बागेची गोष्ट.

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
20 Oct 2008 - 10:00 pm

कच्ची तुरट आंबट चिंबट
अशीकशी नावं ठेवत
पेरवाची बाग लुटली कुणी.?
बघा जीभ काळी निळी
चव कश्शी नाही मुळी,
लालडी चोच पुसत पुसत
इकडे तिकडे बघत बघत
रावे म्हणाले हसत हसत.
आम्ही नाही बॉ त्या गावचे !

कविताचौकशी

प्रतिक्रिया

धनंजय's picture

20 Oct 2008 - 10:45 pm | धनंजय

खेळकर कविता.

प्राजु's picture

20 Oct 2008 - 11:55 pm | प्राजु

अतिशय लाघवी आहे कविता.. अल्लड आणि खेळकर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

21 Oct 2008 - 12:01 am | विसोबा खेचर

रामदासभावजी,

छोटेखानी कविता मस्तच बर्र का! :)

तात्या.

चतुरंग's picture

21 Oct 2008 - 12:02 am | चतुरंग

कुठल्या कुठल्या बागेतून भटकत दुपारच्या कविता करत हिंडत असतात कोण जाणे?
पेरवाची बाग काय अन काय ते लुटले जाणे अन काय ती लालडी चोच, आम्ही त्या गावचेच नाही बॉ!! ;)

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Oct 2008 - 12:13 am | बिपिन कार्यकर्ते

च्यामारी, रंगाशेठ, माझ्याही मनात सेम टू सेम विचार आला... जरा लक्ष नीट ठेवायला पाहिजे रामदासकाकांवर ;) नाही म्हणजे एखाद दुसरा पेरू आपल्याला पण मिळेल खायला.

:)

बाकी कविता छानच...

बिपिन कार्यकर्ते

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Oct 2008 - 8:03 am | श्रीकृष्ण सामंत

कविता छान आहे आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

दत्ता काळे's picture

21 Oct 2008 - 3:13 pm | दत्ता काळे

थोरामोठ्यांसाठी आणि लहान-छोट्यांसाठीही सर्वव्यापी कविता

अवलिया's picture

21 Oct 2008 - 3:15 pm | अवलिया

सुंदर

(रावा) नाना

अरुण मनोहर's picture

21 Oct 2008 - 5:41 pm | अरुण मनोहर

जीभल्या चाटत वाचण्याची कविता!

लिखाळ's picture

21 Oct 2008 - 8:24 pm | लिखाळ

कविता आवडली.. मस्तच आहे..
--लिखाळ.