नाच नाचूनी अति मी दमले थकले रे नंदलाला
या गाण्यावर कुठल्यातरी एका वर्तमानपत्रात फार अप्रतिम लेख आला होता .... सुरुवातीस गाणं ऐकताना कोणीतरी नर्तकी नाचून दमली आहे असं वाटतं पण नीट ऐकल्यावर काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर या षड्रिपूंच्या पाशात अडकल्यामुळे व्यथित झालेले मन परमेश्वराची सुटकेसाठी करुणा भाकत आहे हे लक्षात येतं असा साधारण या लेखाचा आशय होता ... त्यातच गायिका , संगीतकार , गीतकार यांबद्दलही थोडीफार माहिती होती .
कोणते वृत्तपत्र ते नक्की आठवत नाही पण बहुतकरून महाराष्ट्र टाईम्स किंवा लोकसत्ता यांच्या एखाद्या पुरवणीत हा लेख असावा . लेखक कोण तेही लक्षात नाही . मिपावरच्या कुणी हा लेख वाचला होता का ? वाचला असल्यास लेखकाचे नाव सांगू शकाल का ? किंवा कदाचित ... जस्ट बाय चान्स कोणीतरी सेव्ह करून ठेवला असेल तर इथे किंवा स्वतंत्र धागा उघडून हा लेख देऊ शकाल का ? किंवा कुणी सांगावं ह्या लेखाचा प्रत्यक्ष लेखक / लेखिकाच मिपाची सदस्य असेल .