माचू पिक्चू - भाग ४

उदय's picture
उदय in भटकंती
26 Nov 2017 - 10:34 am

भाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६

दिवस ३
रात्रभर तुफान पाऊस पडला, पण त्यामुळे की काय, आज हवा खूप छान होती. थोडी वाऱ्याची झुळूक पण येत होती आणि ऊन पण चांगले होते (म्हणजे सनग्लासेस वापरावे लागले नाहीत). आज जरा उशीरा म्हणजे ७ वाजता निघालो.

आजचा प्रवास बऱ्यापैकी फ्लॅट + उताराचा होता (म्हणजे तुलनेत सोपा होता). त्यामुळे सगळेजण आरामात चालले होते. आज फक्त ५ तास चालायचे होते, पण आरामात, सगळीकडे बघत बघत गेलो त्यामुळे ६-६:३० तास लागले. १:३० वाजता कॅम्प साईटवर पोचलो आणि साधारण २ वाजता जेवायला बसलो.

असेच चालता चालता माझ्यापुढे चालणारी चिनी मुलगी अक्षरश: मरता मरता वाचली. ती वॉकिंग स्टिक न घेता उतरत होती. उतरताना अचानक दगडावरून तिचा पाय घसरला आणि उजवीकडे जवळपास १०,००० फुटाची खोल दरी होती त्यात ती घसरत पडू लागली. केवळ तिचे नशीब बलवत्तर म्हणून तिच्या जस्ट मागेच गाईड चालला होता त्याने हात देऊन कसे बसे तिला पकडले. हे अगदी हिंदी सिनेमासारखे वाटले तरी इतके फास्ट झाले की क्षणभर आम्हाला तिघांनाही काही कळले नाही. पण मग काय होतेय ते त्या मुलीला जाणवले तेव्हा तिचा चेहरा अक्षरश: पांढराफट्टक पडला आणि तिचे शरीर खरोखर थरथरत होते. शेवटी गाईडने तिला खाली बसवले, पाणी दिले, कुठले तरी औषध हातावर टाकून वास घ्यायला दिला, तेव्हा २-३ मिनिटांनी She was OK. कुणालाही मृत्यूच्या इतक्या जवळून जाताना मी आजपर्यंत बघितले न्हवते, पण खरं सांगतो, हे सर्व बघून मी पण बराच वेळ सुन्न झालो.शेवटी तिला माऊंटन साइडने चाल, दरीच्या बाजूने नको असे सांगून गाईडने कॅम्प साईटवर आणले. एक चांगले झाले की संध्याकाळी ती तिच्या मैत्रीणीबरोबर मस्त हसत-हसत गप्पा मारत होती. बहुधा सकाळचा प्रसंग विसरली ती.

फोटो: इंका लोक गवतापासून दोरखंड कसा बनवायचे, याचे प्रात्यक्षिक
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: आता एका गुहेतून जायचा रस्ता येणार आहे, ज्यात अगदी वाकून जावे लागते.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: Phuyupata इथे ग्रुप फोटो. हा ट्रेलवरचा तिसरा पास (उंची १२,१०० फूट)
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: अतिशय निसर्गरम्य परिसरात ट्रेलवर जाताना. रात्रभर पाऊस पडून गेल्याने आज हवा पण छान होती.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: अजून एका गुहेतून जाणारा रस्ता. इंका लोकांची खरंच कमाल आहे. किती कठीण परिस्थितीत त्यांनी मार्ग शोधून काढले आहेत ते बघून थक्क व्हायला होते.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: वाटेत अचानक लामा समोर आले.
फोटो: लामाचे पिल्लू

 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: Intipata येथील अजून १ इंका साईट
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: इतका रम्य देखावा होता की तिथून उठावेसे वाटत न्हवते.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: टेरेस
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: भयानक पायऱ्या

 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: नशीब की इथे वर चढायचे न्हवते तर खाली उतरायचे होते. नाही तर काही खरे नाही.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: ऑर्किड

 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: आता फक्त ही इंका साईट पार केली की जेवायला जायचे. भूक लागलीये ना?
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: दुपारचे जेवण
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

आज जिथे दुपारचे जेवण होते, तिथेच रात्रीचा मुक्काम पण होता. जवळच विनेवायना winay wayna म्हणजे चिरतरुण (forever young) येथील इंका साईट होती. माचू पिक्चू ची छोटी प्रतिमाच आहे ही, आणि या दोन्ही जागांची स्पॅनिश लोकांकडून नासधूस झाली नाही, कारण नशीबाने त्यांना माचू पिक्चू आणि विनेवायना या दोन्ही जागा सापडल्या नाहीत.

फोटो: वायना पिक्चू (winay wayna) दरीत खालून वाहणारी उरूबाम्बा नदी वरून मस्त दिसते.
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: शेवटचा भोजन समारंभ म्हणून शेफने खास केक बनवला. "Welcome to Machu Picchu"
 Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

आता उद्या भल्या पहाटे ३ वाजता उठायचे आहे, म्हणून ७-७:३० ला झोपायला गेलो.

(क्रमशः)

इथे टाकलेले फोटो आकाराने लहान आहेत. फोटोवर क्लिक केले तर मोठ्या आकारातले फोटो बघता येतील, जे अधिक सुस्पष्ट आहेत.

प्रतिक्रिया

एव्हढ्या उंचीवर केक बनवला? कमाल आहे! जेवण अगदी छान दिसते आहे. या ट्रेलमध्ये इतकी उत्तम सुविधा पुरवणाऱ्या लोकांना सलाम!

थोडे माचूपिक्चूबद्दलही माहिती द्या.

उदय's picture

26 Nov 2017 - 10:56 am | उदय

अगदी माझ्या मनात पण हाच विचार आला होता की केक कसा बनवला? मी विचारले पण की सोबत घेऊनच आला होता का? पण म्हणे की नाही, आजच बनवला.
माचू पिक्चूबद्दल माहिती पुढील भागात.

पद्मावति's picture

26 Nov 2017 - 2:26 pm | पद्मावति

मस्तच!

सुरेख वर्णन आणि फोटो. पुभाप्र.

अभिजीत अवलिया's picture

27 Nov 2017 - 11:38 am | अभिजीत अवलिया

वाचतोय. फोटो थोडे मोठे करून टाकायला हवे होते.

उदय's picture

27 Nov 2017 - 1:02 pm | उदय

फोटो थोडे मोठे करून टाकले आहेत. फोटोवर क्लिक केले तर मोठ्या आकारातले फोटो बघता येतील, जे अधिक सुस्पष्ट आहेत.
काही काही जण मोबाईलवर बघतात म्हणून छोट्या आकाराचे टाकले होते आणि घाबरत-घाबरत कमीच फोटो टाकले आहेत. जास्त वाटले तर कमी करतो.
धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2017 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

घाबरत-घाबरत कमीच फोटो टाकले आहेत. जास्त वाटले तर कमी करतो.

भरपूर फोटोंचे मिपाकर चाहते आहेत. शिवाय त्यांच्यामुळे लेखाची खुमारी अधिकच वाढते. तेव्हा बेलाशक फोटो टाका ! :)

लेखमाला मस्तं चालली आहे, हेवेसांन !

निशाचर's picture

28 Nov 2017 - 1:59 am | निशाचर

खूप छान चालल्येय लेखमाला. फोटोही मस्तच! जेवणाची एवढी रेलचेल असेल असं वाटलं नव्हतं. वर एस यांनी लिहिल्याप्रमाणे माचूपिक्चू आणि इंका संस्कृतीबद्दल वाचायला आवडेल.

फोटो अवश्य टाका. पुभाप्र

प्रचेतस's picture

28 Nov 2017 - 8:49 am | प्रचेतस

भारी आहे हे सगळं.

एमी's picture

28 Nov 2017 - 12:56 pm | एमी

मस्त!

माचूपिक्चू आणि इंका संस्कृतीबद्दल वाचायला आवडेल. >> +१