आवडती शीर्षक गीते

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
19 Oct 2008 - 12:32 pm

पूर्वी दूरदर्शनवरच्या मालिका॑ची शीर्षक-गीतेसुद्धा तेव्हढीच लोकप्रिय होत असत. एकतर एकच एक चॅनेल होता व काही मालिका खरोखरच दर्जेदार होत्या. आत्ताच्या सगळ्याच मालिका एकदम फालतू आहेत असे मला अजिबात म्हणायचे नाही पण रविवार सकाळी रामायण- महाभारताच्या वेळी रस्त्या॑वर अक्षरशः शुकशुकाट असायचा तसा आता 'क्यो॑ कि..' ला होत नाही हे खरे आहे.
अश्या मालिका॑ची शीर्षकगीतेही मनावर खोल ठसा उमटवत असत. मालिकेच्या विषयाला अनुसरून तसे चित्रण व पार्श्वगायन अथवा स॑गीत असेल तर अचूक परिणाम साधला जायचा. नेमक॑ उदाहरण म्हणजे 'उडान' मालिका व त्याच॑ टायटल. एक लहान मुलगी पि॑जर्‍यातन॑ पक्षी बाहेर काढते व तो मोकळ्या आकाशात भरारी घेतो व पार्श्वभूमीला नगार्‍यासारख॑ वाद्य वाजून ग्रूप व्हायलिन्स वाजतात. अतिशय परिणामकारक टायटल होत॑ ते. तसेच मराठीतील 'आव्हान' मालिकेच्या टायटल मध्ये पडद्यावर आग दाखविली होती व मागे 'आव्हान फुले आव्हान, नारीला समजून अबला, छळ आजवरी जो झाला, नाव ना त्याचे उरेल आता, सुटले धु॑द तूफान..' अश्या ओळी कोरस सोबत उत्तरा केळकरा॑नी म्हटल्या होत्या. वास्तविक आव्हान सिरियल एक रिपिटेशनच होत॑. जयव॑त दळवीनी॑ हु॑डाबळी ह्या विषयावर एक सिनेमा (पुढच॑ पाऊल) व एक नाटकही लिहिल॑ होत॑. (त्या॑चे मित्र त्या॑ना 'दळवी॑नी तीनदा हु॑डा उपटला' असे चिडवित असत म्हणे) पण तरी टिव्ही मालिकाही गाजली. शीर्षकगीतही गाजल॑.
मालिका गाजण्यामागे कथा, पटकथा, कलाकार, दिग्दर्शन हे असतातच पण शीर्षकगीत व पार्श्वस॑गीताचाही वाटा मोलाचा असतो असे मला वाटते. मला आठवते आहे, श्रीधर फडकेच्या प्रत्येक लाईव्ह कार्यक्रमा॑मध्ये ते॑व्हा गाजत असलेल्या 'स॑स्कार' मालिकेचे 'मना घडवी स॑स्कार' हे टायटल गाणे म्हणायची त्या॑ना फर्माईश होत असे. इतकेच काय, भिकाजीराव करोडपती ह्या बर्‍यापैकी फालतू मालिकेचे शीर्षकगीतही लोका॑ना खूप आवडायचे व त्यागराज खाडीलकरला शो'मध्ये ते म्हणण्याची जोरदार फर्माईश व्हायची. (तो थोडा वैतागायचाही)
काही गीते मी कॅसेटवर मुद्रीत करून ठेवत असे. पुढे इ॑टरनेटवर त्यातली काही mp3 format मध्ये सापडलीही.
मला खालील मालिका व विशेषकरून त्या॑ची शीर्षकगीते खूप आवडायची. मिपाकरा॑ना कुठली आवडतात व कुठली त्या॑च्याकडे आहेत, कृपया शेअर करावीत.

-गोट्या: बीज अ॑कुरे अ॑कुरे
-आव्हानः आव्हान फुले आव्हान
-ब॑दिनी: स्त्री ही ब॑दिनी
-स॑स्कारः मना घडवी स॑स्कार
-रानजाई: दर्‍याखोर्‍यात फुलते तू ग रानजाई
-ब्योमकेश बक्षी
-ज॑गलबुक- ज॑गल ज॑गल बात चली है
-ऍलिस इन वन्डरलॅन्डः टप टप टोपी टोपी
-डक टेल्स
-आभाळमाया: उरे तोच र॑ग
-बुनियाद
-जबान स॑भालके
-तमस (नीटसे आठवत नाही पण छान असावे)
-मु॑गेरीलाल के हसीन सपने
-विक्रम और वेतालः (चक्क केदार रागातले स॑गीत वापरले होते व वेताल' ह्या शब्दावर आलापीही होती. त्याचे माझ्या स॑गीत विशारद आईला खूप हसू यायचे :))
-एक शून्य शून्य (हे म्युझिक खरोखर॑च अ॑गावर काटा आणायचे!)
-किले का रहस्य (हेही टेरर होत॑)
-प्रतिभा आणि प्रतिमा (रविवार सकाळी सनईच्या सुरातले हे म्युझिक खूप आवडायचे)

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

फटू's picture

19 Oct 2008 - 12:40 pm | फटू

मी पाचवी किंवा सहावीला असताना म्हणजे साधारण ९३ - ९४ च्या आसपास दुरदर्शनवर "संघर्ष" नावाची मालिका लागत असे तिचे हे शिर्षकगीत...

आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा

मालिकेतलं काहीच आठवत नाही... पण हे गाणं मात्र या दोन ओळींच्या रुपाने मनात घर करुन राहीलं आहे...

खुप शोधलं हे गाणं जालावर पण नाही मिळालं...

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

mina's picture

19 Oct 2008 - 1:32 pm | mina

आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा
झिजूनी स्वतः चंदनाने
दुसर्‍यास मधुगंध द्यावा..
हे जाणता जीवनाचा
प्रारंभ हा ओळखावा
आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा

खरचं खुप अर्थपूर्ण गाणं. या गाण्यातल्या प्रारंभ या शब्दाबाबत मला थोडा संशय आहे.प्रारंभ च्या एवजी प्रारब्ध शब्द तर नाही ना..!असो पण..
खुप दिवसांनी या गाण्यानिमित्ताने माझी गाण्याची जुनी डायरी मी बाहेर काढली..आणि चक्क गायले.वा मजा वाटली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2008 - 12:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

साळसूदः कोण कुणास्तव जगतो मरतो.
माझ्याकडे नाही आहे हे गाणं, पण खूप छान अर्थही आहे त्याचा.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Oct 2008 - 12:30 pm | llपुण्याचे पेशवेll

दिलीप प्रभावळकरांनी गाजवलेली साळसूद ना? मस्त होते शिर्षकगीत. :) आणि मालिकापण.
(साळसूद)
पुण्याचे पेशवे

मदनबाण's picture

19 Oct 2008 - 12:46 pm | मदनबाण

मलाही ही शीर्षक गीते फार आवडतात..:--
१)गोट्या: बीज अ॑कुरे अ॑कुरे
२)स॑स्कारः मना घडवी स॑स्कार
३)१०० मालिका (जबरदस्त संगीत)
४)हॅलो इन्सेक्टर..(ऍनट ने भन्नाट गायले आहे)

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

अप्पासाहेब's picture

20 Oct 2008 - 11:17 am | अप्पासाहेब

१०० मालिका चे संगीत क्राफ्ट वर्क च्या 'मैन मशीन' या अल्बम मधुन.
अगदि जसेच्या तसे चोरलेले आहे.

लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 Oct 2008 - 12:51 pm | डॉ.प्रसाद दाढे

सुरभीचा उल्लेख राहिलाच की! माझे खूप आवडत॑ टायटल होत॑ व आहेही. (मी त्याचा रिन्गटोनही केलाय) कोरस, एक धीरग॑भीर आवाज व पै॑जण, बासरी, गिटार, घटमने एकदम अचूक वातावरण निर्मिती साधली होती.
भारत एक खोज व चाणक्यची शीर्षकगीतेही सु॑दर होती.
माझ्याकडे सुरभी, चाणक्य, भारत एक खोज, ज॑गलबुक, मालगुडी डेज, ब्योमकेश बक्षी व गॉडफादरची शीर्षकगीते आहेत (कारण ती जालावर सहज उपलब्ध आहेत) बाकी कुणाकडे आहेत का?

नंदन's picture

19 Oct 2008 - 1:11 pm | नंदन

लेख. आवडणार्‍या बर्‍याचशा शीर्षकगीतांचा उल्लेख वर डॉक्टरसाहेबांनी केलाच आहे. मराठी मालिकांतली ही काही आवडती -

१. महाश्वेता - भय इथले संपत नाही (ग्रेसच्या 'निष्पर्ण तरूंची राई' या कवितेचा काही भाग लताबाईंच्या आवाजात)
२. प्रपंच - माणूस होऊन जगणे थोडे जगून पहा, देवपणा तू सोडून खाली उतर जरा (कवी - सौमित्र)
३. नायक - कसं जगायचं, कसं वागायचं, कुणी सांगेल का मला...

बाकी श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेचं शीर्षकगीत छोटेखानी असलं, तरी मालिका आवडत असल्याने चालून जायचं :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2008 - 1:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

३. नायक - कसं जगायचं, कसं वागायचं, कुणी सांगेल का मला...
या गाण्यातली "माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला" ही ओळ मला फारच आवडते.

लिखाळ's picture

19 Oct 2008 - 3:54 pm | लिखाळ

> महाश्वेता - भय इथले संपत नाही (ग्रेसच्या 'निष्पर्ण तरूंची राई' या कवितेचा काही भाग लताबाईंच्या आवाजात)<
वा.. मला हे गाणं फार आवडते.
--लिखाळ.

भडकमकर मास्तर's picture

19 Oct 2008 - 1:48 pm | भडकमकर मास्तर

परमवीर : जो करी जिवाची होळी...
महान नाही पण त्या वेळी बरेच आवडलेले... मराठीमधला अगदी सुरुवातीचा डिटेक्टिव्ह म्हणून असेल कदाचित...
( आता वाटतं, हे मला आवडायचं?? काय काय वाटत असतं लहानपणी).

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

माझ्याकडे महाश्वेता,आभाळमाया,संघर्ष या मालिकांचे टायटल गीत आहेत. जीवनाचा अर्थ सांगणारी गाणी आजही ताजीतवानी आणि मनाला आनंद देऊन जातात. तुम्हाला बंदिनी मालिका आठवते..तिचं टायटल गीत-

बंदिनी स्त्री ही बंदिनी...
ह्यदयी पान्हा नयनी पानी
जन्मोजन्मीची कहाणी..बदिनी
रुप बहिणीची माया देई,वात्सल्यमूर्त आई होई
माहेर सोडून येई,सासरी सर्वस्व देई
ह्यदयी पान्हा नयनी पानी
जन्मोजन्मीची कहाणी..बदिनी
कधी सीता कधी होई कुंती,सावित्रीची दिव्यशक्ती
शकुंतला तुच होई,मीरा ही प्रीत व देवयानी
ह्यदयी पान्हा नयनी पानी
जन्मोजन्मीची कहाणी..बदिनी
युगे युगे भावनांचे धागे
जपावया मन तुझे जागे
बंधने...ही रेशमाची,सांभाळी प्रित मायेनी
ह्यदयी पान्हा नयनी पानी
जन्मोजन्मीची कहाणी..बंदिनी

भडकमकर मास्तर's picture

19 Oct 2008 - 2:18 pm | भडकमकर मास्तर

दुर्दैवाने बंदिनीचं हे शीर्षकगीत मला कधीच आनंद देऊन गेलं नाही , ताजंतवानं तर नाहीच केलं या गाण्याने...
.. स्त्रिया बंदिनी आहेत आणि ही जन्मोजन्मीची कहाणी आहे, हे कौतुकाने सांगणारे हे गीत मला कायम लिंगभेद करणारं वाटत आलंय.....
या गीतातला माझा आक्षेप बंदिनी शब्दाला आहे...आणि जन्मोजन्मीच्या कहाणीला आहे...( बाकी सगळं ठीक)...

मला आश्चर्य हेच वाटतं की खरंतर स्त्रियांना हे गाणं अधिक त्रास देणारं वाटायला हवं तर त्यांना ते जास्त आवडतं...
असो, ज्याची त्याची आवड, हेच खरं...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मला आश्चर्य हेच वाटतं की खरंतर स्त्रियांना हे गाणं अधिक त्रास देणारं वाटायला हवं तर त्यांना ते जास्त आवडतं...
अहो भडकमकरजी...गीताचा अर्थ बघा..इतकी माया लावूनही या पुरुषप्रधान संस्क्रुतीने तिला आजही बंदिस्त ठेवलं आहे.स्त्रीचं मोठेपण कळते या गीतातून..!आपलं दु:ख स्त्री उघडपणे कुणाला सांगू शकत नाही.त्यामुळे या गीताद्वारे ती आपल्या मनातल्या वेदना जणू व्यक्त करते.असा भाव या गीताचा असल्याने हे गीत स्त्रियांना जास्त आवडते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2008 - 3:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रीचं मोठेपण कळते या गीतातून..!आपलं दु:ख स्त्री उघडपणे कुणाला सांगू शकत नाही.त्यामुळे या गीताद्वारे ती आपल्या मनातल्या वेदना जणू व्यक्त करते.असा भाव या गीताचा असल्याने हे गीत स्त्रियांना जास्त आवडते.
मी भडकमकर मास्तरांशी सहमत आहे. या गाण्याचे कवी/कवयित्री कोण आहेत माहित नाही, पण ऐकताना असं वाटतं मोठेपणा द्यायचा आणि बंदिस्त करून ठेवायचं स्त्रिला, मग बंदिस्त केलं असेल तर पिंजरा काय आणि देऊळ काय, सारखंच!

अदिती

मनिष's picture

19 Oct 2008 - 4:15 pm | मनिष

अदिती/यमी/आज्जी/संहिता इ. इ. (हुश्श!!!) आणि मास्तरांशी सहमत!

भडकमकर मास्तर's picture

20 Oct 2008 - 12:43 am | भडकमकर मास्तर

मग बंदिस्त केलं असेल तर पिंजरा काय आणि देऊळ काय, सारखंच!

छान वाक्य आहे....सहमत...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

20 Oct 2008 - 12:45 am | भडकमकर मास्तर

स्त्रीचं मोठेपण कळते या गीतातून..!आपलं दु:ख स्त्री उघडपणे कुणाला सांगू शकत नाही.त्यामुळे या गीताद्वारे ती आपल्या मनातल्या वेदना जणू व्यक्त करते.
हे सगळं मान्य...
पण तिनं जन्मोजन्मी याच वेदना सहन कराव्यात असं कवीचं / कवयित्रीचं म्हणणं आहे असंही वाटतं, त्याचं काय?...
... या गाण्यात काही पॉझिटिव्ह निघेल असं वाटेपर्यंत पुन्हा जन्मोजन्मीची कहाणी म्हणून बदलाचे दरवाजे बंद केलेत असं वाटतं...
पॉझिटिव्ह म्हणजे निदान या अन्यायाविरुद्ध कोणीतरी स्त्री लढली, जन्मोजन्मीची कहाणी बदलायचा तिने काहीतरी प्रयत्न केला अशा अर्थाचे शब्द काहीतरी असते तर आधीच्या ओळींना अधिक अर्थ आला असता... शिवाय या कथासुद्धा माझ्या आठवणीप्रमाणे अत्यंत निगेटिव्ह शेवटाच्याच असत...
नाहीतर केवळ स्त्री प्रेक्षकांच्या अश्रूपातावर पैसे कमावणार्‍या सिनेमांमध्ये आणि या मालिकेत काहीच फरक नव्हता...

अर्थ समजून घेतला तरी बंदिनी शब्दाचे वृथा कौतुक का हे कळत नाही .......
काहींना आत्मपीडेत कौतुक वाटते असे असेल कदाचित ....
( विशेषतः जालावर खुट्ट होताच स्त्रियांच्या आत्मसन्मानाला ठेच लागत असते , इथंतर धडधडीत बंदिस्त असण्याचे कौतुक केले गेले आहे , तरी गाणं आवडतंच...आश्चर्य याचंच वाटतं..)...
.. बाकी ज्याची त्याची आवड, असं पुन्हा म्हणतो...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Oct 2008 - 11:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोण म्हणतो डॉ. दाढे वादग्रस्त विषय सोडून इतरही काही लिहितात (काही थोडेसे अपवाद वगळता)!
(ह. घ्या हे सां. न ल.)

भडकमकर मास्तर's picture

19 Oct 2008 - 1:54 pm | भडकमकर मास्तर

स्वामी... जो जनतेचे...
आणि द्विधाता मालिका १९९० ... विक्रम गोखले डबल रोल ... छान टायटल ट्रॅक होता...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

देवदत्त's picture

19 Oct 2008 - 9:36 pm | देवदत्त

आणि द्विधाता मालिका १९९० ... विक्रम गोखले डबल रोल ...
विक्रम गोखलेंचीच दुहेरी भूमिका असलेली मालिका होती 'प्रतिबिंब'.
त्याचे शीर्षक गीत आवडायचे मला. 'बिंबातून प्रतिबिंब जन्मले, प्रतिबिंबित हे बिंब जाहले.'

नंदन's picture

19 Oct 2008 - 1:58 pm | नंदन

नावाची एक मालिका (बहुतेक डीडी मेट्रोवर) लागायची. तिच्या शीर्षकगीतातलं वेगवेगळ्या सुरांत म्हटलेलं 'अहो, ऐकलंत का?' एवढंच आता लक्षात आहे. 'चाळ नावाची वाचाळ वस्ती'चे शीर्षकगीतही आता आठवत नाही. कुणाला आठवतंय का?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

19 Oct 2008 - 3:52 pm | विसोबा खेचर

लडकी है एक नाम, रजनी है..

हे गाणं मला फार आवडायचं! अजूनही आहेत, आठवेल तशी लिहितो...

डॉक्टर, हा धागा छान आहे! :)

तात्या.

पांथस्थ's picture

19 Oct 2008 - 3:57 pm | पांथस्थ

चुनौति - महाविद्यालयातील वातवरणावर आधारित...
"मन एक सिपी है, आशा मोती है
हरपल जीवन का एक चुनौति है..."

सुबह - अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांची कहाणी...

"ए जमाने तेरे सामने आगये
आजके दौरके नौजवा आगये...
दरपे तेरे बनके सुरज
लेके सुबह आगये अब हम..."

(गतकाळात रमणारा) पांथस्थ...

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Oct 2008 - 12:34 pm | llपुण्याचे पेशवेll

तिचे पण शिर्षकगीत मला आवडायचे. आता त्याचे शब्दही धड आठवत नाहीत. पण तेव्हा मात्र आवडले होते फार.
पुण्याचे पेशवे

संदीप चित्रे's picture

20 Oct 2008 - 9:50 pm | संदीप चित्रे

माझे टायपायचे कष्ट वाचवल्याबद्दल आभार :)

लिखाळ's picture

19 Oct 2008 - 3:57 pm | लिखाळ

नाजूका नावाची एक मालिका असे.. त्याचे गीत..
माझ्या जन्माची चित्तरकथा.... असे होते.. पुढचे आठवत नाही... पण तेव्हा तो चित्तरकथा हा शब्द मी प्रथमच ऐकला होता :)
आणि नाजूका परिक्षेला शहरात येते तो परिक्षेचा भाग माझ्या शाळेत चित्रित केला होता.. ते आठवते.. ती शाळेतल्या मोठ्या खांबांकडे पाहून ते किती मोठे आहेत असे काही म्हणते असे आठावते..पण ते खांब खरेच इतके मोठे आहेत हे मला तेव्हाचा जाणवले...
--लिखाळ.

सहज's picture

19 Oct 2008 - 4:23 pm | सहज

जसपाल भट्टीची फ्लॉप शो नावाची मालीका होती

त्याचे शीर्षक गीत छान होते. :-)

अवलिया's picture

19 Oct 2008 - 4:53 pm | अवलिया

सर्वात प्रथम वादरहीत विषय चर्चेला आणल्याबद्दल अभिनंदन व वाढदिवसाच्या (झालेल्या व येणा-या) शुभेच्छा!!!

भारत एक खोज चे शीर्षक गीत जे ऋग्वेदातील नासदीय सुक्तावर आधारीत आहे ते आवडते. ते लिखित स्वरुपात माझ्या खव च्या स्वागत परिच्छेदात आहे.

घासू's picture

19 Oct 2008 - 4:55 pm | घासू

मलाही ह्या मालिका व त्यांची शीर्षक गीते फार आवडतात अजूनही..:--

१)हॅलो इन्सेक्टर
२) राऊ
३)एक शुन्य शुन्य
४)फ्लॉप शो
५)सर्कस
६)सुरभि
७)श्रीयुत गंगाधर टिपरे
८)गोट्या

आणी बर्‍याच........... (कॄपया आपण ज्या ज्या मालिकांचे शीर्षक गीते इटंरनेटवर उपलब्ध त्याचा दुवा द्यावा)

जुनं ते सोनं मानणारा आधुनिक घासू

स्वामि's picture

19 Oct 2008 - 7:40 pm | स्वामि

हिला कसे काय विसरलात बरे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Oct 2008 - 8:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दर्‍याखोर्‍यात फुलते तू ग रानजाई
रामायण
विक्रम-विक्रम वेताळ -वेताळ
ज॑गल ज॑गल बात चली है
फ्लॊप शो
दादा-दादी की कहाणी
सुरभी

वरील कार्यक्रम आठवणीने पाहत असायचो, चांगल्या आठवणी चाळवल्या आज !!!
(नगरपालिकेतल्या टीव्हीवर, मित्राच्या घरी रंगीत टीव्हीवर कोणताही कार्यक्रम पाहायला आवडायचा )

बोका's picture

19 Oct 2008 - 8:50 pm | बोका

लतादिदींच्या आवाजात स्वयंसिद्धा चे ...
एक दफा तो अपना जीवन, मुझको खुद ही बोने दो
लिख ले ने दो अपनी किस्मत , होना हैं जो होने दो

________________________________________

आशाताईंच्या आवाजात रथचक्र चे ...
... एक रोज अचानक धरती में , जीवन के रथ का चक्र धसा

________________________________________

...आणि शाळेत असताना अत्यंत आवडते ...
चिमणराव अन गुंड्याभाऊ
राघु मैना सोबत काऊ
खळखळून हसवायाला...
आला रे आला, चिमण आला

प्राजु's picture

19 Oct 2008 - 9:14 pm | प्राजु

भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते...

ही सुरेश भटांची कविता .. महाश्वेता.. या मालिकेचं शिर्षक गीत होतं.
वादळवाट या मालिकेचं शिर्षक गीतही मला खूप आवडतं.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

20 Oct 2008 - 1:00 am | भडकमकर मास्तर

भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते...

ही सुरेश भटांची कविता .. महाश्वेता..

ही कविता ग्रेस यांची ना?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Oct 2008 - 12:36 pm | llपुण्याचे पेशवेll

'भय इथले' कवि ग्रेस यांचीच..

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शूनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघवशेला.

-(खात्रीशीर)
पुण्याचे पेशवे

वर्षा's picture

19 Oct 2008 - 9:29 pm | वर्षा

'कुछ खोया कुछ पाया' अशी एक हिंदी सिरीयल होती...(बहुतेक 'पडघवली' नामक कादंबरीवर आधारीत) शीर्षकगीत छान होतं. लताबाईंच्या आवाजात.
(शब्द चू.भू.द्या. घ्या)
यादों के धुंदले दर्पन में
बीते हर एक पल की छाया है
हर मोड पे मैनें जीवन के
कुछ खोया है कुछ पाया है
मस्त धागा आहे. यानिमित्ताने जुन्या आठवणी उगाळल्या जातायत.
'श्वेतांबरा' नावाची पण एक सिरीयल होती...पण त्याचं शीर्षकगीत कसं होतं आठवत नाही...
नवीन मालिकांपैकी 'मानसी तुमच्या घरी'चं देवकी पंडीत यांच्या आवाजातलं शीर्षकगीत खासच आहे. (मी झीमराठी वरुन डाऊनलोड केलं)
'कशी वेल्हाळ वेल्हाळ
त्यांना हवीशी हवीशी
सार्‍या सख्यासजणींचे
मन मानसी मानसी'
:)
-वर्षा

देवदत्त's picture

19 Oct 2008 - 9:59 pm | देवदत्त

माझी आवडती भरपूर गीते वर येऊन गेली आहेतच.
संस्कार, जंगल बुक, गोट्या,ऍलिस इन वन्डरलॅन्ड, आभाळमाया, मु॑गेरीलाल के हसीन सपने, हॅलो इन्स्पेक्टर,नायक
इन्कार पण ही मालिका आधीच्या 'चुनौती'व 'सुबह' एवढी चालली नाही.
मेरे यारों,मेरे प्यारो, ...... (ह्या ओळी आठवत नाहीत)
गलत जो राहें, तुमको बुलाए, कर दो तुम इन्कार.

असे पाहुणे येती
असे पाहुणे.. असे पाहुणे.. असे पाहुणे येती...

आणखी एक हिंदी मालिका होती, दाने अनार के
त्याचेही शीर्षकगीत तेव्हा आवडायचे.
किस्सा है कहानी है पहेली है,जिंदगी ये __ की सहेली है

एक दो तीन चार
एक दो तीन चार.. चारो मिल के साथ चलें तो कर दे चमत्कार.
अशीच एक मालिका आली होती, सुपर सिक्स . त्याचे ही शीर्षक गीत तेव्हा आवडायचे.

लेखू, मोहन गोखलेंची मालिका. ह्याचे ही शीर्षक गीत चांगले होते. आता नीट आठवत नाही पण एक हिंदी सिनेमा 'टिंकू' ह्यातील 'टिंकू खो गया' गाण्याचीच चाल होती ती.

गुणीराम भई गुणीराम आ पहुंचे बंबई धाम.
मि. योगी, मि. योगी....

नुक्कड...बडे शहर की एक गली में बसा हुआ है नुक्कड. नुक्कड के सारे वासी है तकदीरों से फक्कड........

अरेच्च्या, लहानपणीच्या बहुतेक सर्वच मालिकांची यादी येईल बहुधा येथे ;) तेव्हा बहुतेक सगळेच आवडायचे :D

घाटावरचे भट's picture

19 Oct 2008 - 10:32 pm | घाटावरचे भट

'स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट' या मालिकेच्या शेवटी लागणारे गीत/धुन (कारण त्यात शब्द नाहीयेत). ही धुन ए.आर. रेहमानने बनवली आहे. लैच्च भारी!!
ती धुन इथे ऐकता येईल.

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

भाग्यश्री's picture

20 Oct 2008 - 12:56 am | भाग्यश्री

तुमचे लाख लाख आभार!! ही माझी सगळ्यात आवडती धून आहे.. :)

अनामिका's picture

19 Oct 2008 - 10:49 pm | अनामिका

बंदिनी या गीताचे गीतकार शांताराम नांदगावकर.
सध्याच्या मालिकांपैकी अवघाची संसार याचे शिर्षक गीत
मन माझे मोरपिषी स्वप्न जणु.........
मन माझे शिशिरातील इंद्रधनु ..............
हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज...........
नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश.....
राखेतुन मीच नवा घेतला आकार..........
उधळुन जाइ पुन्हा अवघाची हा संसार...........

तसेच जगावेगाळी या मालिकेचे शिर्षक गीत

सुखाचा तिचा गोड संसार होता
कुणाची कशी दृष्ट त्या लागली?
जळी सोडलेले दिवे दुर गेले
तरी सर्व नाती तिने सांधली
जगावेगळी...........
जरी संकटे पावलो -पावली
उभारी परि ना तिची भंगली
उन्हे सोसुनी दे जगा साऊली
जगावेगळी..............
अप्रतिम आहेत.

"अनामिका"

विद्य।धर बिवरे's picture

19 Oct 2008 - 11:05 pm | विद्य।धर बिवरे

शीर्षक गीत लेख आवडला. ल़क्षात रहाण्यासारख्या शीर्षक धून असतील तर यादी पाठवावी.

भडकमकर मास्तर's picture

20 Oct 2008 - 1:04 am | भडकमकर मास्तर

टिपू सुल्तानचा टायटल ट्रॅक मस्त होता... माझ्या आठवणीप्रमाणे नौशाद यांनी केला होता...
अवांतर : (मात्र मालिकेत महाराष्ट्रातले सैन्य शत्रुपक्षातले असायचे याचा वैताग येत असे... आणि तो द्राक्षं खात बोलणारा राजा... त्या नटाचं नाव होतं पप्पू पॉलिस्टर)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अनिता's picture

20 Oct 2008 - 4:33 am | अनिता

एक तितली..अनेक तितलिया.., एक गिलहरी..अनेक गिलहरीया..
दुरदर्शनवर लागायचे हे गाणे..फिल्म डिविजन कि॑ भे॑ट असे नाव सुरुवातीला असायचे...

अनिता's picture

20 Oct 2008 - 4:36 am | अनिता

पडघवली.., फास्टर फेणे...स्पायडरमन (कार्टून..., डी डीज कोमेडी शो च्या आधि )

ई टीव्ही वर यायची ही मालीका कदाचीत आताही येत असेल .त्याचे शिर्षक गीत मला खुप आवडायचे

ह्या गोजीरवाण्या घरात सारे अपुल्या मर्जीचे राजे
ह्या गोजीरवाण्या घरात सारे अपुल्या मर्जीचे राजे
कशी जपावी कुणा कळेणा ही रक्ताची नाती
माणुसकी अन परंपरा ही सारे विसरुण जाती
एका छायेखाली बघा कश्या नांदती
ह्या जुण्या नव्या संस्क्रुती
ह्या गोजीरवाण्या घरात सारे अपुल्या मर्जीचे राजे
ह्या गोजीरवाण्या घरात सारे अपुल्या मर्जीचे राजे
---नि३.

डोमकावळा's picture

20 Oct 2008 - 8:07 am | डोमकावळा

वर सांगितलेल्या गाण्यांपैकी बरीचशी गाणी आवडणारी आहेत.
पण मला त्यापैकी सगळ्यात जास्त आवडणारे म्हणजे आभाळामाया..
देवकीताई पंडीत यांच्या आवाजातलं हे गाणं काही वेगळीच छाप टाकत.
मी ती मालिका कधी जास्त पाहिली नाही पण ते गाणं मात्र आवर्जून ऐकायचो.

जडतो तो जीव, लागते ती आस
बुडतो तो सूर्य, उरे तो आभास
कळे तोच अर्थ, उरे तोच रंग
ढळतो तो अश्रु , सुटतो तो संग
दाटते ती माया, सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव, ते तर आभाळ
घननीळा डोह, अतिगुढ माया,
आभाळ माया.... आभाळ माया....

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

वर्षा's picture

20 Oct 2008 - 9:03 am | वर्षा

मला वाटतं टिपू सुलतानचा टायटल ट्रॅक खय्याम यांचा होता....
-वर्षा

डॉ.प्रसाद दाढे's picture

20 Oct 2008 - 12:34 pm | डॉ.प्रसाद दाढे

नाही. टिपू सुलतानचे टायटल व पार्श्वस॑गीत नौशादमिया॑चेच होते. अप्रतिम होते (सिरियलचा विषय नालायक टिपूला स्वात॑त्र्ययोद्धा दाखविणारा असला तरी)
खय्यामसाहेबा॑नी त्यान॑तर आलेल्या अकबर दि ग्रेट ला स॑गीत दिले होते.

ऋचा's picture

20 Oct 2008 - 9:14 am | ऋचा

मला आवडणारी शिर्षक गीते-
गोट्या- बीज अंकुरे अंकुरे
सुरभी
जंगल बुक-जंगल जंगल बात चली है
तहकीकात
आमची माती आमची माणसं :)
टेल स्पीन

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ's picture

20 Oct 2008 - 9:48 am | विजुभाऊ

मला "स्वामी" मराठी मालीकेचे शीर्शक गीत आवडायचे
"जो जनतेचे रक्षण करत तोच पिता साक्षात मानावा"....
स्वामी (हिन्दी)आणि मालगुडी डेज या आर के नारायण लिखीत मालिकेचे "तानाना ताना ना....."
ही आख्खी मालीका माझ्याकडे डीव्हीडी वर आहे.
अवांतरः गोट्या मालिकेत कधितरी मध्यन्तर यायचा. तेंव्हा निवेदीका म्हणायची आता पहा गोट्याचा पुढील भाग..... जाम हसु यायचे

गणा मास्तर's picture

20 Oct 2008 - 10:46 am | गणा मास्तर

मला चंद्रकांताचे शिर्षक गीत आवडाय्चे
नौगड विजयगद की टकरार
नौगड का था जो राजकुमार,
चंद्रकांतासे करता था प्यार
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

बेसनलाडू's picture

20 Oct 2008 - 11:23 am | बेसनलाडू

या मालिकांची शीर्षकगीते फार आवडतात.
(कानसेन)बेसनलाडू

ईश्वरी's picture

20 Oct 2008 - 1:37 pm | ईश्वरी

'ये जो है जिंदगी' ही लहानपणी पाहीलेली एक मस्त हलकी फुलकी सिरियल होती. त्याचे शिर्षक गीत ही आवडायचे.

http://www.youtube.com/watch?v=S2760NU_jVM

'स्वामी' चे ही शिर्षक गीत सुंदर होते.

ईश्वरी

गणपा's picture

20 Oct 2008 - 5:51 pm | गणपा

मस्त धागा चालु केलाय दाढे साहेब,
बाल पणीच्या बर्‍याच स्मॢती जाग्या झाल्यात. बरीचशी शिर्षक गीते वर आलीच आहेत.

मी लहान असताना एक विंग्रजी पपेट शो यायचा फायर बॉल XL५ तेव्हा अर्थ समजायचा नाही, पण चाल खूप आवडायची.
पोटली बाबाकी नावाच्या हिंदी पपेट शोचं शिर्षक पण मस्त होत.

खडूस's picture

20 Oct 2008 - 10:54 pm | खडूस

चाणक्य आणि भारत एक खोज
तलाश
दरार (रिश्तों में दरार आयी - जगजीत सिंग )

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

चटोरी वैशू's picture

24 Oct 2008 - 12:08 pm | चटोरी वैशू

मिट्टी के रंग : दुनिया बदल गयी इन्सान बदल गये.... बदले नही कभि मिट्टी के रंग ...
देख भई देख : देख भई देख इस रंग बदलती दुनिया में क्या तेरा है क्या मेरा है.... देख भई देख
महाश्वेता : भय इथले संपत नाही ...
अजून आहेत पण आत्ता एवढेच आठवताय....