मराठी दिवस २०२०

मोह

Primary tabs

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
4 Dec 2017 - 8:58 am

मंद धुंद ही हवा...
सहवास तुझा हवा हवा..
नितळ कांतीवरील दवातून..
ओघळू दे गंध नवा!

पहाट वारा... सरसर काटा..
नयन पुष्पे अर्धोन्मलीत ती..
कोकीळ कंठी माळ अडकली;
युगुल कबुतरे मूक होती!

मोहक कटीवर घट्ट मिठी अन्..
कुंतलात त्या मन बहकले!
नव यौवना तू.. मोहक.. सुंदर..
सूर्य किरणांनाही मोह पडे!

प्रेम कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

राघव's picture

22 Dec 2017 - 11:40 pm | राघव

वर्णनात्मक रचना छान. सूर्यकिरणांच्या मोहाची कल्पनाही सुंदर..

पण अगदी राहवलं नाही म्हणून -

- शब्द.. त्यांनी निर्माण केलेली सॄष्टी.. ती भिडायला हवी.. कल्पना प्रत्यक्षात उतरतांना आपल्यालाच "हाssssय..." असं वाटायला हवं.. :-) मूळ कल्पनेच्या ऐवजी दुसर्‍या जागी असं झालं तर रचनेवर अजून काम होणं गरजेचं.

- शीर्षक आणि रचनेचा गाभा यांत थोडं अजून सिंक्रोनायझेशन [मराठी?] हवं.. सूर्यकिरणांना पडलेल्या मोहाच्या अनुषंगानं लिहायचं झालं तर कसं होईल? मुळात कवितेचा चढ जिथं सुरू व्हायला हवा, तिथंच कविता संपते आहेसं झालंय..

- मुक्तछंदात मीटर कडे लक्ष न दिलेलं चालतं. पण लयबद्ध रचनेत मीटरचं पथ्य पाळायला हवं.
मग त्या अनुषंगानं थोडे बदल घडवावे लागतात.. आणिक नवीन शब्द शोधावे लागतात.. तसं करत आपलं शब्दभांडार आपण वाढवत जातो.

आपलं लेखन चांगलं आहे. अजून छान व्हावं म्हणून सांगावं वाटलं. पटलं तर घ्यावं.. नाहीतर सोडून द्यावं.

राघव

ज्योति अळवणी's picture

24 Dec 2017 - 8:59 am | ज्योति अळवणी

धन्यवाद. आपल्या सूचना पुढच्यावेळी लक्षात ठेवेन