2017 - 11:04 am | आदूबाळ

बघा ना राव. मी माझ्या प्रकाशनव्यवसायाची सुरुवात 'लाईफ अ‍ॅण्ड टाईम्स...' ने करणार होतो. आता तितका सुयोग्य क्यांडिडेट उपलब्ध नसल्याने** कुरडयांचा व्यवसाय सुरू करेन म्हणतो. सूडवर सूड उगवण्यासाठी वांजळे तलावात खाजकुयली टाकायची सोय करणेत आलेली आहे.

**'माई का लाल' हा ग्रंथ माईसाहेब लिहिणार असतील तर फेरविचार करेन.

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2017 - 10:52 am | टवाळ कार्टा

माई का लाल म्हणजे माईंचा सुपुत्र कि माई का लाल झाल्यात असा प्रश्न आहे?

असा माझा एक नाखुनी प्रश्न ;)

आदूबाळ's picture

15 Dec 2017 - 12:05 pm | आदूबाळ

ते समजण्यासाठी ग्रंथ विकत घ्या.

एकमेकांची उणीदुणी काढायला व्यनि आणि खफची सोय आहे ना! धाग्यांवर एकमेकांची जाहीरपणे उणीदुणी काढणाऱ्या मिपासदस्यांना व्यनि आणि खफची माहिती नाही का? एकमेकांच्या भांडणाची जाहिर वाच्यता कशाला? धाग्यांवर एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या सदस्यांना मालकांनी किंवा/आणि संपादक मंडळाने जाहिर समज देऊन नंतर (गरज पडल्यास) त्यांचे सदस्यत्व तात्पुरते/कायमचे बंद करता येणार नाही का?

ईश्वर पिलियन रायडर यांस माझे प्रतिसाद न वाचता स्क्रोल करून पुढे जाण्यास बोटांमधे पुरेसे सामर्थ्य देवो.

असे अजून ८-१० जण आहेत ज्यांनी हे स्क्रोलिंग असह्य आहे अशी तक्रार मांडलीय. त्यांना नंतर शुभेच्छा.

अरुणजोशी यांनी भरपूर विचार करण्याचे नाविपश्यना शिबिर काही मिपाकरांसाठी नम:शांति केंद्राजवळ लोणावळा येथे काढावे.

नाव हिंदूहृयसम्राट बाळ ठाकरे यांच्या निकटचे.
आडनाव अखंड भारत वेड्या देशभक्ताचे
पण यांच्या प्रतिसादातील मोदीद्वेष पाहिला तर एखाद्या जैश-ए-मोहम्मद च्या टेररिस्टचे नाव "स्वातंत्र्यवीर सावरकर" असे निघाले तर जसा धक्का बसेल त्यापेक्षा जास्तच धक्का बसेल.

सुबोध खरे's picture

15 Dec 2017 - 10:00 am | सुबोध खरे

जैश-ए-मोहम्मद च्या टेररिस्टचे नाव "स्वातंत्र्यवीर सावरकर"
हा हा हा
नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा