चंद्रयान - १

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
21 Oct 2008 - 6:47 pm

हे चंद्राकडे जाणारे भारताचे पहिले यान उद्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून अवकाशात झेपावण्याच्या तयारीत आहे. ते सुमारे पांच दिवसांनी चंद्रावर पोचेल आणि त्याच्याभोंवती १०० किलोमीटर अंतरावरून त्याला प्रदक्षिणा घालत राहील. या घिरट्या घालत असतांनाच त्यावर बसवलेल्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे चंद्राविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती ते यान गोळा करणार आहे. चंद्राची पृथ्वीवरून दिसणारी (सशाचे चित्र असलेली ) बाजू तसेच त्याची पलीकडली आपल्याला कधीच न दिसणारी बाजू या दोन्हींच्या पृष्ठभागाचा सविस्तर त्रिमित नकाशा काढणे, चंद्राच्या पृष्ठभागावरील तसेच गर्भातील विविध खनिजांचा शोध घेणे वगैरे उद्देशाने ही निरीक्षणे करण्यात येणार आहेत. मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह, टायटेनियम आदि पृथ्वीवर ब-या प्रमाणात सापडणारी मूलद्रव्ये तसेच रेडॉन, युरेनियम व थोरियम यासारखी दुर्मिळ मूलद्रव्ये यांची चंद्रावर किती उपलब्धता आहे हे यावरून समजू शकेल. अखेर चंद्राचा जन्म नेमका कशामुळे आणि कसा झाला असावा हे समजण्याच्या दृष्टीनेही या निरीक्षणांचा उपयोग होऊ शकेल.

(ही माहिती अवकाश खात्यातर्फे प्रसिध्द करण्यात आली आहे.)

दोन अडीच वर्षांपूर्वी मी चंद्रासंबंधी विविध प्रकारची माहिती गोळा करून ती ३२ लेखांच्या मालिकेतून माझ्या ब्लॉगवर सादर केली होती. ती या दुव्यांवर पाहता येईल.
तोच चंद्रमा नभात - Unicode
तोच चंद्रमा नभात - JPEG

विज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

आनंद घारे's picture

21 Oct 2008 - 6:54 pm | आनंद घारे

पाहण्यासाठी याहू३६० तसेच ब्लॉगस्पॉटने निर्देश दिलेले आहेत त्यांचा उपयोग करावा.

आनंद's picture

21 Oct 2008 - 7:12 pm | आनंद

घारे काका फारच उपयुक्त लेखमाला . चन्द्रा इतकी माहिती आणि ती ही खुपच सोपी करुन,याचे pdf मधे एक चांगले छोटे पुस्तकच होइल.