अश्वत्थामा

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
6 Nov 2017 - 10:13 am

मनाच्या एका खोलवर
अंधार्‍या कप्प्यामधे कुठेतरी
दडपून टाकलेली तूझी आठवण,....

कधीतरी उफाळून बाहेर येतेच
अचानक, मला नकळत......

आणि मग कोरड्या पडलेल्या
जखमा परत भळभळू लागतात

मनावर मोठा दगड ठेवून
तूला लिहिलेले ते शेवटचे पत्र

इतक्या वर्षां नंतरही.... जसेच्या तसे,
डोळ्यांसमोर नाचत असते,

मला आणि फक्त मलाच माहीत आहे
ते पत्र लिहिण्याचे खरे कारण

पत्रात खरे कारण लिहायची हिम्मत झाली नाही
आणि तूझ्याबरोबर खोटं बोलायच नव्हत,
(तू नेहमी प्रमाणे अचूक पकडलेच् असते)

म्हणून मग शेवटी
नाव लिहायचेही टाळले

बर्‍याच वेळा मी माझी तुलना,
अश्वत्थाम्याशी करतो
पण खरेतर तो सुध्दा,
माझ्या पेक्षा कितीतरी भाग्यवान....

कारण त्याला आपली जखम,
जगापासून लपवावी लागत नाही…

पैजारबुवा,

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

6 Nov 2017 - 10:58 am | प्राची अश्विनी

क्या बात!:)

पद्मावति's picture

6 Nov 2017 - 12:57 pm | पद्मावति

आहा!!

जागु's picture

6 Nov 2017 - 1:18 pm | जागु

छानच.

दुर्गविहारी's picture

6 Nov 2017 - 5:38 pm | दुर्गविहारी

शेवटचं वाक्य म्हणजे परमोच्च बिंदु आहे, या कवितेचा. सुंदर!

चाणक्य's picture

6 Nov 2017 - 11:22 pm | चाणक्य

.

चाणक्य's picture

6 Nov 2017 - 11:21 pm | चाणक्य

झकास हो पैजारबुवा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Nov 2017 - 6:44 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

बुवा, डायरेक्ट आत पोहचली.. जियो..

मेघमल्हार's picture

19 Feb 2019 - 7:39 pm | मेघमल्हार

वाह मस्तच!!

जव्हेरगंज's picture

19 Feb 2019 - 7:43 pm | जव्हेरगंज

क्या बात!!!