नवीन आहे

आगाऊ म्हादया......'s picture
आगाऊ म्हादया...... in जे न देखे रवी...
21 Oct 2017 - 11:44 pm

एक गझल लिहिण्याचा प्रयत्न आहे. जाणकारांनी जरूर मार्गदर्शन करावे.
विशेष सूचना- हौशे, नवशे, गवशे ह्यांनी दूर राहावे ( हे मिपावर कमी मात्र झुक्या फॅमिलीत विपुल आहेत) व आपापल्या मैत्रिणींना इम्प्रेस करण्यासाठी "मी चंद्र आणेल किंवा का गं सोडून गेलीस मला, एकटे टाकून गेलीस मला " ह्या प्रकारातील काव्य वापरावे जे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
माझी गझल माझ्या नावासहीत देखील सामायिक करण्यास हरकत असलेला अत्यंत पझेसिव्ह असा मी व्यक्ती आहे.

खूप गर्दी दिसते आहे, मला हे नवीन आहे
सरणावर एकांत सरतो, हेही नवीन आहे

धांदल उडते आहे,पण सावरते आहे ती,
जमेल सगळे तीलाही, संसार नवीन आहे

तो काल हसमुख होता, दुःख संपलेसे वाटले,
कालचे सोडा पण आजची, हळहळ नवीन आहे

धीर देऊन हळूच मग, राजीनामा दे म्हणाले,
हसलो फक्त मग म्हणालो,ही पद्धत नवीन आहे

तो पट्टीचा पिणारा, पण आज लगेच चढली,
घोळ काय झाला?, की साकी नवीन आहे?

नक्कीच देणार आहे, ह्या छळाचा परतावा
तुमच्याच मुद्दलावर चढलेले, व्याज नवीन आहे

अश्रू कैक ढाळले, जुने संदर्भ खोडले,
माझ्या लग्नात ती आली, पण नाते नवीन आहे

गेलो तीथेच होतो, पण अनोळखी वाटले,
हिरवी पायवाट लोपली, सिमेंटचा; रस्ता नवीन आहे

आमच्या प्रत्येक भेटीसाठी, ते कारण मागत होते,
लग्न ठरल्यानंतरची, ही शाळा नवीन आहे?

माझे 'असे' रूप पाहून ते थक्क झाले असे ऐकले,
केदार 'तसा' असेलही,पण हा ही खरा अन नवीन आहे

-केदार पाध्ये उर्फ आगाऊ म्हादया

gazalगझल

प्रतिक्रिया

मला पझेसिव्ह लोकांच्या गझला खूप आवडतात.
येऊद्या अजून.

आगाऊ म्हादया......'s picture

23 Oct 2017 - 9:38 pm | आगाऊ म्हादया......

पुढच्या वेळी आणखी तंत्र शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करीन

जव्हेरगंज's picture

22 Oct 2017 - 9:10 pm | जव्हेरगंज

एकदम मस्त!!!

आगाऊ म्हादया......'s picture

23 Oct 2017 - 9:39 pm | आगाऊ म्हादया......
आगाऊ म्हादया......'s picture

23 Oct 2017 - 9:39 pm | आगाऊ म्हादया......