परक्यांनाही आपलसं करतील
असे गोड शब्द असतात
शब्दांनाही कोड पडावं
अशी काही गोड माणसं असतात
किती मोठ भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात !!
.............................
............................
काळाचे बांध फुटून जातात
वाहून जाते पाणी
तरिही मैत्रीचा अंकूर
तग धरुन राहतो
कारण भिजत राहतात
त्या फक्त आठवणी !
...............................
............................
प्रतिक्रिया
20 Oct 2008 - 9:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोड शब्दांमुळे कितीतरी माणसं आपल्या आयुष्यात येतात हे खरं आहे.
आणि त्यांच्या आठवणी विचारांना जराशी फट मिळाली की आपल्या भोवती फेर धरतात, सुंदर कविता !!!
अवांतर : आपल्याला विशेष खरड केली आहे, त्यावर योग्य कार्यवाही करावी. :)
20 Oct 2008 - 9:27 pm | दत्ता काळे
काळाचे बांध फुटून जातात
वाहून जाते पाणी
तरिही मैत्रीचा अंकूर
तग धरुन राहतो
- हे आवडलं